Scilab/C2/Getting-Started/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:02 Getting Started with Scilab वरील पाठात स्वागत.
00:07 ह्या पाठात शिकणार आहोत:
00:09 Scilab चा कॅलक्युलेटर म्हणून वापर.
00:12 व्हॅल्यूज व्हेरिएबलमधे संचित करणे.
00:15 व्हेरिएबल्सद्वारे अनेक गणिती क्रिया करणे.
00:21 सेशन दरम्यान कार्यान्वित केलेल्या कमांडस फाईलमधे संचित करून फाईल करंट डिरेक्टरीमधे ठेवणे.
00:29 कॉम्प्लेक्स नंबर्स डिफाईन करणे.
00:31 संख्येवर घातांक, लॉगॅरिदमिक आणि trigonometric म्हणजेच त्रिकोणमितीय क्रिया करणे.
00:38 ह्या पाठासाठी Scilab(साईलॅब) इन्स्टॉल झालेले असणे गरजेचे आहे.
00:44 आपण प्रात्यक्षिकासाठी Mac OS/X आणि Scilab 5.2.0 वापरणार आहोत.
00:51 हा पाठाचा Flow chart आहे.
00:55 तुमच्या डेस्क टॉपवरील Scilab(साईलॅब) शॉर्टकट आयकॉन क्लिक करून Scilab(साईलॅब) सुरू करा.
01:01 ही Scilab console(साईलॅब कॉन्सोल) विंडो आहे. कर्सर command prompt(कमांड प्रॉंप्ट ) वर असल्याचे दिसेल.
01:07 पाठाचा व्हिडिओ थोड्या थोड्या वेळानी थांबवून Scilab(साईलॅब) वर त्याचा सराव करून बघा.
01:16 Scilab(साईलॅब) चा उपयोग कॅलक्युलेटर सारखा करता येतो.
01:19 काही बेसिक ऑपरेशन्स पाहू.
01:25 टाईप करा, 42 plus 4 multiplied by 4 minus 64 divided by 4 आणि एंटर दाबा.
01:36 42 हे अपेक्षित उत्तर मिळेल.
01:39 42 हे उत्तर "a n s" ह्या डिफॉल्ट व्हेरिएबलमधे संचित होईल.
01:45 व्हेरिएबल्सना नाव देऊ शकतो. टाईप करा,
01:49 a=12,b=21 , c=33 आणि एंटर दाबा.
02:00 12, 21 आणि 33 ह्या व्हॅल्यूज अनुक्रमे a, b आणि c मधे संचित होतील.
02:08 clc कमांड द्वारे scilab console(साईलॅब कॉन्सोल) क्लियर करू.
02:13 ह्या व्हेरिएबल्स द्वारे आपण काही गणिती क्रिया करणार आहोत.
02:19 उदाहरणार्थ,
02:21 a+b+c आपल्याला 66 हे उत्तर देते.
02:27 तसेच,
02:29 a गुणिले कंसात
02:35 b + c आपल्याला 648 हे उत्तर देते.
02:41 तसेच d = कंसात a+b multiplied by c ह्या दुस-या व्हेरिएबलमधे उत्तर संचित करू शकतो.
02:58 d = 1089.
03:01 व्हॅल्यूज तपासण्यासाठी कमांड लाईनवर व्हेरिएबल्सची नावे स्वल्पविराम देऊन असे टाईप करू.
03:09 a,b,c,d आणि एंटर दाबा.
03:16 clc कमांड टाईप करून console(कॉन्सोल) क्लियर करू.
03:21 घातांक लिहिण्यासाठी कीबोर्डवरील 6 नंबरवरील “raised to” चिन्ह वापरा.
03:29 हे चिन्ह वापरण्यासाठी ' shift key'(शिफ्ट की) दाबून 6 नंबरचे बटण दाबा.
03:34 उदाहरणार्थ, 7 raised to 2 टाईप करून एंटर दाबा म्हणजे 7 चा वर्ग मिळेल.
03:43 संख्येचे वर्गमूळ काढण्यासाठी उदाहरणार्थ sqrt कंसात 17 असे लिहू शकतो.
03:55 हे 17 च्या 0.5 व्या घाताच्या उत्तराबरोबरच आहे.
04:06 उत्तर म्हणून फक्त धन संख्या दाखवल्या जातात.
04:10 34 चा 2 छेद 5 वा घात काढण्यासाठी टाईप करा,
04:15 34 raised to कंसात 2/5 आणि एंटर दाबा.
04:25 आपण ऋण संख्या घात म्हणून वापरू शकतो.
04:28 clc कमांड द्वारा console(कॉन्सोल)क्लियर करू.
04:33 आत्तापर्यंत Scilab(साईलॅब ) मधे काही प्राथमिक गणिती क्रिया, व्हेरिएबल बनवण्याबद्दल जाणून घेतले.
04:40 आता नव्या कमांडने सुरूवात करू.
04:43 ही कमांड आपल्याला पूर्वी दिलेल्या कमांड्स उत्तरांसहित लक्षात ठेवण्यास मदत करेल.
04:49 प्रथम pwd कमांड टाईप करून एंटर दाबा.
04:55 ही माझ्या संगणकावरील current(करेंट ) डिरेक्टरी आहे.
04:58 तुमच्या संगणकावर वेगळी असू शकेल.
05:01 scilab console(साईलॅब कॉन्सोल) विंडोच्या टूलबारवरील changed current directory(चेंज्ड करेंट डाइरेक्टरी) च्या आयकॉनवर क्लिक करून करंट डिरेक्टरी बदलता येते.
05:15 आता diary(डाइयरी) कमांड देण्यासाठी टाईप करा
05:20 diary(डाइयरी) कंसात, अवतरण चिन्हांत, myrecord.txt आणि एंटर दाबा.
05:40 ही कमांड करंट डिरेक्टरीमधे "myrecord.txt" नावाची फाईल बनवेल.
05:48 Scilab(साईलॅब) सेशनचे ट्रान्स्क्रिप्ट इथून पुढे ह्या फाईलमधे सेव्ह होईल.
05:53 ह्याच पाठाच्या पुढच्या भागात त्याचा उपयोग कसा करायचा हे पाहू.
06:00 हा पाठ थांबवून व्हिडिओवर दाखवलेला exercise 1 सोडवण्याचा प्रयत्न करा.
06:07 Scilab(साईलॅब) कॉम्प्लेक्स नंबर्स कशाप्रकारे हाताळते ते पाहू.
06:13 Scilab(साईलॅब) मधे imaginary संख्या i ही percent i ने दाखवली जाते.
06:18 उदाहरणार्थ, Five point two multiplied by percent i आपल्याला 5.2i देईल.
06:29 कंसात 10 plus 5 into percent i whole multiply by 2 times percent i आपल्याला -10. + 20.i हे आऊटपुट देईल.
06:58 आता कन्सोल क्लियर करू.
07:04 आता Scilab(साईलॅब) मधे उपलब्ध असलेले इतर घोषित स्थिरांक पाहू.
07:09 i प्रमाणेच ह्यांच्या नावांची सुरूवात देखील percent(पर्सेंट) चिन्हाने होते.
07:13 उदाहरणार्थ percent pi.
07:18 pi ची अपेक्षित व्हॅल्यू मिळालेली आहे.
07:21 pi वापरून दिलेली काही त्रिकोणमितीय फंक्शन्स वापरून बघू.
07:27 sin कंसात percent pi by 2 चे उत्तर 1 मिळेल.
07:37 आणि cos कंसात percent pi by 2 चे उत्तर 6.123D-17 असे मिळेल.
07:50 कोन radians(रेडियन्स) मधे मोजले जातात.
07:54 लक्षात घ्या की दुसरे उत्तर वास्तवात जवळजवळ शून्य आहे.
07:59  %eps हा स्थिरांक "machine epsilon"(मशीन एप्सिलॉन) शी संबंधित आहे.
08:03 Scilab(साईलॅब) मधील हे किमान डिजिट रेज़ल्यूशन आहे.
08:08 संगणकावरील कन्सोल वर त्याची व्हॅल्यू मिळवण्यासाठी टाईप करा % eps .
08:19 माझ्या संगणकावर हे 2.220D-16 देत आहे.
08:24 हे Scilab(साईलॅब) मधील floating point precision सांगते .
08:28 हे 2.22 times 10^(-16). या संख्येचे नोटेशन आहे. कन्सोल क्लियर करू.
08:41 0.000456 लिहायचे असल्यास 4.56d-4 किंवा 4.56e-4 असे लिहिता येते.
09:06 scilab(साईलॅब) मधील व्हेरिएबल्स आणि फंक्शन्स case-sensitive(केस-सेन्सिटिव) असली तरी येथे d किंवा e ही अक्षरे capital(कॅपिटल) किंवा small(स्माल), वापरू शकतो.
09:16 नॅचरल लॉगॅरिथमचा पाया हा आणखी एक महत्त्वाचा घोषित स्थिरांक आहे.
09:22 percent e आपल्याला अपेक्षित आऊटपुट देते.
09:30 "e x p फंक्शनद्वारे आपण हाच आऊटपुट मिळवू शकतो.
09:35 उदाहरणार्थ, exp bracket (1) close the bracket एंटर दाबा.
09:44 दोन्ही उत्तरे समान असल्याचे दिसेल.
09:47 clc कमांडद्वारे कन्सोल क्लियर करा.
09:55 तसेच,  % e चा वर्ग आपल्याला जे उत्तर देईल,
10:04 तेच आपल्याला exp कंसात 2 टाईप करून देखील मिळवता येते.
10:18 log ही कमांड संख्येचा natural म्हणजेच base e वापरून काढलेला logarithm देते.
10:23 base 10 वापरून काढलेल्या logarithm साठी log 10 ही कमांड वापरतात .
10:29 उदाहरणार्थ log10 कंसात 1E minus 23 टाईप करून एंटर दाबल्यास -23 उत्तर मिळेल.
10:47 ऋण संख्यांचा logarithm(लोगरिदम) काढल्यास complex numbers( कॉंप्लेक्स नंबर्स) मिळतात.
10:51 scilab console (साईलॅब कॉन्सोल) वर log of -1 किंवा log of %i टाईप केल्यास तुम्हाला हे तपासता येईल.
11:01 तुम्हाला आठवत असेल की diary(डाइयरी) कमांड वापरून आपण दिलेल्या कमांडस व उत्तरे myrecord.txt मधे संचित होत आहेत.
11:09 ही फाईल कशी बंद करायची आणि कशी बघायची ते पाहू.
11:13 फाईल बंद करण्यास टाईप करा,
11:16 diary of zero.
11:21 ही कमांड myrecord.txt ही फाईल सेव्ह करून बंद करेल.
11:26 आपण ही फाईल करंट डिरेक्टरीमधे म्हणजेच येथे डेस्कटॉपवर बनवली होती.
11:34 ही फाईल उघडण्यासाठी scilab(साईलॅब ) कन्सोल टूलबारवरील Open-a-file shortcut(ओपन-अ-फाइल शॉर्टकट ) आयकॉन क्लिक करा.
11:46 फाईल फॉरमॅट बदलून तो ऑल फाईल करा.
11:51 myrecord.txt फाईल सिलेक्ट करून Open(ओपन) क्लिक करा.
11:59 सर्व transactions म्हणजेच आपण दिलेल्या कमांडस आणि Scilab(साईलॅब ) ने दिलेले आऊटपुट ह्या फाईलमधे सेव्ह झालेले आहेत.
12:10 ही फाईल बंद करू.
12:15 yes(एस) क्लिक करा.
12:21 एखादा प्रोग्रॅम बनत असताना योग्य कोड मिळेपर्यंत त्या कोडवर आपण अनेक प्रयोग केलेले असतात.
12:29 Diary( डाइयरी ) कमांड सर्व गोष्टींची नोंद ठेवते.
12:35 diary of zero कमांडद्वारे myrecord.txt ही फाईल बंद केली होती .
12:42 ही कमांड कार्यान्वित झाल्यानंतर कुठलीही कमांड सेव्ह होणार नाही.
12:48 पुढील सेशन सेव्ह करायचे असल्यास पुन्हा diary (डाइयरी)कमांड कार्यान्वित करणे गरजेचे आहे.
12:54 फाईलमधे काही उपयोगी माहिती असल्यास diary(डाइयरी) कमांडमधील फाईलचे नाव बदला.
13:03 कारण फाईलचे तेच नाव वापरल्यास त्या फाईलमधे नवा डेटा ओवरराइट होईल.
13:09 येथे व्हिडिओ थांबवून exercise 2 सोडवण्याचा प्रयत्न करा.
13:15 तुमच्या लक्षात आले असेल की zero असे उत्तर मिळाले नव्हते.
13:21 हे कसे हाताळायचे ते जाणून घेण्यासाठी टाईप करा “help clean”.
13:27 तुम्हाला एखाद्या कमांडबद्दल माहिती हवी असल्यास 'help' किंवा, help आणि कमांडचे नाव द्या.
13:37 उदाहरणार्थ scilab(साईलॅब ) कन्सोल वर “help chdir” टाईप करून एंटर दाबा.
13:53 help ब्राऊजरचा आकार मोठा करू.
14:01 Help chdir आपल्याला करंट डिरेक्टरी बदलण्याबाबत सविस्तर माहिती देईल.
14:10 scilab(साईलॅब ) कन्सोल टूलबारवरील help(हेल्प) ब्राऊजर आयकॉन क्लिक करूनही हे करता येते.
14:20 help(हेल्प) ब्राऊजर बंद करून स्लाईडसवर परत जाऊ.
14:31 अप-डाऊन arrow(एरो) कीज द्वारे पूर्वी कार्यान्वित केलेल्या कमांडस पुन्हा बघता येतात.
14:36 अप-डाऊन arrow (एरो)वापरताना कुठल्याही कमांडवर थांबता येते आणि एंटर दाबून कार्यान्वित करता येते.
14:45 गरज असल्यास कमांड एडिट करता येते.
14:48 पूर्वी 'e' अक्षरापासून टाईप केलेली कमांड शोधत असल्यास e टाईप करून अप arrow(एरो) की वापरा.
14:59 कमांड आपोआप पूर्ण करण्यासाठी टॅब की वापरल्याने उपलब्ध सर्व पर्याय निवडण्यासाठी दिसतील.
15:07 या पाठात शिकलो,
15:10 Scilab(साईलॅब ) कॅलक्युलेटर म्हणून वापरणे.
15:12 ans या डिफॉल्ट व्हेरिएबलमधे आऊटपुट संचित करणे.
15:16 equality चिन्हाद्वारे व्हेरिएबलला व्हॅल्यू देणे.
15:20 कन्सोल वर कॉमा देऊन व्हेरिएबलची नावे टाईप करून व्हेरिएबलच्या व्हॅल्यूज तपासणे.
15:28 pwd कमांडद्वारे करंट डिरेक्टरी तपासणे.
15:34 कन्सोल वर टाईप केलेल्या सर्व कमांडस फाईलमधे सेव्ह करण्यासाठी diary कमांड वापरणे.
15:40  %i, %e आणि %pi वापरून अनुक्रमे complex numbers(कॉंप्लेक्स नंबर्स), natural exponents(नॅचुरल एक्सपोनेंट्स) आणि π च्या व्हॅल्यूज वापरणे.
15:49 कुठल्याही कमांडबद्दल सविस्तर माहिती मिळवण्यासाठी help(हेल्प) कमांड वापरणे.
15:54 Scilab च्या Getting Started वरील पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
15:59 Scilab मधील अनेक फंक्शन्स इतर पाठात पाहणार आहोत.
16:06 हा पाठ फ्री अँड ओपन सोर्स सॉफ्टवेर इन साइन्स अँड इंजिनियरिंग एजुकेशन (FOSSEE) ने तयार केला आहे.
16:14 FOSSEE प्रोजेक्ट संबंधी अधिक माहिती fossee.in किंवा scilab.in द्वारे मिळवू शकता.
16:22 यासाठी नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया कडून अर्थसहाय्य मिळाले आहे.
16:29 अधिक माहितीसाठी spoken hyphen tutorial dot org slash NMEICT hyphen intro ला भेट द्या.
16:43 आशा वाटते की हा पाठ तुम्हाला शिकण्यासाठी उपयुक्त वाटला असेल.
16:47 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
16:48 सहभागाबद्दल धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana