Gedit-Text-Editor/C3/Snippets-in-gedit/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | gedit Text editor मध्ये Snippets वरील स्पोकन ट्युटोरिअलमधील आपले स्वागत आहे. |
00:08 | ह्या ट्युटोरिअलमध्ये, आपण डीफॉल्ट Snippets चा उपयोग, |
00:13 | नवीन snippets जोडणे, |
00:15 | snippets डिलीट करणे, |
00:17 | Highlight matching brackets आणि Document Statistics शिकणार आहोत. |
00:22 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी उबंटू लिनक्स 14.04 ऑपरेटिंग सिस्टम , gedit Text editor 3.10 वापरत आहे. |
00:33 | ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यासाठी आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00:39 | snippests काय आहेत? |
00:41 | snippests टेक्स्ट किंवा सोर्स कोडची लाईन्स आहेत जे प्रोग्राम लिहिताना नेहमी वापरले जातात. |
00:49 | हे युजरला पुन्हापुन्हा टायपिंग करण्याशी टाळतो. |
00:54 | Snippets हे gedit Text editor मधील डिफॉल्ट प्लगइन्सपैकी एक आहे. |
00:59 | आपण Snippets कसे तयार करू आणि वापरू शकतो ते पाहू. |
01:04 | gedit Text editor उघडा. |
01:08 | प्रथम आपल्याला Snippet plugin सक्षम करणे आवश्यक आहे. |
01:12 | Main मेनूमधून Edit आणि Preferences वर क्लिक करा. |
01:17 | Plugin टॅबमध्ये, खाली स्क्रोल करा आणि Snippets बॉक्स चेक करा. |
01:23 | Close वर क्लिक करा. |
01:25 | दिलेली संख्या सकारात्मक किंवा नकारात्मक आहे का ते तपासण्यासाठी C प्रोग्राम लिहू. |
01:32 | प्रथम फाईल NumCheck.c म्हणून सेव्ह करा. |
01:39 | ट्युटोरिअल थांबवा आणि हा कोड आपल्या gedit Text editor मध्ये टाईप करा. |
01:44 | आपण टायपिंग पूर्ण केल्यानंतर, तुमचा कर्सर पुढील ओळीवर ठेवा. |
01:49 | आता, If शब्द टाईप करा आणि Tab की दाबा. |
01:54 | आपण इथे If स्टेटमेंटची आपोआप आलेली संरचना पाहू शकतो? |
02:00 | कृपया लक्षात घ्या की कर्सर डिफॉल्टनुसार condition शब्दावर आहे, |
02:05 | num==0 टाईप करा. |
02:09 | condition शब्द अधिलिखित आहे. |
02:12 | आपण पाहू शकतो ओपन कर्ली ब्रेसेस आणि एण्ड ब्रेसेस स्वयंचलितपणे समाविष्ट आहेत. |
02:18 | कारण मागील ट्युटोरिअलमध्ये आपण Intelligent text completion नावाचे plugin जोडले होते. |
02:26 | printf open brackets double quotes टाईप करा. |
02:31 | लक्ष द्या कि एन्ड डबल कोट्स देखील आपोआप आले आहेत. |
02:36 | हे आठवा की Intelligent Text Completion चे एक फिचर्स Auto close brackets and quotes आहे. |
02:44 | आता येथे दाखविल्याप्रमाणे टाईप करा. |
02:48 | आता, Main मेनूमधून, Tools आणि Manage Snippets निवडा. |
02:54 | Manage Snippets डायलॉग-बॉक्स प्रदर्शित होतो. |
02:56 | डाव्या बाजूच्या पॅनलवर, खाली स्क्रोल करा आणि C निवडा. |
03:02 | त्याच्यापुढील त्रिकोण चिह्नावर क्लिक करा. |
03:06 | C साठी सर्व Snippets ची सूची येथे सूचीबद्ध केली आहे. |
03:11 | If स्निपेटवर क्लिक करा. |
03:14 | वरच्या उजव्या पॅनलमध्ये, आपण C लँग्वेजमधील if स्टेटमेंटसाठी संपूर्ण सिंटेक्स पाहू शकतो. |
03:21 | उजव्या तळाशी Tab Trigger फिल्डकडे पाहा. हे डीफॉल्टपणे If असे प्रदर्शित केले जाते. |
03:30 | तर If टाईप करून आणि टॅब की दाबून, संपूर्ण If स्टेटमेंट घातले जाते. |
03:38 | else if नावाचे आणखी एक snippet पाहू. |
03:42 | डाव्या बाजूवर, C अंतर्गत else if स्निपेट वर क्लिक करा. |
03:48 | शीर्षस्थानी असलेल्या उजव्या पॅनलवर आपण सिंटेक्स पाहू शकतो. |
03:53 | लक्षात घ्या Tab trigger मध्ये elif आहे. |
03:56 | Close वर क्लिक करा. |
04:00 | आपल्या प्रोग्राममध्ये हे snippet कसे वापरायचे ते पाहू. |
04:04 | elif टाईप करा आणि tab दाबा. |
04:09 | आपण पाहू शकतो की else if साठी सिंटेक्स इथे प्रविष्ट झाला आहे. |
04:14 | येथे दाखविल्याप्रमाणे प्रोग्राम कोड टाईप करा. |
04:19 | म्हणून, Snippets च्या मदतीने, आपण आपल्या source code मध्ये वारंवार टायपिंग टाळू शकतो. |
04:26 | आता आपले स्वतःचे Snippet कसे बनवायचे ते पाहू. |
04:30 | आता Main मेनूमधून, Tools आणि Manage snippets वर क्लिक करा. |
04:38 | प्रदर्शित झालेल्या Manage Snippets डायलॉग-बॉक्समध्ये, C निवडा. |
04:42 | विंडोच्या खाली डाव्या बाजूस, नवीन snippet तयार करण्यासाठी plus चिह्नावर क्लिक करा. |
04:49 | HelloWorld टाईप करा आणि Enter दाबा. |
04:53 | त्यानंतर Edit पॅनेलवर क्लिक करा. |
04:56 | खालील कोड टाईप करा. हा C मधील एक साधा मूलभूत प्रोग्राम आहे. |
05:02 | Tab trigger फिल्डमध्ये, hello टाईप करा. हे एडिटरमध्ये वापरलेले शॉर्टकट कीवर्ड आहे. |
05:10 | Close वर क्लिक करा. |
05:13 | gedit Text editor मध्ये एक नवीन डॉक्युमेंट उघडा. |
05:18 | फाईल helloworld.c म्हणून सेव्ह करा. |
05:22 | आपण .c एक्सटेंशनसह फाईल सेव्ह न केल्यास, snippets काम करणार नाही. |
05:29 | हे फाईलला टेक्स्ट फाईल च्या रूपात समजेल, c प्रोग्राम फाईल म्हणून नाही. |
05:35 | hello टाईप करा आणि Tab की दाबा. |
05:39 | आपण HelloWorld स्निपेटमध्ये टाईप केलेले टेक्स्ट येथे प्रविष्ट झाला आहे. |
05:45 | अशा प्रकारे आपण कस्टम snippet तयार करतो आणि वापरतो. |
05:50 | पुढे Snippet डिलीट कसे करायचे ते पाहू. |
05:54 | Main मेनूमधून, Tools आणि Manage Snippets वर क्लिक करा. |
05:59 | snippet लिस्टमध्ये C वर क्लिक करा. |
06:02 | आपण तयार केलेला स्निपेट HelloWorld वर क्लिक करा. |
06:07 | विंडोच्या तळाशी डावीकडे, snippet डिलीट करण्यासाठी minus आयकॉनवर क्लिक करा. |
06:13 | snippet डिलीट झाला आहे. |
06:16 | आता, सूचीमधून snippet While loop शोधा आणि डिलीट करण्यासाठी हे निवडा. |
06:23 | येथे आपण पाहू शकतो की delete आयकॉन अक्षम झाले आहे. |
06:28 | याचाच अर्थ आहे की आपण तयार केलेले snippets डिलीट केले जाऊ शकतात, डिफॉल्ट असलेले नाही. |
06:35 | Close वर क्लिक करा. |
06:37 | NumCheck.c टॅबवर पुन्हा जाऊ. |
06:42 | ह्या C प्रोग्राममध्ये, आपण वेगवेगळ्या प्रकारचे ब्रॅकेट्स पाहू शकता. |
06:47 | कधीकधी, आपण ओपनिंग ब्रॅकेटशी जुळणाऱ्या क्लोजिंग ब्रॅकेटचा ट्रॅक गमावू शकतो. |
06:54 | समान ब्रॅकेट्सना कसे हायलाईट करायचे ते पाहू. |
06:58 | Main मेनूमध्यू Edit आणि Preferences वर क्लिक करा. |
07:03 | View टॅबमध्ये, Highlight matching brackets बॉक्स चेक करा. |
07:07 | Close वर क्लिक करा. |
07:09 | आता, प्रोग्रामच्या सुरूवातीला कर्सर ओपन कर्ली ब्रेसेसवर ठेवा. |
07:15 | लक्षात घ्या की शेवटचे क्लोज कर्ली ब्रेसेस ताबडतोब हायलाईट झाली आहे. |
07:22 | आपला कर्सर दुसऱ्या ओपन कर्ली ब्रेसेसवर ठेवा. |
07:27 | लक्षात घ्या की दुसरा शेवटचा क्लोज कर्ली ब्रेसेस राखाडी रंगात हायलाईट झाला आहे. |
07:33 | हा प्रोग्राममधील ब्रॅकेटचा ट्रॅक ठेवण्याचा हा एक चांगला मार्ग आहे. |
07:38 | हे सुनिश्चित करते की सर्व ओपन ब्रॅकेट्समध्ये संबंधित क्लोजिंग ब्रॅकेट्स आहेत. |
07:44 | आता आपण Document Statistics च्या वैशिष्ट्यांबद्दल शिकू. |
07:49 | Document Statistics plugin सध्याच्या डॉक्युमेंटशी संबंधित विविध आकडेवारी दर्शविते. |
07:56 | हे माहिती दाखवते जसे - Number of words, Number of lines, Number of characters, Number of non-space characters, Size of the file in bytes. |
08:10 | gedit Text editor वर पुन्हा जाऊ. |
08:14 | Main मेनूमध्ये Edit आणि Preferences वर क्लिक करा. |
08:19 | Plugins टॅबवर क्लिक करा. |
08:22 | Document Statistics ऑप्शन पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. |
08:26 | जर Document Statistics plugin सक्षम नाही तर ते चेक करा. |
08:32 | Close वर क्लिक करा. |
08:34 | Main मेनूमधून, Tools and Document Statistics निवडा. |
08:39 | Document Statistics डायलॉग-बॉक्स उघडतो. |
08:43 | हे डॉक्युमेंट NumCheck.c मध्ये lines, words, characters आणि bytes सह आकडेवारी प्रदर्शित करते. |
08:53 | NumCheck.c फाईलमध्ये, दर्शविल्याप्रमाणे शब्द बदला. |
09:01 | आता Document Statistics डायलॉग बॉक्समधून Update वर क्लिक करा. |
09:07 | लक्षात घ्या की माहिती आपण केलेल्या बदलांमध्ये अपडेट झाली आहे. |
09:12 | Close वर क्लिक करा. |
09:15 | एखाद्या डॉक्युमेंटमध्ये शब्दांची निश्चित संख्या आवश्यकता असताना हे फिचर्स अतिशय उपयुक्त आहेत. |
09:22 | आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
09:25 | सारांशित करू. |
09:27 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण डीफॉल्ट Snippets वापरणे. |
09:32 | नवीन snippets जोडणे. |
09:34 | snippets डिलीट करणे. |
09:36 | Highlight matching brackets आणि Document Statistics शिकलो. |
09:41 | इथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे. |
09:44 | company header नावाचे एक नवीन कस्टम snippet तयार करा. |
09:49 | edit पॅनेलमध्ये कंपनीचा संपूर्ण पत्ता एंटर करा. |
09:53 | Tab trigger फिल्डमध्ये, company म्हणून shortcut key प्रविष्ट करा. |
09:58 | नवीन डॉक्युमेंट उघडा आणि snippet वापरा. |
10:02 | खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा. |
10:10 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम स्पोकन टयूटोरिअलच्या सहाय्याने कार्यशाळेचे आयोजन करते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण करणाऱ्यांना प्रमाणपत्रे देते. |
10:19 | अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा. |
10:22 | कृपया आपले प्रश्न वेळेसहित ह्या फोरममध्ये पोस्ट करा. |
10:26 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:39 | हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |