Linux-Old/C2/Ubuntu-Software-Center/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:29, 6 September 2018 by Nancyvarkey (Talk | contribs)
Time | Narration |
00:00 | Ubuntu Software Center वरील स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:04 | यात आपण शिकू Ubuntu Software Center चा वापर. |
00:09 | Ubuntu Operating System वर सॉफ्टवेअरdownload, install, update आणि uninstall करणे . |
00:16 | Ubuntu Software Center म्हणजे काय? |
00:18 | हे Ubuntu वरील सॉफ्टवेअरचे व्यवस्थापन करणारे टूल आहे. |
00:23 | याचा वापर सॉफ्टवेअर शोधणे, download, install, update आणि uninstall करण्यासाठी होतो. |
00:30 | तसेच Ubuntu Software Center, प्रत्येक सॉफ्टवेअरचे reviews आणि ratings ची सूची दाखवतो. |
00:36 | अशा प्रकारे सॉफ्टवेअरबद्दलची माहिती ते वापरण्यापूर्वी आपल्याकडे असते. |
00:41 | ते सॉफ्टवेअरच्या पूर्व इतिहासाची नोंदही ठेवते. |
00:45 | या ट्युटोरियलमध्ये आपण Ubuntu 11.10 versionवरील Ubuntu Software Center वापरणार आहोत. |
00:52 | आता पुढे जाऊ या. |
00:54 | तुमचे इंटरनेट चालू असणे आवश्यक आहे. |
00:56 | सॉफ्टवेअर इन्स्टॉल करण्यासाठी तुम्हाला Administrator rights असणे आवश्यक आहे. |
01:04 | तुमच्या Launcher वरील Ubuntu Software Center आयकॉनवर क्लिक करा. |
01:08 | Ubuntu Software Centerची विंडो उघडेल. |
01:12 | विंडोच्या वरती डावीकडे All Software, Installed आणि History ही बटणे दिसतील. |
01:19 | वरती उजवीकडे कोप-यात Search field दिसेल. |
01:23 | Ubuntu Software Center दोन पॅनेल्समध्ये विभागलेले असते. |
01:28 | डावीकडील पॅनेल सॉफ्टवेअर categories ची सूची दाखवते. |
01:33 | उजवीकडील पॅनेल What's New आणि Top Rated ची सूची दाखवेल. |
01:38 | What's New panel नव्याने उपलब्ध झालेल्या सॉफ्टवेअरची सूची दाखवते. |
01:42 | Top Rated panel मध्ये सर्वाधिक user rating असलेली आणि वारंवार डाऊनलोड झालेल्या सॉफ्टवेअरची यादी दिसेल. |
01:51 | category प्रमाणे सॉफ्टवेअर ब्राऊज करू या. |
01:55 | डाव्या पॅनेलमधील Internet वर क्लिक करा. |
01:58 | Internet या category साठी Internet software आणि top rated software अशी यादी दाखवली जाईल. |
02:05 | काही सॉफ्टवेअरच्या नावाशेजारी tick mark केलेले वर्तुळ दिसेल. |
02:10 | याचा अर्थ ते सॉफ्टवेअर तुमच्या संगणकावर आधीच इन्स्टॉल केलेले आहे. |
02:15 | All च्या आयकॉनवर क्लिक करून Internet category मधील अधिक सॉफ्टवेअर बघू शकतो. |
02:21 | Internet या category तील उपलब्ध सॉफ्टवेअर विंडोमध्ये दिसतील. |
02:26 | तसेच आपण सॉफ्टवेअर Name, Top Rated किंवा Newest First प्रमाणे सॉर्ट करू शकतो. |
02:32 | वरती उजवीकडील कोप-यात असलेल्या drop-down वर क्लिक करा. |
02:36 | सूची मधील By Top Rated हा पर्याय निवडा. |
02:40 | Internet सॉफ्टवेअरची मांडणी त्यांच्या ratings नुसार झाली आहे. |
02:45 | तुमच्या संगणकावर इन्स्टॉल केलेल्या सॉफ्टवेअरची संपूर्ण यादी बघण्यासाठी, |
02:50 | Installed या बटणावर क्लिक करा. |
02:53 | सॉफ्टवेअरची category दाखवली जाईल. |
02:56 | Sound आणि Video च्या अलीकडे असलेल्या छोट्या त्रिकोणी बटणावर क्लिक करा. |
03:02 | संगणकावरील Sound आणि Videoशी संबंधित सॉफ्टवेअरची यादी दिसेल. |
03:08 | All Softwareवर क्लिक करा आणि drop-down मधील Provided by Ubuntu हा पर्याय निवडा. |
03:14 | Ubuntuद्वारा प्रदान केलेल्या सर्व सॉफ्टवेअरची यादी दिसेल. |
03:19 | आता VLC media player हे सॉफ्टवेअर इन्स्टॉल करू या. |
03:24 | विंडोवरती उजव्या बाजूला Search box मध्ये VLC टाईप करा. |
03:29 | VLC media player दिसेल. |
03:33 | इन्स्टॉलवर क्लिक करा. |
03:35 | Authentication नामक dialog box उघडेल. |
03:38 | तुमचा system password टाईप करा. |
03:42 | Authenticate वर क्लिक करा. |
03:44 | progress bar कडे बघा. आपल्याला VLCइन्स्टॉल होत असल्याचे दिसत आहे. |
03:50 | पॅकेजच्या आकारमानानुसार ते इन्स्टॉल होण्यासाठी लागणारा वेळ कमी जास्त असू शकतो. |
03:57 | वरती progress दाखवणारे बटण ही उपलब्ध आहे. |
04:02 | Installation ची क्रिया होत असताना आपण इतर applications ही निवडू शकतो. |
04:07 | एकदा VLCइन्स्टॉल झाले की त्याच्या समोर एक छोटा tick mark दिसेल. |
04:13 | उजवीकडे Remove बटण दिसत आहे. |
04:17 | जर आपल्याला VLC uninstall करायचे असेल तर केवळ Removeया बटणावर क्लिक करा. |
04:23 | अशाच प्रकारे आपण इतर सर्व सॉफ्टवेअर पॅकेजेस शोधून इन्स्टॉल करू शकतो. |
04:29 | आता आपणHistory बघू या. |
04:31 | येथे आपल्याला आपण केलेले सर्व बदल बघता येतात. जसे की installations, |
04:37 | updates आणि काढून टाकलेली सॉफ्टवेअर्स. |
04:40 | History वर क्लिक करा. Historyचा डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:45 | All Changes, Installations, Updates आणि Removals आपण History मध्ये बघू शकतो. |
04:51 | All Changes वर क्लिक करा. |
04:53 | आपण केलेले सर्व बदल दिसतील म्हणजेच Installations, Updates आणि Removals. |
05:01 | तुम्ही इन्स्टॉल केलेली सॉफ्टवेअर नियमितपणे Update करू शकता. |
05:07 | Ubuntu च्या वेबसाईटवर तुम्हाला Ubuntu आणि Ubuntu Software Center बद्दलची अधिक माहिती मिळेल. |
05:17 | अशा प्रकारे आपण ह्या ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
05:21 | यात आपण शिकलो Ubuntu Software Center चा वापर. |
05:26 | तसेच आपण Ubuntu Operating System वर सॉफ्टवेअर download, install, update आणि un-install करण्याबद्दल शिकलो. |
05:36 | आता assignment करू या. |
05:39 | Ubuntu सॉफ्टवेअरच्या मदतीने Thunderbird हे सॉफ्टवेअरDownload आणि install करू. |
05:46 | *प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
05:49 | *ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05:52 | *जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
05:57 | *स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
05:59 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
06:02 | *परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
06:06 | *अधिक माहितीसाठी कृपया या संकेतस्थळाला जा./अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा. |
06:12 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
06:17 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
06:24 | *यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:28 | spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen Intro |
06:35 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |
Contributors and Content Editors
Nancyvarkey, PoojaMoolya, Pratik kamble, Pravin1389, Ranjana, Sneha