Advanced-Cpp/C2/More-On-Inheritance/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 C++ मधील Multiple आणि Hierarchical Inheritance वरील पाठात आपले स्वागत.
00:07 यात शिकणार आहोत,
00:09 मल्टिपल इनहेरिटन्स.
00:11 हायरार्किकल इनहेरिटन्स.
00:13 आपण उदाहरणाच्या सहाय्याने हे बघू.
00:17 ह्या पाठासाठी,
00:20 उबंटु OS वर्जन 11.10 आणि
00:24 g++ compiler वर्जन 4.6.1 वापरू.
00:29 मल्टिपल इनहेरिटन्समधे derived क्लासला एकापेक्षा अधिक बेस क्लासकडून वारसा मिळतो.
00:36 मल्टिपल इनहेरिटन्स वरील उदाहरण पाहू.
00:40 मी एडिटरवर कोड आधीच टाईप करून ठेवला आहे.
00:42 आपण तो उघडू.
00:45 multiple.cpp हे आपले फाईलनेम आहे.
00:49 ह्या प्रोग्रॅममधे विद्यार्थ्याचे नाव, रोल नंबर, मार्क्स आणि अॅव्हरेज दाखवणार आहोत.
00:56 कोड समजून घेऊ.
00:59 iostream ही हेडर फाईल आहे.
01:01 std हे namespace आहे.
01:05 आपल्याकडे "student" क्लास आहे.
01:07 हा बेस क्लास आहे.
01:09 ह्यात roll_no हे इंटिजर व्हेरिएबल आणि name हे कॅरॅक्टर व्हेरिएबल आहे.
01:16 हे प्रोटेक्टेड म्हणून घोषित केले आहे.
01:19 आपल्याकडे "exam_inherit" हा क्लास आहे.
01:24 हा सुध्दा बेस क्लास आहे.
01:26 त्यामुळे student आणि exam_inherit हे दोन बेस क्लास आहेत.
01:32 ह्यामधे sub1, sub2 आणि sub3 ही तीन प्रोटेक्टेड व्हेरिएबल्स आहेत.
01:38 प्रोटेक्टेड व्हेरिएबल्स असल्यामुळे ती derived क्लासमधून अॅक्सेस करता येतात.
01:44 आपल्याकडे "grade" हा derived क्लास आहे.
01:50 त्याला student आणि "exam_inherit" ह्या दोन बेस क्लासचा वारसा मिळाला आहे.
01:56 त्यामधे avg हे इंटिजर व्हेरिएबल प्रायव्हेट म्हणून घोषित केले आहे.
02:02 नंतर आपल्याकडे,
02:04 input() , display()
02:06 average(), input_exam()
02:08 आणि display_exam() ही पब्लिक फंक्शन्स आहेत.
02:11 ह्यामधे "total" हे इंटिजर व्हेरिएबल पब्लिक म्हणून घोषित केले आहे.
02:17 नंतर विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि नाव मिळवण्यासाठी input फंक्शन वापरू.
02:24 display फंक्शनमधे विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि नाव दाखवू.
02:28 येथे input_exam फंक्शन आहे.
02:31 ह्यामधे sub1, sub2 आणि sub3 म्हणून तीन विषयांचे मार्क्स घेऊ.
02:37 नंतर display_exam फंक्शनमधे, तिन्ही विषयांची बेरीज करून ती प्रिंट करू.
02:44 आणि average फंक्शनमधे सरासरी काढू.
02:48 हे main फंक्शन आहे.
02:51 ह्यात gd हे grade ह्या derived क्लासचे ऑब्जेक्ट बनवू.
02:57 नंतर वरील सर्व फंक्शन्स कॉल करणार आहोत.
03:01 हे रिटर्न स्टेटमेंट आहे.
03:03 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
03:05 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T ही बटणे दाबा.
03:14 कंपाईल करण्यासाठी टाईप करा g++ space multiple dot cpp space hyphen o space mult. एंटर दाबा.
03:24 टाईप करा dot slash mult. एंटर दाबा.
03:29 आपल्याला दिसेल, Enter Roll no.:
03:32 3 टाईप करू.
03:34 Enter Name:
03:36 मी Pratham टाईप करत आहे.
03:39 Enter marks of subject1
03:41 67 टाईप करू.
03:43 subject2 साठी 78 आणि
03:46 subject3 साठी 84
03:48 आऊटपुट असे मिळेल.
03:51 Roll no is: 3 , Name is: Pratham
03:53 Total is: 229
03:55 Average is: 76
03:58 असे हे मल्टिपल इनहेरिटन्स आहे.
04:00 आता हायरार्किकल इनहेरिटन्स पाहू.
04:03 प्रोग्रॅमवर जाऊ.
04:05 हायरार्किकल इनहेरिटन्समधे अनेक derived क्लासेसला एका बेस क्लासकडून वारसा मिळतो.
04:12 hierarchical dot cpp हे फाईलनेम आहे.
04:16 आता कोड समजून घेऊ.
04:19 iostream ही हेडर फाईल आहे.
04:22 येथे std namespace वापरले आहे.
04:25 नंतर student हा बेस क्लास आहे.
04:29 आपल्याकडे roll_no हे इंटिजर व्हेरिएबल आहे.
04:34 sub1, sub2, sub3 आणि total ही इंटिजर व्हेरिएबल्स आहेत.
04:40 नंतर name हे कॅरॅक्टर व्हेरिएबल आहे.
04:43 ही प्रोटेक्टेड म्हणून घोषित केली आहेत.
04:46 येथे 'show' हा आणखी क्लास आहे.
04:49 हा derived क्लास आहे.
04:51 त्याला student क्लासचे गुणधर्म वारशाने मिळालेले आहेत.
04:54 ह्यामधे "input" आणि "display" ही दोन फंक्शन्स आहेत.
04:59 ही पब्लिक फंक्शन्स म्हणून घोषित केली आहेत.
05:02 input फंक्शनमधे विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि नाव घेऊ.
05:07 display फंक्शन मधे विद्यार्थ्याचा रोल नंबर आणि नाव दाखवू.
05:11 आपल्याकडे exam हा आणखी derived क्लास आहे.
05:15 त्याला student क्लासचे गुणधर्म वारशाने मिळालेले आहेत.
05:19 येथे दिसेल की exam आणि show हे दोन derived क्लास आहेत.
05:26 दोन्ही क्लासेसला "student" क्लासचा वारसा मिळाला आहे.
05:30 exam क्लासमधे "input_exam" आणि "total_marks" ही दोन पब्लिक फंक्शन्स घोषित केली आहेत.
05:38 येथे "input_exam" हे फंक्शन अॅक्सेस करणार आहोत.
05:41 हे sub1, sub2 आणि sub3 ह्या तीन विषयांचे मार्क्स घेईल.
05:46 आपल्याकडे "total_marks" फंक्शन आहे.
05:49 हे तिन्ही विषयांची बेरीज करून ती प्रिंट करेल.
05:53 हे main फंक्शन आहे.
05:56 ह्यामधे st, sw आणि em हे तीन क्लासेसचे ऑब्जेक्टस बनवू.
06:03 ह्या ऑब्जेक्टद्वारे वरील सर्व फंक्शन्स कॉल करणार आहोत.

sw.input();

em.input_exam();

sw.display();

em.total_marks();

06:15 हे रिटर्न स्टेटमेंट आहे.
06:17 प्रोग्रॅम कार्यान्वित करू.
06:19 टर्मिनलवर जाऊ.
06:21 प्रॉम्प्ट क्लियर करा.
06:24 कंपाईल करण्यासाठी, टाईप करा g++ space hierarchical dot cpp space hyphen o space hier
06:36 एंटर दाबा, टाईप करा ./hier
06:41 एंटर दाबा.
06:43 Enter Roll no.: 4 टाईप करू.
06:46 Enter Name: येथे Ashwini देऊ.
06:50 Enter marks of subject1
06:52 मी 87 देत आहे.
06:54 subject2 साठी 67 आणि subject3 साठी 97
07:00 आऊटपुट असे मिळेल.
07:02 Roll no is: 4
07:04 Name is: Ashwini आणि
07:06 Total is : 251 , आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:10 स्लाईडसवर जाऊ.
07:13 थोडक्यात, या पाठात शिकलो,
07:16 मल्टिपल इनहेरिटन्स,
07:18 हायरार्किकल इनहेरिटन्स.
07:20 असाईनमेंट म्हणून area आणि perimeter हे क्लास बनवा.
07:25 आयताचे क्षेत्रफळ आणि परिमिती काढा.
07:29 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:32 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:35 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:40 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:42 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:45 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:49 अधिक माहितीसाठी कृपया
07:51 contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा</nowiki>
07:56 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
08:01 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
08:07 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:11 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते . धन्यवाद.

Contributors and Content Editors

PoojaMoolya, Ranjana