Difference between revisions of "C-and-C++/C2/Tokens/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 333: Line 333:
 
|-
 
|-
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06.59
 
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:none;padding:0.097cm;"| 06.59
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्याचा अर्थ दशांश चिन्हानंतर दोन व्हॅल्यूज प्रिंट करू शकते .
+
| style="border-top:none;border-bottom:1pt solid #000000;border-left:1pt solid #000000;border-right:1pt solid #000000;padding:0.097cm;"| ह्याचा अर्थ दशांश चिन्हानंतर दोन व्हॅल्यूज प्रिंट करू शकतो.
  
 
|-
 
|-

Revision as of 15:54, 29 August 2013

Title of script: Tokens

Author: Manali Ranade

Keywords: C-and-C++


Visual Clue
Narration
00.01 'Tokens-in-C-and-C-Plus-Plus च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत.
00.06 ह्यात शिकणार आहोत
00.09 tokens चे स्वरूप आणि त्यांचा वापर.
00.12 हे उदाहरणाच्या सहाय्याने पाहू.
00.15 आपणcommon errors आणि solutions ही पाहणार आहोत.
00.20 ह्यासाठी
00.21 आपणUbuntu Operating system version 11.10, gcc आणि g++ Compiler version 4.6.1 वापरणार आहोत.
00.33 परिचयासहित सुरूवात करू या.
00.37 Token हा Data types, Variables, Constants आणि Identifiers साठी वापरला जाणारा शब्द आहे.
00.46 प्रोग्रॅमपासून सुरूवात करू.
00.49 मी एडिटरवर आधीचcode लिहिला आहे.
00.53 तो उघडू. फाईलचे नाव Tokens .c आहे.
01.04 प्रोग्रॅममध्ये व्हेरिएबल्स initialize करून त्यांच्या व्हॅल्यूज प्रिंट करू.
01.09 code समजून घेऊ. ही header file आहे.
01.16 हे मुख्य फंक्शन आहे.
01.20 int हा keyword आहे.
01.22 compiler ला keywordsचे अर्थ माहित असतात.
01.26 a हे integer variable आहे.
01.29 यास दोन ही व्हॅल्यू दिली आहे.
01.32 यास initialization म्हणतात.
01.35 जर व्हेरिएबलला कुठलीही व्हॅल्यू दिलेली नसेल तर त्याला declaration of the variable म्हणतात.
01.43 b हा constant आहे.
01.46 bला चार ही व्हॅल्यू देऊन, तो initialize केला आहे.
01.53 read only variable बनवण्यासाठी const हा keyword वापरतात.
01.58 keywords आणि constant बद्दल जाणून घेण्यासाठी स्लाईडसवर परत जाऊ.
02.06 Keywords चे अर्थ निश्चित असतात जे बदलता येत नाहीत.
02.11 variable चे नाव म्हणून Keywords वापरता येत नाहीत.
02.15 C मध्ये एकूण बत्तीस keywords आहेत.
02.18 auto, break, case, char, const, default, enum extern हे त्यापैकी काही.
02.28 Constants म्हणजे न बदलणा-या व्हॅल्यूज.
02.34 प्रोग्रॅम कार्यान्वित होते वेळी त्यात बदल होत नाही. constants चे दोन प्रकार आहेतNumeric आणि Character constants.
02.45 प्रोग्रॅमवर जाऊ.
02.47 variable c चा डेटा टाईप float आहे.
02.52 त्याला 1.5 ही व्हॅल्यू दिली आहे.
02.57 Data type हा नियम निश्चित केलेला finite म्हणजेच मर्यादित संच असतो.
03.05 येथे d हे variable आहे.
03.07 Char आणि single quotes आपण अक्षरे वापरत असल्याचे सुचवते.
03.13 d हे character variable असून त्यात 'A' ही व्हॅल्यू संचित केली आहे.
03.20 int, double float आणि char हे डेटाटाईप्स आपण सहज समजू शकतो.
03.30 a, c आणि d हे variables आहेत.
03.36 आता स्लाईडसवर जाऊ.
03.38 डेटाटाईप्स आणि व्हेरिएबल्सबद्दल अधिक जाणून घेऊ.
03.48 integer डेटाटाईप पासून सुरूवात करू.
03.51 हे int म्हणून घोषित केले जाते.
03.53 जर integer प्रिंट करायचा असेल तर %d हा format specifier वापरतात.
04.01 त्याप्रमाणे float point numbers साठी float आणि %f वापरला जातो.
04.09 character डेटाटाईपसाठी char आणि %c वापरले जाते.
04.15 double डेटाटाईपसाठी, double आणि %lf format specifier वापरला जातो.
04.25 डेटाटाईप्सची मर्यादा पाहू.
04.29 Integerडेटाटाईपची मर्यादा -32,768 ते 32,767
04.34 Floating point ची मर्यादा 3.4E +/-38
04.39 Character ची मर्यादा -128 to 127
04.42 आणि Double ची मर्यादा 1.7E +/-308
04.48 व्हेरिएबलमध्ये संचित होणा-या व्हॅल्यूज या मर्यादांपेक्षा जास्त किंवा कमी असता कामा नये.
04.56 व्हेरिएबल बद्दल अधिक जाणून घेऊ.
05.00 व्हेरिएबल म्हणजे data name.
05.03 ह्यात डेटा व्हॅल्यू साठवली जाते.
05.06 प्रोग्रॅम कार्यान्वित होत असताना व्हॅल्यूज बदलता येतात.
05.10 वापरण्यापूर्वी व्हेरिएबल घोषित करणे आवश्यक असते.
05.15 व्हेरिएबल्सला शक्यतो अर्थपूर्ण नावे द्यावीत.
05.19 उदाहरणार्थ john, marks, sum इत्यादी.
05.24 प्रोग्रॅमवर परत जाऊ.
05.27 printf हे फंक्शनचे identifier नाव आहे.
05.32 स्लाईडसवर जाऊ. identifiers बद्दल शिकू.
05.38 Identifiers ही user defined नावे असतात.
05.41 identifier ही अक्षरे व अंकांनी बनलेली असतात.
05.46 ह्यात uppercase आणि lowercase वापरता येतात.
05.51 पहिले अक्षर हे alphabet किंवा underscore असले पाहिजे.
05.55 प्रोग्रॅमवर जाऊ.
05.58 variables आणि constants initialized केले आहेत. ते प्रिंट करू.
06.05 हे return statement आहे. सेव्ह करा.
06.10 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
06.12 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T keys एकत्रितपणे दाबा.
06.21 compile करण्यासाठी टाईप करा gcc tokens.c -o tok आणि Enter दाबा.
06.30 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./tok
06.35 आऊटपुट दाखवला जाईल.
06.39 दशांश चिन्हानंतर सहा व्हॅल्यूज बघू शकतो.
06.44 येथे दोन व्हॅल्यूज आहेत.
06.48 येथे काय झाले ते शोधून प्रोग्रॅमवर जाऊ.
06.54 कारण आपल्याकडे %.2f आहे.
06.59 ह्याचा अर्थ दशांश चिन्हानंतर दोन व्हॅल्यूज प्रिंट करू शकतो.
07.04 आपल्याला आउटपुट मध्ये दशांशचिन्हानंतर तीन व्हॅल्यूज हव्या आहेत.
07.09 म्हणून %.2f च्या जागी %.3f टाईप करू.
07.16 Save करा.
07.20 टर्मिनलवर जाऊनcompile करून कार्यान्वित करा.
07.29 आता दशांशचिन्हानंतर तीन व्हॅल्यूज दिसतील.
07.33 हाच प्रोग्रॅम C++ मध्ये कार्यान्वित करू.
07.37 प्रोग्रॅमवर जाऊ.
07.40 ह्यात काही बदल करू.
07.42 प्रथम shift+ctrl+s keys एकत्रितपणे दाबा.
07.50 फाईलला .cpp हे extension देऊन save करा.
07.58 header file बदलून iostream करा.
08.03 using statement समाविष्ट करून save करा.
08.11 printf statement च्या जागी cout statement लिहा.
08.15 C++ मध्ये ओळ लिहिण्यास cout आणि दोन opening angle brackets << वापरतात.
08.21 Search for आणि replace text option वर क्लिक करा.
08.28 टाईप करा printf नंतरopening bracket "("
08.33 column मध्ये टाईप करा,
08.35 cout आणि two opening angle brackets "<<". Replace All वर क्लिक करून Close बटण दाबा.
08.45 format specifierआणि /n ची गरज नाही.
08.50 ते डिलिट करा. comma ही डिलिट करा.
08.54 टाईप करा two opening angle brackets.
09.01 Save करा. closing bracket डिलिट करा.
09.06 टाईप करा two opening angle brackets
09.09 पुढे double quotes मध्ये टाईप करा \n. Save करा.
09.20 प्रोग्रॅम कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
09.24 compile करण्यासाठी टाईप करा g++ tokens.cpp -o tok 1
09.35 येथे tok1 आहे.
09.36 कारण tokens.c ह्या फाईलच्या tok ह्या output parameter वर आपल्याला overwrite करायचे नाही. Enter दाबा.
09.48 कार्यान्वित करण्यासाठी टाईप करा ./tok1 . Enter दाबा.
09.55 आपल्याला आऊटपुट दिसेल.
09.59 ह्या संबंधीच्या common errors पाहू.
10.03 प्रोग्रॅमवर जाऊ. समजा b ला आठ ही व्हॅल्यू दिली.
10.13 सेव्ह करा आणि पहा.
10.15 टर्मिनलवर जाऊनprompt क्लियर करा.
10.22 हे compile करा.
10.26 tokens. cpp file च्या सातव्या ओळीवर error दिसेल.
10.32 Assignment of read only variable b.
10.36 प्रोग्रॅमवर जाऊ.
10.40 कारण b हा constant आहे. Constants म्हणजे न बदलणा-या व्हॅल्यूज.
10.46 त्या प्रोग्रॅम कार्यान्वित होत असताना बदलत नाहीत.
10.49 हे error देत आहे. ती दुरूस्त करू.
10.54 हे डिलिट करून सेव्ह करा.
10.57 हे कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
11.01 Compile करून कार्यान्वित करा. हे कार्य करत आहे.
11.09 आणखी एक common error बघू.
11.12 प्रोग्रॅमवर जाऊ.
11.15 समजा single quotes द्यायला विसरलो. सेव्ह करा.
11.21 हे कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनलवर जाऊ.
11.25 हे Compile करू.
11.28 tokens. cpp file च्या नवव्या ओळीवर error दिसेल .
11.34 A was not declared in the scope. प्रोग्रॅमवर जाऊ.
11.40 ह्याचे कारणsingle quotes मध्ये असलेले काहीही character value समजले जाते.
11.47 येथे d हे character व्हेरिएबल म्हणून घोषित केले आहे.
11.53 ही error दुरूस्त करू. नवव्या ओळीवरsingle quotes टाईप करू.
11.59 सेव्ह करून कार्यान्वित करा.
12.02 टर्मिनलवर जाऊ.
12.04 हे Compile करू.
12.06 हे कार्यान्वित करा. हे कार्य करत आहे.
12.14 स्लाईडसवर जाऊ.
12.15 थोडक्यात
12.16 आपण शिकलो,
12.18 int, double, float इत्यादी डेटा टाईप्स.
12.24 Variables उदाहरणार्थ int a=2;
12.29 Identifiers उदाहरणार्थ printf() आणि
12.34 Constant उदाहरणार्थ double const b=4;
12.40 assignment
12.41 सरळव्याज calculate करणारा C program लिहा.
12.45 सूत्र: Simple Interest = principal * rate * time / 100
12.51 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंकवर उपलब्ध आहे.
12.54 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
12.57 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
13.01 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम
13.03 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
13.07 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
13.11 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
13.20 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
13.24 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
13.30 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13.35 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद .

Contributors and Content Editors

Gaurav, PoojaMoolya, Pratik kamble, Ranjana