Difference between revisions of "Digital-India/C2/Register-on-SBI-Pay-app/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with " {| border = 1 | '''Time''' | '''Narration''' |- | 00:01 | '''SBI Pay''' ऍपवर नोंदणी करण्याच्या संदर्भातील पा...") |
Nancyvarkey (Talk | contribs) m (Nancyvarkey moved page Showcase-Tutorials/C2/Register-on-SBI-Pay-app/Marathi to Digital-India/C2/Register-on-SBI-Pay-app/Marathi without leaving a redirect) |
(No difference)
|
Latest revision as of 11:21, 12 July 2017
Time | Narration |
00:01 | SBI Pay ऍपवर नोंदणी करण्याच्या संदर्भातील पाठात आपले स्वागत. |
00:08 | या पाठात तुमच्या अँड्रॉईड स्मार्ट फोनवर SBI Pay ऍप डाऊनलोड करून इन्स्टॉल करणे तसेच, |
00:18 | एकदाच करावी लागणारी नोंदणी प्रक्रिया जाणून घेणार आहोत. |
00:22 | SBI Pay ऍप हे UPI app आहे जे SBI ने विशेषकरून UPI पेमेंट प्रणालीसाठी तयार केले आहे. |
00:32 | UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. |
00:38 | SBI Pay च्या सहाय्याने आपण रकमेची देवाणघेवाण करू शकतो. |
00:45 | SBI Pay ऍप कुठल्याही अँड्रॉईड स्मार्टफोनवर डाऊनलोड आणि इन्स्टॉल करता येते. |
00:53 | बँकेचे खाते असलेली कुठलीही व्यक्ती SBI Pay चा वापर करू शकते. |
00:59 | SBI Pay च्या सहाय्याने एखादी व्यक्ती बँक खात्याची किंवा कार्डाची कुठलीही माहिती उघड न करता व्यवहार करू शकते. |
01:09 | UPI सुविधा देणा-या कुठल्याही बँकेचा कुठलाही ग्राहक SBI Pay चा उपयोग करू शकतो. |
01:17 | For eg: An ICICI Bank or Axis Bank customer can also use SBI Pay app. |
01:27 | SBI Pay कुठलेही आगाऊ पैसे मागत नाही. |
01:32 | किंबहुना तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात राहून व्याज मिळवत राहतात. |
01:39 | आता SBI Pay कसे डाऊनलोड व इस्टॉल करायचे ते पाहू. |
01:45 | महत्वाची सूचना- SBI Pay हे अशाच मोबाईल नंबरशी जोडा जो तुमच्या बँक खात्यावर नोंदवलेला आहे. |
01:55 | तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनवरील गुगल प्लेस्टोअरवर जा. |
02:01 | येथे दाखवल्याप्रमाणे SBI Pay शोधा. |
02:05 | येथे अनेक ऍप्स दिसतील परंतु काळजीपूर्वक नेमक्या SBI Pay चा शोध घ्या. |
02:13 | किंवा तुम्ही SBI Pay च्या डायरेक्ट लिंकचा देखील उपयोग करू शकता. |
02:19 | तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर SBI Pay ऍप डाऊनलोड करून इन्स्टॉल करा. |
02:26 | इन्स्टॉलेशन नंतर लगेच Open बटण सिलेक्ट करून आपण हे ऍप उघडू शकतो. |
02:34 | नंतर तुम्हाला हे ऍप वापरण्यासाठी या स्क्रीनवर यावे लागेल. |
02:39 | आता हे ऍप कसे वापरायचे ते पाहू. |
02:44 | पहिली पायरी तुमच्या बँक खात्याची नोंद करणे. |
02:48 | ऍपवर Account Management हा पर्याय निवडा. |
02:53 | नंतर Add Account निवडा. |
02:56 | कुठल्याही स्थितीत तुम्हाला हा मेसेज दाखवणारे पेज दिसेल. |
03:02 | येथे हे ऍप तुम्हाला SMS पाठवण्याची आणि वाचण्याची परवानगी मागेल. |
03:07 | येथे तो म्हणेल 1 of 3. येथे Allow पर्याय निवडा. |
03:13 | यानंतर ऍप तुम्हाला तुमचे फोन कॉल्स करण्याची व मॅनेज करण्याची परवानगी मागेल. |
03:20 | येथे तो म्हणेल 2 of 3. येथे Allow पर्याय निवडा. |
03:27 | शेवटी ऍप तुम्हाला डिव्हाईसचे लोकेशन ऍक्सेस करण्याची परवानगी मागेल. यावेळीही Allow निवडा. |
03:36 | आता तुम्हाला तुमचे डिव्हाईस PSP वर नोंदलेले नसल्याचा मेसेज दिसेल. |
03:42 | कृपया लक्षात घ्या- SBI Pay ऍप वापरण्यासाठी, तुमचे मोबाईल डिव्हाईस PSP वर नोंदलेले असले पाहिजे. |
03:51 | Accept पर्याय निवडा. |
03:54 | प्रमाणीकरण करण्यासाठी तुमच्या फोनवरून मेसेज पाठवला जाईल. |
03:59 | याची खात्री करणारा मेसेज स्क्रीनवर दिसेल ज्यामधे तुमचा मोबाईल नंबर दिलेला असेल. |
04:06 | याची सत्यता पडताळून नंतर Yes पर्याय निवडा. |
04:10 | आता हे ऍप तुम्हाला UPI Registration च्या पेजवर घेऊन जाईल. |
04:15 | येथे तुम्हाला VPA म्हणजेच Virtual Payment Address तयार करावा लागेल. |
04:23 | त्यासाठी दिलेल्या टेक्स्ट बॉक्समधे तुम्हाला पसंत असलेला व्हर्च्युअल ऍड्रेस द्या. मी lata असे टाईप करत आहे.
|
04:31 | त्यानंतर First Name, Last Name आणि Email ह्या फिल्डसमधे सर्व तपशील भरा. |
04:39 | नंतर सुरक्षिततेच्या उद्देशासाठी Secret Question आणि Answer निवडा. |
04:46 | त्यानंतर ड्रॉप डाऊन सूचीमधून तुमची बँक निवडा. |
04:52 | तुमचे खाते असलेलीच बँक निवडणे अनिवार्य आहे. |
04:57 | येथे केवळ SBI bank निवडणेच अनिवार्य नाही. |
05:02 | माझे खाते State Bank of India मधे असल्यामुळे मी तो पर्याय निवडत आहे. |
05:10 | शेवटी I agree च्या चेकबॉक्स वर क्लिक करा. |
05:15 | आता Next बटण निवडा. |
05:19 | हे ऍप तुमच्या बँकेचा खाते क्रमांक मिळवून तो येथे दाखवेल. |
05:26 | आता Register बटण निवडा. |
05:28 | लगेचच असा मेसेज दाखवला जाईल, |
05:31 | जो UPI नोंदणी यशस्वी झाल्याचे सांगत आहे. |
05:36 | म्हणजेच तुमची बँक खात्याची नोंदणी पूर्ण झाली आहे जी एकदाच करायची आहे. |
05:43 | आता Ok बटण निवडा. |
05:46 | आता हे ऍप तुम्हाला पुढील पानावर घेऊन जाईल. |
05:50 | येथे तुम्हाला SBI Pay ऍप पासवर्ड सेट करणे आवश्यक आहे. |
05:55 | तुम्ही SBI Pay ऍप वापरताना प्रत्येक वेळी हा पासवर्ड वापरायचा आहे. |
06:02 | तुमच्या पसंतीचा पासवर्ड द्या. |
06:05 | याच्या पाठोपाठ आणखी एकदा Security Question आणि Answer दाखवले जाईल. |
06:12 | आता Set App Password निवडा. |
06:15 | लगेचच ही प्रक्रिया यशस्वी झाल्याचा मेसेज दिसेल. OK सिलेक्ट करा. |
06:22 | हे ऍप तुम्हाला या पेजवर घेऊन जाईल. परंतु तसे न झाल्यासही काळजी करू नका. |
06:29 | या पेजवर हे ऍप तुम्हाला तुम्ही सेट केलेला पासवर्ड या ऍपने लक्षात ठेवावा की नाही हे विचारेल. |
06:36 | तुमच्या पसंतीनुसार दाखवलेल्या पर्यायातून एक पर्याय निवडा. |
06:41 | त्यानंतर हे ऍप तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर घेऊन जाईल. |
06:45 | येथे तुम्हाला तुम्ही तयार केलेलाच पासवर्ड पुन्हा टाईप करण्याची मागणी केली जाईल. |
06:52 | तसे करून नंतर Submit बटणावर क्लिक करा. |
06:56 | असे केल्यावर तुमची एकदाच करायची पासवर्ड नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे |
07:03 | तुम्ही SBI Pay ऍपसाठी तुमचा लॉगिन आणि पासवर्ड यशस्वीरित्या तयार केला आहे. |
07:10 | पुढे हे तुम्हाला UPI Pin किंवा MPIN सेट करण्यासाठीच्या पेजवर घेऊन जाईल. |
07:18 | SET UPI PIN हा पर्याय निवडा. |
07:21 | हे ऍप तुम्हाला या पेजवर घेऊन जाईल. |
07:25 | येथे तुम्ही मागे समाविष्ट केलेला खाते क्रमांक परत निवडा. |
07:31 | हे ऍप पहिल्यांदाच वापरणा-यांना केवळ एकच खाते दर्शवले जाईल. |
07:37 | तरी या ऍपमधे तुमची आणखी बँक खाती जोडण्यासाठी तुम्ही वरील प्रक्रिया पुन्हा करू शकता. |
07:45 | तुमच्या इतर बँकांमधील खात्याशी जर हाच मोबाईल नंबर जोडला असेल तरच हे करणे शक्य आहे. |
07:54 | म्हणूनच आपल्याला आपला खाते क्रमांक काळजीपूर्वक निवडणे आवश्यक आहे. |
07:59 | नंतर तुम्ही निवडलेल्या बँक खात्याशी संबंधित असलेल्या डेबिट कार्डवरील शेवटचे 6 आकडे टाईप करा. |
08:06 | शेवटी कालावधी समाप्त होण्याचा दिनांक टाईप करून Submit बटण दाबा. |
08:13 | बफरिंग होत असल्यास थोडी वाट बघा. |
08:18 | आता हे ऍप तुम्हाला या पेजवर घेऊन जाईल. |
08:22 | येथे तुम्हाला OTP आणि MPIN टाईप करण्याचा पर्याय दिला जाईल. |
08:28 | मला माझ्या फोनवर SMS द्वारे OTP मिळाला आहे. |
08:33 | मी तो येथे टाईप करत आहे. |
08:37 | पुढे MPIN म्हणजेच तुम्ही आधी तयार केलेला पासवर्ड टाईप करा. |
08:42 | मग Submit बटणावर क्लिक करा. |
08:45 | बफरिंग होत असल्यास थोडी वाट बघा. |
08:49 | आता MPIN हे यशस्वीरित्या तुमच्या बँक खात्याशी जोडले गेले आहे. |
08:54 | Back बटण निवडा. |
08:56 | हे ऍप तुम्हाला मुख्य मेनूवर परत घेऊन जाईल.
|
09:00 | या टप्प्यावर एकदाच करायची सर्व नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे. |
09:06 | SBI Pay हे डिजिटल पेमेंट प्रणालीसाठी परिवर्तन घडवून आणणारे ठरणार आहे. |
09:13 | SBI Pay ऍप पैसे हस्तांतरित करण्याची सर्वात स्वस्त पध्दत आहे. |
09:19 | SBI Pay ऍपद्वारे व्यवहार केल्यास 50 पैशांपेक्षाही कमी खर्च येतो. |
09:25 | खर्च इतका कमी असल्याने छोट्या रकमांचे व्यवहार रोख चलनाशिवाय करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे. |
09:32 | कमी पैशाचा व्यवहार- जसे, शेजारील वाण्याचे पैसे देणे |
09:38 | * किंवा भाजी विक्रेत्याला पैसे देणे.
आता हे छोटे दुकानदार तसेच ग्राहक यांच्यासाठी शक्य झाले आहे.
|
09:48 | SBI Pay ऍपने सामान्य माणसाची सुरक्षिततेसंबंधी चिंता कमी केली आहे. |
09:54 | Virtual Payment Address तुमच्या बँक खात्याबद्दलचा कुठलाही सुगावा लागू देत नाही. |
10:01 | तसेच दोन वेगवेगळे PIN क्रमांक देऊन तुमच्या स्वतःच्या स्मार्ट फोनवर प्रमाणीकरण केले जाते. |
10:10 | SBI Pay हे UPI ऍप असून ते IMPS platform वर आधारित आहे. |
10:17 | त्यामुळे हे 24x7 कार्य करते. म्हणून हस्तांतरण प्रक्रिया त्वरित पूर्ण होते. |
10:23 | तुम्ही कुठल्याही वेळी पैशाची देवाणघेवाण करू शकता. त्याला सुट्टी किंवा वेळेची मर्यादा नाही. |
10:31 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
10:34 | थोडक्यात, |
10:36 | या पाठात आपण ऍड्रॉईड स्मार्ट फोनवर SBI Pay ऍप डाऊनलोड करून इन्स्टॉल करणे,
|
10:44 | तसेच एकदाच करायची संपूर्ण नोंदणी प्रक्रिया जाणून घेतली. |
10:48 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम जनरल अवेअरनेस विषयांवर विविध माहितीपूर्ण ऑडिओ-व्हिडीओ ट्युटोरियल्स तयार करते, |
10:57 | आणि प्रशिक्षण कार्यक्रमही चालवते. |
11:01 | विषयांच्या पूर्ण सूचीसाठी पुढील साईटला भेट द्या. http://spoken-tutorial.org |
11:08 | अधिक माहितीसाठी कृपया लिहाः contact@spoken-tutorial.org |
11:15 | हे ट्युटोरियल तुम्हाला उपयोगी वाटले असेल अशी आशा आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले आहे. सहभागासाठी धन्यवाद. |