BASH/C3/Recursive-function/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 11:58, 31 December 2014 by Madhurig (Talk | contribs)

(diff) ← Older revision | Latest revision (diff) | Newer revision → (diff)
Jump to: navigation, search

Title of script: Recursive-function

Author: Manali Ranade

Keywords: video tutorial, Bash shell, functions, recursive function

Visual Cue Narration
00:01 नमस्कार. Recursive function वरील पाठात आपले स्वागत.
00:07 या पाठात शिकणार आहोत,
00:10 Recursive फंक्शन म्हणजे काय?
00:12 हे उदाहरणांद्वारे समजून घेऊ.
00:15 ह्या पाठासाठी BASHमधील Shell स्क्रिप्टींगचे ज्ञान असावे.
00:20 नसल्यास संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या.

http://www.spoken-tutorial.org

00:27 ह्या पाठासाठी आपण वापरू,
00:29 उबंटु लिनक्स 12.04 OS आणि
00:33 GNU BASH वर्जन 4.2
00:37 पाठाच्या सरावासाठी कृपया, GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे.
00:44 आता recursive फंक्शन म्हणजे काय ते पाहू.
00:48 recursive फंक्शन जे स्वतःलाच कॉल देऊ शकते.
00:52 Recursion हे गुंतागुंतीचे अल्गोरिदम सोपे करणारे एक उपयुक्त तंत्र आहे.
00:59 मी factorial.sh फाईल उघडत आहे.
01:04 त्यात मी कोड लिहून ठेवला आहे.
01:07 ही shebang lineआहे.
01:10 factorial हे फंक्शनचे नाव आहे.
01:12 त्याच्या आत “Inside factorial function” हा मेसेज प्रिंट करू.
01:19 हे स्टेटमेंट युजरने दिलेले इनपुट वाचेल आणि ती व्हॅल्यू 'n' ह्या व्हेरिएबलमधे संचित करेल.
01:26 येथे if-else कंडिशन आहे.
01:30 If कंडिशन 'n' ची व्हॅल्यू शून्य आहे का तपासेल.
01:36 true असल्यास "factorial value of n is 1" हा मेसेज दाखवेल.
01:42 if स्टेटमेंट मधील else भाग येथे आहे.
01:46 हे factorial फंक्शन कॉल करेल.
01:50 आणि fi ने if-else स्टेटमेंट पूर्ण झाले आहे.
01:55 factorial.sh फाईल कार्यान्वित करू.
01:59 CTRL+ALT+T ही बटणे एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा.
02:07 टाईप करा :

chmod space plus x space factorial dot sh

02:15 एंटर दाबा.
02:17 टाईप करा:

dot slash factorial.sh

02:21 एंटर दाबा.
02:24 आपल्याला " Enter the number" असे दिसेल.
02:26 मी 0टाईप करत आहे.
02:29 हे आऊटपुट मिळेल.
02:31 factorial value of 0 is 1
02:35 अप ऍरो दाबा. मागील कमांड मिळवा.
02:40 एंटर दाबा.
02:42 ह्यावेळी 5 टाईप करा.
02:45 हे आऊटपुट दाखवले जाईल.
02:47 Inside factorial function.
02:51 factorial फंक्शनमधे काही अतिरक्त लॉजिकचा समावेश करू.
02:56 आपण दिलेल्या संख्येचे factorial काढू.
03:01 कोडवर परत जाऊ.
03:03 factorial फंक्शनमधील echo स्टेटमेंट काढून तेथे कोड ब्लॉक लिहू.
03:10 Save क्लिक करा.
03:13 temp हे व्हेरिएबल आहे जे युजरने दिलेली व्हॅल्यू संचित करेल.
03:19 If कंडिशन व्हेरिएबलची व्हॅल्यू एक आहे का तपासेल.
03:25 true असल्यास ते 1 प्रिंट करेल.
03:29 हा if स्टेटमेंटमधील else चा भाग आहे.
03:33 हे temp ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू एक ने कमी करेल.
03:37 आणि रिझल्ट 'f' व्हेरिएबलमधे संचित केला जाईल.
03:42 व्हेरिएबल f factorial फंक्शनचा आऊटपुट संचित करेल.
03:46 हा recursive कॉल आहे.
03:50 f आणि temp ह्या व्हेरिएबलच्या व्हॅल्यूजचा गुणाकार करून तो f मधे संचित केला आहे.
03:57 नंतर fची व्हॅल्यू प्रिंट करू.
04:00 येथे if-else स्टेटमेंट आणि फंक्शन पूर्ण होईल.
04:05 स्लाईडसवर जाऊ.
04:08 आता प्रोग्रॅम कसे कार्य करेल ते पाहू.
04:12 # n ची व्हॅल्यू म्हणजेच n युजरकडून स्वीकारला जाईल.
04:17 # एंटर केलेली व्हॅल्यू शून्य असेल तर हा मेसेज प्रिंट होईल.
04:24 # अन्यथा ते factorial फंक्शनवर जाईल.
04:29 # येथे व्हॅल्यू एक असेल तर हे एक ही व्हॅल्यू प्रिंट करेल.
04:36 # नसल्यास, व्हेरिएबलची व्हॅल्यू एक होईपर्यंत फंक्शनला recursive call दिला जाईल.
04:44 # नंतर सर्व व्हॅल्यूजचा गुणाकार करून तो दाखवला जाईल.
04:49 टर्मिनलवर जा.
04:52 अप ऍरो दाबा.
04:54 मागील ./factorial.sh कमांडवर जा.
04:58 एंटर दाबा.
05:00 आता इनपुट व्हॅल्यू म्हणून 5 टाईप करा.
05:05 आपल्याला 5 ह्या संख्येचेfactorial मिळेल.
05:08 ते 120 आहे.
05:11 आपल्याला टर्मिनलवर प्रोग्रॅमचा फ्लो दिसेल. त्याचा अभ्यास करून प्रोग्रॅमचा मागोवा घ्या.
05:18 स्लाईडसवर जाऊ.
05:20 थोडक्यात,
05:21 पाठात शिकलो,
05:23 Recursive फंक्शन.
05:25 आणि ते उदाहरणांद्वारे समजून घेतले.
05:28 असाईनमेंट म्हणून,
05:29 recursive फंक्शनद्वारे N नंबर्सची बेरीज करणारा प्रोग्रॅम लिहा.
05:36 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
05:39 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
05:43 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
05:47 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
05:53 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
05:58 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
06:06 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
06:10 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
06:18 यासंबंधी अधिक माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.

http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro

06:24 हे स्क्रिप्ट FOSSEE आणि spoken-tutorial टीमने तयार केले आहे.
06:29 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
06:33 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Madhurig, Manali, Ranjana