Scilab/C2/Getting-Started/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Revision as of 17:43, 11 April 2017 by PoojaMoolya (Talk | contribs)
Time | Narration |
00:02 | Getting Started with Scilab वरील पाठात स्वागत. |
00:07 | ह्या पाठात शिकणार आहोत: |
00:09 | Scilab चा कॅलक्युलेटर म्हणून वापर. |
00:12 | व्हॅल्यूज व्हेरिएबलमधे संचित करणे. |
00:15 | व्हेरिएबल्सद्वारे अनेक गणिती क्रिया करणे. |
00:21 | सेशन दरम्यान कार्यान्वित केलेल्या कमांडस फाईलमधे संचित करून फाईल करंट डिरेक्टरीमधे ठेवणे. |
00:29 | कॉम्प्लेक्स नंबर्स डिफाईन करणे. |
00:31 | संख्येवर घातांक, लॉगॅरिदमिक आणि trigonometric म्हणजेच त्रिकोणमितीय क्रिया करणे. |
00:38 | ह्या पाठासाठी Scilab(साईलॅब) इन्स्टॉल झालेले असणे गरजेचे आहे. |
00:44 | आपण प्रात्यक्षिकासाठी Mac OS/X आणि Scilab 5.2.0 वापरणार आहोत. |
00:51 | हा पाठाचा Flow chart आहे. |
00:55 | तुमच्या डेस्क टॉपवरील Scilab(साईलॅब) शॉर्टकट आयकॉन क्लिक करून Scilab(साईलॅब) सुरू करा. |
01:01 | ही Scilab console(साईलॅब कॉन्सोल) विंडो आहे. कर्सर command prompt(कमांड प्रॉंप्ट ) वर असल्याचे दिसेल. |
01:07 | पाठाचा व्हिडिओ थोड्या थोड्या वेळानी थांबवून Scilab(साईलॅब) वर त्याचा सराव करून बघा. |
01:16 | Scilab(साईलॅब) चा उपयोग कॅलक्युलेटर सारखा करता येतो. |
01:19 | काही बेसिक ऑपरेशन्स पाहू. |
01:25 | टाईप करा, 42 plus 4 multiplied by 4 minus 64 divided by 4 आणि एंटर दाबा. |
01:36 | 42 हे अपेक्षित उत्तर मिळेल. |
01:39 | 42 हे उत्तर "a n s" ह्या डिफॉल्ट व्हेरिएबलमधे संचित होईल. |
01:45 | व्हेरिएबल्सना नाव देऊ शकतो. टाईप करा, |
01:49 | a=12,b=21 , c=33 आणि एंटर दाबा. |
02:00 | 12, 21 आणि 33 ह्या व्हॅल्यूज अनुक्रमे a, b आणि c मधे संचित होतील. |
02:08 | clc कमांड द्वारे scilab console(साईलॅब कॉन्सोल) क्लियर करू. |
02:13 | ह्या व्हेरिएबल्स द्वारे आपण काही गणिती क्रिया करणार आहोत. |
02:19 | उदाहरणार्थ, |
02:21 | a+b+c आपल्याला 66 हे उत्तर देते. |
02:27 | तसेच, |
02:29 | a गुणिले कंसात |
02:35 | b + c आपल्याला 648 हे उत्तर देते. |
02:41 | तसेच d = कंसात a+b multiplied by c ह्या दुस-या व्हेरिएबलमधे उत्तर संचित करू शकतो. |
02:58 | d = 1089. |
03:01 | व्हॅल्यूज तपासण्यासाठी कमांड लाईनवर व्हेरिएबल्सची नावे स्वल्पविराम देऊन असे टाईप करू. |
03:09 | a,b,c,d आणि एंटर दाबा. |
03:16 | clc कमांड टाईप करून console(कॉन्सोल) क्लियर करू. |
03:21 | घातांक लिहिण्यासाठी कीबोर्डवरील 6 नंबरवरील “raised to” चिन्ह वापरा. |
03:29 | हे चिन्ह वापरण्यासाठी ' shift key'(शिफ्ट की) दाबून 6 नंबरचे बटण दाबा. |
03:34 | उदाहरणार्थ, 7 raised to 2 टाईप करून एंटर दाबा म्हणजे 7 चा वर्ग मिळेल. |
03:43 | संख्येचे वर्गमूळ काढण्यासाठी उदाहरणार्थ sqrt कंसात 17 असे लिहू शकतो. |
03:55 | हे 17 च्या 0.5 व्या घाताच्या उत्तराबरोबरच आहे. |
04:06 | उत्तर म्हणून फक्त धन संख्या दाखवल्या जातात. |
04:10 | 34 चा 2 छेद 5 वा घात काढण्यासाठी टाईप करा, |
04:15 | 34 raised to कंसात 2/5 आणि एंटर दाबा. |
04:25 | आपण ऋण संख्या घात म्हणून वापरू शकतो. |
04:28 | clc कमांड द्वारा console(कॉन्सोल)क्लियर करू. |
04:33 | आत्तापर्यंत Scilab(साईलॅब ) मधे काही प्राथमिक गणिती क्रिया, व्हेरिएबल बनवण्याबद्दल जाणून घेतले. |
04:40 | आता नव्या कमांडने सुरूवात करू. |
04:43 | ही कमांड आपल्याला पूर्वी दिलेल्या कमांड्स उत्तरांसहित लक्षात ठेवण्यास मदत करेल. |
04:49 | प्रथम pwd कमांड टाईप करून एंटर दाबा. |
04:55 | ही माझ्या संगणकावरील current(करेंट ) डिरेक्टरी आहे. |
04:58 | तुमच्या संगणकावर वेगळी असू शकेल. |
05:01 | scilab console(साईलॅब कॉन्सोल) विंडोच्या टूलबारवरील changed current directory(चेंज्ड करेंट डाइरेक्टरी) च्या आयकॉनवर क्लिक करून करंट डिरेक्टरी बदलता येते. |
05:15 | आता diary(डाइयरी) कमांड देण्यासाठी टाईप करा |
05:20 | diary(डाइयरी) कंसात, अवतरण चिन्हांत, myrecord.txt आणि एंटर दाबा. |
05:40 | ही कमांड करंट डिरेक्टरीमधे "myrecord.txt" नावाची फाईल बनवेल. |
05:48 | Scilab(साईलॅब) सेशनचे ट्रान्स्क्रिप्ट इथून पुढे ह्या फाईलमधे सेव्ह होईल. |
05:53 | ह्याच पाठाच्या पुढच्या भागात त्याचा उपयोग कसा करायचा हे पाहू. |
06:00 | हा पाठ थांबवून व्हिडिओवर दाखवलेला exercise 1 सोडवण्याचा प्रयत्न करा. |
06:07 | Scilab(साईलॅब) कॉम्प्लेक्स नंबर्स कशाप्रकारे हाताळते ते पाहू. |
06:13 | Scilab(साईलॅब) मधे imaginary संख्या i ही percent i ने दाखवली जाते. |
06:18 | उदाहरणार्थ, Five point two multiplied by percent i आपल्याला 5.2i देईल. |
06:29 | कंसात 10 plus 5 into percent i whole multiply by 2 times percent i आपल्याला -10. + 20.i हे आऊटपुट देईल. |
06:58 | आता कन्सोल क्लियर करू. |
07:04 | आता Scilab(साईलॅब) मधे उपलब्ध असलेले इतर घोषित स्थिरांक पाहू. |
07:09 | i प्रमाणेच ह्यांच्या नावांची सुरूवात देखील percent(पर्सेंट) चिन्हाने होते. |
07:13 | उदाहरणार्थ percent pi. |
07:18 | pi ची अपेक्षित व्हॅल्यू मिळालेली आहे. |
07:21 | pi वापरून दिलेली काही त्रिकोणमितीय फंक्शन्स वापरून बघू. |
07:27 | sin कंसात percent pi by 2 चे उत्तर 1 मिळेल. |
07:37 | आणि cos कंसात percent pi by 2 चे उत्तर 6.123D-17 असे मिळेल. |
07:50 | कोन radians(रेडियन्स) मधे मोजले जातात. |
07:54 | लक्षात घ्या की दुसरे उत्तर वास्तवात जवळजवळ शून्य आहे. |
07:59 | %eps हा स्थिरांक "machine epsilon"(मशीन एप्सिलॉन) शी संबंधित आहे. |
08:03 | Scilab(साईलॅब) मधील हे किमान डिजिट रेज़ल्यूशन आहे. |
08:08 | संगणकावरील कन्सोल वर त्याची व्हॅल्यू मिळवण्यासाठी टाईप करा % eps . |
08:19 | माझ्या संगणकावर हे 2.220D-16 देत आहे. |
08:24 | हे Scilab(साईलॅब) मधील floating point precision सांगते . |
08:28 | हे 2.22 times 10^(-16). या संख्येचे नोटेशन आहे. कन्सोल क्लियर करू. |
08:41 | 0.000456 लिहायचे असल्यास 4.56d-4 किंवा 4.56e-4 असे लिहिता येते. |
09:06 | scilab(साईलॅब) मधील व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स case-sensitive(केस-सेन्सिटिव) असली तरी येथे d किंवा e ही अक्षरे capital(कॅपिटल) किंवा small(स्माल), वापरू शकतो. |
09:16 | नॅचरल लॉगॅरिथमचा पाया हा आणखी एक महत्त्वाचा घोषित स्थिरांक आहे. |
09:22 | percent e आपल्याला अपेक्षित आऊटपुट देते. |
09:30 | "e x p फंक्शनद्वारे आपण हाच आऊटपुट मिळवू शकतो. |
09:35 | उदाहरणार्थ, exp bracket (1) close the bracket एंटर दाबा. |
09:44 | दोन्ही उत्तरे समान असल्याचे दिसेल. |
09:47 | clc कमांडद्वारे कन्सोल क्लियर करा. |
09:55 | तसेच, % e चा वर्ग आपल्याला जे उत्तर देईल, |
10:04 | तेच आपल्याला exp कंसात 2 टाईप करून देखील मिळवता येते. |
10:18 | log ही कमांड संख्येचा natural म्हणजेच base e वापरून काढलेला logarithm देते. |
10:23 | base 10 वापरून काढलेल्या logarithm साठी log 10 ही कमांड वापरतात . |
10:29 | उदाहरणार्थ log10 कंसात 1E minus 23 टाईप करून एंटर दाबल्यास -23 उत्तर मिळेल. |
10:47 | ऋण संख्यांचा logarithm(लोगरिदम) काढल्यास complex numbers( कॉंप्लेक्स नंबर्स) मिळतात. |
10:51 | scilab console (साईलॅब कॉन्सोल) वर log of -1 किंवा log of %i टाईप केल्यास तुम्हाला हे तपासता येईल. |
11:01 | तुम्हाला आठवत असेल की diary(डाइयरी) कमांड वापरून आपण दिलेल्या कमांडस व उत्तरे myrecord.txt मधे संचित होत आहेत. |
11:09 | ही फाईल कशी बंद करायची आणि कशी बघायची ते पाहू. |
11:13 | फाईल बंद करण्यास टाईप करा, |
11:16 | diary of zero. |
11:21 | ही कमांड myrecord.txt ही फाईल सेव्ह करून बंद करेल. |
11:26 | आपण ही फाईल करंट डिरेक्टरीमधे म्हणजेच येथे डेस्कटॉपवर बनवली होती. |
11:34 | ही फाईल उघडण्यासाठी scilab(साईलॅब ) कन्सोल टूलबारवरील Open-a-file shortcut(ओपन-अ-फाइल शॉर्टकट ) आयकॉन क्लिक करा. |
11:46 | फाईल फॉरमॅट बदलून तो ऑल फाईल करा. |
11:51 | myrecord.txt फाईल सिलेक्ट करून Open(ओपन) क्लिक करा. |
11:59 | सर्व transactions म्हणजेच आपण दिलेल्या कमांडस आणि Scilab(साईलॅब ) ने दिलेले आऊटपुट ह्या फाईलमधे सेव्ह झालेले आहेत. |
12:10 | ही फाईल बंद करू. |
12:15 | yes(एस) क्लिक करा. |
12:21 | एखादा प्रोग्रॅम बनत असताना योग्य कोड मिळेपर्यंत त्या कोडवर आपण अनेक प्रयोग केलेले असतात. |
12:29 | Diary( डाइयरी ) कमांड सर्व गोष्टींची नोंद ठेवते. |
12:35 | diary of zero कमांडद्वारे myrecord.txt ही फाईल बंद केली होती . |
12:42 | ही कमांड कार्यान्वित झाल्यानंतर कुठलीही कमांड सेव्ह होणार नाही. |
12:48 | पुढील सेशन सेव्ह करायचे असल्यास पुन्हा diary (डाइयरी)कमांड कार्यान्वित करणे गरजेचे आहे. |
12:54 | फाईलमधे काही उपयोगी माहिती असल्यास diary(डाइयरी) कमांडमधील फाईलचे नाव बदला. |
13:03 | कारण फाईलचे तेच नाव वापरल्यास त्या फाईलमधे नवा डेटा ओवरराइट होईल. |
13:09 | येथे व्हिडिओ थांबवून exercise 2 सोडवण्याचा प्रयत्न करा. |
13:15 | तुमच्या लक्षात आले असेल की zero असे उत्तर मिळाले नव्हते. |
13:21 | हे कसे हाताळायचे ते जाणून घेण्यासाठी टाईप करा “help clean”. |
13:27 | तुम्हाला एखाद्या कमांडबद्दल माहिती हवी असल्यास 'help' किंवा, help आणि कमांडचे नाव द्या. |
13:37 | उदाहरणार्थ scilab(साईलॅब ) कन्सोल वर “help chdir” टाईप करून एंटर दाबा. |
13:53 | help ब्राऊजरचा आकार मोठा करू. |
14:01 | Help chdir आपल्याला करंट डिरेक्टरी बदलण्याबाबत सविस्तर माहिती देईल. |
14:10 | scilab(साईलॅब ) कन्सोल टूलबारवरील help(हेल्प) ब्राऊजर आयकॉन क्लिक करूनही हे करता येते. |
14:20 | help(हेल्प) ब्राऊजर बंद करून स्लाईडसवर परत जाऊ. |
14:31 | अप-डाऊन arrow(एरो) कीज द्वारे पूर्वी कार्यान्वित केलेल्या कमांडस पुन्हा बघता येतात. |
14:36 | अप-डाऊन arrow (एरो)वापरताना कुठल्याही कमांडवर थांबता येते आणि एंटर दाबून कार्यान्वित करता येते. |
14:45 | गरज असल्यास कमांड एडिट करता येते. |
14:48 | पूर्वी 'e' अक्षरापासून टाईप केलेली कमांड शोधत असल्यास e टाईप करून अप arrow(एरो) की वापरा. |
14:59 | कमांड आपोआप पूर्ण करण्यासाठी टॅब की वापरल्याने उपलब्ध सर्व पर्याय निवडण्यासाठी दिसतील. |
15:07 | या पाठात शिकलो, |
15:10 | Scilab(साईलॅब ) कॅलक्युलेटर म्हणून वापरणे. |
15:12 | ans या डिफॉल्ट व्हेरिएबलमधे आऊटपुट संचित करणे. |
15:16 | equality चिन्हाद्वारे व्हेरिएबलला व्हॅल्यू देणे. |
15:20 | कन्सोल वर कॉमा देऊन व्हेरिएबलची नावे टाईप करून व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज तपासणे. |
15:28 | pwd कमांडद्वारे करंट डिरेक्टरी तपासणे. |
15:34 | कन्सोल वर टाईप केलेल्या सर्व कमांडस फाईलमधे सेव्ह करण्यासाठी diary कमांड वापरणे. |
15:40 | %i, %e आणि %pi वापरून अनुक्रमे complex numbers(कॉंप्लेक्स नंबर्स), natural exponents(नॅचुरल एक्सपोनेंट्स) आणि π च्या व्हॅल्यूज वापरणे. |
15:49 | कुठल्याही कमांडबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी help(हेल्प) कमांड वापरणे. |
15:54 | Scilab च्या Getting Started वरील पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
15:59 | Scilab मधील अनेक फंक्शन्स इतर पाठात पाहणार आहोत. |
16:06 | हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन (FOSSEE) ने तयार केला आहे. |
16:14 | FOSSEE प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fossee.in किंवा scilab.in द्वारे मिळवू शकता. |
16:22 | यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे. |
16:29 | अधिक माहितीसाठी spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen intro ला भेट द्या. |
16:43 | आशा वाटते की हा पाठ तुम्हाला शिकण्यासाठी उपयुक्त वाटला असेल. |
16:47 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
16:48 | सहभागाबद्दल धन्यवाद. |