Difference between revisions of "Drupal/C2/Overview-of-Drupal/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 365: | Line 365: | ||
|- | |- | ||
| 09:41 | | 09:41 | ||
− | | हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी | + | | हा व्हिडिओ '''Acquia '''आणि '''OSTraining''' ह्यावर आधारित असून आय आय टी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
|- | |- | ||
| 09:51 | | 09:51 | ||
− | | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. | + | | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाऊनलोड करून पहा. |
|- | |- | ||
| 09:59 | | 09:59 | ||
− | | प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. | + | | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
Revision as of 11:13, 2 September 2016
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या ‘ओव्हरव्ह्यु ऑफ ड्रुपल’ वरील पाठात आपले स्वागत. |
00:06 | या पाठात आपण शिकणार आहोत,
|
00:13 | ड्रुपल ची महत्वाची वैशिष्ट्ये आणि
|
00:19 | प्रथम ड्रुपल म्हणजे काय ते पाहू. ड्रुपल ही मुक्त आणि ओपन सोर्स कंटेट मॅनेजमेंट सिस्टीम (CMS) आहे. |
00:30 | CMS म्हणजे काय?
|
00:40 | पारंपारिक पध्दतीने प्रत्येक वेबपेजला त्याची स्वतःची एक html फाईल असते. |
00:47 | आता हे खूप बदलले आहे.
|
00:55 | प्रत्येक घटक हा भिन्न ठिकाणाहून येऊ शकतो. |
01:00 | ह्या घटकांची प्रोग्रॅमिंग लॉजिकद्वारा गतिमान पध्दतीने जुळणी केली जाते. |
01:06 | आपण मोबाईल किंवा डेस्कटॉपचा स्क्रीन बघत असू त्यानुसार ते बदलते. |
01:14 | आपले बघण्याचे ठिकाण कुठले आहे त्यावरही ते अवलंबून असते.
|
01:23 | किंवा तुम्ही सिंगापूर स्थित ग्राहक असाल,
|
01:32 | CMS म्हणजे सादरीकरण करणा-या लॉजिकमागील प्रोग्रॅम. |
01:37 | ह्यात प्रोग्रॅमिंगची विविध तंत्रे वापरलेली असतात जसे की, PHP, Ajax, Javascript इत्यादी. |
01:47 | सर्व CMS डेटाबेसचा उपयोग करतात ज्यात विविध डेटा फॉरमॅटिंग शिवाय संचित केलेला असतो. |
01:55 | माहितीचे फॉरमॅटिंग स्वतंत्रपणे केले जाते. |
02:00 | CMS वापरून बिगर तांत्रिक युजर्सनाही वेबसाईटचे व्यवस्थापन सहज करता येते. |
02:07 | ड्रुपल ही या पध्दतीची एक ओपन सोर्स CMS आहे. म्हणजेच जिचा कोड मुक्तपणे उपलब्ध आहे. |
02:15 | कोणीही तो डाऊनलोड करून बदलू शकतो. |
02:18 | ड्रुपल ही Dries Buytaert याने 2000 साली विद्यार्थी असताना स्थापन केली. |
02:24 | ओपन सोर्स असल्याने हजारो लोकांचा ड्रुपलचा कोड सुधारण्यास हातभार लागला. |
02:32 | छोट्या सुधारणा करून नंतर ती कम्युनिटीला परत देण्यात आली. |
02:37 | ड्रुपल कम्युनिटी ही ओपन सोर्स चळवळीतील एक सर्वात मोठी कम्युनिटी आहे. |
02:43 | ह्या कम्युनिटीत डेव्हलपर्स, साईट बनवणारे, स्वयंसेवक आहेत ज्यांनी ड्रुपलला आजच्या स्वरूपात आणले आहे. |
02:51 | ड्रुपलमधे असे म्हटले जाते की तुम्ही कोड घेण्यास येता आणि कम्युनिटीचा भाग बनून राहता. |
02:58 | याच कारणासाठी तुम्ही सुध्दा या कम्युनिटीचा भाग बनाल. |
03:02 | आता मी तुम्हाला ड्रुपलची 10 मुख्य वैशिष्टये सांगते. |
03:06 | क्रमांक 1:
|
03:11 | तिचा सोर्स कोड कोणीही डाऊनलोड करून बदलू शकतो. |
03:15 | आपण डेव्हलपर असाल तरी ड्रुपल ही अतिशय उपयोगी आहे. |
03:20 | क्रमांक 2:
|
03:24 | आज उपलब्ध प्रणालींपैकी ड्रुपल ही बदल करून घेण्यास सर्वात योग्य प्रणाली आहे. |
03:28 | कस्टम डेटा स्ट्रक्चर्स वापरणा-या अत्याधुनिक वेबसाईटसवर ड्रुपल योग्य पध्दतीने चालते. |
03:35 | डेव्हलपर्स ड्रुपलचा वापर CMS तसेच विस्तारित web development platform म्हणूनही करतात. |
03:42 | क्रमांक 3:
|
03:46 | ड्रुपल साईटवरील प्रत्येक पान आपण कोणत्याही मोबाईल डिव्हाईसेसवर दाखवू किंवा पाहू शकतो. |
03:54 | क्रमांक 4:
|
04:00 | whitehouse.gov पासून weather.com पर्यंत आणि Dallas Cowboys सारखा कोणताही प्रकल्प ड्रुपल हाताळू शकते. |
04:08 | गुंतागुंतीच्या वेबसाईटसवर ड्रुपलची कामगिरी अधिकच चमकदार आहे. |
04:12 | उत्तम वैशिष्ट्ये असलेली वेबसाईट तयार करणा-या लोकांसाठी ड्रुपल हा एक चांगला पर्याय आहे. |
04:19 | आणि ती मोठ्या उद्योगांसाठी सुध्दा सोईस्कर आहे. |
04:24 | क्रमांक 5:
|
04:29 | ड्रुपल लोकांना my site आणि my content शोधायला मदत करते. |
04:34 | *शिवाय, ड्रुपल साईट एडिटर्सना टॅग्ज, माहिती, कीवर्डस आणि human-friendly URLs समाविष्ट करण्यास परवानगी देते . |
04:45 | क्रमांक 6:
ड्रुपल ही सुरक्षित आणि संरक्षित आहे. |
04:50 | hash passwords आणि नियमित सिक्युरिटी अपडेटसद्वारा ड्रुपल आपली साईट सुरक्षित ठेवते. |
04:57 | * पर्मिशन्सच्या बदलाबरोबर session ID बदलले जातात. |
05:01 | * युजर इनपुटवर निर्बंध घालणा-या टेक्स्ट फॉरमॅट परमिशन्स आणि यासारखे अनेक. |
05:07 | ड्रुपलमधे सुरक्षेला अतिशय महत्व आहे. |
05:11 | क्रमांक 7:
|
05:18 | आपल्या मनातले ड्रुपलमधील एखादे वैशिष्टय कोणीतरी आधीच Module द्वारा विनामूल्य उपलब्ध करून दिलेले असू शकते. |
05:27 | एकाच साईटवर अनेक थीम्स किंवा एका थीमची अनेक वर्जन्स आपल्याला मिळू शकतात.
|
05:40 | क्रमांक 8:
|
05:48 | ड्रुपल वर कार्यक्रम जगभर होत असतात. |
05:52 | स्थानिक कार्यक्रमांना ड्रुपल कँपस म्हणतात. |
05:55 | आणि प्रत्येक वर्षी जगभर मोठ्या DrupalCons भरवल्या जातात. |
06:01 | याशिवाय ड्रुपल सपोर्टसाठी कार्यक्षम Forums, User Groups आणि IRC chats उपलब्ध असतात. |
06:08 | क्रमांक 9:
|
06:15 | या मालिकेसाठी भागीदार असलेली Acquia ही सर्वात मोठी ड्रुपल कंपनी आहे. |
06:21 | भारतात साठाहून जास्त ड्रुपल सेवा देणा-या कंपन्या आहेत. याशिवाय ड्रुपल जाणणारे शेकडो फ्रीलान्सर्स आहेत. |
06:32 | क्रमांक 10:
|
06:40 | जगातल्या सर्व वेबसाईटसपैकी 3% ड्रुपल वापरतात आणि सर्वात मोठ्या दहा हजार साईटसपैकी 15% साईटसवर ड्रुपल आहे. |
06:50 | ड्रुपल हे सरकार, शिक्षण, नॉन प्रॉफिट संस्था आणि मोठ्या उद्योगांमधे लोकप्रिय आहे. |
06:58 | या पाठांच्या मालिकेत आपण खालील गोष्टी शिकणार आहोत,
|
07:04 | ड्रुपल आणि त्याच्याशी संबंधित सॉफ्टवेअर कसे इन्स्टॉल करायचे ते पाहू. |
07:10 | जवळजवळ कुणालाही हे इन्स्टॉल करता येईल त्यासाठी लिनक्स किंवा विंडोजचे जाणकार असण्याची गरज नाही |
07:18 | content वर्कफ्लोची माहिती
|
07:26 | एक साधे वेबसाईट कंटेंट बनवू जसे की, वर्ड प्रोसेसरमध्ये आपण ते एडिट करत आहोत. |
07:34 | यानंतर आपण ड्रुपलची काही प्रभावी वैशिष्ट्ये पाहू ज्यामुळे ड्रुपल अद्वितीय आहे. |
07:40 | जसे की, कंटेटमधील संबंध, अनेक कंटेंट्समधील प्रोग्रॅमॅटिक फॉरमॅटेड डिस्प्ले इत्यादी. |
07:49 | ड्रुपलचा विस्तार करणे
|
07:56 | आधी पाहिल्याप्रमाणे तुम्हाला हव्याशा वाटणा-या बहुतेक वैशिष्ट्यांसाठी ऍपप्रमाणे Modules आधीच उपलब्ध आहेत. |
08:05 | दहा हजारांच्यावर मॉड्युल्स उपलब्ध असल्यामुळे आम्ही तुमच्या उपयोगाची मॉड्युल्स कशी शोधायची ते सांगू |
08:13 | साईटचा लेआऊट तयार करणे
|
08:24 | लेआऊट विभागात आपण पाहू की वेबसाईटची मांडणी आपण किती सहजपणे बदलू शकतो. |
08:31 | *कम्युनिटीच्या योगदानातून मॉड्युल्सप्रमाणेच लेआऊटस किंवा थीम्सही वापरासाठी उपलब्ध आहेत. |
08:38 | लोकांचे व्यवस्थापन करणे. |
08:40 | ड्रुपल ही वर्डप्रेस सारख्या सिंगल युजर CMS पेक्षा वेगळी आहे. यात बहुतांश वेळी विविध युजर्स वेबसाईटची विविध कामे पहात असतात. |
08:53 | people व्यवस्थापन विभागात आपण विविध भूमिका आणि त्याद्वारे दिल्या जाणा-या पर्मिशन्स पाहू. |
09:01 | साईटचे योग्य व्यवस्थापन
|
09:11 | ही साइट सुरक्षा आणि स्थैर्याच्या दृष्टीने अद्ययावत ठेवणे महत्वाचे आहे. |
09:17 | * ही साइट अधिक मैत्रीपूर्ण करण्यासाठी त्यात नवीन वैशिष्ट्ये वाढवणेही उपयुक्त ठरते. |
09:24 | आपण या पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
09:28 | थोडक्यात, आपण या पाठात शिकलो,
|
09:41 | हा व्हिडिओ Acquia आणि OSTraining ह्यावर आधारित असून आय आय टी बॉम्बेच्या स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टने संशोधित केला आहे. |
09:51 | या व्हिडिओमधे तुम्हाला स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. कृपया डाऊनलोड करून पहा.
|
09:59 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
|
10:11 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD आणि NVLI, Ministry of Culture, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
|
10:24 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |