Ruby/C3/Object-Oriented-Concept-in-Ruby/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 16:59, 3 July 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search

Title of script: Object-Oriented-Concept-in-Ruby

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00:01 रुबी मधील Object Oriented Concept वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत,
00:08 क्लासेस,
00:09 ऑब्जेक्ट बनवणे
00:10 रुबी मधील मेथडस घोषित करण्याच्या पध्दती.
00:13 येथे आपण,
00:14 उबंटु लिनक्स वर्जन 12.04 आणि
00:16 रुबी 1.9.3 वापरणार आहोत.
00:19 या पाठासाठी लिनक्स कमांडस, टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00:24 संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:28 तुम्हाला आठवत असेल की आपण ttt डिरेक्टरी बनवली होती.
00:33 त्या डिरेक्टरीवर जाऊ.
00:35 नंतर ruby hyphen tutorial आणि classes ह्या डिरेक्टरीत जा.
00:41 रुबी ही object oriented लँग्वेज आहे.
00:44 रुबीमधील स्ट्रिंग किंवा नंबर पासून व्हॅल्यूपर्यंत सर्व काही म्हणजे ऑब्जेक्ट्स.
00:49 क्लास म्हणजे संबंधित डेटा आणि फंक्शन्सचा संच.
00:53 माहितीत सुसूत्रता ठेवण्यास यांचा उपयोग होतो.
00:56 ऑब्जेक्ट म्हणजे क्लासचा instanceतयार करणे.
01:00 class ह्या कीवर्डद्वारे क्लास घोषित केला जातो.
01:05 त्याच्यापुढे क्लासचे नाव दिले जाते.
01:08 शेवट “end” द्वारे होतो.
01:11 क्लासचे उदाहरण पाहू.
01:14 class Product
01:16 ruby कोड
01:17 end
01:20 क्लासच्या नावाची सुरूवात कॅपिटल अक्षराने होणे आवश्यक आहे .
01:24 ज्या नावात एकापेक्षा अधिक शब्द असतील ते camelcased असणे आवश्यक आहे.
01:28 उदाहरणार्थ,
01:30 UserInformation
01:32 ProductInformation
01:34 यानंतरची फाईल नेम्स त्यातील शब्द underscoreने जोडून लिहू.
01:37 user underscore information
01:40 product underscore information
01:45 रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा.
01:48 त्याला class_definition.rb असे नाव द्या.
01:52 माझ्याकडे क्लासेस चा वापर केलेले एक उदाहरण आहे.
01:57 पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता.
02:02 या उदाहरणात मी Order नामक क्लास घोषित केला आहे.
02:05 आता हा क्लास उपयोगी बनवण्यासाठी त्यात काही व्हेरिएबल्स समाविष्ट करू.
02:11 मी “myinstance” हे इन्स्टन्स व्हेरिएबल घोषित केले आहे .
02:15 आणि त्याला व्हॅल्यू दिली आहे.
02:18 “myclassvar” नावाचे क्लास व्हेरिएबल घोषित केले आहे .
02:21 आणि त्याला व्हॅल्यू दिली आहे.
02:24 आता हा क्लास उपयोगी बनवण्यासाठी त्यात कोड समाविष्ट करू.
02:30 टाईप करा puts Order dot instance underscore variables.
02:36 या ओळीच्या आधी नव्या ओळीकरता टाईप करा puts काही कॅरॅक्टर्स आणि slash n.
02:43 ही ओळ कॉपी करून ती ह्या ओळीच्या खाली पेस्ट करा व फाईल सेव्ह करा.
02:51 आता हा कोड कार्यान्वित करू.
02:53 टर्मिनलवर जा आणि टाईप करा
02:56 ruby space class underscore definition dot rb
03:02 आणि आऊटपुट बघा.
03:05 आपण घोषित केलेले instance व्हेरिएबल दिसेल.
03:09 आता टाईप करा puts Order dot class underscore variables.
03:15 डिमार्केशन, लगेच ओळीच्या खाली कॉपी आणि पेस्ट करून सेव्ह करा.
03:21 आता टर्मिनलवर जा आणि आधीसारखीच फाईल कार्यान्वित करा.
03:26 आपण घोषित केलेले क्लास व्हेरिएबल देखील दाखवले जात आहे.
03:32 आता तुम्ही स्वतःचा क्लास बनवू शकता.
03:35 आता ऑब्जेक्ट म्हणजे काय ते पाहू.
03:40 ऑब्जेक्ट म्हणजे क्लास चा instance .
03:43 ऑब्जेक्ट हे क्लास पासून बनलेले असते.
03:46 क्लासमधे घोषित केलेल्या प्रॉपर्टीज आणि मेथडस ऑब्जेक्ट मधे असतात.
03:52 ऑब्जेक्ट कसे घोषित करायचे?
03:54 new कीवर्डद्वारे क्लासचा ऑब्जेक्ट घोषित केला जातो .
03:58 येथे Product क्लासचा ऑब्जेक्ट घोषित करत आहोत.
04:02 येथे आपले ऑब्जेक्ट बनेल.
04:05 product = Product.new
04:09 ह्या क्रियेला ऑब्जेक्टचे इनिशियलायझेशन असे म्हणतात.
04:12 हे ऑब्जेक्ट Product प्रकाराचे आहे.
04:16 आता आपण “initialize” ही मेथड बघू.
04:20 initialize मेथड ऑब्जेक्ट तयार करताना कॉल केली जाते.
04:26 new या कीवर्डने ऑब्जेक्ट कॉल करताना, आपण इनिशियलाईज मेथड वापरतो.
04:31 इनिशियलाईज मेथडला अनेक parameters असू शकतात.
04:37 इतर रुबी मेथडसप्रमाणेच, तिची सुरूवात “def” कीवर्डने होते.
04:43 त्याचे उदाहरण पाहू.
04:46 रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा.
04:50 आणि त्याला object undescore initialize dot rb असे नाव द्या.
04:55 माझ्याकडे ऑब्जेक्ट इनिशियलायझेशन कोडचे उदाहरण आहे.
05:00 पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता.
05:04 येथे आपण “Order” नावाचा क्लास घोषित केला आहे.
05:08 नंतर अर्ग्युमेंटशिवाय इनिशियलाईज मेथड घोषित केली आहे.
05:13 नंतर “I have created an object” हा मेसेज दाखवणारी puts मेथड लिहिली आहे.
05:20 नंतर Order dot new असे टाईप केले आहे.
05:24 जे इनिशियलाईज मेथड कॉल करेल.
05:27 टर्मिनलवर जा आणि टाईप करा
05:31 ruby space object underscore initialize dot rb
05:36 आणि आऊटपुट बघा.
05:39 I have created an object” असा मेसेज दिसेल.
05:43 आता gedit वर जाऊन मेथडमधे अर्ग्युमेंट समाविष्ट करा.
05:48 putsमधे काही बदल करू .
05:51 ह्याने पास केलेल्या अर्ग्युमेंटसच्या व्हॅल्यूज दाखवल्या पाहिजेत.
05:55 पुढे टाईप करा.
05:56 Order dot new(“I have created an object”).
06:04 येथे नव्या मेथडला अर्ग्युमेंट दिली आहे.
06:08 हे अर्ग्युमेंट इनिशियलाईज मेथडला पास केले जाते .
06:13 टर्मिनलवर जा आणि टाईप करा
06:16 ruby space object underscore initialize dot rb
06:20 आणि आऊटपुट पहा.
06:22 आपल्याला “I have created an object” असा मेसेज दिसेल.
06:29 आता तुम्हाला object initialization चा अर्थ लक्षात येईल.
06:33 लक्षात घ्या, रुबीतील मेथडस ही क्लासने वापरलेली functions असतात.
06:39 क्लास मधील प्रत्येक मेथड ही “def” आणिend” ब्लॉकमधे घोषित केलेली असते.
06:45 अनेक शब्दांनी बनवलेले मेथडचे नाव underscoreने जोडतात.
06:48 मेथडच्या नावाला काही कॅरॅक्टर्स जोडता येतात ती म्हणजे
06:54 ? (question-mark)
06:56 = (equal to)
06:58 प्रत्येक कॅरॅक्टर मुळे मेथडला वेगळा अर्थ प्राप्त होतो.
07:02 काही उदाहरणे पाहू.
07:05 रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा.
07:09 त्याला class underscore methods dot rb असे नाव द्या.
07:14 माझ्याकडे क्लास मेथडसच्या कोडचे एक उदाहरण आहे.
07:17 पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता.
07:21 येथे “Animal” नावाचा क्लास घोषित केला आहे.
07:23 आपल्याकडे “breathe” आणिwalk” या मेथडस आहेत .
07:28 त्या “def” आणिend” कीवर्डस वापरून लिहिल्या आहेत.
07:32 Animalहे ऑब्जेक्ट इनिशियलाईज केले आहे.
07:36 आणि ते “animal” व्हेरिएबलला दिले. येथे “a” लोअरकेसमधे आहे.
07:40 यानंतर “breathe” आणि “walk” या मेथडस एकामागून एक कॉल केल्या आहेत.
07:48 आता प्रोग्रॅम कार्यान्वित करा.
07:51 टर्मिनलवर जा आणि टाईप करा
07:53 ruby space class underscore methods dot rb
07:58 आणि आऊटपुट पहा.
08:00 “ I breathe”
08:02 “ I walk”
08:03 या ओळी
08:04 प्रिंट झालेल्या दिसतील.
08:05 कारण आपण “breathe” आणिwalk” मेथडस कॉल केल्या होत्या.
08:10 या मेथडस मधे लिहिलेली “puts” स्टेटमेंटस आपल्याला हा रिझल्ट दाखवतील .
08:16 आता question markने संपणा-या मेथडस कशा तयार करायच्या ते पाहू.
08:21 रुबीच्या सुरूवातीच्या पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा.
08:25 आणि त्याला class underscore methods underscore with underscore trailing underscore characters dot rb असे नाव द्या.
08:35 माझ्याकडे question mark सहित क्लास मेथडच्या कोडचे उदाहरण आहे.
08:40 पाठ थांबवून तुम्ही कोड टाईप करू शकता.
08:45 येथे आपण उदाहरण म्हणून पूर्वीचाच क्लास घेतला आहे.
08:48 येथे breathe मेथडच्या शेवटी “question mark (?)” आहे.
08:52 अशा मेथडस सामान्यतः boolean values परत करतात.
08:55 हे रुबीतील मेथडसच्या naming convention प्रमाणे आहे.
09:00 ही मेथड animal dot breathe question-mark असे लिहून कॉल केली जाते.
09:06 टर्मिनलवर जा आणि टाईप करा
09:09 ruby space class underscore methods underscore with underscore trailing underscore characters dot rb आणि आऊटपुट पहा.
09:22 true” हे आऊटपुट मिळेल.
09:26 पुढे “walk” नामक आणखी मेथड घोषित करू .
09:30 त्याच्या आधी equal-to चिन्ह “=(value)” लिहू.
09:36 ही मेथड animal dot walk लिहून कॉल करतात.
09:41 ही मेथड कार्यान्वित करू.
09:44 टर्मिनलवर जा आणि टाईप करा
09:45 ruby class underscore methods underscore with underscore trailing underscore characters dot rb
09:52 आणि आऊटपुट पहा.
09:56 undefined method” अशी एरर मिळेल.
09:59 कारण equal to चिन्हाला वेगळा अर्थ आहे.
10:03 मेथडला व्हॅल्यू देण्यासाठी त्याचा उपयोग होतो.
10:08 आता आपण ही मेथड वेगळ्या पध्दतीने कॉल करू.
10:13 टाईप करा puts animal dot walk equal to “ hops”
10:17 पुन्हा एकदा करून बघू.
10:20 टर्मिनलवर जा. मागील कमांड कार्यान्वित करून आऊटपुट बघा.
10:27 hops” शब्द प्रिंट झालेला दिसेल.
10:30 मेथडच्या पुढीलequal to चे चिन्ह हे व्हॅल्यू देण्यासाठी आहे असे दाखवते.
10:36 आता तुम्ही मेथडस लिहू शकता.
10:42 या पाठात आपण शिकलो,
10:44 क्लासेस घोषित करणे
10:46 क्लासचे ऑब्जेक्ट्स घोषित करणे
10:48 रुबीमधील मेथडस घोषित करण्याच्या विविध पध्दती.
10:52 आता असाईनमेंट.
10:54 Product नामक क्लास घोषित करा.
10:56 “myvar” च्या व्हॅल्यू घेण्यासाठी आणि सेट करण्यासाठी मेथडस घोषित करा.
11:01 व्हॅल्यू सेट करण्यासाठी “=” चिन्ह वापरून मेथड घोषित करा .
11:05 वरील क्लासचे ऑब्जेक्ट Instantiate करा आणि वरील दोन्ही मेथडस वापरून व्हॅल्यू set आणि get करा.
11:12 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
11:14 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
11:18 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11:22 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
11:24 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11:27 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11:30 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11:36 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11:39 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11:46 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11:56 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana