Difference between revisions of "OpenFOAM/C3/Installing-and-running-Gmsh/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(First Upload)
 
 
Line 6: Line 6:
 
| 00:01
 
| 00:01
 
| नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या '''Installing and running Gmsh''' या पाठात आपले स्वागत.
 
| नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या '''Installing and running Gmsh''' या पाठात आपले स्वागत.
 
  
 
|-
 
|-
Line 17: Line 16:
 
| 00:18
 
| 00:18
 
| या पाठाच्या सरावासाठी युजरला मेशचे प्राथमिक ज्ञान असायला हवे.
 
| या पाठाच्या सरावासाठी युजरला मेशचे प्राथमिक ज्ञान असायला हवे.
 
  
 
|-
 
|-
Line 33: Line 31:
 
| '''blades, aerofoil''' सारख्या गुंतागुंतीच्या जॉमेट्री OpenFOAM च्या '''blockmesh''' युटिलिटीपेक्षा '''gmsh''' मधे तयार करणे जास्त फायद्याचे आहे  
 
| '''blades, aerofoil''' सारख्या गुंतागुंतीच्या जॉमेट्री OpenFOAM च्या '''blockmesh''' युटिलिटीपेक्षा '''gmsh''' मधे तयार करणे जास्त फायद्याचे आहे  
 
OpenFOAM  हे थर्ड पार्टी सॉफ्टवेअर जसे की '''Gmsh''' मधून मेश इंपोर्ट करण्याची मुभा देते.  
 
OpenFOAM  हे थर्ड पार्टी सॉफ्टवेअर जसे की '''Gmsh''' मधून मेश इंपोर्ट करण्याची मुभा देते.  
 +
 
|-
 
|-
 
| 01:08
 
| 01:08
Line 52: Line 51:
 
|-
 
|-
 
| 01:50
 
| 01:50
| अन्यथा तुम्ही '''Gmsh ''' च्या वेबसाईटवरून '''Gmsh ''' डाऊनलोड करू शकता. मी ब्राऊजर उघडत आहे.
+
| अन्यथा तुम्ही '''Gmsh''' च्या वेबसाईटवरून '''Gmsh''' डाऊनलोड करू शकता. मी ब्राऊजर उघडत आहे.
  
 
|-
 
|-
Line 60: Line 59:
 
|-
 
|-
 
| 02:09
 
| 02:09
| खाली स्क्रॉल करून डाऊनलोडवर जा. तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार करंट स्टेबल रिलीज सिलेक्ट करा. मी लिनक्स 64-bit निवडत आहे. '''Save file''' पर्याय निवडून '''OK''' वर क्लिक करा.
+
| खाली स्क्रॉल करून डाऊनलोडवर जा. तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार करंट स्टेबल रिलीज सिलेक्ट करा. मी लिनक्स 64-bit निवडत आहे. '''Save file''' पर्याय निवडून '''OK''' वर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
Line 68: Line 67:
 
|-
 
|-
 
| 02:31
 
| 02:31
| येथे '''tar ''' फाईल पाहू शकतो. ही फाईल '''Extract''' करा.  नवा फोल्डर तयार होईल.
+
| येथे '''tar''' फाईल पाहू शकतो. ही फाईल '''Extract''' करा.  नवा फोल्डर तयार होईल.
  
 
|-
 
|-
 
| 02:41
 
| 02:41
| फोल्डर उघडा. '''bin''' फोल्डरमधे जाऊन '''gmsh ''' आयकॉनवर क्लिक करा.
+
| फोल्डर उघडा. '''bin''' फोल्डरमधे जाऊन '''gmsh''' आयकॉनवर क्लिक करा.
  
 
|-
 
|-
 
| 02:49
 
| 02:49
| आपण '''Gmsh ''' चा स्टार्ट स्क्रीन पाहू शकतो. आता '''Gmsh''' च्या सहाय्याने घनाकृती तयार करू.
+
| आपण '''Gmsh''' चा स्टार्ट स्क्रीन पाहू शकतो. आता '''Gmsh''' च्या सहाय्याने घनाकृती तयार करू.
  
 
|-
 
|-
Line 97: Line 96:
 
| 03:34
 
| 03:34
 
| दुसरे को-ऑडिर्नेट म्हणून (1 0 0) टाईप करून एंटर दाबा. तिसरे को-ऑडिर्नेट म्हणून (1 1 0) टाईप करून एंटर दाबा. चौथ्या को-ऑडिर्नेटसाठी (0 1 0) टाईप करून एंटर दाबा.
 
| दुसरे को-ऑडिर्नेट म्हणून (1 0 0) टाईप करून एंटर दाबा. तिसरे को-ऑडिर्नेट म्हणून (1 1 0) टाईप करून एंटर दाबा. चौथ्या को-ऑडिर्नेटसाठी (0 1 0) टाईप करून एंटर दाबा.
 +
 
|-
 
|-
 
|03:53
 
|03:53
Line 209: Line 209:
 
| प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते.   
 
| प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते.   
 
अधिक माहितीसाठी कृपया लिहा:  
 
अधिक माहितीसाठी कृपया लिहा:  
'''contact@spoken-tutorial.org'''
+
'''contact@spoken-tutorial.org'''
 
या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.     
 
या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.     
  

Latest revision as of 18:13, 9 February 2018

Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Installing and running Gmsh या पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात शिकणार आहोत:

Gmsh इन्स्टॉल आणि कार्यान्वित करणे Gmsh मधे प्राथमिक जॉमेट्री तयार करणे.

00:18 या पाठाच्या सरावासाठी युजरला मेशचे प्राथमिक ज्ञान असायला हवे.
00:24 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 12.04 आणि Gmsh वर्जन 2.8.5 वापरत आहे.

00:34 मी तुम्हाला Gmsh ची ओळख करून देते. Gmsh हे एक स्वयंचलित 3-D finite element mesh generator असून यात पूर्वप्रक्रिया तसेच उत्तर प्रक्रिया करण्याच्या सोयी आहेत.

हे मुक्त स्त्रोत सॉफ्टवेअर आहे.

00:51 blades, aerofoil सारख्या गुंतागुंतीच्या जॉमेट्री OpenFOAM च्या blockmesh युटिलिटीपेक्षा gmsh मधे तयार करणे जास्त फायद्याचे आहे

OpenFOAM हे थर्ड पार्टी सॉफ्टवेअर जसे की Gmsh मधून मेश इंपोर्ट करण्याची मुभा देते.

01:08 आता Gmsh कसे इन्स्टॉल करायचे ते पाहू.

सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरच्या सहाय्याने Gmsh इन्स्टॉल करता येते.

01:15 मी सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर उघडत आहे. येथे पासवर्ड विचारला जाईल. पासवर्ड टाईप करा.
01:25 सर्च बॉक्समधे "gmsh" टाईप करून gmsh पुढील चेकबॉक्सवर क्लिक करा आणि Mark for installation वर क्लिक करा. Apply वर क्लिक करा.
01:40 पुन्हा Apply वर क्लिक करा. कदाचित ह्याला थोडा वेळ लागेल. आता Gmsh इन्स्टॉल झाले आहे.
01:50 अन्यथा तुम्ही Gmsh च्या वेबसाईटवरून Gmsh डाऊनलोड करू शकता. मी ब्राऊजर उघडत आहे.
01:59 ऍड्रेसबारमधे http://geuz.org/gmsh/ टाईप करून एंटर दाबा.
02:09 खाली स्क्रॉल करून डाऊनलोडवर जा. तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार करंट स्टेबल रिलीज सिलेक्ट करा. मी लिनक्स 64-bit निवडत आहे. Save file पर्याय निवडून OK वर क्लिक करा.
02:26 डाऊनलोड पूर्ण झाल्यावर डाऊनलोडस फोल्डरवर जा.
02:31 येथे tar फाईल पाहू शकतो. ही फाईल Extract करा. नवा फोल्डर तयार होईल.
02:41 फोल्डर उघडा. bin फोल्डरमधे जाऊन gmsh आयकॉनवर क्लिक करा.
02:49 आपण Gmsh चा स्टार्ट स्क्रीन पाहू शकतो. आता Gmsh च्या सहाय्याने घनाकृती तयार करू.
02:57 येथे बघू शकतो की घनाकृतीची प्रत्येक बाजू एक युनिट आहे.
03:03 Gmsh वर परत जाऊ. डाव्या बाजूला जॉमेट्री, मेश आणि सॉल्व्हर असलेली module tree आपण पाहू शकतो.
03:14 जॉमेट्रीमधील Elementary entities वर जा. Add वर क्लिक करून Point वर क्लिक करा. नवी विंडो उघडेल.
03:25 (0 0 0) ने सुरूवात करून X, Y आणि Z चे को-ऑर्डिनेटस टाईप करा आणि एंटर दाबा.
03:34 दुसरे को-ऑडिर्नेट म्हणून (1 0 0) टाईप करून एंटर दाबा. तिसरे को-ऑडिर्नेट म्हणून (1 1 0) टाईप करून एंटर दाबा. चौथ्या को-ऑडिर्नेटसाठी (0 1 0) टाईप करून एंटर दाबा.
03:53 अशाचप्रकारे धन z- डायरेक्शनसाठी (0 0 1) पॉईंटने सुरूवात करून को-ऑर्डिनेटस समाविष्ट करा आणि एंटर दाबा. उर्वरित तीन को-ऑर्डिनेटस टाईप करून विंडो बंद करा.
04:10 मी सर्व आठही को-ऑर्डिनेटस येथे दिले आहेत. माऊसचे डावे बटण पॉईंटस हलवण्यासाठी वापरा.
04:18 आपण सर्व आठही को-ऑर्डिनेटस पॉईंटस म्हणून बघू शकतो.
04:23 आता Straight line वर क्लिक करा. हे स्टार्ट पॉईंटची विचारणा करेल. पहिला पॉईंट सिलेक्ट करा.
04:33 नंतर हे एंड पॉईंटची विचारणा करेल. शेवटचा पॉईंट सिलेक्ट करा.
04:37 दोन बिंदूंमधे एक रेष काढली जाईल. अशाचप्रकारे सर्व पॉईंटस जोडा.
04:45 रद्द करण्यासाठी 'q' दाबा.
04:49 आता घनाकृतीचा पृष्ठभाग निश्चित करू. plane surface वर क्लिक करा. हे सरफेस बाऊंडरीची विचारणा करेल.
04:59 प्रथम तळाचा पृष्ठभाग सिलेक्ट करा. तुमच्या लक्षात येईल की सिलेक्ट केलेली बाजू लाल रंगाची झालेली आहे.
05:08 हे hole बाऊंड्रीज असल्यास त्यांची विचारणा करेल. आपल्या बाऊंड्रीमधे कोणतेही hole नसल्यामुळे सिलेक्शन संपवण्यासाठी 'e' हे बटण दाबा.
05:19 आपल्याला दिसेल की पृष्ठभागावर तुटक मध्यरेषा आलेल्या दिसतील. आता वरील पृष्ठभाग निश्चित करू.
05:29 अशाचप्रकारे उर्वरित पृष्ठभाग निश्चित करा. सर्व पृष्ठभाग निश्चित केले आहेत. बाहेर पडण्यासाठी 'q' चे बटण दाबा.
05:39 आता घनाकृतीचे घनफळ निश्चित करू. हे volume बाऊंडरीची विचारणा करेल.
05:47 कोणतीही सरफेस बाऊंडरी सिलेक्ट करा. सिलेक्शन संपवण्यासाठी 'e' हे बटण दाबा.
05:55 घनाकृतीच्या मध्यस्थानी एक पिवळ्या रंगाचा ठिपका दिसेल जे घनफळ दाखवते. बाहेर पडण्यासाठी q हे बटण दाबा.
06:04 आता फिजीकल ग्रुप्स निश्चित करू जे जॉमेट्री OpenFOAM मधे एक्सपोर्ट करण्यासाठी वापरले जातील.
06:13 Physical Groups खालील Add वर जाऊन Surface वर क्लिक करा.
06:19 प्रथम दर्शनी पृष्ठभाग सिलेक्ट करा. सिलेक्शन संपवण्यासाठी e हे बटण दाबा. मागील पृष्ठभाग सिलेक्ट करून सिलेक्शन संपवण्यासाठी e हे बटण दाबा.
06:31 अशाचप्रकारे उर्वरित पृष्ठभाग सिलेक्ट करा. मी सर्व पृष्ठभाग सिलेक्ट केले आहेत. बाहेर पडण्यासाठी q हे बटण दाबा.
06:41 आता भौतिक घनफळ निश्चित करू. Volume वर क्लिक करा. हे घनफळाची विचारणा करेल. घनाकृतीच्या मध्यभागी असलेल्या पिवळ्या ठिपक्यावर क्लिक करा.
06:53 पिवळा ठिपका लाल रंगाचा झालेला दिसेल. सिलेक्शन संपवण्यासाठी e हे बटण दाबा. बाहेर पडण्यासाठी q दाबा.
07:02 आपली घनाकृती पूर्ण झाली आहे. हे काम सेव्ह करू.
07:07 File खालील Save as वर जा. फाईलला cube.geo असे नाव द्या.
07:15 लक्षात घ्या येथे "geo" म्हणजे जॉमेट्री. Ok वर क्लिक करून पुन्हा Ok वर क्लिक करा.
07:23 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. असाईनमेंट म्हणून, दंडगोल, गोल यासारख्या साध्या जॉमेट्री Gmsh मधे तयार करून बघा.
07:35 या पाठात शिकलो: सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर आणि वेबसाईटच्या सहाय्याने Gmsh इन्स्टॉल व कार्यान्वित करणे. Gmsh च्या सहाय्याने घनाकृती तयार करणे.
07:48 URL वरील व्हिडिओमधे प्रोजेक्टचा सारांश मिळेल. तुमच्याकडे चांगली bandwidth नसल्यास व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
07:56 प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते.

अधिक माहितीसाठी कृपया लिहा: contact@spoken-tutorial.org या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

08:11 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana