PERL/C2/Hash-in-Perl/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: More-on-Hash

Author: Manali Ranade

Keywords: Perl


Time Narration
00:01 पर्लमधील Hash वरील पाठात आपले स्वागत.
00:05 यात शिकणार आहोत,
00:09 पर्लमधील Hash आणि
00:11 हॅशचे घटक ऍक्सेस करणे.
00:14 या पाठासाठी मी वापरत आहे,
00:16 उबंटु लिनक्स 12.04 ऑपरेटिंग सिस्टीम,
00:21 Perl 5.14.2 आणि
00:24 gedit हा टेक्स्ट एडिटर.
00:26 तुम्ही तुमच्या आवडीचा टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:30 या पाठासाठी पर्लमधील व्हेरिएबल्स आणि डेटा स्ट्रक्चर्सचे ज्ञान आवश्यक आहे.
00:38 कॉमेंटस, लूप्स, कंडिशनल स्टेटमेंटस आणि ऍरेजचे ज्ञान फायद्याचे ठरेल.
00:46 संबंधित पाठांसाठी स्पोकन ट्युटोरियल वेबसाईटला भेट द्या.
00:52 हॅश हा अनियमीत डेटाचा संच असतो.
00:56 हे key/value अश्या जोडीचे डेटा स्ट्रक्चर आहे.
00:59 हॅशमधील की ही एकमेव असते.
01:01 परंतु हॅशमधील व्हॅल्यूज डुप्लिकेट असू शकतात.
01:05 हॅश असे घोषित केले जाते.
01:08 हॅशमधून की ची व्हॅल्यू कशी मिळवायची ते पाहू.
01:12 की ची व्हॅल्यू मिळवण्याचा सिंटॅक्स असा आहे.
01:17 dollar hashName महिरपी कंसातsingle quote keyName single quote महिरपी कंस पूर्ण
01:26 सँपल प्रोग्रॅमद्वारे हॅश समजून घेऊ.
01:31 मी geditमधील perlHash dot pl ह्या फाईलमध्ये कोड आधीच टाईप केला आहे.
01:37 येथे दाखवल्याप्रमाणे तुमच्या perlHash dot pl फाईलमधे कोड टाईप करा.
01:42 पर्लमधे हॅश percentage च्या चिन्हाने घोषित केले जाते.
01:47 ह्या हॅशच्या कीज आहेत.
01:49 आणि ह्या हॅशच्या व्हॅल्यूज आहेत.
01:53 हॅशची की, ऍक्सेस करण्यासाठी डॉलर चिन्हाचा उपयोग करावा लागतो.
01:59 Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा.
02:02 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
02:08 perl perlHash dot pl
02:11 आणि एंटर दाबा.
02:14 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
02:19 आता हॅश मधून कीज समाविष्ट आणि डिलिट करण्याबद्दल पाहू.
02:24 की समाविष्ट करण्याचा,
02:26 सिंटॅक्स असा आहे dollar hashName महिरपी कंसात
02:30 single quote KeyName single quote
02:34 महिरपी कंस पूर्ण equal to value semicolon
02:40 की डिलिट करण्यासाठी delete dollar hashName महिरपी कंसात
02:46 single quote KeyName single quote महिरपी कंस पूर्ण semicolon
02:53 आता हे उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
02:58 मी hashKeyOperations dot pl ह्या फाईलमधे कोड आधीच लिहून ठेवला आहे.
03:05 येथे हॅश घोषित केले आहे.
03:08 आपण हॅश मधे कीज समाविष्ट करू आणि काढून टाकू.
03:13 येथे आधीच बनवलेल्या हॅशमधे की समाविष्ट करत आहोत.
03:18 हे व्हेरिएबलला व्हॅल्यू प्रदान करण्यासारखेच आहे.
03:23 की डिलिट करण्यासाठी delete हा कीवर्ड वापरला जातो.
03:27 त्याला डिलिट करण्यासाठी की सांगणे आवश्यक आहे.
03:31 Ctrl+S दाबून फाईल सेव्ह करा.
03:35 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
03:40 perl hashKeyOperations dot pl
03:44 आणि एंटर दाबा.
03:47 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
03:52 आता हॅश कीज आणि व्हॅल्यूज सॉर्ट कशा करायच्या ते पाहू.
03:57 कीज सॉर्ट करण्याचा सिंटॅक्स-
04:00 sort कंसात keys percentage hashName कंस पूर्ण semicolon
04:07 तसेच हॅश व्हॅल्यूज सॉर्ट करण्यासाठी
04:11 sort कंसातvalues percentage hashName कंस पूर्ण semicolon
04:18 सॉर्टिंगची फंक्शनॅलिटी सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
04:24 gedit वरील sortHash dot pl ह्या फाईलवर जा.
04:30 स्क्रीनवर दाखवलेला कोड sortHash dot pl फाईलमधे टाईप करा.
04:36 येथे address चा हॅश घोषित केला आहे.
04:41 येथे कीज सॉर्ट करण्यासाठी कीज फंक्शनसोबत सॉर्ट हे इनबिल्ट फंक्शन वापरू.
04:49 हॅश कीज अक्षरांच्या क्रमानुसार सॉर्ट करेल.
04:54 तसेच हॅशच्या व्हॅल्यूजवरही सॉर्ट फंक्शन वापरू शकतो.
04:59 तसेच न्युमरीक कीज आणि/किंवा व्हॅल्यूजवर सॉर्टिंग करता येते.
05:05 फाईल सेव्ह करून टर्मिनलवर जा.
05:09 स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा perl sortHash dot pl आणि एंटर दाबा.
05:17 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
05:22 आता हॅशच्या सर्व कीज आणि व्हॅल्यूज कशा मिळवायच्या ते पाहू.
05:27 त्यासाठी पर्ल इनबिल्ट फंक्शन प्रदान करते.
05:34 हॅश च्या सर्व कीज मिळवण्यासाठी keysफंक्शन वापरले जाते.
05:40 values फंक्शन सर्व कीजच्या व्हॅल्यूज आपल्याला देते.
05:46 each फंक्शन हॅशवर आयटरेट करून सर्व की/व्हॅल्यूच्या जोड्या देते.
05:53 हे सँपल प्रोग्रॅमद्वारे समजून घेऊ.
05:57 त्यासाठी perlHash dot pl ही स्क्रिप्ट वापरू जी पाठाच्या सुरूवातीला बनवली होती.
06:07 स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे कोड टाईप करा.
06:12 आता कोड समजून घेऊ.
06:15 हॅश वरील keys फंक्शन हॅशच्या सर्व कीज असलेला ऍरे देईल .
06:22 हॅश वरील values फंक्शन हॅश च्या सर्व कीजच्या व्हॅल्यूजचा ऍरे देईल.
06:30 each फंक्शन key/value ची जोडी परत देईल.
06:34 येथे while loop वापरले आहे.
06:36 ते each फंक्शनने परत दिलेल्या हॅशमधील key/valueजोड्यांवर आयटरेट करेल .
06:43 Ctrl+S दाबून फाईल सेव्ह करा.
06:48 टर्मिनलवर जाऊन स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
06:53 perl perlHash dot pl
06:58 आणि एंटर दाबा.
07:01 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
07:05 आता हॅशमधे लूपिंग कसे करायचे ह्याचे इतर मार्ग पाहू .
07:10 हॅशमधील प्रत्येक की वर आयटरेट करण्यासाठी foreach लूप वापरू.
07:15 नंतर की च्या व्हॅल्यूवर काही विशिष्ट कार्य करू
07:20 ह्याचा सिंटॅक्स स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे आहे .
07:24 येथे foreach loop च्या प्रत्येक आयटरेशनमधे हॅशची की $variable ला देण्यात येईल.
07:32 नंतर हा $variable व्हॅल्यू मिळवण्यासाठी किंवा इतर कार्य करण्यासाठी वापरला जाईल.
07:40 तसेच स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे हॅश मधील व्हॅल्यूजवर लूप करू शकतो.
07:47 आता सँपल प्रोग्रॅम पाहू.
07:49 त्यासाठी मी gedit मधील loopingOverHash dot pl फाईलवर जात आहे.
07:55 दर्शवलेला कोड loopingOverHash dot pl मधे टाईप करा.
08:02 हा कोड हॅशची एकच की परत करेल.
08:07 आपल्या केसमधे,
08:09 पहिल्यावेळी डॉलर की ($key) मधे की म्हणून Department संचित करेल.
08:15 foreach च्या पुढच्या आयटरेशनमधे आपल्याला Name की मिळेल.
08:21 टीपः हॅश हा अनियमीत डेटाचा संच आहे.
08:26 त्यामुळे रिटर्नड कीज हॅश तयार करताना घोषित केलेला अनुक्रम पाळणार नाहीत.
08:33 व्हॅल्यूज वर लूप करतानाही हेच होऊ शकेल.
08:38 Ctrl + S दाबून फाईल सेव्ह करा.
08:41 टर्मिनलवर जाऊन पर्ल स्क्रिप्ट कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा
08:46 perl loopingOverHash dot pl
08:50 आणि एंटर दाबा.
08:53 टर्मिनलवर असे आऊटपुट दिसेल.
08:58 थोडक्यात, आपण,
09:01 पर्लमधील हॅश आणि
09:03 हॅशचे एलिमेंट ऍक्सेस करण्याबद्दल
09:05 सँपल प्रोग्रॅमद्वारे शिकलो.
09:08 आता असाईनमेंट.
09:11 student nameही की असलेला आणि तिचे/त्याचे
09:15 percentage ही व्हॅल्यू असलेला हॅश घोषित करा.
09:18 keys, values आणि each फंक्शन वापरून हॅशवर लूप करा.
09:24 प्रत्येक विद्यार्थ्याचे परसेंटेज प्रिंट करा.
09:29 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
09:32 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
09:37 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
09:42 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
09:49 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
09:53 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:02 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:06 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:15 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:26 हा पर्लवरील पाठ तुम्हाला आवडला असेल अशी आशा करते.
10:30 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
10:33 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana