Difference between revisions of "Advanced-Cpp/C2/More-On-Inheritance/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
PoojaMoolya (Talk | contribs) |
||
Line 513: | Line 513: | ||
|- | |- | ||
| 08:11 | | 08:11 | ||
− | | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . | + | | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . धन्यवाद. |
|} | |} |
Latest revision as of 11:22, 11 April 2017
Time | Narration |
---|---|
00:01 | C++ मधील Multiple आणि Hierarchical Inheritance वरील पाठात आपले स्वागत. |
00:07 | यात शिकणार आहोत, |
00:09 | मल्टिपल इनहेरिटन्स. |
00:11 | हायरार्किकल इनहेरिटन्स. |
00:13 | आपण उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू. |
00:17 | ह्या पाठासाठी, |
00:20 | उबंटु OS वर्जन 11.10 आणि |
00:24 | g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू. |
00:29 | मल्टिपल इनहेरिटन्समधे derived क्लासला एकापेक्षा अधिक बेस क्लासकडून वारसा मिळतो. |
00:36 | मल्टिपल इनहेरिटन्स वरील उदाहरण पाहू. |
00:40 | मी एडिटरवर कोड आधीच टाईप करून ठेवला आहे. |
00:42 | आपण तो उघडू. |
00:45 | multiple.cpp हे आपले फाईलनेम आहे. |
00:49 | ह्या प्रोग्रॅममधे विद्यार्थ्याचे नाव, रोल नंबर, मार्क्स आणि अॅव्हरेज दाखवणार आहोत. |
00:56 | कोड समजून घेऊ. |
00:59 | iostream ही हेडर फाईल आहे. |
01:01 | std हे namespace आहे. |
01:05 | आपल्याकडे "student" क्लास आहे. |
01:07 | हा बेस क्लास आहे. |
01:09 | ह्यात roll_no हे इंटिजर व्हेरिएबल आणि name हे कॅरॅक्टर व्हेरिएबल आहे. |
01:16 | हे प्रोटेक्टेड म्हणून घोषित केले आहे. |
01:19 | आपल्याकडे "exam_inherit" हा क्लास आहे. |
01:24 | हा सुध्दा बेस क्लास आहे. |
01:26 | त्यामुळे student आणि exam_inherit हे दोन बेस क्लास आहेत. |
01:32 | ह्यामधे sub1, sub2 आणि sub3 ही तीन प्रोटेक्टेड व्हेरिएबल्स आहेत. |
01:38 | प्रोटेक्टेड व्हेरिएबल्स असल्यामुळे ती derived क्लासमधून अॅक्सेस करता येतात. |
01:44 | आपल्याकडे "grade" हा derived क्लास आहे. |
01:50 | त्याला student आणि "exam_inherit" ह्या दोन बेस क्लासचा वारसा मिळाला आहे. |
01:56 | त्यामधे avg हे इंटिजर व्हेरिएबल प्रायव्हेट म्हणून घोषित केले आहे. |
02:02 | नंतर आपल्याकडे, |
02:04 | input() , display() |
02:06 | average(), input_exam() |
02:08 | आणि display_exam() ही पब्लिक फंक्शन्स आहेत. |
02:11 | ह्यामधे "total" हे इंटिजर व्हेरिएबल पब्लिक म्हणून घोषित केले आहे. |
02:17 | नंतर विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि नाव मिळवण्यासाठी input फंक्शन वापरू. |
02:24 | display फंक्शनमधे विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि नाव दाखवू. |
02:28 | येथे input_exam फंक्शन आहे. |
02:31 | ह्यामधे sub1, sub2 आणि sub3 म्हणून तीन विषयांचे मार्क्स घेऊ. |
02:37 | नंतर display_exam फंक्शनमधे, तिन्ही विषयांची बेरीज करून ती प्रिंट करू. |
02:44 | आणि average फंक्शनमधे सरासरी काढू. |
02:48 | हे main फंक्शन आहे. |
02:51 | ह्यात gd हे grade ह्या derived क्लासचे ऑब्जेक्ट बनवू. |
02:57 | नंतर वरील सर्व फंक्शन्स कॉल करणार आहोत. |
03:01 | हे रिटर्न स्टेटमेंट आहे. |
03:03 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
03:05 | टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे दाबा. |
03:14 | कंपाईल करण्यासाठी टाईप करा g++ space multiple dot cpp space hyphen o space mult. एंटर दाबा. |
03:24 | टाईप करा dot slash mult. एंटर दाबा. |
03:29 | आपल्याला दिसेल, Enter Roll no.: |
03:32 | 3 टाईप करू. |
03:34 | Enter Name: |
03:36 | मी Pratham टाईप करत आहे. |
03:39 | Enter marks of subject1 |
03:41 | 67 टाईप करू. |
03:43 | subject2 साठी 78 आणि |
03:46 | subject3 साठी 84 |
03:48 | आऊटपुट असे मिळेल. |
03:51 | Roll no is: 3 , Name is: Pratham |
03:53 | Total is: 229 |
03:55 | Average is: 76 |
03:58 | असे हे मल्टिपल इनहेरिटन्स आहे. |
04:00 | आता हायरार्किकल इनहेरिटन्स पाहू. |
04:03 | प्रोग्रॅमवर जाऊ. |
04:05 | हायरार्किकल इनहेरिटन्समधे अनेक derived क्लासेसला एका बेस क्लासकडून वारसा मिळतो. |
04:12 | hierarchical dot cpp हे फाईलनेम आहे. |
04:16 | आता कोड समजून घेऊ. |
04:19 | iostream ही हेडर फाईल आहे. |
04:22 | येथे std namespace वापरले आहे. |
04:25 | नंतर student हा बेस क्लास आहे. |
04:29 | आपल्याकडे roll_no हे इंटिजर व्हेरिएबल आहे. |
04:34 | sub1, sub2, sub3 आणि total ही इंटिजर व्हेरिएबल्स आहेत. |
04:40 | नंतर name हे कॅरॅक्टर व्हेरिएबल आहे. |
04:43 | ही प्रोटेक्टेड म्हणून घोषित केली आहेत. |
04:46 | येथे 'show' हा आणखी क्लास आहे. |
04:49 | हा derived क्लास आहे. |
04:51 | त्याला student क्लासचे गुणधर्म वारशाने मिळालेले आहेत. |
04:54 | ह्यामधे "input" आणि "display" ही दोन फंक्शन्स आहेत. |
04:59 | ही पब्लिक फंक्शन्स म्हणून घोषित केली आहेत. |
05:02 | input फंक्शनमधे विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि नाव घेऊ. |
05:07 | display फंक्शन मधे विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि नाव दाखवू. |
05:11 | आपल्याकडे exam हा आणखी derived क्लास आहे. |
05:15 | त्याला student क्लासचे गुणधर्म वारशाने मिळालेले आहेत. |
05:19 | येथे दिसेल की exam आणि show हे दोन derived क्लास आहेत. |
05:26 | दोन्ही क्लासेसला "student" क्लासचा वारसा मिळाला आहे. |
05:30 | exam क्लासमधे "input_exam" आणि "total_marks" ही दोन पब्लिक फंक्शन्स घोषित केली आहेत. |
05:38 | येथे "input_exam" हे फंक्शन अॅक्सेस करणार आहोत. |
05:41 | हे sub1, sub2 आणि sub3 ह्या तीन विषयांचे मार्क्स घेईल. |
05:46 | आपल्याकडे "total_marks" फंक्शन आहे. |
05:49 | हे तिन्ही विषयांची बेरीज करून ती प्रिंट करेल. |
05:53 | हे main फंक्शन आहे. |
05:56 | ह्यामधे st, sw आणि em हे तीन क्लासेसचे ऑब्जेक्टस बनवू. |
06:03 | ह्या ऑब्जेक्टद्वारे वरील सर्व फंक्शन्स कॉल करणार आहोत.
sw.input(); em.input_exam(); sw.display(); em.total_marks(); |
06:15 | हे रिटर्न स्टेटमेंट आहे. |
06:17 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
06:19 | टर्मिनलवर जाऊ. |
06:21 | प्रॉम्प्ट क्लियर करा. |
06:24 | कंपाईल करण्यासाठी, टाईप करा g++ space hierarchical dot cpp space hyphen o space hier |
06:36 | एंटर दाबा, टाईप करा ./hier |
06:41 | एंटर दाबा. |
06:43 | Enter Roll no.: 4 टाईप करू. |
06:46 | Enter Name: येथे Ashwini देऊ. |
06:50 | Enter marks of subject1 |
06:52 | मी 87 देत आहे. |
06:54 | subject2 साठी 67 आणि subject3 साठी 97 |
07:00 | आऊटपुट असे मिळेल. |
07:02 | Roll no is: 4 |
07:04 | Name is: Ashwini आणि |
07:06 | Total is : 251 , आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत. |
07:10 | स्लाईडसवर जाऊ. |
07:13 | थोडक्यात, या पाठात शिकलो, |
07:16 | मल्टिपल इनहेरिटन्स, |
07:18 | हायरार्किकल इनहेरिटन्स. |
07:20 | असाईनमेंट म्हणून area आणि perimeter हे क्लास बनवा. |
07:25 | आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा. |
07:29 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
07:32 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
07:35 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
07:40 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, |
07:42 | Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
07:45 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
07:49 | अधिक माहितीसाठी कृपया |
07:51 | contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki> |
07:56 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
08:01 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
08:07 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
08:11 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . धन्यवाद. |