Difference between revisions of "Digital-Divide/D0/First-aid-measures-for-ChickenPox/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with ''''Title of script''': '''First-aid-measures-for-ChickenPox''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Digital-Divide''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue<…') |
|||
Line 4: | Line 4: | ||
'''Keywords: Digital-Divide''' | '''Keywords: Digital-Divide''' | ||
− | |||
− | |||
{| style="border-spacing:0;" | {| style="border-spacing:0;" | ||
Line 136: | Line 134: | ||
|- | |- | ||
− | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02:50 | + | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 02:50 |
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप असणे. | | style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप असणे. | ||
Revision as of 10:24, 20 March 2014
Title of script: First-aid-measures-for-ChickenPox
Author: Manali Ranade
Keywords: Digital-Divide
|
|
---|---|
00:07 | अशोक शेतावरून घरी परतला. त्याने ताप आल्याचे व अंग दुखत असल्याचे सांगितले. |
00:13 | त्याची पत्नी, अनिताला, त्याच्या हाता-पायांवर फोड आल्याचे दिसले. |
00:19 | ती घाबरली. तिच्या पतीवर देवीचा कोप झाला आहे असे म्हणू लागली. |
00:25 | तिने मुलांना ताबडतोब घराबाहेर जाण्यास सांगितले. |
00:30 | आई आणि मुले यांनी घराबाहेर येऊन दरवाजा बंद केला. |
00:35 | त्याचवेळी, गावातल्या दवाखान्यातील डॉक्टर त्यांच्या घराजवळून जात असताना ते अनिताला अभिवादन करतात. |
00:44 | अनिता व मुले यांचे घाबरलेले चेहरे पाहून त्यांनी त्याबद्दल चौकशी केली. |
00:51 | पतीवर देवीचा कोप झाल्याचे ती डॉक्टरांना सांगते. |
00:57 | डॉक्टर तिच्या पतीला भेटण्याची इच्छा व्यक्त करतात. |
01:02 | परंतु अनिता, तिच्या पतिला भेटू नये असे, सांगून नकार देते. |
01:08 | तिच्याकडे दुर्लक्ष करून डॉक्टर घरात जातात. त्यांच्या मागोमाग अनिताही डळमळीत आत जाते. |
01:16 | डॉक्टर अशोकला तपासतात आणि त्याला कांजिण्या झाल्याचे सांगतात. |
01:22 | परंतु,त्या दोघांना कांजिण्याबद्दल काहीच माहिती नव्हती. |
01:26 | ते प्रश्नार्थक नजरेने डॉक्टरांकडे पहात होते. |
01:30 | digital divide वरील ट्युटोरियलमधे स्वागत. |
01:34 | येथे आपण कांजिण्या, त्याची लक्षणे, कारणे, त्यावेळी काय करावे आणि काय टाळावे हे जाणून घेणार आहोत. |
01:43 | प्रथम कांजिण्या म्हणजे काय ते पाहू. |
01:47 | कांजिण्या म्हणजे विषाणूंचा संसर्ग ज्यामधे व्यक्तीच्या शरीरावर खाज येणारे फोड येतात. |
01:53 | कांजिण्यांची लस रोगाला प्रतिबंध करण्याचे चांगले कार्य करते. |
01:59 | काही व्यक्तींना लस घेऊन देखील कांजिण्या होतात. |
02:03 | परंतु त्याची तीव्रता कमी असते. |
02:06 | सामान्यतः कांजिण्या सौम्य असून त्या जीवघेण्या नसतात. |
02:10 | परंतु काही वेळा त्या गंभीर असू शकतात, आणि हॉस्पिटलमधे भरती करावे लागते किंवा त्या व्यक्तीचा मृत्यूही होऊ शकतो. |
02:18 | कांजिण्यांचा परिणाम ह्यांच्यावर होऊ शकतो, |
02:21 | * गर्भवती महिला, |
02:23 | * नवजात बालके, |
02:26 | * मुले आणि प्रौढ व्यक्ती, |
02:29 | * प्रतिकार शक्ती कमी असलेल्या व्यक्ती. |
02:32 | एकदा कांजिण्या होऊन गेल्यावर शक्यतो ह्या विषाणूंचा प्रादुर्भाव पुन्हा होत नाही. |
02:38 | जर एखाद्या व्यक्तीला दुस-यांदा कांजिण्या झाल्यास त्याला shingles असे म्हणतात. |
02:45 | आता कांजिण्याची काही लक्षणे पाहू. |
02:50 | दोन दिवसांपेक्षा जास्त दिवस ताप असणे. |
02:54 | त्वचा लाल, गरम आणि दुखरी असणे. |
02:58 | घरगुती उपायांनी बरी न होणारी तीव्र खाज असणे, |
03:03 | दोन आठवड्यांपेक्षा जास्त काळ पुरळ राहणे. |
03:08 | आता कांजिण्यांचा कालावधी व संसर्गाबद्दल जाणून घेऊ. |
03:13 | कांजिण्यांचे फोड 3ते 5 दिवसात तयार होतात आणि 7 ते 10 दिवसात त्यांना खपली धरते. |
03:22 | कांजिण्या झाल्यावर 1 ते 2 दिवसात संसर्गजन्य होतात. |
03:27 | आणि सर्व फोडांना खपली धरेपर्यंत संसर्गजन्यच राहतात. |
03:33 | हा अतीशय संसर्गजन्य रोग असून एकापासून दुस-याला त्याची सहज लागण होते. |
03:39 | आता कांजिण्या होण्याची कारणे पाहू. |
03:43 | यामुळे कांजिण्या होऊ शकतात, |
03:47 | * कांजिण्यांच्या फोडातील द्रवाला स्पर्श केल्यास, किंवा |
03:52 | * एखादी सर्दी-खोकला झालेली रोगी व्यक्ती तुमच्या संपर्कात आल्यास, |
03:57 | धोका अधिक असतो जर तुम्हाला, |
04:00 | * पूर्वी कधीही कांजिण्या झालेल्या नसतील तर आणि, |
04:03 | * जर तुम्ही कांजिण्यांची लस घेतलेली नसेल. |
04:08 | आता कांजिण्यावर काय करावे ते पाहू. |
04:14 | शरीरावरील फोड डास किंवा कीटकांनी चावल्यामुळे आहेत का ह्या कांजिण्या आहेत, याची डॉक्टरांकडून खात्री करून घ्या. |
04:20 | हलके जेवण खा, शक्यतो घरी शिजवलेले हलके अन्न घ्या. |
04:26 | पहिले काही दिवस दर 3 ते 4 तासांनी थंड किंवा कोमट पाण्याने आंघोळ करा. |
04:33 | आंघोळीच्या पाण्यात कडूनिंबाची पाने टाका. त्यामुळे खाज कमी होते. |
04:38 | आंघोळ झाल्यावर अंग कोरडे करण्यासाठी ते टिपा. |
04:42 | शहाळे, बार्ली (जव) किंवा ज्यामुळे थंडावा मिळेल असे भरपूर पाणी प्या. |
04:49 | संसर्ग टाळण्यासाठी रोग्याचे कपडे वेगळे धुवा. |
04:55 | जर तुम्हाला कांजिण्या झालेल्या नसतील किंवा तुम्ही लस घेतलेली नसेल तर ती अवश्य घ्या. |
05:02 | कांजिण्या झाल्यावर काय करू नये हे पाहू. |
05:08 | लाल खाजणारे फोड खाजवणे टाळा. |
05:10 | ह्यामुळे विषाणूंचा संसर्ग होऊ शकतो आणि व्रण येऊ शकतात. |
05:15 | इतर लोकांशी संपर्क टाळा. कारण त्यांना ह्याचा संसर्ग होऊ शकतो. |
05:22 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. लक्षात ठेवा, वैद्यकीय मदत मिळवणे नेहमीच उपयुक्त ठरते. |
05:28 | सुरक्षित रहा. सहभागाबद्दल धन्यवाद. |
05:32 | प्रकल्पाची अधिक माहिती, दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे. |
05:35 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
05:39 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
05:44 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorials च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
05:49 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
05:53 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
06:01 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
06:05 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
06:12 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
06:22 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून, |
06:30 | मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
06:33 | सहभागासाठी धन्यवाद . |