Digital-India/C2/Register-on-SBI-Pay-app/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 SBI Pay ऍपवर नोंदणी करण्याच्या संदर्भातील पाठात आपले स्वागत.
00:08 या पाठात तुमच्या अँड्रॉईड स्मार्ट फोनवर SBI Pay ऍप डाऊनलोड करून इन्स्टॉल करणे तसेच,
00:18 एकदाच करावी लागणारी नोंदणी प्रक्रिया जाणून घेणार आहोत.
00:22 SBI Pay ऍप हे UPI app आहे जे SBI ने विशेषकरून UPI पेमेंट प्रणालीसाठी तयार केले आहे.
00:32 UPI म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस.
00:38 SBI Pay च्या सहाय्याने आपण रकमेची देवाणघेवाण करू शकतो.
00:45 SBI Pay ऍप कुठल्याही अँड्रॉईड स्मार्टफोनवर डाऊनलोड आणि इन्स्टॉल करता येते.
00:53 बँकेचे खाते असलेली कुठलीही व्यक्ती SBI Pay चा वापर करू शकते.
00:59 SBI Pay च्या सहाय्याने एखादी व्यक्ती बँक खात्याची किंवा कार्डाची कुठलीही माहिती उघड न करता व्यवहार करू शकते.
01:09 UPI सुविधा देणा-या कुठल्याही बँकेचा कुठलाही ग्राहक SBI Pay चा उपयोग करू शकतो.
01:17 For eg: An ICICI Bank or Axis Bank customer can also use SBI Pay app.
01:27 SBI Pay कुठलेही आगाऊ पैसे मागत नाही.
01:32 किंबहुना तुमचे पैसे तुमच्या बँक खात्यात राहून व्याज मिळवत राहतात.
01:39 आता SBI Pay कसे डाऊनलोड व इस्टॉल करायचे ते पाहू.
01:45 महत्वाची सूचना- SBI Pay हे अशाच मोबाईल नंबरशी जोडा जो तुमच्या बँक खात्यावर नोंदवलेला आहे.
01:55 तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनवरील गुगल प्लेस्टोअरवर जा.
02:01 येथे दाखवल्याप्रमाणे SBI Pay शोधा.
02:05 येथे अनेक ऍप्स दिसतील परंतु काळजीपूर्वक नेमक्या SBI Pay चा शोध घ्या.
02:13 किंवा तुम्ही SBI Pay च्या डायरेक्ट लिंकचा देखील उपयोग करू शकता.
02:19 तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनवर SBI Pay ऍप डाऊनलोड करून इन्स्टॉल करा.
02:26 इन्स्टॉलेशन नंतर लगेच Open बटण सिलेक्ट करून आपण हे ऍप उघडू शकतो.
02:34 नंतर तुम्हाला हे ऍप वापरण्यासाठी या स्क्रीनवर यावे लागेल.
02:39 आता हे ऍप कसे वापरायचे ते पाहू.
02:44 पहिली पायरी तुमच्या बँक खात्याची नोंद करणे.
02:48 ऍपवर Account Management हा पर्याय निवडा.
02:53 नंतर Add Account निवडा.
02:56 कुठल्याही स्थितीत तुम्हाला हा मेसेज दाखवणारे पेज दिसेल.
03:02 येथे हे ऍप तुम्हाला SMS पाठवण्याची आणि वाचण्याची परवानगी मागेल.
03:07 येथे तो म्हणेल 1 of 3. येथे Allow पर्याय निवडा.
03:13 यानंतर ऍप तुम्हाला तुमचे फोन कॉल्स करण्याची व मॅनेज करण्याची परवानगी मागेल.
03:20 येथे तो म्हणेल 2 of 3. येथे Allow पर्याय निवडा.
03:27 शेवटी ऍप तुम्हाला डिव्हाईसचे लोकेशन ऍक्सेस करण्याची परवानगी मागेल. यावेळीही Allow निवडा.
03:36 आता तुम्हाला तुमचे डिव्हाईस PSP वर नोंदलेले नसल्याचा मेसेज दिसेल.
03:42 कृपया लक्षात घ्या- SBI Pay ऍप वापरण्यासाठी, तुमचे मोबाईल डिव्हाईस PSP वर नोंदलेले असले पाहिजे.
03:51 Accept पर्याय निवडा.
03:54 प्रमाणीकरण करण्यासाठी तुमच्या फोनवरून मेसेज पाठवला जाईल.
03:59 याची खात्री करणारा मेसेज स्क्रीनवर दिसेल ज्यामधे तुमचा मोबाईल नंबर दिलेला असेल.
04:06 याची सत्यता पडताळून नंतर Yes पर्याय निवडा.
04:10 आता हे ऍप तुम्हाला UPI Registration च्या पेजवर घेऊन जाईल.
04:15 येथे तुम्हाला VPA म्हणजेच Virtual Payment Address तयार करावा लागेल.
04:23 त्यासाठी दिलेल्या टेक्स्ट बॉक्समधे तुम्हाला पसंत असलेला व्हर्च्युअल ऍड्रेस द्या. मी lata असे टाईप करत आहे.


04:31 त्यानंतर First Name, Last Name आणि Email ह्या फिल्डसमधे सर्व तपशील भरा.
04:39 नंतर सुरक्षिततेच्या उद्देशासाठी Secret Question आणि Answer निवडा.
04:46 त्यानंतर ड्रॉप डाऊन सूचीमधून तुमची बँक निवडा.
04:52 तुमचे खाते असलेलीच बँक निवडणे अनिवार्य आहे.
04:57 येथे केवळ SBI bank निवडणेच अनिवार्य नाही.
05:02 माझे खाते State Bank of India मधे असल्यामुळे मी तो पर्याय निवडत आहे.
05:10 शेवटी I agree च्या चेकबॉक्स वर क्लिक करा.
05:15 आता Next बटण निवडा.
05:19 हे ऍप तुमच्या बँकेचा खाते क्रमांक मिळवून तो येथे दाखवेल.
05:26 आता Register बटण निवडा.
05:28 लगेचच असा मेसेज दाखवला जाईल,
05:31 जो UPI नोंदणी यशस्वी झाल्याचे सांगत आहे.
05:36 म्हणजेच तुमची बँक खात्याची नोंदणी पूर्ण झाली आहे जी एकदाच करायची आहे.
05:43 आता Ok बटण निवडा.
05:46 आता हे ऍप तुम्हाला पुढील पानावर घेऊन जाईल.
05:50 येथे तुम्हाला SBI Pay ऍप पासवर्ड सेट करणे आवश्यक आहे.
05:55 तुम्ही SBI Pay ऍप वापरताना प्रत्येक वेळी हा पासवर्ड वापरायचा आहे.
06:02 तुमच्या पसंतीचा पासवर्ड द्या.
06:05 याच्या पाठोपाठ आणखी एकदा Security Question आणि Answer दाखवले जाईल.
06:12 आता Set App Password निवडा.
06:15 लगेचच ही प्रक्रिया यशस्वी झाल्याचा मेसेज दिसेल. OK सिलेक्ट करा.
06:22 हे ऍप तुम्हाला या पेजवर घेऊन जाईल. परंतु तसे न झाल्यासही काळजी करू नका.
06:29 या पेजवर हे ऍप तुम्हाला तुम्ही सेट केलेला पासवर्ड या ऍपने लक्षात ठेवावा की नाही हे विचारेल.
06:36 तुमच्या पसंतीनुसार दाखवलेल्या पर्यायातून एक पर्याय निवडा.
06:41 त्यानंतर हे ऍप तुम्हाला पुढच्या स्क्रीनवर घेऊन जाईल.
06:45 येथे तुम्हाला तुम्ही तयार केलेलाच पासवर्ड पुन्हा टाईप करण्याची मागणी केली जाईल.
06:52 तसे करून नंतर Submit बटणावर क्लिक करा.
06:56 असे केल्यावर तुमची एकदाच करायची पासवर्ड नोंदणीची प्रक्रिया पूर्ण झाली आहे
07:03 तुम्ही SBI Pay ऍपसाठी तुमचा लॉगिन आणि पासवर्ड यशस्वीरित्या तयार केला आहे.
07:10 पुढे हे तुम्हाला UPI Pin किंवा MPIN सेट करण्यासाठीच्या पेजवर घेऊन जाईल.
07:18 SET UPI PIN हा पर्याय निवडा.
07:21 हे ऍप तुम्हाला या पेजवर घेऊन जाईल.
07:25 येथे तुम्ही मागे समाविष्ट केलेला खाते क्रमांक परत निवडा.
07:31 हे ऍप पहिल्यांदाच वापरणा-यांना केवळ एकच खाते दर्शवले जाईल.
07:37 तरी या ऍपमधे तुमची आणखी बँक खाती जोडण्यासाठी तुम्ही वरील प्रक्रिया पुन्हा करू शकता.
07:45 तुमच्या इतर बँकांमधील खात्याशी जर हाच मोबाईल नंबर जोडला असेल तरच हे करणे शक्य आहे.
07:54 म्हणूनच आपल्याला आपला खाते क्रमांक काळजीपूर्वक निवडणे आवश्यक आहे.
07:59 नंतर तुम्ही निवडलेल्या बँक खात्याशी संबंधित असलेल्या डेबिट कार्डवरील शेवटचे 6 आकडे टाईप करा.
08:06 शेवटी कालावधी समाप्त होण्याचा दिनांक टाईप करून Submit बटण दाबा.
08:13 बफरिंग होत असल्यास थोडी वाट बघा.
08:18 आता हे ऍप तुम्हाला या पेजवर घेऊन जाईल.
08:22 येथे तुम्हाला OTP आणि MPIN टाईप करण्याचा पर्याय दिला जाईल.
08:28 मला माझ्या फोनवर SMS द्वारे OTP मिळाला आहे.
08:33 मी तो येथे टाईप करत आहे.
08:37 पुढे MPIN म्हणजेच तुम्ही आधी तयार केलेला पासवर्ड टाईप करा.
08:42 मग Submit बटणावर क्लिक करा.
08:45 बफरिंग होत असल्यास थोडी वाट बघा.
08:49 आता MPIN हे यशस्वीरित्या तुमच्या बँक खात्याशी जोडले गेले आहे.
08:54 Back बटण निवडा.
08:56 हे ऍप तुम्हाला मुख्य मेनूवर परत घेऊन जाईल.


09:00 या टप्प्यावर एकदाच करायची सर्व नोंदणी प्रक्रिया पूर्ण झाली आहे.
09:06 SBI Pay हे डिजिटल पेमेंट प्रणालीसाठी परिवर्तन घडवून आणणारे ठरणार आहे.
09:13 SBI Pay ऍप पैसे हस्तांतरित करण्याची सर्वात स्वस्त पध्दत आहे.
09:19 SBI Pay ऍपद्वारे व्यवहार केल्यास 50 पैशांपेक्षाही कमी खर्च येतो.
09:25 खर्च इतका कमी असल्याने छोट्या रकमांचे व्यवहार रोख चलनाशिवाय करण्यास प्रोत्साहन मिळणार आहे.
09:32 कमी पैशाचा व्यवहार- जसे, शेजारील वाण्याचे पैसे देणे
09:38 * किंवा भाजी विक्रेत्याला पैसे देणे.

आता हे छोटे दुकानदार तसेच ग्राहक यांच्यासाठी शक्य झाले आहे.


09:48 SBI Pay ऍपने सामान्य माणसाची सुरक्षिततेसंबंधी चिंता कमी केली आहे.
09:54 Virtual Payment Address तुमच्या बँक खात्याबद्दलचा कुठलाही सुगावा लागू देत नाही.
10:01 तसेच दोन वेगवेगळे PIN क्रमांक देऊन तुमच्या स्वतःच्या स्मार्ट फोनवर प्रमाणीकरण केले जाते.
10:10 SBI Pay हे UPI ऍप असून ते IMPS platform वर आधारित आहे.
10:17 त्यामुळे हे 24x7 कार्य करते. म्हणून हस्तांतरण प्रक्रिया त्वरित पूर्ण होते.
10:23 तुम्ही कुठल्याही वेळी पैशाची देवाणघेवाण करू शकता. त्याला सुट्टी किंवा वेळेची मर्यादा नाही.
10:31 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
10:34 थोडक्यात,
10:36 या पाठात आपण ऍड्रॉईड स्मार्ट फोनवर SBI Pay ऍप डाऊनलोड करून इन्स्टॉल करणे,


10:44 तसेच एकदाच करायची संपूर्ण नोंदणी प्रक्रिया जाणून घेतली.
10:48 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम जनरल अवेअरनेस विषयांवर विविध माहितीपूर्ण ऑडिओ-व्हिडीओ ट्युटोरियल्स तयार करते,
10:57 आणि प्रशिक्षण कार्यक्रमही चालवते.
11:01 विषयांच्या पूर्ण सूचीसाठी पुढील साईटला भेट द्या. http://spoken-tutorial.org
11:08 अधिक माहितीसाठी कृपया लिहाः contact@spoken-tutorial.org
11:15 हे ट्युटोरियल तुम्हाला उपयोगी वाटले असेल अशी आशा आहे. या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Nancyvarkey