Difference between revisions of "OpenModelica/C2/Arrays-in-Modelica/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 60: | Line 60: | ||
|- | |- | ||
|| 01:29 | || 01:29 | ||
− | |'''Vector indexing''' हे '''1''' ने सुरू होते आणि '''Indices''' | + | |'''Vector indexing''' हे '''1''' ने सुरू होते आणि '''Indices''' पूर्णांक (integers)असणे आवश्यक आहे. |
|- | |- | ||
Line 104: | Line 104: | ||
|- | |- | ||
|| 02:49 | || 02:49 | ||
− | | चांगल्या दृश्यतेसाठी मी '''OMEdit''' | + | | चांगल्या दृश्यतेसाठी मी '''OMEdit''' विंडो डावीकडे स्थानांतरित करते. |
|- | |- | ||
Line 112: | Line 112: | ||
|- | |- | ||
|| 03:00 | || 03:00 | ||
− | | ते'''Text View''' मध्ये उघडा. | + | | ते '''Text View''' मध्ये उघडा. |
|- | |- | ||
Line 128: | Line 128: | ||
|- | |- | ||
|| 03:23 | || 03:23 | ||
− | |'''polynomialEvaluator''' चे '''a,b''' आणि '''c''' | + | |'''polynomialEvaluator''' चे '''a,b''' आणि '''c''' पॅरामीटर्स, वेक्टर '''a''' शी बदलले आहेत. |
|- | |- | ||
Line 367: | Line 367: | ||
|- | |- | ||
|| 08:31 | || 08:31 | ||
− | | '''while''' च्या तुलनेने '''for ''' | + | | '''while''' च्या तुलनेने '''for ''' लूपचा वापर Modelica मध्ये वारंवार केला जातो. |
|- | |- | ||
|| 08:37 | || 08:37 | ||
− | |आता '''Arrays''' | + | |आता '''Arrays''' बद्दल चर्चा करू. |
|- | |- | ||
Line 387: | Line 387: | ||
|- | |- | ||
|| 08:55 | || 08:55 | ||
− | |'''array''' | + | |'''array''' बनविण्याविषयी आणि इंडेक्सिंगविषयी अधिक जाणण्यासाठी, |
|- | |- | ||
Line 411: | Line 411: | ||
|- | |- | ||
||09:29 | ||09:29 | ||
− | |'''myMatrix''' हा एक '''Real''' | + | |'''myMatrix''' हा एक '''Real''' पॅरामीटर अॅरे आहे. |
|- | |- | ||
Line 459: | Line 459: | ||
|- | |- | ||
|| 10:29 | || 10:29 | ||
− | |हे दोन arrays | + | |हे दोन arrays किंवा matrices जोडण्यासाठी आपल्याला दोन डायमेंशनमधील एलिमेन्ट्स एक्सेस करणे आवश्यक आहे. |
|- | |- |
Latest revision as of 17:29, 26 April 2018
Time | Narration |
00:01 | Arrays वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:05 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - array व्हेरिएबल्स कसे घोषित करायचे, arrays कसे बनवायचे, for आणि while लूप्स कसे वापरावे आणि OMShell कसे वापरावे. |
00:20 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी OpenModelica 1.9.2 वापरत आहे. |
00:26 | आपण ह्या ट्युटोरिअलचा सराव करण्यासाठी पुढीलपैकी कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमचा उपयोग करू शकता. |
00:32 | हे ट्युटोरिअल समजण्यासाठी आणि सराव करण्यासाठी, कोणत्याही प्रोग्रामिंग भाषेमध्ये आपल्याला arrays चे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00:40 | Modelica मध्ये class कसे परिभाषित करायचे हे आपल्याला माहित असणे आवश्यक आहे. पूर्वापेक्षित ट्युटोरिअल्स आमच्या वेबसाईटवर उल्लेखित आहेत. कृपया त्यांमार्फत जा. |
00:50 | Vector हा एक डायमेन्शनल array आहे. |
00:53 | त्यात एक इंडेक्स आहे. |
00:55 | वेक्टर घोषित करण्यासाठी Syntax दर्शविले आहे. |
00:59 | दाखवलेली उदाहरणे व्हेक्टर व्हेरिएबल a ची घोषणा करतात, ज्याची साईज 2 आहे. |
01:05 | एक व्हेक्टर कर्ली ब्रैसेसमध्ये समाविष्ट करून बनविले जाऊ शकते. |
01:11 | हे उदाहरण एक vector पॅरामीटर a सहित 2 आणि 3 ला त्याच्या एलिमेन्ट्सच्या रूपात परिभाषित करते. |
01:19 | vector चे एलिमेन्ट्स एक्सेस करण्यासाठी, indexing समजून घेणे आवश्यक आहे. |
01:25 | vector indexing साठी सिन्टेक्स दाखवले गेले आहे. |
01:29 | Vector indexing हे 1 ने सुरू होते आणि Indices पूर्णांक (integers)असणे आवश्यक आहे. |
01:35 | polynomialEvaluatorUsingVectors नावाचे फंक्शन बनवू. |
01:41 | हे फंक्शन polynomialEvaluator फंक्शनचे एक एक्सटेंशन आहे जे मागील ट्युटोरिअलमध्ये चर्चिले होते. |
01:49 | आपण polynomialEvaluator च्या a,b आणि c ची पॅरामीटर्स वेक्टर a शी बदलणार आहोत. |
01:58 | कृपया आमच्या Code Files लिंकवर उपलब्ध असलेल्या सर्व फाईल्स डाऊनलोड करा आणि सेव्ह करा. |
02:05 | आपल्या सोयीसाठी, polynomialEvaluator फंक्शनदेखील उपलब्ध आहे. |
02:12 | आता मी हे फंक्शन प्रदर्शित करण्यासाठी OMEdit वर जाते. |
02:17 | आता OMEdit, Welcome परस्पेक्टिव्हमध्ये खुले आहे. |
02:21 | मी सर्व आवश्यक फाईल्स उघडल्या आहेत. |
02:25 | लक्षात ठेवा की, खालील क्लास किंवा फंक्शन्स आता OMEdit मध्ये खुले आहेत : functionTester, matrixAdder, polynomialEvaluator आणि polynomialEvaluatorUsingVectors. |
02:42 | आता, ते पाहण्यासाठी मी त्या प्रत्येक आयकॉनवर डबल क्लिक करते. |
02:49 | चांगल्या दृश्यतेसाठी मी OMEdit विंडो डावीकडे स्थानांतरित करते. |
02:56 | polynomialEvaluator टॅबवर जा. |
03:00 | ते Text View मध्ये उघडा. |
03:03 | ह्या function वर अधिक माहितीसाठी, मागील ट्युटोरिअल पाहा. |
03:09 | मी polynomialEvaluatorUsingVectors वर जाते. हे Text View मध्ये उघडा. |
03:16 | Input आणि output व्हेरिएबल्स, polynomialEvaluator फंक्शनप्रमाणेच आहेत. |
03:23 | polynomialEvaluator चे a,b आणि c पॅरामीटर्स, वेक्टर a शी बदलले आहेत. |
03:32 | ह्या वेक्टरची साईज 3 आहे. |
03:36 | दाखवल्याप्रमाणे ह्या वेक्टरचे एलिमेंट्स कर्ली ब्रेसेसमध्ये समाविष्ट केले आहेत. |
03:42 | एलिमेंट्स comma ने वेग वेगळे केले आहेत. |
03:46 | assignment स्टेटमेंटमध्ये a वेक्टरचे एलिमेंट्स, त्यांचे निर्देशक वापरून एक्सेस केले जातात. |
03:54 | a[1] हा वेक्टरचा a पहिला एलिमेंट आहे. |
03:59 | त्याचप्रमाणे, वेक्टर a चा दुसरा एलिमेंट आणि तिसरा एलिमेंटही एक्सेस केला गेला आहे. |
04:08 | आता मी functionTester टॅबवर जाते. |
04:13 | ते Text View मध्ये उघडा. |
04:16 | हा क्लास functionTester क्लाससारखाच आहे ज्याची आपण मागील ट्युटोरिअलमध्ये चर्चा केली होती. |
04:24 | z हे Real व्हेरिएबल आहे. |
04:27 | polynomialEvaluatorUsingVectors फंक्शनला 10 युनिट्सच्या input आर्ग्युमेंटसह कॉल केले जाते. |
04:35 | ह्या फंक्शनद्वारे मिळणारी वॅल्यू z प्रमाणे आहे. |
04:40 | आता मी हा क्लास सिम्युलेट करते. |
04:43 | Simulate बटणावर क्लिक करा. |
04:46 | पॉप अप विंडो बंद करा. |
04:49 | variables ब्राऊझरमध्ये z निवडा. |
04:53 | हे लक्षात घ्या की z ची वॅल्यू, x = 10 वर f(x) च्या समान आहे. |
05:00 | हे प्लॉट polynomialEvaluator फंक्शनमध्ये दाखवलेल्या केसप्रमाणे आहे. |
05:07 | आता मी z डी-सिलेक्ट करते आणि रिझल्ट डिलीट करते. |
05:13 | Modeling perspective वर पुन्हा जा. |
05:16 | आता मी स्लाईड्सवर जाते. |
05:19 | for लूप स्टेटमेंट्सची पुनरावृत्ती करण्यासाठी वापरले जाते. |
05:24 | हे algorithm आणि equation सेक्शन्समध्ये वापरले जाऊ शकते. |
05:29 | Syntax हे, for लूपसाठी एका उदाहरणसह दाखवले गेले आहे. |
05:34 | for लूप कसे वापरायचे हे सादर करण्यासाठी मी OMEdit वर परत जाते. |
05:40 | polynomialEvaluatorUsingVectors टॅबवर क्लिक करा. |
05:45 | assignment स्टेटमेंटमध्ये fx साठी, आपण वेक्टर a च्या एलिमेंट्स एक्सेस करत आहोत. |
05:52 | हे for लूप वापरूनदेखील करता येऊ शकते. |
05:55 | आता algorithm सेक्शनमध्ये, for लूप कसे समाविष्ट करावे ते पाहू. |
06:01 | सर्वप्रथम, सुरुवातीस आणि शेवटी डबल स्लॅश घालून fx साठी असाईनमेंट स्टेटमेंट कमेंट करा. |
06:10 | Ctrl+S दाबून हे फंक्शन सेव्ह करा. |
06:15 | प्रविष्ट केला जाणारा for लूप, for-loop.txt नावाच्या एका टेक्स्ट फाईलमध्ये देण्यात आला आहे. |
06:23 | हे आमच्या वेबसाईटवर उपलब्ध आहे. मी gedit वापरून ही फाईल उघडली आहे. |
06:29 | विंडोज वापरणारे, हे उघडण्यासाठी notepad किंवा इतर टेक्स्ट एडिटर वापरू शकतात. |
06:35 | मी gedit वर जाते. |
06:38 | Ctrl+C दाबून सर्व स्टेटमेन्ट्स कॉपी करा. |
06:44 | OMEdit वर परत जा. |
06:46 | Enter दाबा. Ctrl + V दाबून सर्व स्टेटमेन्ट्स पेस्ट करा. |
06:53 | Ctrl + S दाबून हे फंक्शन सेव्ह करा. |
06:57 | आता मी ह्या लूपचे प्रत्येक स्टेटमेंट समजावून सांगते. |
07:02 | लूप सुरू होण्याआधी हे स्टेटमेंट शून्याच्या प्राथमिक व्हॅल्यूला fx लागू करते. |
07:09 | येथे, i लूप काऊंटर म्हणून कार्य करते. |
07:12 | i ची वॅल्यू 3 होईपर्यंत लूप रन होते. |
07:16 | हे वापरले जाण्यापूर्वी i घोषित करणे आवश्यक नाही. |
07:21 | मी थोडे खाली स्क्रोल करते. |
07:24 | हे स्टेटमेंट वारंवार polynomial f(x) च्या टर्म्स जोडते. |
07:30 | polynomialEvaluator फंक्शनवरील चर्चा करताना Polynomial f(x) ची चर्चा झाली आहे. |
07:37 | हे स्टेटमेंट for लूपची समाप्ती दर्शविते. |
07:41 | आता हे फंक्शन पूर्ण झाले आहे. |
07:44 | ह्या फंक्शनची चाचणी करण्यासाठी, आपण क्लास functionTester वापरू. |
07:49 | मी ह्या फंक्शनमध्ये class साठी काहीही बदल केले नाहीत. |
07:54 | टूलबारमधील Simulate बटण दाबून मी हा क्लास सिम्युलेट करते. |
07:59 | variables browser मध्ये z निवडा. |
08:03 | लक्षात घ्या की, z ची वॅल्यू ही फंक्शनमध्ये बदल झाल्यानंतरदेखील समान राहते. |
08:10 | मी z डी-सिलेक्ट करून रिझल्ट डिलीट करते. |
08:14 | Modeling perspective वर परत जा. |
08:17 | आता मी पुन्हा एकदा स्लाईड्सवर परत जाते. |
08:21 | while लूपचा वापर स्टेटमेंटला पुनरावृत्त करण्यासाठी केला जातो, जोपर्यंत एखादी दिलेली स्थिती समाधानकारक होत नाही. |
08:27 | equation सेक्शनमध्ये while लूप वापरू शकत नाही. |
08:31 | while च्या तुलनेने for लूपचा वापर Modelica मध्ये वारंवार केला जातो. |
08:37 | आता Arrays बद्दल चर्चा करू. |
08:40 | multi-dimensional डेटा प्रदर्शित करण्यासाठी Arrays वापरले जातात. |
08:44 | vector नोटेशन वापरून ते तयार करता येऊ शकते. |
08:48 | array घोषित करण्यासाठी आणि इंडेक्सिंगसाठी Syntax दाखवले आहे. |
08:55 | array बनविण्याविषयी आणि इंडेक्सिंगविषयी अधिक जाणण्यासाठी, |
09:00 | मी matrixAdder नावाचा क्लास लिहिते, जो mySum देण्यासाठी myMatrix आणि adder matrices जोडतो. myMatrix आणि adder matrices दर्शविल्याप्रमाणे आहेत. |
09:14 | आता मी matrixAdder क्लास सादर करण्यासाठी OMEdit वर जाते. |
09:19 | हे आधीपासून OMEdit मध्ये उघडलेले आहे. |
09:23 | matrixAdder टॅबवर क्लिक करा. |
09:26 | ते Text view मध्ये उघडा. |
09:29 | myMatrix हा एक Real पॅरामीटर अॅरे आहे. |
09:33 | स्क्वेर ब्रॅकेटमधील संख्या, ह्या array ची साईज दर्शवितो. |
09:39 | पहिल्या डायमेन्शनची साईज 3 आहे. |
09:42 | याचप्रकारे दुसऱ्या डायमेंशनची साईज 2 आहे. |
09:46 | myMatrix अॅरेची निर्मिती प्रत्येक दोन एलिमेंट्सच्या तीन वेक्टर्सचा उपयोग करून केली आहे. |
09:53 | {1,2} प्रथम वेक्टर |
09:57 | {3,4} दुसरा वेक्टर आणि |
10:00 | {5,6} तिसरा वेक्टर प्रदर्शित करतो. |
10:04 | ह्या प्रत्येक वेक्टरची साईज ह्या अॅरेच्या दुसऱ्या डायमेंशनच्या साईजइतकी आहे. |
10:11 | म्हणून, myMatrix च्या दुसऱ्या डायमेंशनची साईज 2 आहे. |
10:16 | वेक्टरची संख्या प्रथम डायमेंशनच्या साईजइतकी आहे. म्हणून पहिल्या डायमेंशनची साईज 3 इतकी आहे. |
10:25 | adder मॅट्रिक्स समान पद्धतीने तयार केले आहे. |
10:29 | हे दोन arrays किंवा matrices जोडण्यासाठी आपल्याला दोन डायमेंशनमधील एलिमेन्ट्स एक्सेस करणे आवश्यक आहे. |
10:35 | त्यामुळे nested for लूप आवश्यक आहे. |
10:40 | हे for लूप प्रथम डायमेंशनने रन होते. |
10:44 | त्याचप्रमाणे हे for लूप दुसऱ्या डायमेंशनने रन होते. |
10:49 | मी थोडे खाली स्क्रोल करते. |
10:52 | myMatrix आणि adder matrices चे संबंधित एलिमेंट्स mySum साठी जोडले गेले आहेत. |
11:00 | हे स्टेटमेन्ट प्रत्येक for लूपची समाप्ती दर्शवते. क्लास आता पूर्ण झाला आहे. |
11:07 | मी Simulate बटणावर क्लिक करून ते सिम्युलेट करते. |
11:11 | आढळल्यास पॉप अप विंडो बंद करा. |
11:15 | मी variables कॉलम विस्तारित करते. |
11:18 | adder[1,1], myMatrix[1,1], आणि mySum[1,1] निवडा. |
11:25 | लक्षात घ्या की adder[1,1] plus myMatrix[1,1] हे mySum[1,1] देते, ह्याचा अर्थ असा होतो की रिझल्ट अचूक आहे. |
11:35 | मी ते डी-सिलेक्ट करते आणि रिझल्ट डिलीट करते. |
11:40 | मी पुन्हा स्लाईड्सवर जाते. |
11:43 | असाईनमेंट म्हणून, वेक्टरमध्ये एलिमेंट्सची क्रमवारी बदलण्यासाठी vectorReversal नावाचे एक फंक्शन लिहा. |
11:51 | त्याचप्रमाणे, मेट्रिक्सच्या प्रत्येक ओळीतील एलिमेंट्सची क्रमवारी बदलण्यासाठी matrixReversal नावाचे फंक्शन लिहा. |
12:00 | हे दोन फंक्शन्स तपासण्यासाठी functionTester क्लास लिहा. |
12:05 | ह्यासह आपण ट्युटोरिलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
12:09 | कृपया खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पाहा: org /What\_is\_a\_Spoken\_Tutorial . हा स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टला सारांशित करतो. |
12:15 | आम्ही स्पोकन ट्युटोरिअल्सच्या साहाय्याने कार्यशाळा चालवितो. प्रमाणपत्रे देतो. कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
12:21 | जर तुम्हांला ह्या स्पोकन ट्युटोरिअलशी संबंधित प्रश्न असतील, तर कृपया खालील वेबसाईटला भेट द्या. |
12:28 | आम्ही लोकप्रिय पुस्तकांची सोडवलेल्या उदाहरणांचे कोडींगचे समन्वय करतो. |
12:33 | आम्ही अशा लोकांना मानधन आणि प्रमाणपत्रे देतो. कृपया खालील वेबसाईटला भेट द्या. |
12:39 | आम्ही वाणिज्यिक सिम्युलेटर लॅब OpenModelica वर स्थलांतरित करण्यास मदत करतो. कृपया अधिक माहितीसाठी खालील वेबसाईटला भेट द्या. |
12:48 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे अर्थसहाय्य दिले जाते. |
12:55 | त्यांनी दिलेल्या समर्थनासाठी आम्ही OpenModelica च्या विकसनशील टीमचे आभारी आहोत. |
13:00 | हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवादित केले आहे. मी रंजना उके आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद. |