Difference between revisions of "C-and-C++/C2/Tokens/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
Line 1: | Line 1: | ||
{|border=1; | {|border=1; | ||
− | + | |'''Time''' | |
− | + | |'''Narration''' | |
|- | |- |
Revision as of 14:57, 15 July 2014
Time | Narration |
00:01 | 'Tokens-in-C-and-C-Plus-Plus च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:06 | ह्यात शिकणार आहोत |
00:09 | tokens चे स्वरूप आणि त्यांचा वापर. |
00:12 | हे उदाहरणाच्या सहाय्याने पाहू. |
00:15 | आपणcommon errors आणि solutions ही पाहणार आहोत. |
00:20 | ह्यासाठी |
00:21 | आपणUbuntu Operating system version 11.10, gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत. |
00:33 | परिचयासहित सुरूवात करू या. |
00:37 | Token हा Data types, Variables, Constants आणि Identifiers साठी वापरला जाणारा शब्द आहे. |
00:46 | प्रोग्रॅमपासून सुरूवात करू. |
00:49 | मी एडिटरवर आधीचcode लिहिला आहे. |
00:53 | तो उघडू. फाईलचे नाव Tokens .c आहे. |
01:04 | प्रोग्रॅममध्ये व्हेरिएबल्स initialize करून त्यांच्या व्हॅल्यूज प्रिंट करू. |
01:09 | code समजून घेऊ. ही header file आहे. |
01:16 | हे मुख्य फंक्शन आहे. |
01:20 | int हा keyword आहे. |
01:22 | compiler ला keywordsचे अर्थ माहित असतात. |
01:26 | a हे integer variable आहे. |
01:29 | यास दोन ही व्हॅल्यू दिली आहे. |
01:32 | यास initialization म्हणतात. |
01:35 | जर व्हेरिएबलला कुठलीही व्हॅल्यू दिलेली नसेल तर त्याला declaration of the variable म्हणतात. |
01:43 | b हा constant आहे. |
01:46 | bला चार ही व्हॅल्यू देऊन, तो initialize केला आहे. |
01:53 | read only variable बनवण्यासाठी const हा keyword वापरतात. |
01:58 | keywords आणि constant बद्दल जाणून घेण्यासाठी स्लाईडसवर परत जाऊ. |
02:06 | Keywords चे अर्थ निश्चित असतात जे बदलता येत नाहीत. |
02:11 | variable चे नाव म्हणून Keywords वापरता येत नाहीत. |
02:15 | C मध्ये एकूण बत्तीस keywords आहेत. |
02:18 | auto, break, case, char, enum extern हे त्यापैकी काही. |
02:28 | Constants म्हणजे न बदलणा-या व्हॅल्यूज. |
02:34 | प्रोग्रॅम कार्यान्वित होते वेळी त्यात बदल होत नाही. constants चे दोन प्रकार आहेतNumeric आणि Character constants. |
02:45 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
02:47 | variable c चा डेटा टाईप float आहे. |
02:52 | त्याला 1.5 ही व्हॅल्यू दिली आहे. |
02:57 | Data type हा नियम निश्चित केलेला finite म्हणजेच मर्यादित संच असतो. |
03:05 | येथे d हे variable आहे. |
03:07 | Char आणि single quotes आपण अक्षरे वापरत असल्याचे सुचवते. |
03:13 | d हे character variable असून त्यात 'A' ही व्हॅल्यू संचित केली आहे. |
03:20 | int, double float आणि char हे डेटाटाईप्स आपण सहज समजू शकतो. |
03:30 | a, c आणि d हे variables आहेत. |
03:36 | आता स्लाईडसवर जाऊ. |
03:38 | डेटाटाईप्स आणि व्हेरिएबल्सबद्दल अधिक जाणून घेऊ. |
03:48 | integer डेटाटाईप पासून सुरूवात करू. |
03:51 | हे int म्हणून घोषित केले जाते. |
03:53 | जर integer प्रिंट करायचा असेल तर %d हा format specifier वापरतात. |
04:01 | त्याप्रमाणे float point numbers साठी float आणि %f वापरला जातो. |
04:09 | character डेटाटाईपसाठी char आणि %c वापरले जाते. |
04:15 | double डेटाटाईपसाठी, double आणि %lf format specifier वापरला जातो. |
04:25 | डेटाटाईप्सची मर्यादा पाहू. |
04:29 | Integerडेटाटाईपची मर्यादा -32,768 ते 32,767 |
04:34 | Floating point ची मर्यादा 3.4E +/-38 |
04:39 | Character ची मर्यादा -128 to 127 |
04:42 | आणि Double ची मर्यादा 1.7E +/-308 |
04:48 | व्हेरिएबलमध्ये संचित होणा-या व्हॅल्यूज या मर्यादांपेक्षा जास्त किंवा कमी असता कामा नये. |
04:56 | व्हेरिएबल बद्दल अधिक जाणून घेऊ. |
05:00 | व्हेरिएबल म्हणजे data name. |
05:03 | ह्यात डेटा व्हॅल्यू साठवली जाते. |
05:06 | प्रोग्रॅम कार्यान्वित होत असताना व्हॅल्यूज बदलता येतात. |
05:10 | वापरण्यापूर्वी व्हेरिएबल घोषित करणे आवश्यक असते. |
05:15 | व्हेरिएबल्सला शक्यतो अर्थपूर्ण नावे द्यावीत. |
05:19 | उदाहरणार्थ john, marks, sum इत्यादी. |
05:24 | प्रोग्रॅमवर परत जाऊ. |
05:27 | printf हे फंक्शनचे identifier नाव आहे. |
05:32 | स्लाईडसवर जाऊ. identifiers बद्दल शिकू. |
05:38 | Identifiers ही user defined नावे असतात. |
05:41 | identifier ही अक्षरे व अंकांनी बनलेली असतात. |
05:46 | ह्यात uppercase आणि lowercase वापरता येतात. |
05:51 | पहिले अक्षर हे alphabet किंवा underscore असले पाहिजे. |
05:55 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
05:58 | variables आणि constants initialized केले आहेत. ते प्रिंट करू. |
06:05 | हे return statement आहे. सेव्ह करा. |
06:10 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
06:12 | टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T keys एकत्रितपणे दाबा. |
06:21 | compile करण्यासाठी टाईप करा gcc tokens.c -o tok आणि Enter दाबा. |
06:30 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./tok |
06:35 | आऊटपुट दाखवला जाईल. |
06:39 | दशांश चिन्हानंतर सहा व्हॅल्यूज बघू शकतो. |
06:44 | येथे दोन व्हॅल्यूज आहेत. |
06:48 | येथे काय झाले ते शोधून प्रोग्रॅमवर जाऊ. |
06:54 | कारण आपल्याकडे %.2f आहे. |
06:59 | ह्याचा अर्थ दशांश चिन्हानंतर दोन व्हॅल्यूज प्रिंट करू शकतो. |
07:04 | आपल्याला आउटपुट मध्ये दशांशचिन्हानंतर तीन व्हॅल्यूज हव्या आहेत. |
07:09 | म्हणून %.2f च्या जागी %.3f टाईप करू. |
07:16 | Save करा. |
07:20 | टर्मिनलवर जाऊनcompile करून कार्यान्वित करा. |
07:29 | आता दशांशचिन्हानंतर तीन व्हॅल्यूज दिसतील. |
07:33 | हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू. |
07:37 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
07:40 | ह्यात काही बदल करू. |
07:42 | प्रथम shift+ctrl+s keys एकत्रितपणे दाबा. |
07:50 | फाईलला .cpp हे extension देऊन save करा. |
07:58 | header file बदलून iostream करा. |
08:03 | using statement समाविष्ट करून save करा. |
08:11 | printf statement च्या जागी cout statement लिहा. |
08:15 | C++ मध्ये ओळ लिहिण्यास cout आणि दोन opening angle brackets << वापरतात. |
08:21 | Search for आणि replace text option वर क्लिक करा. |
08:28 | टाईप करा printf नंतरopening bracket "(" |
08:33 | column मध्ये टाईप करा, |
08:35 | cout आणि two opening angle brackets "<<". Replace All वर क्लिक करून Close बटण दाबा. |
08:45 | format specifierआणि /n ची गरज नाही. |
08:50 | ते डिलिट करा. comma ही डिलिट करा. |
08:54 | टाईप करा two opening angle brackets. |
09:01 | Save करा. closing bracket डिलिट करा. |
09:06 | टाईप करा two opening angle brackets |
09:09 | पुढे double quotes मध्ये टाईप करा \n. Save करा. |
09:20 | प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. |
09:24 | compile करण्यासाठी टाईप करा g++ tokens.cpp -o tok 1 |
09:35 | येथे tok1 आहे. |
09:36 | कारण tokens.c ह्या फाईलच्या tok ह्या output parameter वर आपल्याला overwrite करायचे नाही. Enter दाबा. |
09:48 | कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./tok1 . Enter दाबा. |
09:55 | आपल्याला आऊटपुट दिसेल. |
09:59 | ह्या संबंधीच्या common errors पाहू. |
10:03 | प्रोग्रॅमवर जाऊ. समजा b ला आठ ही व्हॅल्यू दिली. |
10:13 | सेव्ह करा आणि पहा. |
10:15 | टर्मिनलवर जाऊनprompt क्लियर करा. |
10:22 | हे compile करा. |
10:26 | tokens. cpp file च्या सातव्या ओळीवर error दिसेल. |
10:32 | Assignment of read only variable b. |
10:36 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
10:40 | कारण b हा constant आहे. Constants म्हणजे न बदलणा-या व्हॅल्यूज. |
10:46 | त्या प्रोग्रॅम कार्यान्वित होत असताना बदलत नाहीत. |
10:49 | हे error देत आहे. ती दुरूस्त करू. |
10:54 | हे डिलिट करून सेव्ह करा. |
10:57 | हे कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. |
11:01 | Compile करून कार्यान्वित करा. हे कार्य करत आहे. |
11:09 | आणखी एक common error बघू. |
11:12 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
11:15 | समजा single quotes द्यायला विसरलो. सेव्ह करा. |
11:21 | हे कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ. |
11:25 | हे Compile करू. |
11:28 | tokens. cpp file च्या नवव्या ओळीवर error दिसेल . |
11:34 | A was not declared in the scope. प्रोग्रॅमवर जाऊ. |
11:40 | ह्याचे कारणsingle quotes मध्ये असलेले काहीही character value समजले जाते. |
11:47 | येथे d हे character व्हेरिएबल म्हणून घोषित केले आहे. |
11:53 | ही error दुरूस्त करू. नवव्या ओळीवरsingle quotes टाईप करू. |
11:59 | सेव्ह करून कार्यान्वित करा. |
12:02 | टर्मिनलवर जाऊ. |
12:04 | हे Compile करू. |
12:06 | हे कार्यान्वित करा. हे कार्य करत आहे. |
12:14 | स्लाईडसवर जाऊ. |
12:15 | थोडक्यात |
12:16 | आपण शिकलो, |
12:18 | int, double, float इत्यादी डेटा टाईप्स. |
12:24 | Variables उदाहरणार्थ int a=2; |
12:29 | Identifiers उदाहरणार्थ printf() आणि |
12:34 | Constant उदाहरणार्थ double const b=4; |
12:40 | assignment |
12:41 | सरळव्याज calculate करणारा C program लिहा. |
12:45 | सूत्र: Simple Interest = principal * rate * time / 100 |
12:51 | प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
12:54 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
12:57 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
13:01 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम |
13:03 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
13:07 | परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
13:11 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
13:20 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
13:24 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:30 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
13:35 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद . |