Difference between revisions of "Inkscape/C2/Create-and-edit-multiple-objects/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
PoojaMoolya (Talk | contribs) |
|||
Line 13: | Line 13: | ||
|- | |- | ||
| 00:13 | | 00:13 | ||
− | | | + | |ऑब्जेक्टसची दुसरी प्रत आणि क्लोन बनवणे |
|- | |- | ||
| 00:16 | | 00:16 | ||
− | | | + | | अनेक ऑब्जेक्टसचा संच बनवणे आणि क्रम लावणे |
|- | |- | ||
| 00:19 | | 00:19 | ||
− | | | + | | Multiple selection आणि invert selection |
|- | |- | ||
| 00:22 | | 00:22 | ||
− | | | + | | '''Clipping''' आणि '''Masking'''. |
|- | |- | ||
Line 33: | Line 33: | ||
|- | |- | ||
| 00:31 | | 00:31 | ||
− | | | + | | इंकस्केप वर्जन 0.48.4 |
|- | |- | ||
Line 425: | Line 425: | ||
|- | |- | ||
| 09:56 | | 09:56 | ||
− | | थोडक्यात, | + | | थोडक्यात, आपण शिकलो: ऑब्जेक्टस कॉपी आणि पेस्ट करणे |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 10:02 | | 10:02 | ||
− | | | + | | ऑब्जेक्टची दुसरी प्रत आणि क्लोन बनवणे |
|- | |- | ||
| 10:05 | | 10:05 | ||
− | | | + | | अनेक ऑब्जेक्टसचा संच बनवणे आणि क्रम लावणे |
|- | |- | ||
| 10:08 | | 10:08 | ||
− | | | + | | '''Multiple selection''' आणि '''invert selection''' |
|- | |- | ||
| 10:10 | | 10:10 | ||
− | | | + | | '''Clipping''' आणि '''Masking'''. |
|- | |- |
Revision as of 10:15, 3 March 2017
Time | Narration |
00:01 | Inkscape वापरून “Create and edit multiple objects” वरील पाठात आपले स्वागत. |
00:08 | आपण शिकणार आहोत- * ऑब्जेक्टस कॉपी आणि पेस्ट करणे |
00:13 | ऑब्जेक्टसची दुसरी प्रत आणि क्लोन बनवणे |
00:16 | अनेक ऑब्जेक्टसचा संच बनवणे आणि क्रम लावणे |
00:19 | Multiple selection आणि invert selection |
00:22 | Clipping आणि Masking. |
00:25 | या पाठासाठी वापरणार आहोत- * उबंटु लिनक्स 12.04 OS |
00:31 | इंकस्केप वर्जन 0.48.4 |
00:35 | Dash home वर जाऊन Inkscape टाईप करा. |
00:39 | लोगोवर क्लिक करून इंकस्केप उघडता येते. |
00:42 | आपण बनवलेली 'Assignment_1.svg' ही फाईल उघडू. |
00:49 | ती डॉक्युमेंटस फोल्डरमधे सेव्ह केलेली आहे. |
00:52 | प्रथम ऑब्जेक्ट कॉपी आणि पेस्ट करण्याबद्दल जाणून घेऊ. |
00:56 | त्यासाठी प्रथम ऑब्जेक्ट सिलेक्ट करा. पंचकोनावर क्लिक करा. |
01:02 | कॉपी करण्यासाठी Ctrl + C दाबा. |
01:07 | ऑब्जेक्ट पेस्ट करण्यासाठी Ctrl + V दाबा. कॅनव्हासवर पंचकोनाची दुसरी प्रत दिसेल. |
01:17 | ऑब्जेक्टसच्या प्रती बनवण्यासाठी आणखी तीन पध्दती आहेत. |
01:21 | या तिन्ही पध्दतींमधे मूळ ऑब्जेक्टवरच त्याची प्रत तंतोतंत तयार होते. |
01:29 | पहिली पध्दत आहे Paste Special. |
01:32 | आपण Ctrl + C द्वारे ऑब्जेक्ट आधीच कॉपी केले होते. |
01:38 | ऑब्जेक्ट जिथून कॉपी केले तिथेच पेस्ट करण्यासाठी Ctrl + Alt + V ही बटणे दाबा. |
01:47 | मूळ ऑब्जेक्ट बघण्यासाठी त्यावरील ऑब्जेक्टची प्रत सरकवू. |
01:54 | ही दोन्ही ऑब्जेक्टस सरकवून बाजूला ठेवू. |
01:57 | Duplication ही दुसरी पध्दत आहे. ज्यामधे ऑब्जेक्टची कॉपी करणे आवश्यक नसते. |
02:05 | पंचकोन सिलेक्ट करून Ctrl + D दाबा. |
02:13 | पंचकोनाची दुसरी प्रत मूळ ऑब्जेक्टच्या वरच तंतोतंत तयार होईल. |
02:19 | खालील मूळ ऑब्जेक्ट दिसण्यासाठी त्याची दुसरी प्रत बाजूला सरकवू. |
02:25 | ऑब्जेक्टच्या बनवलेल्या प्रतीत केलेल्या बदलांचा परिणाम मूळ ऑब्जेक्टवर होत नाही. |
02:32 | याला हिरवा रंग देऊन आणि आकार छोटा करून तपासू. |
02:40 | तिसरी पध्दत आहे Cloning. |
02:44 | ellipse वर क्लिक करून क्लोन बनवण्यासाठी Alt + D दाबा. |
02:49 | मागीलप्रमाणेच क्लोन केलेले ऑब्जेक्ट मूळ ऑब्जेक्टच्या वर तयार होईल. |
02:55 | दिसण्यासाठी ते दुसरीकडे सरकवा. |
02:58 | क्लोन केलेले ऑब्जेक्ट नेहमीच मूळ ऑब्जेक्टला जोडलेले असते. |
03:04 | मूळ ऑब्जेक्टला पालक किंवा पेरेंट असे म्हणतात. |
03:08 | मूळ ऑब्जेक्ट मधे केलेला बदल म्हणजे आकार, रंग इत्यादी, क्लोन मधेही झालेला दिसेल. |
03:16 | मूळ ऑब्जेक्टचा रंग गुलाबी करून, तो फिरवून, त्याचा आकार कमी करून हे तपासून बघू शकता. |
03:30 | हेच बदल क्लोन केलेल्या ऑब्जेक्टवर आपोआप झालेले दिसतील. |
03:36 | क्लोन आणि मूळ ऑब्जेक्ट यांच्यातील हा जोड काढून टाकण्यासाठी प्रथम क्लोन सिलेक्ट करून Shift + Alt + D दाबा. |
03:44 | आता पुन्हा मूळ ऑब्जेक्ट सिलेक्ट करून त्याचा आकार बदला. |
03:50 | क्लोन केलेल्या ऑब्जेक्टमधे आता काही बदल होणार नाहीत. |
03:54 | कमांड बारमधे दाखवल्याप्रमाणे या सर्व प्रक्रियांसाठी शॉर्टकट आयकॉन उपलब्ध आहेत. |
04:01 | अनेक ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी Shift चे बटण दाबून हव्या असलेल्या ऑब्जेक्टसवर क्लिक करा. |
04:08 | मी प्रथम लंबगोल सिलेक्ट करत आहे. नंतर Shift दाबून दुसरे लंबगोल निवडत आहे. |
04:15 | दोन्ही ऑब्जेक्टस सिलेक्ट झाली आहेत. |
04:19 | Ctrl + G दाबून त्यांचा एक संच करू शकतो. |
04:24 | हे दोन्ही लंबगोल आता एकच ऑब्जेक्ट बनले आहे. |
04:28 | ते हलवून बघितल्यास दोन्ही ऑब्जेक्टस एकत्रित एकच ऑब्जेक्ट म्हणून हलतील. |
04:35 | या संचाचा आकार बदलून पहा. दोन्ही ऑब्जेक्टसचे आकार प्रमाणात बदललेले दिसतील. |
04:43 | त्यांचा रंग बदलून निळा करा. दोन्ही ऑब्जेक्टसचा रंग सारखाच झालेला दिसेल. |
04:53 | समजा संचातील केवळ एकाच ऑब्जेक्टच्या प्रॉपर्टीजमधे बदल करायचा असेल तर काय? |
05:01 | संचातील एक ऑब्जेक्ट सिलेक्ट करण्यासाठी Ctrl चे बटण दाबून ऑब्जेक्टवर क्लिक करा. |
05:08 | यामुळे संचाच्या आत शिरून एकेक ऑब्जेक्ट सिलेक्ट करू शकतो. |
05:13 | संचातून बाहेर पडण्यासाठी कॅनव्हासवर रिकाम्या भागात कुठेही क्लिक करा. |
05:18 | ऑब्जेक्टसचा संच काढण्यासाठी प्रथम group सिलेक्ट करून Ctrl + Shift + G ही बटणे दाबा किंवा Ctrl + U दाबा. |
05:28 | आता लंबगोलांचा संच काढून टाकला आहे. |
05:31 | कमांडबार वर या प्रक्रियांसाठीचे शॉर्टकट उपलब्ध आहेत. |
05:36 | कॅनव्हासवरील सर्व ऑब्जेक्टस सिलेक्ट करण्यासाठी Ctrl + A दाबा. |
05:42 | सर्व ऑब्जेक्टसची केलेली निवड रद्द करण्यासाठी कॅनव्हास वरील रिकाम्या भागात क्लिक करा. |
05:48 | एखादे विशिष्ट ऑब्जेक्ट सोडून इतर सर्व सिलेक्ट करायचे असल्यास Invert Selection पर्याय वापरू शकतो. |
05:55 | समजा बाणाव्यतिरिक्त सर्व ऑब्जेक्टस निवडायची आहेत. |
05:59 | प्रथम बाणावर क्लिक करा. नंतर Edit मेनूखालील Invert selection वर क्लिक करा. |
06:08 | कॅनव्हासवरील बाणाव्यतिरिक्त सर्व ऑब्जेक्टस निवडली जातील. |
06:16 | आता ऑब्जेक्टसचा क्रम कसा लावायचा हे पाहू. |
06:20 | मोठ्या पंचकोनावर छोटा पंचकोन ठेवू. |
06:25 | आता एक चांदणी काढून ती छोट्या पंचकोनावर ठेवा. |
06:36 | छोटा पंचकोन सिलेक्ट करा. Object मेनूखालील Raise वर क्लिक करा. |
06:42 | छोटा पंचकोन उचलला जाऊन तो चांदणीच्यावर ठेवला गेला आहे. |
06:47 | आता चांदणीवर क्लिक करा. Object मेनूखालील Lower वर क्लिक करा. |
06:53 | आता चांदणी खालच्या बाजूला गेली आहे. मोठा पंचकोन त्याच्यावरती ठेवला गेला आहे. |
07:00 | आता मोठ्या पंचकोनावर क्लिक करा. Object मेनूखालील Raise to top वर क्लिक करा. |
07:11 | पुन्हा Object मेनूखालील Lower to bottom वर क्लिक करून मोठा पंचकोन सगळ्यात मागे गेलेला दिसेल. |
07:20 | हे पर्याय Tool controls bar वर देखील उपलब्ध आहेत. |
07:25 | पुढे Clipping कसे करायचे ते पाहू. |
07:28 | क्लिपिंग वापरून तुम्ही गुंतागुंतीची ऑब्जेक्टस |
07:31 | दुस-या घटकाशी किंवा रचनेच्या आकाराशी |
07:35 | पटकन आणि सोप्या पध्दतीने जुळवून घेऊ शकता. |
07:39 | हे करून बघण्यासाठी मी image वापरणार आहे. नव्या इंकस्केप फाईलमधे ही इमेज आहे. |
07:45 | या इमेजवर लंबगोलाचा आकार काढा. |
07:49 | आता इमेज आणि लंबगोल सिलेक्ट करा. |
07:53 | Object मेनूखालील Clip वर क्लिक करून Set वर क्लिक करा. |
07:59 | आता इमेज लंबगोलाच्या आकारात कापली गेली आहे. |
08:04 | क्लिपिंगमधे क्लिप म्हणून वापरले गेलेले ऑब्जेक्ट दृश्य भागाचे क्षेत्र ठरवते. |
08:09 | क्लिप काढण्यासाठी Object मेनूखालील Clip वर क्लिक करा. नंतर Release वर क्लिक करा. |
08:17 | clip काढली गेली आहे. |
08:19 | Masking बद्दल जाणून घेऊ. |
08:22 | Masking हे Clipping सारखेच आहे. |
08:25 | मास्किंगमधे एका ऑब्जेक्टची पारदर्शकता किंवा फिकटपणा दुस-या ऑब्जेक्टची अपारदर्शकता ठरवतात. |
08:32 | Masking करण्यासाठी gradient टूल वापरून प्रथम लंबगोल अर्धपारदर्शक करून घेऊ. |
08:38 | आता लंबगोल सिलेक्ट करा. |
08:40 | Object मेनूखालील Fill and stroke वर क्लिक करा. |
08:44 | Radial gradient वर क्लिक करून नंतर Edit वर क्लिक करा. |
08:50 | पांढ-या रंगासाठी RGB स्लायडर्स सगळ्यात उजवीकडे सरकवा. |
09:00 | Stop च्या ड्रॉपडाऊनवर क्लिक करून दुसरा Stop पर्याय निवडा. |
09:05 | काळ्या रंगासाठी RGB स्लायडर्स सगळ्यात डावीकडे सरकवा आणि alpha व्हॅल्यू बदलून 255 करा. |
09:15 | त्यात आणखी एक रंग समाविष्ट करण्यासाठी Add stop वर क्लिक करा. |
09:20 | Node tool वर क्लिक करून डायमंड हँडल वरच्या बाजूला सरकवा. |
09:27 | आता image आणि ellipse सिलेक्ट करा. |
09:30 | Object मेनू खालील |
09:32 | Mask आणि नंतर Set वर क्लिक करा. |
09:36 | इमेजवर मास्क तयार झाला आहे. |
09:40 | लक्षात घ्या की इमेज, लंबगोल असलेल्या मास्किंग ऑब्जेक्टच्या ट्रान्सपरन्सी प्रॉपर्टीज घेत आहे. |
09:47 | मास्क काढून टाकण्यासाठी Object मेनूखालील, |
09:51 | Mask वर क्लिक करून नंतर Release वर क्लिक करा. |
09:54 | मास्क काढले गेले आहे. |
09:56 | थोडक्यात, आपण शिकलो: ऑब्जेक्टस कॉपी आणि पेस्ट करणे |
10:02 | ऑब्जेक्टची दुसरी प्रत आणि क्लोन बनवणे |
10:05 | अनेक ऑब्जेक्टसचा संच बनवणे आणि क्रम लावणे |
10:08 | Multiple selection आणि invert selection |
10:10 | Clipping आणि Masking. |
10:12 | या दोन असाईनमेंट करा. |
10:15 | ग्रे रंगाचा उभट लंबगोल आणि काळ्या रंगाचे वर्तुळ काढा. |
10:20 | लंबगोलाच्या वर मध्यात ते वर्तुळ ठेवा. |
10:23 | हे डोळ्यासारखे दिसले पाहिजे. |
10:25 | त्यांचा संच करा. |
10:27 | पुढे दुस-या डोळ्यासाठी क्लोन बनवा. |
10:31 | दोन्ही डोळे दिसण्यासाठी तो बाजूला सरकवा. |
10:35 | निळ्या रंगाचे वर्तुळ आणि लाल रंगाचा चौरस काढा. |
10:40 | चौरसाची दुसरी प्रत बनवून दोन्ही चौरस विरूध्द दिशेला तिरपे ठेवा. |
10:45 | दोन्ही चौरस सिलेक्ट करून एक ऑब्जेक्ट करण्यासाठी त्यांचा संच करा. |
10:50 | चौरसाच्या संचाच्या वरच्या बाजूला बरोबर मध्यात वर्तुळ ठेवा. |
10:54 | दोन्ही सिलेक्ट करून त्यांची क्लिप बनवा. ते बो (bow) सारखे दिसले पाहिजे. |
11:00 | असाईनमेंट पूर्ण झाल्यावर ती अशी दिसली पाहिजे. |
11:03 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11:12 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:21 | अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
11:23 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:31 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
11:35 | आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
11:38 | हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |