Ruby/C2/Logical-and-other-Operators/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Title of script: Logical-and-other-Operators
Author: Manali Ranade
Keywords: Ruby
Time | Narration
|
---|---|
00.02 | Logical आणि Other Operators वरील पाठात आपले स्वागत. |
00.06 | या पाठात शिकणार आहोत, |
00.09 | लॉजिकल ऑपरेटर्स, |
00.11 | पॅरलल असाईनमेंट आणि |
00.13 | रेंज ऑपरेटर्स. |
00.15 | येथे वापरणार आहोत. |
00.17 | उबंटु लिनक्स वर्जन12.04 |
00.20 | आणि रुबी 1.9.3 |
00.23 | या पाठासाठी तुम्हाला लिनक्स टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे. |
00.29 | तसेच irb चा परिचय असावा. |
00.33 | नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00.38 | लॉजिकल ऑपरेटर्सला Boolean ऑपरेटर्स असेही म्हणतात. |
00.42 | कारण ते राशीतील भागांचे मूल्यमापन करून |
00.45 | true किंवा false व्हॅल्यू आपल्याला देतात. |
00.48 | लॉजिकल ऑपरेटर्स अशाप्रकारे आहेत. |
00.51 | दोन अँपरसँड (&&) म्हणजे (and) |
00.54 | डबल पाईप म्हणजे (or) |
00.56 | एक्स्लमेशन मार्क (!) म्हणजे (not) |
01.00 | दोन्ही राशी true असतील तरच &&(दोन अँपरसँड) आणि and आपल्याला true व्हॅल्यू देते . |
01.07 | पहिली राशी true असेल तरच दुस-याचे मूल्यमापन केले जाते. |
01.12 | प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारांतील फरक आहे. |
01.15 | चिन्हरूपी and म्हणजे &&(दोन अँपरसँड) ला अधिक प्राधान्य असते. |
01.20 | त्याची उदाहरणे पाहू. |
01.22 | त्यासाठी irb वापरू. |
01.25 | टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबा. |
01.31 | इंटरऍक्टीव्ह रुबी उघडण्यासाठी irb टाईप करून एंटर दाबा. |
01.36 | टाईप करा 3 greater than 2 space &&(दोन अँपरसँड) space 4 less than 5 |
01.47 | एंटर दाबा. |
01.49 | trueहे आऊटपुट मिळाले. |
01.53 | येथे पहिली राशी 3>2 ही true आहे. |
01.59 | दुसरी राशी 4<5 ही सुध्दा true आहे. |
02.03 | दोन्ही राशी trueअसल्याने true हे आऊटपुट मिळाले. |
02.08 | मागील कमांड पुन्हा मिळवण्यासाठी अप ऍरो दाबा. |
02.12 | दोन अँपरसँड चिन्हांच्या जागी and टाईप करा. |
02.17 | एंटर दाबा. |
02.19 | आपल्याला तोच रिझल्ट मिळेल. |
02.22 | मागील कमांड पुन्हा मिळवण्यासाठी अप ऍरो दाबा. |
02.27 | पहिल्या राशीत greater than बदलून ते less than करा. |
02.32 | एंटर दाबा. |
02.35 | false असे आऊटपुट मिळेल. |
02.38 | कारण 3<2 हे false आहे. |
02.43 | पहिली राशी falseअसल्यामुळे दुस-या राशीचे मूल्यमापन झाले नाही. |
02.49 | आणि false हे आऊटपुट मिळाले. |
02.53 | राशींपैकी एक जरी true असेल तर double pipe आणि or आपल्याला true व्हॅल्यू देते . |
02.59 | पहिली राशी false असेल तरच दुस-या राशीचे मूल्यमापन होते. |
03.04 | प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारातील फरक आहे. |
03.07 | चिन्हरूपी or म्हणजे double pipeला सर्वाधिक प्राधान्य असते. |
03.11 | त्याची उदाहरणे पाहू. |
03.15 | 10 greater than 6 space double pipe space 12 less than 7 |
03.23 | एंटर दाबा. |
03.26 | true हे आऊटपुट मिळेल. |
03.29 | येथे पहिली राशी म्हणजे 10>6 true आहे. |
03.35 | पहिली राशी true असल्यामुळे दुस-या राशीचे मूल्यमापन होणार नाही. |
03.40 | आणि true हे आऊटपुट मिळेल. |
03.42 | मागील कमांड पुन्हा मिळवण्यासाठी अप ऍरो दाबा. |
03.46 | पहिल्या राशीत greater than चिन्ह बदलून ते less than करा. |
03.52 | आणि pipe चिन्हाच्या जागी or टाईप करा. |
03.57 | एंटर दाबा. |
04.00 | येथे पहिली राशी म्हणजे 10<6 false आहे. |
04.05 | दुसरी राशी 12<7 सुध्दा false आहे. |
04.10 | दोन्ही राशी falseअसल्यामुळे falseहे आऊटपुट मिळाले. |
04.15 | ! ( exclamation mark ) आणि not ऑपरेटर्स दिलेल्या राशीच्या विरूध्द व्हॅल्यू परत करतात. |
04.20 | जर राशी true असेल, exclamation mark ऑपरेटर false व्हॅल्यू परत करेल. |
04.27 | राशी false असल्यास true व्हॅल्यू परत करेल. |
04.30 | प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारातील फरक आहे. |
04.33 | चिन्हरूपी not म्हणजे (!) उद्गारचिन्हाला सर्वाधिक प्राधान्य असते. |
04.37 | आता not ऑपरेटर वापरून बघू. |
04.40 | प्रथम टाईप करा 10 double equal to 10 |
04.45 | एंटर दाबा. |
04.47 | true हे आऊटपुट मिळेल. |
04.50 | वरील राशीचा रिझल्ट उलटा करण्यासाठी |
04.53 | राशीच्या आधी not ऑपरेटर समाविष्ट करा. |
04.57 | टाईप करा Exclamation mark कंसात 10 double equal to 10 |
05.04 | एंटर दाबा. |
05.06 | false हे आऊटपुट मिळेल. |
05.10 | Ctrl+L दाबा. irb कंसोल क्लियर करा. |
05.15 | आता parallel assignment बद्दल जाणून घेऊ. |
05.20 | रूबीत पॅरलल असाइनमेंटद्वारे एका ओळीने अनेक व्हेरिएबल्सना प्राथमिक व्हॅल्यू देता येते. |
05.26 | आता टर्मिनलवर जा. |
05.29 | पॅरलल असाइनमेंटद्वारे a, b, c ही तीन व्हेरिएबल घोषित करू. |
05.36 | टाईप करा a comma b comma c equal to 10 comma 20 comma 30 |
05.45 | आणि एंटर दाबा. |
05.47 | येथे व्हेरिएबल a ला 10 |
05.52 | b ला 20 , |
05.54 | c ला 30 ही व्हॅल्यू दिली जाईल. |
05.56 | उजवी बाजू ऍरे सारखे कार्य करेल. |
06.01 | जर डाव्या बाजूस अनेक व्हेरिएबल्स लिहिले तर त्यांचा ऍरे अनपॅक करून त्यांना अनुक्रमाने व्हॅल्यू दिल्या जातात. |
06.10 | ऍरेज बद्दल पुढील पाठांत सविस्तर जाणून घेऊ. |
06.14 | आता व्हॅल्यूज योग्य पध्दतीने प्रदान झाल्या आहेत का ते पाहू . |
06.20 | a टाईप करून एंटर दाबा. |
06.23 | व्हेरिएबल a मधे 10 ही व्हॅल्यू संचित असल्याचे दिसेल . |
06.28 | b टाईप करून एंटर दाबा. |
06.31 | आपल्याला 20 मिळेल. |
06.33 | c टाईप करून एंटर दाबा. |
06.37 | 30 दाखवले जाईल. |
06.40 | दोन व्हेरिएबल्समधील व्हॅल्यूजची अदलाबदल करण्यासाठी पॅरलल असाइनमेंट उपयोगी आहे. |
06.45 | a आणि b च्या व्हॅल्यूजची अदलाबदल करू. |
06.50 | टाईप करा puts space डबल कोटसमधे a equal to hash महिरपी कंसात a comma डबल कोटसमधे b equal to hash महिरपी कंसात b |
07.11 | एंटर दाबा. |
07.13 | a=10 आणि |
07.16 | b=20 हे आऊटपुट मिळेल. |
07.20 | आता a आणि b ची अदलाबदल करू. |
07.23 | त्यासाठी टाईप करा |
07.25 | a comma b equal to b comma a |
07.31 | एंटर दाबा. |
07.33 | puts कमांड मिळवण्यासाठी दोनदा अप ऍरो की दाबा आणि एंटर दाबा. |
07.39 | आपल्याला, |
07.41 | a=20 |
07.44 | b=10 हे आऊटपुट मिळेल. |
07.47 | आता रुबीमधील रेंजबद्दल जाणून घेऊ. |
07.50 | रेंजमधील व्हॅल्यूज नंबर्स, कॅरॅक्टर्स, स्ट्रिंग्ज किंवा ऑब्जेक्टस असू शकतात. |
07.58 | रेंजचा उपयोग अनुक्रम (Sequence) दाखवण्यासाठी करतात. |
08.02 | Sequence रेंज ही व्हॅल्यूजची सलग रेंज तयार करण्यास वापरतात. |
08.06 | त्यामधे सुरूवातीची व्हॅल्यू, व्हॅल्यूजची रेंज आणि शेवटची व्हॅल्यू दिली जाते. |
08.13 | (..) two dot ऑपरेटर इनक्लुझिव्ह रेंज बनवते. |
08.16 | (...) three dot ऑपरेटर एक्सक्लुझिव्ह रेंज बनवते. |
08.20 | रेंजचा वापर एखादी व्हॅल्यू दिलेल्या रेंजमधे आहे की नाही हे तपासण्यासाठी होतो. |
08.26 | आपण हे (===) equality ऑपरेटरद्वारे करतो. |
08.30 | रेंजेसवरील उदाहरणे पाहू. |
08.33 | टर्मिनलवर जा. |
08.36 | टाईप करा कंसात 1 two dots 10 then dot to underscore a |
08.46 | Two dot ऑपरेटर इनक्लुझिव्ह रेंज बनवतो. |
08.50 | इनक्लुझिव्ह ऑपरेटर रेंजमधे सुरूवातीची किंवा शेवटची व्हॅल्यू समाविष्ट करतो. |
08.57 | रेंज, सूचीमधे बदलण्यासाठी to_a ही मेथड वापरली आहे. |
09.03 | एंटर दाबा. |
09.05 | रेंजमधे 1 आणि 10 ह्या व्हॅल्यूज समाविष्ट झालेल्या दिसतील. |
09.11 | आता एक्सक्लुझिव्ह रेंज ऑपरेटर पाहू. |
09.16 | टाईप करा कंसात 1 three dots 10 then dot to underscore a |
09.27 | Three dot ऑपरेटर एक्सक्लुझिव्ह रेंज बनवतो. |
09.31 | एक्सक्लुझिव्ह ऑपरेटर रेंजमधील शेवटची व्हॅल्यू वगळतो. |
09.37 | एंटर दाबा. |
09.39 | येथे 10 ही व्हॅल्यू रेंजमधे समाविष्ट झालेली नाही. |
09.45 | आता 1 ते 10च्या रेंजमधे 5 ही व्हॅल्यू येते का ते तपासू . |
09.50 | टाईप करा कंसात 1 two dots 10 तीन वेळा equal to आणि नंतर 5 |
10.00 | एंटर दाबा. |
10.02 | रेंजमधे एखाद्या व्हॅल्यूचा समावेश होतो का ते तपासण्यासाठी Equality ऑपरेटर वापरतात. |
10.07 | 1 ते 10 या रेंजमधे 5 ही व्हॅल्यू समाविष्ट होत असल्यामुळे trueआऊटपुट मिळेल. |
10.14 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
10.17 | या पाठात आपण शिकलो , |
10.20 | लॉजिकल ऑपरेटर म्हणजे दोन अँपरसँड, डबल पाईप आणि उद्गारचिन्ह हे ऑपरेटर्स |
10.27 | पॅरलल असाइनमेंट उदाहरणार्थ a,b,c=10,20,30 |
10.34 | रेंज ऑपरेटर, इनक्लुझिव्ह ऑपरेटर (..) आणि एक्सक्लुझिव्ह ऑपरेटर(...) |
10.39 | आता असाईनमेंट. |
10.41 | पॅरलल असाइनमेंट वापरून दोन व्हेरिएबल्स घोषित करा. |
10.45 | त्या दोन्हींची बेरीज 20 आणि 50 च्या मधे येते की नाही ते तपासा. |
10.49 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
10.52 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
10.56 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11.00 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
11.03 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
11.05 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11.09 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
11.15 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
11.19 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11.25 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11.34 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . |
11.38 | सहभागासाठी धन्यवाद. |