Netbeans/C2/Designing-GUI-for-Sample-Java-Application/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार,Building GUIs using Netbeans वरील पाठात स्वागत.
00:06 या पाठात Netbeans चे अतिशय आकर्षक फीचर म्हणजे GUI बिल्डर पाहू.
00:13 GUI बनवण्यासाठी Netbeans आपल्याला काय देते ?
00:16 हे What You See Is What You Get प्रकारची रचना करण्याची सुविधा देते.
00:21 लेआऊट बनवण्यासाठी सोपा इंटरफेस प्रदान करते ज्यात घटक ड्रॅग व ड्रॉप करता येतात.
00:27 ह्यात पॅलेटस उपलब्ध होतात ज्यामधे AWT आणि Swing हे घटक आधीच इन्स्टॉल्ड असतात.
00:33 यातील प्रभावी व्हिज्युअल एडिटर वापरून पूर्ण GUI ऍप्लीकेशन काही मिनिटात बनवता येते.
00:39 या पाठासाठी आपण,
00:43 Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04
00:46 आणि Netbeans IDE v7.1.1 वापरणार आहोत.
00:50 इन्स्टॉलेशन व इतर गोष्टींबाबत अधिक जाणून घेण्यासाठी सुरूवातीचे पाठ पहा.
00:56 या पाठात आपण शिकणार आहोत,
00:58 फॉर्म एडिटरचा वापर,
01:00 सोर्स एडिटर,
01:02 पॅलेट, इन्सपेक्टर आणि प्रॉपर्टीज ही वैशिष्ट्ये.
01:05 इव्हेंट हँडलर्स समाविष्ट करणे,
01:07 तसेच ऍप्लिकेशन कंपाईल आणि कार्यान्वित करणे.
01:10 आता सुरूवात करू. सोपे अकाउंट बॅलन्सचे ऍप्लिकेशन बनवू.
01:15 ह्यात खालील गोष्टी करायच्या आहेत,
01:18 अकाउंटमधे क्रेडिट केलेली रक्कम तसेच
01:21 अकाऊंट मधून डेबिट केलेली रक्कम इनपुट करणे,
01:24 आणि शेवटी बॅलन्स काढणे.
01:26 ऍप्लिकेशन आकर्षक दिसण्यासाठी त्यात पिक्चर,
01:31 सहज व पटकन नेव्हीगेट करता येण्यासाठी वरती मेनूबार समाविष्ट करू.
01:35 आता netbeans वर जाऊन नवे प्रोजेक्ट बनवू.
01:40 File(फाइल) मेनू मधून New Project(न्यू प्रॉजेक्ट) निवडून Java Application(जावा अप्लिकेशन) सिलेक्ट करा. Next(नेक्स्ट) वर क्लिक करा.
01:49 प्रोजेक्टला नाव द्या.
01:51 आपण Account balance(अकाउंट बॅलेन्स ) हे नाव देऊ.
01:58 main class(मेन क्लास) बनवू नका पण ते main project(मेन प्रॉजेक्ट) म्हणून सेट करा.
02:02 finish(फिनिश) वर क्लिक करा. तुमच्या IDE मधे नवे प्रोजेक्ट बनले असेल.
02:07 आता मेनूतील File(फाइल) वर जाऊन New File(न्यू फाइल) निवडा.
02:15 categories(कॅटगरीज ) खालील Swing GUI(स्विंग जीयूआय) forms निवडा.
02:18 File Type(फाइल टाइप) खालील Jframe Form(जे फ्रेम फॉर्म) निवडून,
02:21 Next(नेक्स्ट) वर क्लिक करा.
02:24 ह्याला आपण Account Balance( अकाउंट बॅलेन्स) असे नाव देत आहोत.
02:29 तुम्ही हवे ते नाव देऊ शकता.
02:33 Finish(फिनिश ) वर क्लिक केल्यावर हे मुख्य डिझाईनच्या भागात घेऊन जाईल.
02:39 आता GUI builder(जीयूआय बिल्डर) समजून घेऊ.
02:43 येथे उजवीकडे palette(पॅलेट) आहे.
02:45 ज्यात Swing आणि AWT हे आधीच इन्स्टॉल्ड असलेले घटक आहेत.
02:49 येथे palette(पॅलेट) च्या खाली Properties(प्रॉपर्टीज) विंडो आहे.
02:53 येथे तुम्ही निवडलेल्या घटकांच्या प्रॉपर्टीज दिसतात.
02:58 डावीकडे navigator(नॅविगेटर) किंवा inspector(इनस्पेक्टर) आहे.
03:01 जे डिझाईन मोडमधील वर्कस्पेसवरील,
03:05 फ्रेममधे समाविष्ट केलेले घटक दाखवते.
03:08 वरच्या बाजूला source(सोर्स) बटण आहे.
03:11 त्यावर क्लिक केल्यावर हे सोर्स कोडवर घेऊन जाईल.
03:15 तुमच्या डिझाईनमधे घटक समाविष्ट केल्यावर
03:18 ते तुम्हाला संबंधित सोर्स कोड येथे सोर्समधे लिहून देईल.
03:23 डिझाईन मोडवर जाऊ आणि कोणते घटक येथे वापरायचे ते पाहू.
03:28 ऍप्लीकेशन बनवण्यासाठी पॅलेटमधील घटक
03:31 जसे की बटणे, लेबल्स, पॅनेल्स, टॅब्ड पेन इत्यादी वापरू.
03:38 Palette मधून swing Containers खालील tabbedPane निवडा.
03:45 Tabbed Pane(टेब्ब्ड पेन )निवडून form (फॉर्म)वर क्लिक करा.
03:50 हे आपल्याला tabbed frame(टेब्ब्ड फ्रेम) देईल. माऊसद्वारे त्याचा आकार बदलू शकतो.
03:58 आता Palette(पॅलेट) वर जाऊन Panel(पॅनेल) निवडा.
04:02 आणि तुमच्या frame वर क्लिक करा.
04:06 हे आपल्याला टॅब देईल.
04:09 आता आणखी एकदा पॅनेल सिलेक्ट करून पुन्हा फॉर्मवर क्लिक करा.
04:14 आपल्याकडे एकूण दोन टॅब्ज आहेत.
04:17 आता टॅब्जचे नाव बदलण्यासाठी त्यावर डबल क्लिक करू शकता किंवा टॅबवर राईट क्लिक करून edit text(एडिट टेक्स्ट) पर्याय निवडू शकता.
04:29 पहिल्या टॅबला image(इमेज) व दुस-याला Balance(बॅलेन्स) असे नवीन नाव देऊ.
04:37 आता पुन्हा पॅलेटवर जाऊन swing Controls(स्विंग कंट्रोल्स) मेनूमधून लेबल्स समाविष्ट करू.
04:43 Swing Controls(स्विंग कंट्रोल्स) मधून लेबल सिलेक्ट करून आपल्या फॉर्ममधे समाविष्ट करा.
04:48 ह्या ऍप्लीकेशनसाठी सहा लेबल्स ची गरज आहे.
04:54 आपल्या फॉर्ममधे सहा लेबल्स समाविष्ट केली आहेत.
04:58 त्यांच्यावर क्लिक करून त्यांची जागा आणि रचना बदलू शकता.
05:02 तसेच माऊसद्वारेही नवी जागा आणि रचना बनवता येते.
05:06 आता लेबलवरील टेक्स्ट बदलू.
05:08 त्यावर डबल क्लिक किंवा राईट क्लिक करू शकता.
05:12 edit text(एडिट टेक्स्ट) निवडा.
05:14 आता लेबल्सची नावे बदलू.
05:16 मी पहिल्या लेबलला Initial Amount(इनिशियल अमाउंट),
05:22 दुस-याला Credit Amount(क्रेडिट अमाउंट),
05:30 तिस-याला Debit amount(डेबिट अमाउंट),
05:35 चौथ्याला balance( बॅलेन्स) नाव देत आहे.
05:41 सुरूवातीची रक्कम रूपये 5000 वर सेट करू.
05:48 बॅलन्स कंप्युट केल्यावर तो येथे दाखवू.
05:53 परंतु आत्ता येथे stars काढू.
06:01 Palette(पॅलेट) वर जाऊन Text Field(टेक्स्टफील्ड) सिलेक्ट करा. आपण credit amount आणि debit amount समोर टेक्स्ट फिल्डस समाविष्ट करू.
06:16 आपण text field(टेक्स्टफील्ड) रिकामी ठेवणे गरजेचे आहे.
06:20 टेक्स्ट एडिट करून येथील टेक्स्ट काढून टाका.
06:27 माऊसद्वारे त्याचा आकार बदलू.
06:35 हे पूर्ण झाल्यावर पॅलेटवर परत जा आणि बटण सिलेक्ट करा.
06:42 फ्रेममधे खाली बटण समाविष्ट करा.
06:48 त्यावर राईट क्लिक करून लेबलचे नाव बदलू शकता.
06:53 edit text(एडिट टेक्स्ट) पर्याय निवडून Get Balance(गेट बॅलेन्स) हे नाव द्या.
06:58 हे GUI आहे.
07:01 आता Image(इमेज) टॅबवर म्हणजेच tab1 वर जाऊन इमेज समाविष्ट करा.
07:05 हे करण्यासाठी Palette(पॅलेट) वर परत जा.
07:08 आणखी एक Label निवडून पॅनेलवर ड्रॉप करा.
07:13 palette(पॅलेट) खालील Properties(प्रॉपेर्टिज) विंडो मधील icon(आइकान) प्रॉपर्टी शोधून त्याच्या उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
07:26 icons(आइकॉन्स) प्रॉपर्टी विंडो उघडेल.
07:28 येथे External Image( एक्सटर्नल इमेज) पर्याय निवडून त्याच्या उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा.
07:35 तुमच्या ऍप्लीकेशनमधे जी इमेज समाविष्ट करायची आहे ती शोधा.
07:41 ही इमेज सिलेक्ट करून OK वर क्लिक करा.
07:48 माऊसद्वारे ती योग्य ठिकाणी ठेवा.
07:51 तुम्ही हे टेक्स्ट काढून टाकू शकता. त्यासाठी लेबलवर डबल क्लिक करा.
07:59 आता इमेज समाविष्ट केली आहे.
08:02 आता GUI मधे मेनू समाविष्ट करू.
08:05 palette(पॅलेट) वर जाऊन swing menus(स्विंग मेनुस) खालील Menu bar (मेनु बार )हा पर्याय निवडा.
08:12 Menu Bar(मेनु बार ) निवडून पॅनेलच्या वरच्या बाजूला येथे क्लिक करा.
08:17 डिफॉल्ट रूपात येथे File( फाइल) आणि Edit(एडिट) ही मेनू लेबल्स आहेत.
08:22 Edit(एडिट) टेक्स्टवर डबल क्लिक करून तिथे Help(हेल्प) लिहा.
08:28 तसेच File(फाइल) खाली सबमेनू देखील समाविष्ट करू.
08:32 आता डाव्या बाजूला असलेल्या Inspector(इनस्पेक्टर) किंवा navigator(नॅविगेटर) मधील JMenu1(जेमेनुवन) वर राईट क्लिक करा.
08:39 Add From Palette(एड फ्रॉम पॅलेट) हा पर्याय निवडून Menu Item(मेनु आइटम) सिलेक्ट करा.
08:45 हे Menu Item(मेनु आइटम) समाविष्ट करेल .
08:47 त्याचे नाव बदलून तिथे Exit(एग्ज़िट) लिहू.
08:54 अशाप्रकारे file(फाइल) मेनूखाली सबमेनू समाविष्ट करून त्या मेनू आयटमचे नाव देखील बदलले.
09:00 आता GUI ब-यापैकी पूर्ण झाले आहे.
09:03 आता प्रिव्ह्यू पाहू.
09:05 वरच्या बाजूला असलेल्या 'Preview Design'(प्रीव्यू डिज़ाइन) बटणावर क्लिक करा.
09:09 आपण जे काम केले त्याचा प्रिव्ह्यू दिसेल.
09:12 येथे बटणे काम करणार नाहीत.
09:16 परंतु कोडमधे समाविष्ट केल्यावर हे सर्व काम करेल.
09:20 आता प्रिव्ह्यू बंद करू.
09:22 कोड समाविष्ट करण्यापूर्वी इनपुट टेक्स्ट फिल्डला योग्य व्हेरिएबलची नावे देऊ.
09:28 balance(बॅलेन्स) टॅबवर जाऊन टेक्स्ट फिल्डला योग्य व्हेरिएबलची नावे देऊ.
09:34 inspector(इनस्पेक्टर) मधे JTextfield1 वर राईट क्लिक करा.
09:40 चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करा.
09:43 व्हेरिएबल चे नाव बदलून credit Amount(क्रेडिट अमाउंट) करा.
09:50 Ok क्लिक करा.
09:53 येथे डिझाईन मोडमधे textfield(टेक्स्टफील्ड ) वर राईट क्लिक करू शकता.
09:56 चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करा.
10:00 व्हेरिएबल चे नाव बदलून debit Amount(डेबिट अमाउंट) करा.
10:04 Ok क्लिक करा.
10:08 आपण या शेवटच्या लेबलला म्हणजेच stars textfields(स्टार्स टेक्स्टफील्ड) लेबलला resultBalance(रिज़ल्ट बॅलेन्स) म्हणू.
10:16 पुन्हा चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करून व्हेरिएबल चे नाव बदलून resultBalance(रिज़ल्ट बॅलेन्स) करा.
10:23 Ok क्लिक करा.
10:25 आता ऍप्लीकेशन सुरू करण्यासाठी कोड बघू.
10:30 हा sample code(सॅम्पल कोड) आहे.
10:32 आपल्याला creditAmount(क्रेडिट अमाउंट ) मधून getText()(गेट टेक्स्ट)
10:37 आणि debitAmount(डेबिट अमाउंट) मधून getText()(गेट टेक्स्ट) हवे आहे.
10:39 balance कंप्युट करून ती रक्कम resultBalance(रिज़ल्ट बॅलेन्स) मधे लिहू.
10:44 येथील कोड कॉपी करून IDE वर जाऊ.
10:51 getBalance(गेट बॅलेन्स ) बटणावर राईट क्लिक करा.
10:55 Events( इवेंट्स) पर्यायातील Action(एक्षन) मधील Action Performed(एक्षन पर्फॉर्म्ड ) सिलेक्ट करा.
11:00 हे आपल्याला कोडच्या विभागाकडे नेईल.
11:03 जेथे तुम्हाला बटण दाबल्यावर करायच्या कृतीचा कोड लिहावा किंवा पेस्ट करावा लागेल.
11:10 कॉपी केलेला कोड येथे पेस्ट करा.
11:17 कोड सेव्ह करून Design mode( डिज़ाइन मोड) वर जा.
11:22 आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कोड समाविष्ट करू.
11:25 मेनू आयटम, Exit(एग्ज़िट) वर राईट क्लिक करून Events( इवेंट्स) मधील Action(एक्षन) मधील Action Performed(एक्षन पर्फॉर्म्ड ) सिलेक्ट करा.
11:40 हे सोर्स कोडवर नेईल. येथे ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कोड लिहायचा आहे.
11:46 टाईप करा. System.exit(1).
11:53 कोड सेव्ह करून डिझाईन मोडवर परत जा.
11:57 Exit(एग्ज़िट) मेनू आयटमसाठी शॉर्टकट समाविष्ट करू.
12:02 शॉर्टकट पर्यायावर डबल क्लिक करा. उघडलेल्या विंडोमधे,
12:07 key stroke(की स्ट्रोक) मधे Q आणि Ctrl चेकबॉक्सवर क्लिक करून OK(ओके) क्लिक करा.
12:14 अशाप्रकारे ऍप्लिकेशन मधूनबाहेर पडण्यासाठी Ctrl Q हा कीबोर्ड शॉर्टकट सेट केला आहे.
12:20 आता ऍप्लिकेशन पूर्ण झाले आहे.
12:23 कीबोर्डवरील F6 दाबून ऍप्लिकेशन कार्यान्वित करा .
12:30 कार्यान्वित करायचा main class(मेन क्लास) आधीच सिलेक्ट केलेला आहे.
12:33 Ok(ओके) क्लिक करा.
12:37 हा GUI आहे.
12:40 आता तपासणी कार्यान्वित करू.
12:43 balance(बॅलेन्स) टॅबवर जाऊन credit amount(क्रेडिट अमाउंट) मधे 300 रूपये टाईप करा.
12:47 आणि debit amount(डेबिट अमाउंट) मधे 200 रूपये टाईप करा. 'Get Balance'(गेट बॅलेन्स) क्लिक करा.
12:53 येथे बॅलन्समधे योग्य रक्कम दिसते.
12:56 आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडू.
12:58 File(फाइल) मधे जाऊन Exit(एग्ज़िट ) वर क्लिक करा.
13:02 कीबोर्डवरील Ctrl Q दाबून देखील ऍप्लिकेशन मधून बाहेर पडू शकतो.
13:08 अशाप्रकारे ऍप्लिकेशन पूर्ण झाले आहे. आता असाईनमेंट करा.
13:14 तुम्हाला टेंपरेचर कन्व्हर्टर ऍप्लिकेशन बनवायचे आहे.
13:18 आपल्याकडे आधीसारखेच दोन टॅब्ज असणे गरजेचे आहे.
13:21 पहिला सेल्सियसचे फॅरनहाइटमधे आणि दुसरा फॅरनहाइटहीटचे सेल्सियसमधे रूपांतर करण्यासाठी.
13:27 आपण इनपुट टेंपरे चर घेऊन,
13:30 त्याचे रूपांतरित टेंपरेचर दाखवायचे आहे.
13:33 तसेच त्यामधे File(फाइल) आणि Help(हेल्प) हे पर्याय असलेला मेनूबार असावा.
13:38 आणि फाईल मेनूमधे ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट सहित Exit(एग्ज़िट ) आयटम असायला हवा.
13:46 ही असाईनमेंट आधीच सोडवलेली आहे.
13:48 हे असे दिसायला हवे.
13:50 आपण असाईनमेंट कार्यान्वित करत आहोत आणि हा GUI आहे.
13:56 आता इनपुट टेंपरेचर म्हणून -40 सेल्सियस टाईप करा. आणि गेट फॅरनहीटवर क्लिक करा.
14:05 ऍप्लिकेशननी योग्य रूपांतरित आऊटपुट टेंपरेचर दिले पाहिजे.
14:10 आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी Ctrl X ही शॉर्टकट की वापरा.
14:18 अशाप्रकारे आपण कीबोर्ड शॉर्टकट वापरून ऍप्लिकेशन मधून बाहेर पडलो आहोत.
14:25 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
14:29 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
14:32 जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता.
14:37 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
14:42 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
14:46 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
14:52 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
14:56 यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे.
15:03 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
15:13 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते.
15:17 सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana