Netbeans/C2/Designing-GUI-for-Sample-Java-Application/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Revision as of 19:35, 17 May 2014 by Ranjana (Talk | contribs)

Jump to: navigation, search
Time Narration
00.01 नमस्कार.
00.02 Building GUIs using Netbeans वरील पाठात स्वागत.
00.06 या पाठात Netbeans चे अतिशय आकर्षक फीचर म्हणजे GUI बिल्डर पाहू.
00.13 GUI बनवण्यासाठी Netbeans आपल्याला काय देते ?
00.16 हे What You See Is What You Get प्रकारची रचना करण्याची सुविधा देते.
00.21 लेआऊट बनवण्यासाठी सोपा इंटरफेस प्रदान करते ज्यात घटक ड्रॅग व ड्रॉप करता येतात.
00.27 ह्यात पॅलेटस उपलब्ध होतात ज्यामधे AWT आणि Swing हे घटक आधीच इन्स्टॉल्ड असतात.
00.33 यातील प्रभावी व्हिज्युअल एडिटर वापरून पूर्ण GUI ऍप्लीकेशन काही मिनिटात बनवता येते.
00.39 या पाठासाठी आपण,
00.43 Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04
00.46 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरणार आहोत.
00.50 इन्स्टॉलेशन व इतर गोष्टींबाबत अधिक जाणून घेण्यासाठी सुरूवातीचे पाठ पहा.
00.56 या पाठात आपण शिकणार आहोत,
00.58 फॉर्म एडिटरचा वापर,
01.00 सोर्स एडिटर,
01.02 पॅलेट, इन्सपेक्टर आणि प्रॉपर्टीज ही वैशिष्ट्ये.
01.05 इव्हेंट हँडलर्स समाविष्ट करणे,
01.07 तसेच ऍप्लिकेशन कंपाईल आणि कार्यान्वित करणे.
01.10 आता सुरूवात करू. सोपे अकाउंट बॅलन्सचे ऍप्लिकेशन बनवू.
01.15 ह्यात खालील गोष्टी करायच्या आहेत,
01.18 अकाउंटमधे क्रेडिट केलेली रक्कम तसेच
01.21 अकाऊंट मधून डेबिट केलेली रक्कम इनपुट करणे,
01.24 आणि शेवटी बॅलन्स काढणे.
01.26 ऍप्लिकेशन आकर्षक दिसण्यासाठी त्यात पिक्चर,
01.31 सहज व पटकन नेव्हीगेट करता येण्यासाठी वरती मेनूबार समाविष्ट करू.
01.35 आता netbeans वर जाऊन नवे प्रोजेक्ट बनवू.
01.40 File(फाइल) मेनू मधून New Project(न्यू प्रॉजेक्ट) निवडून Java Application(जावा अप्लिकेशन) सिलेक्ट करा. Next(नेक्स्ट) वर क्लिक करा.
01.49 प्रोजेक्टला नाव द्या.
01.51 आपण Account balance(अकाउंट बॅलेन्स ) हे नाव देऊ.
01.58 main class(मेन क्लास) बनवू नका पण ते main project(मेन प्रॉजेक्ट) म्हणून सेट करा.
02.02 finish(फिनिश) वर क्लिक करा. तुमच्या IDE मधे नवे प्रोजेक्ट बनले असेल.
02.07 आता मेनूतील File(फाइल) वर जाऊन New File(न्यू फाइल) निवडा.
02.15 categories(कॅटगरीज ) खालील Swing GUI(स्विंग जीयूआय) forms निवडा.
02.18 File Type(फाइल टाइप) खालील Jframe Form(जे फ्रेम फॉर्म) निवडून,
02.21 Next(नेक्स्ट) वर क्लिक करा.
02.24 ह्याला आपण Account Balance( अकाउंट बॅलेन्स) असे नाव देत आहोत.
02.29 तुम्ही हवे ते नाव देऊ शकता.
02.33 Finish(फिनिश ) वर क्लिक केल्यावर हे मुख्य डिझाईनच्या भागात घेऊन जाईल.
02.39 आता GUI builder(जीयूआय बिल्डर) समजून घेऊ.
02.43 येथे उजवीकडे palette(पॅलेट) आहे.
02.45 ज्यात Swing आणि AWT हे आधीच इन्स्टॉल्ड असलेले घटक आहेत.
02.49 येथे palette(पॅलेट) च्या खाली Properties(प्रॉपर्टीज) विंडो आहे.
02.53 येथे तुम्ही निवडलेल्या घटकांच्या प्रॉपर्टीज दिसतात.
02.58 डावीकडे navigator(नॅविगेटर) किंवा inspector(इनस्पेक्टर) आहे.
03.01 जे डिझाईन मोडमधील वर्कस्पेसवरील,
03.05 फ्रेममधे समाविष्ट केलेले घटक दाखवते.
03.08 वरच्या बाजूला source(सोर्स) बटण आहे.
03.11 त्यावर क्लिक केल्यावर हे सोर्स कोडवर घेऊन जाईल.
03.15 तुमच्या डिझाईनमधे घटक समाविष्ट केल्यावर
03.18 ते तुम्हाला संबंधित सोर्स कोड येथे सोर्समधे लिहून देईल.
03.23 डिझाईन मोडवर जाऊ आणि कोणते घटक येथे वापरायचे ते पाहू.
03.28 ऍप्लीकेशन बनवण्यासाठी पॅलेटमधील घटक
03.31 जसे की बटणे, लेबल्स, पॅनेल्स, टॅब्ड पेन इत्यादी वापरू.
03.38 Palette मधून swing Containers खालील tabbedPane निवडा.
03.45 Tabbed Pane(टेब्ब्ड पेन )निवडून form (फॉर्म)वर क्लिक करा.
03.50 हे आपल्याला tabbed frame(टेब्ब्ड फ्रेम) देईल. माऊसद्वारे त्याचा आकार बदलू शकतो.
03.58 आता Palette(पॅलेट) वर जाऊन Panel(पॅनेल) निवडा.
04.02 आणि तुमच्या frame वर क्लिक करा.
04.06 हे आपल्याला टॅब देईल.
04.09 आता आणखी एकदा पॅनेल सिलेक्ट करून पुन्हा फॉर्मवर क्लिक करा.
04.14 आपल्याकडे एकूण दोन टॅब्ज आहेत.
04.17 आता टॅब्जचे नाव बदलण्यासाठी त्यावर डबल क्लिक करू शकता किंवा टॅबवर राईट क्लिक करून edit text(एडिट टेक्स्ट) पर्याय निवडू शकता.
04.29 पहिल्या टॅबला image(इमेज) व दुस-याला Balance(बॅलेन्स) असे नवीन नाव देऊ.
04.37 आता पुन्हा पॅलेटवर जाऊन swing Controls(स्विंग कंट्रोल्स) मेनूमधून लेबल्स समाविष्ट करू.
04.43 Swing Controls(स्विंग कंट्रोल्स) मधून लेबल सिलेक्ट करून आपल्या फॉर्ममधे समाविष्ट करा.
04.48 ह्या ऍप्लीकेशनसाठी सहा लेबल्स ची गरज आहे.
04.54 आपल्या फॉर्ममधे सहा लेबल्स समाविष्ट केली आहेत.
04.58 त्यांच्यावर क्लिक करून त्यांची जागा आणि रचना बदलू शकता.
05.02 तसेच माऊसद्वारेही नवी जागा आणि रचना बनवता येते.
05.06 आता लेबलवरील टेक्स्ट बदलू.
05.08 त्यावर डबल क्लिक किंवा राईट क्लिक करू शकता.
05.12 edit text(एडिट टेक्स्ट) निवडा.
05.14 आता लेबल्सची नावे बदलू.
05.16 मी पहिल्या लेबलला Initial Amount(इनिशियल अमाउंट),
05.22 दुस-याला Credit Amount(क्रेडिट अमाउंट),
05.30 तिस-याला Debit amount(डेबिट अमाउंट),
05.35 चौथ्याला balance( बॅलेन्स) नाव देत आहे.
05.41 सुरूवातीची रक्कम रूपये 5000 वर सेट करू.
05.48 बॅलन्स कंप्युट केल्यावर तो येथे दाखवू.
05.53 परंतु आत्ता येथे stars काढू.
06.01 Palette(पॅलेट) वर जाऊन Text Field(टेक्स्टफील्ड) सिलेक्ट करा. आपण credit amount आणि debit amount समोर टेक्स्ट फिल्डस समाविष्ट करू.
06.16 आपण text field(टेक्स्टफील्ड) रिकामी ठेवणे गरजेचे आहे.
06.20 टेक्स्ट एडिट करून येथील टेक्स्ट काढून टाका.
06.27 माऊसद्वारे त्याचा आकार बदलू.
06.35 हे पूर्ण झाल्यावर पॅलेटवर परत जा आणि बटण सिलेक्ट करा.
06.42 फ्रेममधे खाली बटण समाविष्ट करा.
06.48 त्यावर राईट क्लिक करून लेबलचे नाव बदलू शकता.
06.53 edit text(एडिट टेक्स्ट) पर्याय निवडून Get Balance(गेट बॅलेन्स) हे नाव द्या.
06.58 हे GUI आहे.
07.01 आता Image(इमेज) टॅबवर म्हणजेच tab1 वर जाऊन इमेज समाविष्ट करा.
07.05 हे करण्यासाठी Palette(पॅलेट) वर परत जा.
07.08 आणखी एक Label निवडून पॅनेलवर ड्रॉप करा.
07.13 palette(पॅलेट) खालील Properties(प्रॉपेर्टिज) विंडो मधील icon(आइकान) प्रॉपर्टी शोधून त्याच्या उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
07.26 icons(आइकॉन्स) प्रॉपर्टी विंडो उघडेल.
07.28 येथे External Image( एक्सटर्नल इमेज) पर्याय निवडून त्याच्या उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
07.35 तुमच्या ऍप्लीकेशनमधे जी इमेज समाविष्ट करायची आहे ती शोधा.
07.41 ही इमेज सिलेक्ट करून OK वर क्लिक करा.
07.48 माऊसद्वारे ती योग्य ठिकाणी ठेवा.
07.51 तुम्ही हे टेक्स्ट काढून टाकू शकता. त्यासाठी लेबलवर डबल क्लिक करा.
07.59 आता इमेज समाविष्ट केली आहे.
08.02 आता GUI मधे मेनू समाविष्ट करू.
08.05 palette(पॅलेट) वर जाऊन swing menus(स्विंग मेनुस) खालील Menu bar (मेनु बार )हा पर्याय निवडा.
08.12 Menu Bar(मेनु बार ) निवडून पॅनेलच्या वरच्या बाजूला येथे क्लिक करा.
08.17 डिफॉल्ट रूपात येथे File( फाइल) आणि Edit(एडिट) ही मेनू लेबल्स आहेत.
08.22 Edit(एडिट) टेक्स्टवर डबल क्लिक करून तिथे Help(हेल्प) लिहा.
08.28 तसेच File(फाइल) खाली सबमेनू देखील समाविष्ट करू.
08.32 आता डाव्या बाजूला असलेल्या Inspector(इनस्पेक्टर) किंवा navigator(नॅविगेटर) मधील JMenu1(जेमेनुवन) वर राईट क्लिक करा.
08.39 Add From Palette(एड फ्रॉम पॅलेट) हा पर्याय निवडून Menu Item(मेनु आइटम) सिलेक्ट करा.
08.45 हे Menu Item(मेनु आइटम) समाविष्ट करेल .
08.47 त्याचे नाव बदलून तिथे Exit(एग्ज़िट) लिहू.
08.54 अशाप्रकारे file(फाइल) मेनूखाली सबमेनू समाविष्ट करून त्या मेनू आयटमचे नाव देखील बदलले.
09.00 आता GUI ब-यापैकी पूर्ण झाले आहे.
09.03 आता प्रिव्ह्यू पाहू.
09.05 वरच्या बाजूला असलेल्या 'Preview Design'(प्रीव्यू डिज़ाइन) बटणावर क्लिक करा.
09.09 आपण जे काम केले त्याचा प्रिव्ह्यू दिसेल.
09.12 येथे बटणे काम करणार नाहीत.
09.16 परंतु कोडमधे समाविष्ट केल्यावर हे सर्व काम करेल.
09.20 आता प्रिव्ह्यू बंद करू.
09.22 कोड समाविष्ट करण्यापूर्वी इनपुट टेक्स्ट फिल्डला योग्य व्हेरिएबलची नावे देऊ.
09.28 balance(बॅलेन्स) टॅबवर जाऊन टेक्स्ट फिल्डला योग्य व्हेरिएबलची नावे देऊ.
09.34 inspector(इनस्पेक्टर) मधे JTextfield1 वर राईट क्लिक करा.
09.40 चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करा.
09.43 व्हेरिएबल चे नाव बदलून credit Amount(क्रेडिट अमाउंट) करा.
09.50 Ok क्लिक करा.
09.53 येथे डिझाईन मोडमधे textfield(टेक्स्टफील्ड ) वर राईट क्लिक करू शकता.
09.56 चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करा.
10.00 व्हेरिएबल चे नाव बदलून debit Amount(डेबिट अमाउंट) करा.
10.04 Ok क्लिक करा.
10.08 आपण या शेवटच्या लेबलला म्हणजेच stars textfields(स्टार्स टेक्स्टफील्ड) लेबलला resultBalance(रिज़ल्ट बॅलेन्स) म्हणू.
10.16 पुन्हा चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करून व्हेरिएबल चे नाव बदलून resultBalance(रिज़ल्ट बॅलेन्स) करा.
10.23 Ok क्लिक करा.
10.25 आता ऍप्लीकेशन सुरू करण्यासाठी कोड बघू.
10.30 हा sample code(सॅम्पल कोड) आहे.
10.32 आपल्याला creditAmount(क्रेडिट अमाउंट ) मधून getText()(गेट टेक्स्ट)
10.37 आणि debitAmount(डेबिट अमाउंट) मधून getText()(गेट टेक्स्ट) हवे आहे.
10.39 balance कंप्युट करून ती रक्कम resultBalance(रिज़ल्ट बॅलेन्स) मधे लिहू.
10.44 येथील कोड कॉपी करून IDE वर जाऊ.
10.51 getBalance(गेट बॅलेन्स ) बटणावर राईट क्लिक करा.
10.55 Events( इवेंट्स) पर्यायातील Action(एक्षन) मधील Action Performed(एक्षन पर्फॉर्म्ड ) सिलेक्ट करा.
11.00 हे आपल्याला कोडच्या विभागाकडे नेईल.
11.03 जेथे तुम्हाला बटण दाबल्यावर करायच्या कृतीचा कोड लिहावा किंवा पेस्ट करावा लागेल.
11.10 कॉपी केलेला कोड येथे पेस्ट करा.
11.17 कोड सेव्ह करून Design mode( डिज़ाइन मोड) वर जा.
11.22 आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कोड समाविष्ट करू.
11.25 मेनू आयटम, Exit(एग्ज़िट) वर राईट क्लिक करून Events( इवेंट्स) मधील Action(एक्षन) मधील Action Performed(एक्षन पर्फॉर्म्ड ) सिलेक्ट करा.
11.40 हे सोर्स कोडवर नेईल. येथे ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कोड लिहायचा आहे.
11.46 टाईप करा. System.exit(1).
11.53 कोड सेव्ह करून डिझाईन मोडवर परत जा.
11.57 Exit(एग्ज़िट) मेनू आयटमसाठी शॉर्टकट समाविष्ट करू.
12.02 शॉर्टकट पर्यायावर डबल क्लिक करा. उघडलेल्या विंडोमधे,
12.07 key stroke(की स्ट्रोक) मधे Q आणि Ctrl चेकबॉक्सवर क्लिक करून OK(ओके) क्लिक करा.
12.14 अशाप्रकारे ऍप्लिकेशन मधूनबाहेर पडण्यासाठी Ctrl Q हा कीबोर्ड शॉर्टकट सेट केला आहे.
12.20 आता ऍप्लिकेशन पूर्ण झाले आहे.
12.23 कीबोर्डवरील F6 दाबून ऍप्लिकेशन कार्यान्वित करा .
12.30 कार्यान्वित करायचा main class(मेन क्लास) आधीच सिलेक्ट केलेला आहे.
12.33 Ok(ओके) क्लिक करा.
12.37 हा GUI आहे.
12.40 आता तपासणी कार्यान्वित करू.
12.43 balance(बॅलेन्स) टॅबवर जाऊन credit amount(क्रेडिट अमाउंट) मधे 300 रूपये टाईप करा.
12.47 आणि debit amount(डेबिट अमाउंट) मधे 200 रूपये टाईप करा. 'Get Balance'(गेट बॅलेन्स) क्लिक करा.
12.53 येथे बॅलन्समधे योग्य रक्कम दिसते.
12.56 आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडू.
12.58 File(फाइल) मधे जाऊन Exit(एग्ज़िट ) वर क्लिक करा.
13.02 कीबोर्डवरील Ctrl Q दाबून देखील ऍप्लिकेशन मधून बाहेर पडू शकतो.
13.08 अशाप्रकारे ऍप्लिकेशन पूर्ण झाले आहे. आता असाईनमेंट करा.
13.14 तुम्हाला टेंपरेचर कन्व्हर्टर ऍप्लिकेशन बनवायचे आहे.
13.18 आपल्याकडे आधीसारखेच दोन टॅब्ज असणे गरजेचे आहे.
13.21 पहिला सेंटीग्रेडचे फॅरनहाइटमधे आणि दुसरा फॅरनहाइटहीटचे सेल्सियसमधे रूपांतर करण्यासाठी.
13.27 आपण इनपुट टेंपरे चर घेऊन,
13.30 त्याचे रूपांतरित टेंपरेचर दाखवायचे आहे.
13.33 तसेच त्यामधे File(फाइल) आणि Help(हेल्प) हे पर्याय असलेला मेनूबार असावा.
13.38 आणि फाईल मेनूमधे ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट सहित Exit(एग्ज़िट ) आयटम असायला हवा.
13.46 ही असाईनमेंट आधीच सोडवलेली आहे.
13.48 हे असे दिसायला हवे.
13.50 आपण असाईनमेंट कार्यान्वित करत आहोत आणि हा GUI आहे.
13.56 आता इनपुट टेंपरेचर म्हणून -40 सेल्सियस टाईप करा. आणि गेट फॅरनहीटवर क्लिक करा.
14.05 ऍप्लिकेशननी योग्य रूपांतरित आऊटपुट टेंपरेचर दिले पाहिजे.
14.10 आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी Ctrl X ही शॉर्टकट की वापरा.
14.18 अशाप्रकारे आपण कीबोर्ड शॉर्टकट वापरून ऍप्लिकेशन मधून बाहेर पडलो आहोत.
14.25 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
14.29 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
14.32 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
14.37 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
14.42 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
14.46 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
14.52 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
14.56 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
15.03 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
15.13 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
15.17 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana