Inkscape/C2/Create-and-edit-multiple-objects/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 12:35, 27 November 2015 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Inkscape वापरून “Create and edit multiple objects” वरील पाठात आपले स्वागत.
00:08 आपण शिकणार आहोत- * ऑब्जेक्टस कॉपी आणि पेस्ट करणे
00:13 * ऑब्जेक्टसची दुसरी प्रत आणि क्लोन बनवणे
00:16 * अनेक ऑब्जेक्टसचा संच बनवणे आणि क्रम लावणे
00:19 * Multiple selection आणि invert selection
00:22 * Clipping आणि Masking.
00:25 या पाठासाठी वापरणार आहोत- * उबंटु लिनक्स 12.04 OS
00:31 * इंकस्केप वर्जन 0.48.4
00:35 Dash home वर जाऊन Inkscape टाईप करा.
00:39 लोगोवर क्लिक करून इंकस्केप उघडता येते.
00:42 आपण बनवलेली 'Assignment_1.svg' ही फाईल उघडू.
00:49 ती डॉक्युमेंटस फोल्डरमधे सेव्ह केलेली आहे.
00:52 प्रथम ऑब्जेक्ट कॉपी आणि पेस्ट करण्याबद्दल जाणून घेऊ.
00:56 त्यासाठी प्रथम ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. पंचकोनावर क्लिक करा.
01:02 कॉपी करण्यासाठी Ctrl + C दाबा.
01:07 ऑब्जेक्ट पेस्ट करण्यासाठी Ctrl + V दाबा. कॅनव्हासवर पंचकोनाची दुसरी प्रत दिसेल.
01:17 ऑब्जेक्टसच्या प्रती बनवण्यासाठी आणखी तीन पध्दती आहेत.
01:21 या तिन्ही पध्दतींमधे मूळ ऑब्जेक्टवरच त्याची प्रत तंतोतंत तयार होते.
01:29 पहिली पध्दत आहे Paste Special.
01:32 आपण Ctrl + C द्वारे ऑब्जेक्ट आधीच कॉपी केले होते.
01:38 ऑब्जेक्ट जिथून कॉपी केले तिथेच पेस्ट करण्यासाठी Ctrl + Alt + V ही बटणे दाबा.
01:47 मूळ ऑब्जेक्ट बघण्यासाठी त्यावरील ऑब्जेक्टची प्रत सरकवू.
01:54 ही दोन्ही ऑब्जेक्टस सरकवून बाजूला ठेवू.
01:57 Duplication ही दुसरी पध्दत आहे. ज्यामधे ऑब्जेक्टची कॉपी करणे आवश्यक नसते.
02:05 पंचकोन सिलेक्ट करून Ctrl + D दाबा.
02:13 पंचकोनाची दुसरी प्रत मूळ ऑब्जेक्टच्या वरच तंतोतंत तयार होईल.
02:19 खालील मूळ ऑब्जेक्ट दिसण्यासाठी त्याची दुसरी प्रत बाजूला सरकवू.
02:25 ऑब्जेक्टच्या बनवलेल्या प्रतीत केलेल्या बदलांचा परिणाम मूळ ऑब्जेक्टवर होत नाही.
02:32 याला हिरवा रंग देऊन आणि आकार छोटा करून तपासू.
02:40 तिसरी पध्दत आहे Cloning.
02:44 ellipse वर क्लिक करून क्लोन बनवण्यासाठी Alt + D दाबा.
02:49 मागीलप्रमाणेच क्लोन केलेले ऑब्जेक्ट मूळ ऑब्जेक्टच्या वर तयार होईल.
02:55 दिसण्यासाठी ते दुसरीकडे सरकवा.
02:58 क्लोन केलेले ऑब्जेक्ट नेहमीच मूळ ऑब्जेक्टला जोडलेले असते.
03:04 मूळ ऑब्जेक्टला पालक किंवा पेरेंट असे म्हणतात.
03:08 मूळ ऑब्जेक्ट मधे केलेला बदल म्हणजे आकार, रंग इत्यादी, क्लोन मधेही झालेला दिसेल.
03:16 मूळ ऑब्जेक्टचा रंग गुलाबी करून, तो फिरवून, त्याचा आकार कमी करून हे तपासून बघू शकता.
03:30 हेच बदल क्लोन केलेल्या ऑब्जेक्टवर आपोआप झालेले दिसतील.
03:36 क्लोन आणि मूळ ऑब्जेक्ट यांच्यातील हा जोड काढून टाकण्यासाठी प्रथम क्लोन सिलेक्ट करून Shift + Alt + D दाबा.
03:44 आता पुन्हा मूळ ऑब्जेक्ट सिलेक्ट करून त्याचा आकार बदला.
03:50 क्लोन केलेल्या ऑब्जेक्टमधे आता काही बदल होणार नाहीत.
03:54 कमांड बारमधे दाखवल्याप्रमाणे या सर्व प्रक्रियांसाठी शॉर्टकट आयकॉन उपलब्ध आहेत.
04:01 अनेक ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी Shift चे बटण दाबून हव्या असलेल्या ऑब्जेक्टसवर क्लिक करा.
04:08 मी प्रथम लंबगोल सिलेक्ट करत आहे. नंतर Shift दाबून दुसरे लंबगोल निवडत आहे.
04:15 दोन्ही ऑब्जेक्टस सिलेक्ट झाली आहेत.
04:19 Ctrl + G दाबून त्यांचा एक संच करू शकतो.
04:24 हे दोन्ही लंबगोल आता एकच ऑब्जेक्ट बनले आहे.
04:28 ते हलवून बघितल्यास दोन्ही ऑब्जेक्टस एकत्रित एकच ऑब्जेक्ट म्हणून हलतील.
04:35 या संचाचा आकार बदलून पहा. दोन्ही ऑब्जेक्टसचे आकार प्रमाणात बदललेले दिसतील.
04:43 त्यांचा रंग बदलून निळा करा. दोन्ही ऑब्जेक्टसचा रंग सारखाच झालेला दिसेल.
04:53 समजा संचातील केवळ एकाच ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीजमधे बदल करायचा असेल तर काय?
05:01 संचातील एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करण्यासाठी Ctrl चे बटण दाबून ऑब्जेक्टवर क्लिक करा.
05:08 यामुळे संचाच्या आत शिरून एकेक ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकतो.
05:13 संचातून बाहेर पडण्यासाठी कॅनव्हासवर रिकाम्या भागात कुठेही क्लिक करा.
05:18 ऑब्जेक्टसचा संच काढण्यासाठी प्रथम group सिलेक्ट करून Ctrl + Shift + G ही बटणे दाबा किंवा Ctrl + U दाबा.
05:28 आता लंबगोलांचा संच काढून टाकला आहे.
05:31 कमांडबार वर या प्रक्रियांसाठीचे शॉर्टकट उपलब्ध आहेत.
05:36 कॅनव्हासवरील सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी Ctrl + A दाबा.
05:42 सर्व ऑब्जेक्टसची केलेली निवड रद्द करण्यासाठी कॅनव्हास वरील रिकाम्या भागात क्लिक करा.
05:48 एखादे विशिष्ट ऑब्जेक्ट सोडून इतर सर्व सिलेक्ट करायचे असल्यास Invert Selection पर्याय वापरू शकतो.
05:55 समजा बाणाव्यतिरिक्त सर्व ऑब्जेक्टस निवडायची आहेत.
05:59 प्रथम बाणावर क्लिक करा. नंतर Edit मेनूखालील Invert selection वर क्लिक करा.
06:08 कॅनव्हासवरील बाणाव्यतिरिक्त सर्व ऑब्जेक्टस निवडली जातील.
06:16 आता ऑब्जेक्टसचा क्रम कसा लावायचा हे पाहू.
06:20 मोठ्या पंचकोनावर छोटा पंचकोन ठेवू.
06:25 आता एक चांदणी काढून ती छोट्या पंचकोनावर ठेवा.
06:36 छोटा पंचकोन सिलेक्ट करा. Object मेनूखालील Raise वर क्लिक करा.
06:42 छोटा पंचकोन उचलला जाऊन तो चांदणीच्यावर ठेवला गेला आहे.
06:47 आता चांदणीवर क्लिक करा. Object मेनूखालील Lower वर क्लिक करा.
06:53 आता चांदणी खालच्या बाजूला गेली आहे. मोठा पंचकोन त्याच्यावरती ठेवला गेला आहे.
07:00 आता मोठ्या पंचकोनावर क्लिक करा. Object मेनूखालील Raise to top वर क्लिक करा.
07:11 पुन्हा Object मेनूखालील Lower to bottom वर क्लिक करून मोठा पंचकोन सगळ्यात मागे गेलेला दिसेल.
07:20 हे पर्याय Tool controls bar वर देखील उपलब्ध आहेत.
07:25 पुढे Clipping कसे करायचे ते पाहू.
07:28 क्लिपिंग वापरून तुम्ही गुंतागुंतीची ऑब्जेक्टस
07:31 दुस-या घटकाशी किंवा रचनेच्या आकाराशी
07:35 पटकन आणि सोप्या पध्दतीने जुळवून घेऊ शकता.
07:39 हे करून बघण्यासाठी मी image वापरणार आहे. नव्या इंकस्केप फाईलमधे ही इमेज आहे.
07:45 या इमेजवर लंबगोलाचा आकार काढा.
07:49 आता इमेज आणि लंबगोल सिलेक्ट करा.
07:53 Object मेनूखालील Clip वर क्लिक करून Set वर क्लिक करा.
07:59 आता इमेज लंबगोलाच्या आकारात कापली गेली आहे.
08:04 क्लिपिंगमधे क्लिप म्हणून वापरले गेलेले ऑब्जेक्ट दृश्य भागाचे क्षेत्र ठरवते.
08:09 क्लिप काढण्यासाठी Object मेनूखालील Clip वर क्लिक करा. नंतर Release वर क्लिक करा.
08:17 clip काढली गेली आहे.
08:19 Masking बद्दल जाणून घेऊ.
08:22 Masking हे Clipping सारखेच आहे.
08:25 मास्किंगमधे एका ऑब्जेक्टची पारदर्शकता किंवा फिकटपणा दुस-या ऑब्जेक्टची अपारदर्शकता ठरवतात.
08:32 Masking करण्यासाठी gradient टूल वापरून प्रथम लंबगोल अर्धपारदर्शक करून घेऊ.
08:38 आता लंबगोल सिलेक्ट करा.
08:40 Object मेनूखालील Fill and stroke वर क्लिक करा.
08:44 Radial gradient वर क्लिक करून नंतर Edit वर क्लिक करा.
08:50 पांढ-या रंगासाठी RGB स्लायडर्स सगळ्यात उजवीकडे सरकवा.
09:00 Stop च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करून दुसरा Stop पर्याय निवडा.
09:05 काळ्या रंगासाठी RGB स्लायडर्स सगळ्यात डावीकडे सरकवा आणि alpha व्हॅल्यू बदलून 255 करा.
09:15 त्यात आणखी एक रंग समाविष्ट करण्यासाठी Add stop वर क्लिक करा.
09:20 Node tool वर क्लिक करून डायमंड हँडल वरच्या बाजूला सरकवा.
09:27 आता image आणि ellipse सिलेक्ट करा.
09:30 Object मेनू खालील
09:32 Mask आणि नंतर Set वर क्लिक करा.
09:36 इमेजवर मास्क तयार झाला आहे.
09:40 लक्षात घ्या की इमेज, लंबगोल असलेल्या मास्किंग ऑब्जेक्टच्या ट्रान्सपरन्सी प्रॉपर्टीज घेत आहे.
09:47 मास्क काढून टाकण्यासाठी Object मेनूखालील,
09:51 Mask वर क्लिक करून नंतर Release वर क्लिक करा.
09:54 मास्क काढले गेले आहे.
09:56 थोडक्यात,
09:57 आपण शिकलो: * ऑब्जेक्टस कॉपी आणि पेस्ट करणे
10:02 * ऑब्जेक्टची दुसरी प्रत आणि क्लोन बनवणे
10:05 * अनेक ऑब्जेक्टसचा संच बनवणे आणि क्रम लावणे
10:08 * Multiple selection आणि invert selection
10:10 * Clipping आणि Masking.
10:12 या दोन असाईनमेंट करा.
10:15 ग्रे रंगाचा उभट लंबगोल आणि काळ्या रंगाचे वर्तुळ काढा.
10:20 लंबगोलाच्या वर मध्यात ते वर्तुळ ठेवा.
10:23 हे डोळ्यासारखे दिसले पाहिजे.
10:25 त्यांचा संच करा.
10:27 पुढे दुस-या डोळ्यासाठी क्लोन बनवा.
10:31 दोन्ही डोळे दिसण्यासाठी तो बाजूला सरकवा.
10:35 निळ्या रंगाचे वर्तुळ आणि लाल रंगाचा चौरस काढा.
10:40 चौरसाची दुसरी प्रत बनवून दोन्ही चौरस विरूध्द दिशेला तिरपे ठेवा.
10:45 दोन्ही चौरस सिलेक्ट करून एक ऑब्जेक्ट करण्यासाठी त्यांचा संच करा.
10:50 चौरसाच्या संचाच्या वरच्या बाजूला बरोबर मध्यात वर्तुळ ठेवा.
10:54 दोन्ही सिलेक्ट करून त्यांची क्लिप बनवा. ते बो (bow) सारखे दिसले पाहिजे.
11:00 असाईनमेंट पूर्ण झाल्यावर ती अशी दिसली पाहिजे.
11:03 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:12 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:21 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
11:23 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:31 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:35 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
11:38 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana