PERL/C2/Hash-in-Perl/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: More-on-Hash
Author: Manali Ranade
Keywords: Perl
Time | Narration |
---|---|
00:01 | पर्लमधील Hash वरील पाठात आपले स्वागत. |
00:05 | यात शिकणार आहोत, |
00:09 | पर्लमधील Hash आणि |
00:11 | हॅशचे घटक ऍक्सेस करणे. |
00:14 | या पाठासाठी मी वापरत आहे, |
00:16 | उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टीम, |
00:21 | Perl 5.14.2 आणि |
00:24 | gedit हा टेक्स्ट एडिटर. |
00:26 | तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
00:30 | या पाठासाठी पर्लमधील व्हेरिएबल्स आणि डेटा स्ट्रक्चर्सचे ज्ञान आवश्यक आहे. |
00:38 | कॉमेंटस, लूप्स, कंडिशनल स्टेटमेंटस आणि ऍरेजचे ज्ञान फायद्याचे ठरेल. |
00:46 | संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या. |
00:52 | हॅश हा अनियमीत डेटाचा संच असतो. |
00:56 | हे key/value अश्या जोडीचे डेटा स्ट्रक्चर आहे. |
00:59 | हॅशमधील की ही एकमेव असते. |
01:01 | परंतु हॅशमधील व्हॅल्यूज डुप्लिकेट असू शकतात. |
01:05 | हॅश असे घोषित केले जाते. |
01:08 | हॅशमधून की ची व्हॅल्यू कशी मिळवायची ते पाहू. |
01:12 | की ची व्हॅल्यू मिळवण्याचा सिंटॅक्स असा आहे. |
01:17 | dollar hashName महिरपी कंसातsingle quote keyName single quote महिरपी कंस पूर्ण |
01:26 | सँपल प्रोग्रॅमद्वारे हॅश समजून घेऊ. |
01:31 | मी geditमधील perlHash dot pl ह्या फाईलमध्ये कोड आधीच टाईप केला आहे. |
01:37 | येथे दाखवल्याप्रमाणे तुमच्या perlHash dot pl फाईलमधे कोड टाईप करा. |
01:42 | पर्लमधे हॅश percentage च्या चिन्हाने घोषित केले जाते. |
01:47 | ह्या हॅशच्या कीज आहेत. |
01:49 | आणि ह्या हॅशच्या व्हॅल्यूज आहेत. |
01:53 | हॅशची की, ऍक्सेस करण्यासाठी डॉलर चिन्हाचा उपयोग करावा लागतो. |
01:59 | Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा. |
02:02 | टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा |
02:08 | perl perlHash dot pl |
02:11 | आणि एंटर दाबा. |
02:14 | टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल. |
02:19 | आता हॅश मधून कीज समाविष्ट आणि डिलिट करण्याबद्दल पाहू. |
02:24 | की समाविष्ट करण्याचा, |
02:26 | सिंटॅक्स असा आहे dollar hashName महिरपी कंसात |
02:30 | single quote KeyName single quote |
02:34 | महिरपी कंस पूर्ण equal to value semicolon |
02:40 | की डिलिट करण्यासाठी delete dollar hashName महिरपी कंसात |
02:46 | single quote KeyName single quote महिरपी कंस पूर्ण semicolon |
02:53 | आता हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ. |
02:58 | मी hashKeyOperations dot pl ह्या फाईलमधे कोड आधीच लिहून ठेवला आहे. |
03:05 | येथे हॅश घोषित केले आहे. |
03:08 | आपण हॅश मधे कीज समाविष्ट करू आणि काढून टाकू. |
03:13 | येथे आधीच बनवलेल्या हॅशमधे की समाविष्ट करत आहोत. |
03:18 | हे व्हेरिएबलला व्हॅल्यू प्रदान करण्यासारखेच आहे. |
03:23 | की डिलिट करण्यासाठी delete हा कीवर्ड वापरला जातो. |
03:27 | त्याला डिलिट करण्यासाठी की सांगणे आवश्यक आहे. |
03:31 | Ctrl+S दाबून फाईल सेव्ह करा. |
03:35 | टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा |
03:40 | perl hashKeyOperations dot pl |
03:44 | आणि एंटर दाबा. |
03:47 | टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल. |
03:52 | आता हॅश कीज आणि व्हॅल्यूज सॉर्ट कशा करायच्या ते पाहू. |
03:57 | कीज सॉर्ट करण्याचा सिंटॅक्स- |
04:00 | sort कंसात keys percentage hashName कंस पूर्ण semicolon |
04:07 | तसेच हॅश व्हॅल्यूज सॉर्ट करण्यासाठी |
04:11 | sort कंसातvalues percentage hashName कंस पूर्ण semicolon |
04:18 | सॉर्टिंगची फंक्शनॅलिटी सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ. |
04:24 | gedit वरील sortHash dot pl ह्या फाईलवर जा. |
04:30 | स्क्रीनवर दाखवलेला कोड sortHash dot pl फाईलमधे टाईप करा. |
04:36 | येथे address चा हॅश घोषित केला आहे. |
04:41 | येथे कीज सॉर्ट करण्यासाठी कीज फंक्शनसोबत सॉर्ट हे इनबिल्ट फंक्शन वापरू. |
04:49 | हॅश कीज अक्षरांच्या क्रमानुसार सॉर्ट करेल. |
04:54 | तसेच हॅशच्या व्हॅल्यूजवरही सॉर्ट फंक्शन वापरू शकतो. |
04:59 | तसेच न्युमरीक कीज आणि/किंवा व्हॅल्यूजवर सॉर्टिंग करता येते. |
05:05 | फाईल सेव्ह करून टर्मिनलवर जा. |
05:09 | स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा perl sortHash dot pl आणि एंटर दाबा. |
05:17 | टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल. |
05:22 | आता हॅशच्या सर्व कीज आणि व्हॅल्यूज कशा मिळवायच्या ते पाहू. |
05:27 | त्यासाठी पर्ल इनबिल्ट फंक्शन प्रदान करते. |
05:34 | हॅश च्या सर्व कीज मिळवण्यासाठी keysफंक्शन वापरले जाते. |
05:40 | values फंक्शन सर्व कीजच्या व्हॅल्यूज आपल्याला देते. |
05:46 | each फंक्शन हॅशवर आयटरेट करून सर्व की/व्हॅल्यूच्या जोड्या देते. |
05:53 | हे सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ. |
05:57 | त्यासाठी perlHash dot pl ही स्क्रिप्ट वापरू जी पाठाच्या सुरूवातीला बनवली होती. |
06:07 | स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा. |
06:12 | आता कोड समजून घेऊ. |
06:15 | हॅश वरील keys फंक्शन हॅशच्या सर्व कीज असलेला ऍरे देईल . |
06:22 | हॅश वरील values फंक्शन हॅश च्या सर्व कीजच्या व्हॅल्यूजचा ऍरे देईल. |
06:30 | each फंक्शन key/value ची जोडी परत देईल. |
06:34 | येथे while loop वापरले आहे. |
06:36 | ते each फंक्शनने परत दिलेल्या हॅशमधील key/valueजोड्यांवर आयटरेट करेल . |
06:43 | Ctrl+S दाबून फाईल सेव्ह करा. |
06:48 | टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा |
06:53 | perl perlHash dot pl |
06:58 | आणि एंटर दाबा. |
07:01 | टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल. |
07:05 | आता हॅशमधे लूपिंग कसे करायचे ह्याचे इतर मार्ग पाहू . |
07:10 | हॅशमधील प्रत्येक की वर आयटरेट करण्यासाठी foreach लूप वापरू. |
07:15 | नंतर की च्या व्हॅल्यूवर काही विशिष्ट कार्य करू |
07:20 | ह्याचा सिंटॅक्स स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आहे . |
07:24 | येथे foreach loop च्या प्रत्येक आयटरेशनमधे हॅशची की $variable ला देण्यात येईल. |
07:32 | नंतर हा $variable व्हॅल्यू मिळवण्यासाठी किंवा इतर कार्य करण्यासाठी वापरला जाईल. |
07:40 | तसेच स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हॅश मधील व्हॅल्यूजवर लूप करू शकतो. |
07:47 | आता सँपल प्रोग्रॅम पाहू. |
07:49 | त्यासाठी मी gedit मधील loopingOverHash dot pl फाईलवर जात आहे. |
07:55 | दर्शवलेला कोड loopingOverHash dot pl मधे टाईप करा. |
08:02 | हा कोड हॅशची एकच की परत करेल. |
08:07 | आपल्या केसमधे, |
08:09 | पहिल्यावेळी डॉलर की ($key) मधे की म्हणून Department संचित करेल. |
08:15 | foreach च्या पुढच्या आयटरेशनमधे आपल्याला Name की मिळेल. |
08:21 | टीपः हॅश हा अनियमीत डेटाचा संच आहे. |
08:26 | त्यामुळे रिटर्नड कीज हॅश तयार करताना घोषित केलेला अनुक्रम पाळणार नाहीत. |
08:33 | व्हॅल्यूज वर लूप करतानाही हेच होऊ शकेल. |
08:38 | Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा. |
08:41 | टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा |
08:46 | perl loopingOverHash dot pl |
08:50 | आणि एंटर दाबा. |
08:53 | टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल. |
08:58 | थोडक्यात, |
08:59 | आपण, |
09:01 | पर्लमधील हॅश आणि |
09:03 | हॅशचे एलिमेंट ऍक्सेस करण्याबद्दल |
09:05 | सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो. |
09:08 | आता असाईनमेंट. |
09:11 | student nameही की असलेला आणि तिचे/त्याचे |
09:15 | percentage ही व्हॅल्यू असलेला हॅश घोषित करा. |
09:18 | keys, values आणि each फंक्शन वापरून हॅशवर लूप करा. |
09:24 | प्रत्येक विद्यार्थ्याचे परसेंटेज प्रिंट करा. |
09:29 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
09:32 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
09:37 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
09:42 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
09:49 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
09:53 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
10:02 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
10:06 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
10:15 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
10:26 | हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते. |
10:30 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
10:33 | सहभागासाठी धन्यवाद. |