OpenFOAM/C3/Installing-and-running-Gmsh/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 नमस्कार. स्पोकन ट्युटोरियलच्या Installing and running Gmsh या पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात शिकणार आहोत:

Gmsh इन्स्टॉल आणि कार्यान्वित करणे Gmsh मधे प्राथमिक जॉमेट्री तयार करणे.

00:18 या पाठाच्या सरावासाठी युजरला मेशचे प्राथमिक ज्ञान असायला हवे.
00:24 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 12.04 आणि Gmsh वर्जन 2.8.5 वापरत आहे.

00:34 मी तुम्हाला Gmsh ची ओळख करून देते. Gmsh हे एक स्वयंचलित 3-D finite element mesh generator असून यात पूर्वप्रक्रिया तसेच उत्तर प्रक्रिया करण्याच्या सोयी आहेत.

हे मुक्त स्त्रोत सॉफ्टवेअर आहे.

00:51 blades, aerofoil सारख्या गुंतागुंतीच्या जॉमेट्री OpenFOAM च्या blockmesh युटिलिटीपेक्षा gmsh मधे तयार करणे जास्त फायद्याचे आहे

OpenFOAM हे थर्ड पार्टी सॉफ्टवेअर जसे की Gmsh मधून मेश इंपोर्ट करण्याची मुभा देते.

01:08 आता Gmsh कसे इन्स्टॉल करायचे ते पाहू.

सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजरच्या सहाय्याने Gmsh इन्स्टॉल करता येते.

01:15 मी सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर उघडत आहे. येथे पासवर्ड विचारला जाईल. पासवर्ड टाईप करा.
01:25 सर्च बॉक्समधे "gmsh" टाईप करून gmsh पुढील चेकबॉक्सवर क्लिक करा आणि Mark for installation वर क्लिक करा. Apply वर क्लिक करा.
01:40 पुन्हा Apply वर क्लिक करा. कदाचित ह्याला थोडा वेळ लागेल. आता Gmsh इन्स्टॉल झाले आहे.
01:50 अन्यथा तुम्ही Gmsh च्या वेबसाईटवरून Gmsh डाऊनलोड करू शकता. मी ब्राऊजर उघडत आहे.
01:59 ऍड्रेसबारमधे http://geuz.org/gmsh/ टाईप करून एंटर दाबा.
02:09 खाली स्क्रॉल करून डाऊनलोडवर जा. तुमच्या ऑपरेटिंग सिस्टीमनुसार करंट स्टेबल रिलीज सिलेक्ट करा. मी लिनक्स 64-bit निवडत आहे. Save file पर्याय निवडून OK वर क्लिक करा.
02:26 डाऊनलोड पूर्ण झाल्यावर डाऊनलोडस फोल्डरवर जा.
02:31 येथे tar फाईल पाहू शकतो. ही फाईल Extract करा. नवा फोल्डर तयार होईल.
02:41 फोल्डर उघडा. bin फोल्डरमधे जाऊन gmsh आयकॉनवर क्लिक करा.
02:49 आपण Gmsh चा स्टार्ट स्क्रीन पाहू शकतो. आता Gmsh च्या सहाय्याने घनाकृती तयार करू.
02:57 येथे बघू शकतो की घनाकृतीची प्रत्येक बाजू एक युनिट आहे.
03:03 Gmsh वर परत जाऊ. डाव्या बाजूला जॉमेट्री, मेश आणि सॉल्व्हर असलेली module tree आपण पाहू शकतो.
03:14 जॉमेट्रीमधील Elementary entities वर जा. Add वर क्लिक करून Point वर क्लिक करा. नवी विंडो उघडेल.
03:25 (0 0 0) ने सुरूवात करून X, Y आणि Z चे को-ऑर्डिनेटस टाईप करा आणि एंटर दाबा.
03:34 दुसरे को-ऑडिर्नेट म्हणून (1 0 0) टाईप करून एंटर दाबा. तिसरे को-ऑडिर्नेट म्हणून (1 1 0) टाईप करून एंटर दाबा. चौथ्या को-ऑडिर्नेटसाठी (0 1 0) टाईप करून एंटर दाबा.
03:53 अशाचप्रकारे धन z- डायरेक्शनसाठी (0 0 1) पॉईंटने सुरूवात करून को-ऑर्डिनेटस समाविष्ट करा आणि एंटर दाबा. उर्वरित तीन को-ऑर्डिनेटस टाईप करून विंडो बंद करा.
04:10 मी सर्व आठही को-ऑर्डिनेटस येथे दिले आहेत. माऊसचे डावे बटण पॉईंटस हलवण्यासाठी वापरा.
04:18 आपण सर्व आठही को-ऑर्डिनेटस पॉईंटस म्हणून बघू शकतो.
04:23 आता Straight line वर क्लिक करा. हे स्टार्ट पॉईंटची विचारणा करेल. पहिला पॉईंट सिलेक्ट करा.
04:33 नंतर हे एंड पॉईंटची विचारणा करेल. शेवटचा पॉईंट सिलेक्ट करा.
04:37 दोन बिंदूंमधे एक रेष काढली जाईल. अशाचप्रकारे सर्व पॉईंटस जोडा.
04:45 रद्द करण्यासाठी 'q' दाबा.
04:49 आता घनाकृतीचा पृष्ठभाग निश्चित करू. plane surface वर क्लिक करा. हे सरफेस बाऊंडरीची विचारणा करेल.
04:59 प्रथम तळाचा पृष्ठभाग सिलेक्ट करा. तुमच्या लक्षात येईल की सिलेक्ट केलेली बाजू लाल रंगाची झालेली आहे.
05:08 हे hole बाऊंड्रीज असल्यास त्यांची विचारणा करेल. आपल्या बाऊंड्रीमधे कोणतेही hole नसल्यामुळे सिलेक्शन संपवण्यासाठी 'e' हे बटण दाबा.
05:19 आपल्याला दिसेल की पृष्ठभागावर तुटक मध्यरेषा आलेल्या दिसतील. आता वरील पृष्ठभाग निश्चित करू.
05:29 अशाचप्रकारे उर्वरित पृष्ठभाग निश्चित करा. सर्व पृष्ठभाग निश्चित केले आहेत. बाहेर पडण्यासाठी 'q' चे बटण दाबा.
05:39 आता घनाकृतीचे घनफळ निश्चित करू. हे volume बाऊंडरीची विचारणा करेल.
05:47 कोणतीही सरफेस बाऊंडरी सिलेक्ट करा. सिलेक्शन संपवण्यासाठी 'e' हे बटण दाबा.
05:55 घनाकृतीच्या मध्यस्थानी एक पिवळ्या रंगाचा ठिपका दिसेल जे घनफळ दाखवते. बाहेर पडण्यासाठी q हे बटण दाबा.
06:04 आता फिजीकल ग्रुप्स निश्चित करू जे जॉमेट्री OpenFOAM मधे एक्सपोर्ट करण्यासाठी वापरले जातील.
06:13 Physical Groups खालील Add वर जाऊन Surface वर क्लिक करा.
06:19 प्रथम दर्शनी पृष्ठभाग सिलेक्ट करा. सिलेक्शन संपवण्यासाठी e हे बटण दाबा. मागील पृष्ठभाग सिलेक्ट करून सिलेक्शन संपवण्यासाठी e हे बटण दाबा.
06:31 अशाचप्रकारे उर्वरित पृष्ठभाग सिलेक्ट करा. मी सर्व पृष्ठभाग सिलेक्ट केले आहेत. बाहेर पडण्यासाठी q हे बटण दाबा.
06:41 आता भौतिक घनफळ निश्चित करू. Volume वर क्लिक करा. हे घनफळाची विचारणा करेल. घनाकृतीच्या मध्यभागी असलेल्या पिवळ्या ठिपक्यावर क्लिक करा.
06:53 पिवळा ठिपका लाल रंगाचा झालेला दिसेल. सिलेक्शन संपवण्यासाठी e हे बटण दाबा. बाहेर पडण्यासाठी q दाबा.
07:02 आपली घनाकृती पूर्ण झाली आहे. हे काम सेव्ह करू.
07:07 File खालील Save as वर जा. फाईलला cube.geo असे नाव द्या.
07:15 लक्षात घ्या येथे "geo" म्हणजे जॉमेट्री. Ok वर क्लिक करून पुन्हा Ok वर क्लिक करा.
07:23 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. असाईनमेंट म्हणून, दंडगोल, गोल यासारख्या साध्या जॉमेट्री Gmsh मधे तयार करून बघा.
07:35 या पाठात शिकलो: सिनॅप्टिक पॅकेज मॅनेजर आणि वेबसाईटच्या सहाय्याने Gmsh इन्स्टॉल व कार्यान्वित करणे. Gmsh च्या सहाय्याने घनाकृती तयार करणे.
07:48 URL वरील व्हिडिओमधे प्रोजेक्टचा सारांश मिळेल. तुमच्याकडे चांगली bandwidth नसल्यास व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
07:56 प्रोजेक्ट टीम स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना सर्टिफिकेटस देते.

अधिक माहितीसाठी कृपया लिहा: contact@spoken-tutorial.org या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

08:11 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana