Advanced Cpp/C2/Classes-And-Objects/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:51, 1 March 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
---|---|
00:01 | C++ मधील Classes आणि Objects वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | यात शिकणार आहोत, |
00:09 | क्लासेस. |
00:11 | ऑब्जेक्टस. , एनकॅप्सुलेशन. |
00:14 | आणि डेटा अॅबस्ट्रॅक्शन. |
00:16 | उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू. |
00:20 | ह्या पाठासाठी, |
00:23 | उबंटु OS वर्जन 11.10 आणि |
00:28 | g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू. |
00:32 | आता क्लासेसबद्दल जाणून घेऊ. |
00:36 | class कीवर्डच्या सहाय्याने क्लास बनवला जातो. |
00:39 | त्यामधे डेटा आणि फंक्शन्सचा समावेश होतो. |
00:42 | "क्लास", "कोड" आणि "डेटा" यांना जोडतो. |
00:45 | क्लास डेटा आणि फंक्शन्स ह्यांना क्लास मेंबर्स म्हणतात. |
00:51 | आता ऑब्जेक्टस बद्दल जाणून घेऊ. |
00:53 | ऑब्जेक्टस हे व्हेरिएबल्स असतात. |
00:55 | ते क्लासची कॉपी असतात. |
00:58 | त्या प्रत्येकाला प्रॉपर्टीज आणि बिहेवियर असतात. |
01:01 | डेटा घटकांच्या द्वारे प्रॉपर्टीज घोषित होतात आणि, |
01:06 | मेथडस या मेंबर फंक्शन्स द्वारे बिहेवियर घोषित केली जाते. |
01:10 | आता क्लासचा सिंटॅक्स पाहू. |
01:14 | येथे क्लास घोषित करण्यासाठी class कीवर्ड वापरला आहे. |
01:18 | Class-name हे क्लासचे नाव आहे. |
01:21 | पब्लिक, प्रायव्हेट आणि प्रोटेक्टेड हे अॅक्सेस स्पेसिफायर आहेत. |
01:26 | येथे डेटा मेंबर्स, मेंबर फंक्शन्स आपण पब्लिक, प्रायव्हेट किंवा प्रोटेक्टेड म्हणून घोषित करतो. |
01:34 | अशाप्रकारे क्लास संपवला जातो. |
01:37 | आता उदाहरण पाहू. |
01:39 | मी एडिटरमधे आधीच कोड लिहिला आहे. |
01:42 | तो उघडू. |
01:44 | class hyphen obj dot cpp हे फाईलचे नाव आहे. |
01:50 | या उदाहरणात क्लासच्या सहाय्याने चौरसाचे क्षेत्रफळ काढू. |
01:56 | आता कोड समजून घेऊ. |
01:58 | iostream ही हेडर फाईल आहे. |
02:02 | येथे std namespace वापरत आहोत. |
02:06 | येथे square नामक क्लास घोषित केला आहे. |
02:10 | येथे अॅक्सेस स्पेसिफायर घोषित केलेले नाही. |
02:14 | त्यामुळे डिफॉल्ट रूपात तो प्रायव्हेट आहे. |
02:17 | त्यामुळे व्हेरिएबल 'x' हा "क्लास" square चा "प्रायव्हेट मेंबर" आहे. |
02:22 | हे पब्लिक स्पेसिफायर आहे. |
02:25 | area पब्लिक फंक्शन आहे. |
02:28 | अशाप्रकारे आपण क्लास पूर्ण केला आहे. |
02:31 | अॅक्सेस स्पेसिफायर बद्दल अधिक जाणून घेण्यासाठी स्लाईडस वर जाऊ. |
02:36 | पब्लिक स्पेसिफायर. |
02:39 | पब्लिक स्पेसिफायर "क्लासच्या" बाहेर "डेटा अॅक्सेस" करण्याची परवानगी देते. |
02:44 | पब्लिक मेंबर प्रोग्रॅममधे कुठेही वापरता येऊ शकतात. |
02:49 | प्रायव्हेट स्पेसिफायर. |
02:51 | प्रायव्हेट म्हणून घोषित केलेले मेंबर्स क्लासच्या बाहेर वापरता किंवा अॅक्सेस करता येत नाहीत. |
02:57 | प्रायव्हेट मेंबर्स केवळ क्लास मेंबर्सलाच वापरता येतात. |
03:03 | प्रोटेक्टेड स्पेसिफायर. |
03:05 | प्रोटेक्टेड मेंबर्स "क्लासच्या" बाहेरून अॅक्सेस करता येत नाहीत. |
03:10 | परंतु ते derived क्लास कडून अॅक्सेस करता येतात. |
03:13 | प्रोग्रॅमवर परत जाऊ. |
03:16 | येथे स्टेटमेंटमधे क्लासचे नाव आहे. |
03:21 | स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर आणि फंक्शनचे नाव. |
03:25 | हा ऑपरेटर आवश्यक आहे. |
03:27 | "area" फंक्शन ग्लोबल फंक्शन नसल्याचे दाखवते. |
03:33 | हे square क्लासचे मेंबर फंक्शन आहे. |
03:36 | येथे int a "अर्ग्युमेंट" पास केले आहे. |
03:40 | आता स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर जाणून घेण्यासाठी स्लाईडसवर जाऊ. |
03:46 | hidden "डेटा" अॅक्सेस करण्यासाठी ह्याचा वापर होतो. |
03:49 | एकच नाव असलेले व्हेरिएबल किंवा फंक्शन अॅक्सेस करण्यासाठी स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर :: वापरतात. |
03:56 | समजा "लोकल" आणि "ग्लोबल" व्हेरिएबलचे नाव एकच असल्यास, |
04:01 | "लोकल" व्हेरिएबलला प्राधान्य मिळते. |
04:05 | "ग्लोबल" व्हेरिएबल ::(स्कोप रेझोल्युशन ऑपरेटर) द्वारे अॅक्सेस करू शकतो. |
04:10 | आता प्रोग्रॅमवर जाऊ. |
04:12 | येथे 'a' ची व्हॅल्यू 'x' मधे संचित केली आहे. |
04:17 | आपण चौरसाचे क्षेत्रफळ रिटर्न करू. |
04:20 | 'x' हा प्रायव्हेट मेंबर आहे. |
04:22 | प्रायव्हेट पॅरॅमीटर अॅक्सेस करण्यासाठी 'a' हा पब्लिक मेंबर वापरू. |
04:27 | प्रायव्हेट मेंबर्स नेहमी hidden असतात. |
04:30 | हे main फंक्शन आहे. |
04:33 | येथे sqr हे क्लास square चे ऑब्जेक्ट आहे. |
04:37 | अशाप्रकारे ऑब्जेक्ट बनते. |
04:40 | क्लास नेम, पुढे ऑब्जेक्ट नेम. |
04:43 | येथे "sqr" हे ऑब्जेक्ट आणि (dot). ऑपरेटरच्या सहाय्याने areaहे फंक्शन कॉल करू. |
04:50 | नंतर '4' हे अर्ग्युमेंट पास करू. |
04:53 | 'x' ची '4' ही व्हॅल्यू सेट करू. |
04:57 | हे रिटर्न स्टेटमेंट आहे. |
04:59 | Save वर क्लिक करा. |
05:00 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
05:03 | टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
05:11 | कंपाईल करण्यासाठी टाईप करा g++ space class hyphen obj dot cpp space hyphen o space class |
05:20 | एंटर दाबा. |
05:22 | टाईप करा ./class(डॉट स्लॅश क्लास) |
05:24 | एंटर दाबा. |
05:25 | आऊटपुट असे दिसेल: |
05:28 | area of the square is 16 |
05:30 | आपल्या प्रोग्रॅमवर जाऊ. |
05:35 | आतापर्यंत आपण पाहिले, |
05:37 | क्लासमधे डेटा आणि फंक्शन एकत्र होतात. |
05:41 | क्लास हे सिंंगल युनिट आहे. |
05:44 | ज्यात डेटा आणि फंक्शन एकत्रितपणे येतात. |
05:49 | ह्या रचनेला एनकॅप्सुलेशन म्हणतात. |
05:53 | नंतर आपण प्रायव्हेट आणि पब्लिक मेंबर्स असलेला क्लास बघितला. |
05:59 | प्रायव्हेट डेटा hidden असतो. |
06:02 | क्लासच्या बाहेर तो अॅक्सेस करता येऊ शकत नाही. |
06:05 | या रचनेला डेटा अॅबस्ट्रॅक्शन म्हणतात. |
06:09 | त्याचा interface दिसू शकतो पण त्याचा उपयोग hidden असतो. |
06:14 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
06:17 | स्लाईडसवर जाऊ. |
06:19 | थोडक्यात, या पाठात शिकलो, |
06:23 | एनकॅप्सुलेशन, डेटा अॅबस्ट्रॅक्शन |
06:25 | प्रायव्हेट मेंबर्स |
06:27 | "int x;" |
06:29 | पब्लिक फंक्शन्स , "int area (int);" |
06:32 | क्लासेस , क्लास स्क्वेअर |
06:35 | ऑब्जेक्ट बनवणे |
06:37 | square sqr; |
06:39 | ऑब्जेक्टच्या सहाय्याने फंक्शन कॉल करणे sqr dot area(); |
06:43 | असाईनमेंट म्हणून दिलेल्या वर्तुळाची परिमिती काढणारा प्रोग्रॅम लिहा. |
06:49 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
06:52 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
06:55 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:00 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
07:02 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:05 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:09 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
07:16 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
07:20 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
07:26 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
07:31 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद. |