Difference between revisions of "LibreOffice-Suite-Writer-6.3/C2/Introduction-to-LibreOffice-Writer/Marathi"
(First Upload) |
|||
Line 7: | Line 7: | ||
|| 00:01 | || 00:01 | ||
|| स्पोकन ट्युटोरियलच्या '''Introduction to LibreOffice Writer''' या पाठात आपले स्वागत. | || स्पोकन ट्युटोरियलच्या '''Introduction to LibreOffice Writer''' या पाठात आपले स्वागत. | ||
− | |||
|- | |- | ||
Line 411: | Line 410: | ||
|| 09:32 | || 09:32 | ||
|| अशाप्रकारे '''dot doc''' आणि '''dot docx''' या एक्सटेन्शन्स असलेल्या | || अशाप्रकारे '''dot doc''' आणि '''dot docx''' या एक्सटेन्शन्स असलेल्या | ||
− | + | फाईल्स '''Writer''' मधे उघडू शकतो. | |
|- | |- | ||
|| 09:39 | || 09:39 | ||
Line 577: | Line 576: | ||
|| 13:04 | || 13:04 | ||
|| कृपया पाठाशी संबंध नसलेले आणि इतर सर्वसामान्य प्रश्न विचारू नये. | || कृपया पाठाशी संबंध नसलेले आणि इतर सर्वसामान्य प्रश्न विचारू नये. | ||
− | |||
त्यामुळे गोंधळ कमी होईल. | त्यामुळे गोंधळ कमी होईल. | ||
Line 595: | Line 593: | ||
|- | |- | ||
|| 13:28 | || 13:28 | ||
− | || ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज | + | || ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे. |
सहभागासाठी धन्यवाद. | सहभागासाठी धन्यवाद. | ||
− | |||
− | |||
|- | |- | ||
|} | |} |
Latest revision as of 12:47, 9 October 2020
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरियलच्या Introduction to LibreOffice Writer या पाठात आपले स्वागत. |
00:07 | या पाठात शिकणार आहोत: |
00:10 | LibreOffice Writer विषयी, |
00:13 | Writer मधील विविध toolbars |
00:16 | नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे |
00:20 | Writer मधील डॉक्युमेंट सेव्ह करून डॉक्युमेंट बंद करणे |
00:24 | ते MS Word डॉक्युमेंट म्हणून सेव्ह करणे |
00:27 | डॉक्युमेंट PDF म्हणून एक्सपोर्ट करणे. |
00:30 | LibreOffice Writer हा LibreOffice Suite मधील वर्ड प्रोसेसर घटक आहे. |
00:36 | रायटरचे साम्य Microsoft Office Suite मधील Microsoft Word शी आहे. |
00:41 | हे विनामूल्य व मुक्त सॉफ्टवेअर आहे. |
00:45 | त्याचे वितरण, वापर व त्यातील बदल निर्बंधांशिवाय करता येतो. |
00:51 | खालील कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टीम्सवर LibreOffice Writer कार्यान्वित होऊ शकते: |
00:57 | Microsoft Windows 8 किंवा त्यापुढील वर्जन्स |
01:01 | GNU/Linux ऑपरेटिंग सिस्टीम आणि |
01:04 | Mac OSX |
01:07 | या पाठासाठी मी Ubuntu Linux OS वर्जन 18.04 आणि
LibreOffice Suite वर्जन 6.3.5 वापरत आहे. |
01:19 | डिफॉल्ट रूपात, नवीनतम Ubuntu Linux OS मधे LibreOffice Suite आधीच इन्स्टॉल केलेले असते. |
01:26 | विशिष्ट वर्जन इन्स्टॉल करण्यासाठी या वेबसाईटवरील LibreOffice Installation या मालिकेचा संदर्भ घ्या. |
01:33 | LibreOffice Writer कसे उघडायचे ते जाणून घेऊ. |
01:37 | Ubuntu Linux ऑपरेटिंग सिस्टीममधे खालच्या डाव्या कोपऱ्यातील Show applications आयकॉनवर क्लिक करा. |
01:45 | सर्च बार मधे Writer असे टाईप करा. |
01:49 | दर्शवलेल्या सूचीमधील Libreoffice Writer च्या आयकॉनवर क्लिक करा. |
01:55 | विंडोज ऑपरेटिंग सिस्टीममधे खालच्या डाव्या कोपऱ्यातील Start Menu आयकॉन क्लिक करा. |
02:02 | सर्च बार मधे Writer असे टाईप करा. |
02:06 | दर्शवलेल्या सूचीमधील Libreoffice Writer च्या आयकॉनवर क्लिक करा. |
02:11 | हे मुख्य Writer विंडोमधे रिकामे डॉक्युमेंट उघडेल. |
02:16 | आता Writer विंडोच्या मुख्य घटकांबद्दल जाणून घेऊ. |
02:21 | Writer विंडोच्या वरील भागात विविध toolbars आहेत. |
02:25 | जसे की, Title bar, Menu bar, Standard toolbar आणि Formatting bar. |
02:32 | खालील भागात Search bar, Drawing toolbar आणि Status bar दिसेल. |
02:39 | इंटरफेसवरून आपण toolbars एनेबल किंवा डिसेबल करू शकतो. |
02:44 | त्यासाठी View मेनूमधे जाऊन Toolbars हा पर्याय निवडा. |
02:49 | त्याच्या सबमेनूमधे तुमच्या आवश्यकतेनुसार toolbars चेक किंवा अनचेक करा. |
02:56 | उजव्या बाजूला उभा scroll bar आणि sidebar दिसेल. |
03:01 | या सर्वांमधे नेहमी व जास्त वापरले जाणारे पर्याय आहेत. |
03:05 | या पाठांच्या मालिकेत पुढे याबद्दल जाणून घेऊ. |
03:09 | आता Writer मधे नवे डॉक्युमेंट कसे उघडायचे हे जाणून घेऊ. |
03:14 | Standard toolbar मधील New आयकॉनवर क्लिक करून नवे डॉक्युमेंट उघडू शकतो. |
03:20 | किंवा मेनूबार मधील File menu वर जा. |
03:25 | नंतर New या सबमेनूवर क्लिक करून Text Document पर्याय निवडा. |
03:32 | Untitled 2 हे नवे Writer डॉक्युमेंट उघडेल. |
03:37 | नवे उघडलेले Untitled 2 नावाचे डॉक्युमेंट वरील उजव्या कोपऱ्यातील X या आयकॉनवर क्लिक करून बंद करा. |
03:44 | आता Untitled 1 डॉक्युमेंटमधे काही टेक्स्ट टाईप करू. |
03:49 | “RESUME” हा शब्द टाईप करा. |
03:53 | एकदा डॉक्युमेंटमधे टाईप केले की त्याचा परत वापर करण्यासाठी ते सेव्ह करावे लागते. |
03:58 | फाईल सेव्ह करण्यासाठी Standard toolbar मधील Save आयकॉन क्लिक करा. |
04:03 | स्क्रीनवर एक डायलॉग बॉक्स उघडेल. |
04:06 | हे Name फिल्डमधे आपल्याला फाईलचे नाव भरण्यास सांगेल. |
04:11 | मी “Resume” हे फाईलचे नाव टाईप करत आहे. |
04:15 | फाईल सेव्ह करण्याची जागा म्हणून मी डावीकडील Desktop हा पर्याय निवडत आहे. |
04:21 | उजव्या कोपऱ्यात खाली File type हा ड्रॉप डाऊन दिसेल.
त्यावर क्लिक करा. |
04:29 | इथे file types किंवा file extensions ची यादी आहे जी वापरून फाईल सेव्ह करता येते. |
04:35 | LibreOffice Writer चा डिफॉल्ट file type हा ODF Text Document (.odt) आहे. |
04:42 | ODF म्हणजे Open Document Format जे ओपन स्टँडर्ड आहे. |
04:48 | भारत सरकारने e-Governance साठी स्वीकारलेल्या open standards मधे याचा स्वीकार केला आहे. |
04:55 | मी फाईल सेव्ह करण्यासाठी ODF Text Document पर्याय निवडत आहे. |
05:00 | हेच तुमच्या मशीनवर करा. |
05:02 | डायलॉग बॉक्सच्या उजव्या कोपऱ्यात वर Save बटण क्लिक करा. |
05:07 | हे तुम्हाला पुन्हा Writer विंडोवर घेऊन जाईल. |
05:12 | आता title bar मधे झालेल्या बदलाचे निरीक्षण करा.
पहिले नाव बदलून ते Resume.odt झाले आहे. |
05:18 | dot odt फॉरमॅटमधे सेव्ह करण्याव्यतिरिक्त आपण या फाईल्स dot doc आणि dot docx मधे देखील सेव्ह करू शकतो. |
05:28 | या फॉरमॅटसमधील फाईल्स नंतर MS Word या ऍप्लिकेशनमधे उघडता येऊ शकतात. |
05:34 | आता हीच फाईल docx फाईल म्हणून सेव्ह करू. |
05:39 | menu bar मधील File मेनूमधे जाऊन Save As पर्यायावर क्लिक करा. |
05:45 | Save As डायलॉग बॉक्समधे उजव्या कोपऱ्यात खाली File type ड्रॉपडाऊन क्लिक करा. |
05:51 | खाली स्क्रॉल करा आणि Word 2007 - 365 (.docx) पर्याय निवडा. |
05:59 | पुन्हा तिथेच ही फाईल सेव्ह करा. |
06:03 | डायलॉग बॉक्सच्या उजव्या कोपऱ्यात वर Save बटणावर क्लिक करा. |
06:08 | इतर फाईल फॉरमॅटमधे फाईल सेव्ह केल्यास, Confirm File Format हा डायलॉग बॉक्स उघडेल. |
06:15 | “Ask when not saving in ODF or default format” हा पर्याय निवडा. |
06:21 | नंतर Use Word 2007 - 365 Format बटण क्लिक करा. |
06:28 | हे पुन्हा Writer च्या विंडोवर घेऊन जाईल. |
06:32 | आता title bar मधील बदलाकडे लक्ष द्या.
त्याचे नाव बदलून Resume.docx झाले आहे. |
06:38 | फाईल PDF फॉरमॅटमधे देखील एक्सपोर्ट करता येते. |
06:42 | Standard toolbar मधील Export Directly as PDF आयकॉनवर क्लिक करा. |
06:47 | फाईलचे नाव टाईप करा, फाईल सेव्ह करण्यासाठी जागा निवडून उजव्या कोपऱ्यात वरच्या सेव्ह बटणावर क्लिक करा. |
06:53 | मी Cancel बटण क्लिक करत आहे. डॉक्युमेंट PDF फॉरमॅटमधे सेव्ह करण्याची दुसरी पध्दत दाखवत आहे. |
07:00 | menu bar वरील File मेनूवर क्लिक करून Export As हा सबमेनू सिलेक्ट करा.
नंतर Export as PDF पर्याय क्लिक करा. |
07:11 | PDF options हा डायलॉग बॉक्स उघडेल. |
07:15 | या डायलॉग बॉक्समधे PDF चे पर्याय हवे तसे बदलण्यासाठीची विविध सेटींग्ज दिसतील. |
07:21 | डिफॉल्ट रूपात असलेली सेटींग तशीच ठेवून खालील Export बटण क्लिक करा. |
07:27 | फाईलचे नाव टाईप करा. फाईल सेव्ह करण्याची जागा निवडून उजव्या कोपऱ्यातील वरचे सेव्ह बटण क्लिक करा. |
07:34 | तुम्ही निवडलेल्या जागी pdf फाईल तयार होईल. |
07:38 | बहुसंख्य प्रोग्रॅममध्ये वापरले जाणारे आणखी एक लोकप्रिय फाईल एक्सटेन्शन dot rtf म्हणजे 'Rich Text Format'. |
07:45 | आपण फाईल dot html फॉरमॅटमधे देखील सेव्ह करू शकतो जो एक वेब पेज फॉरमॅट आहे. |
07:53 | ही क्रिया आधी सांगितल्याप्रमाणेच करता येते. |
07:57 | File type च्या ड्रॉप डाऊनमधे खाली स्क्रॉल करून HTML Document (Writer)(.html) हा पर्याय निवडा. |
08:05 | हे डॉक्युमेंटला dot html हे एक्स्टेन्शन देईल. |
08:10 | ही फाईल पुन्हा तिथेच सेव्ह करा.
आता डायलॉग बॉक्सच्या उजव्या कोपऱ्यातील वरच्या Save बटणावर क्लिक करा. |
08:19 | Confirm File Format हा डायलॉग बॉक्स उघडेल. |
08:23 | “Ask when not saving in ODF or default format” हा पर्याय निवडा. |
08:29 | नंतर Use HTML Document (Writer) Format बटण क्लिक करा. |
08:35 | फाईल dot html या एक्स्टेन्शनने सेव्ह झालेली दिसेल. |
08:40 | आपले डॉक्युमेंट web page म्हणून दाखवायचे असल्यास या फॉरमॅटचा वापर केला जातो. |
08:45 | हे कोणत्याही web browser मधे उघडता येऊ शकते. |
08:48 | आता File menu वर क्लिक करून नंतर Close वर क्लिक करून डॉक्युमेंट बंद करू. |
08:53 | पुढे LibreOffice Writer मध्ये अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट कसे उघडायचे हे शिकणार आहोत.
Resume.odt हे डॉक्युमेंट उघडूया. |
09:03 | LibreOffice इंटरफेसच्या डावीकडील Open File मेनूवर क्लिक करा. |
09:09 | फाईल ब्राऊजर डायलॉग बॉक्स उघडेल.
आपण फाईल ज्या ठिकाणी सेव्ह केलेली आहे त्या फोल्डरवर जा. |
09:16 | आता दिसत असणाऱ्या फाईलच्या नावांच्या यादीतून Resume.odt ही फाईल निवडा. |
09:22 | नंतर उजव्या कोपऱ्यात वरती Open बटणावर क्लिक करा. |
09:27 | Writer विंडोमधे Resume.odt ही फाईल उघडेल. |
09:32 | अशाप्रकारे dot doc आणि dot docx या एक्सटेन्शन्स असलेल्या
फाईल्स Writer मधे उघडू शकतो. |
09:39 | आता फाईलमधे बदल कसे करायचे आणि ती फाईल आहे त्याच नावाने कशी सेव्ह करायची ते जाणून घेऊ. |
09:45 | त्यासाठी प्रथम RESUME हा शब्द सिलेक्ट करू. |
09:49 | त्यासाठी माऊसचे डावे बटण क्लिक करून ते टेक्स्टवर ड्रॅग करा.
अशाप्रकारे टेक्स्ट सिलेक्ट आणि हायलाईट होईल. |
09:59 | आता माऊसचे डावे बटण सोडून द्या.
टेक्स्ट हायलाईट झालेलेच राहिले पाहिजे. |
10:05 | आता Formatting bar वरील Bold या आयकॉनवर क्लिक करा.
त्यामुळे टेक्स्ट bold झालेले दिसेल. |
10:12 | पुढे RESUME हा शब्द पानाच्या मध्यभागी आणू. |
10:17 | आपण LibreOffice विंडोचा आकार बदललेला असल्यास काही icons कदाचित दिसणार नाहीत. |
10:23 | अशा वेळी toolbars च्या शेवटी डबल ऍरोच्या आयकॉनवर क्लिक करा. |
10:29 | Formatting bar मधील Align Center या आयकॉनवर क्लिक करा. |
10:34 | टेक्स्ट पानाच्या मध्यभागी आलेले दिसेल. |
10:38 | आता टेक्स्टचा font size वाढवूया. |
10:42 | त्यासाठी Formatting bar वरील 'Font Size' या फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करू. |
10:47 | ड्रॉप डाऊन मेनूतील '14' वर क्लिक करू या.
टेक्स्टचा font size 14 पर्यंत वाढलेला दिसेल. |
10:56 | आता वापरत असलेला Font बदलू. |
11:00 | Formatting bar मधील Font Name फिल्डच्या डाऊन ऍरोवर क्लिक करा. |
11:05 | ड्रॉप डाऊनमधून Undotum पर्याय निवडा.
टेक्स्टचे font name बदलून ते Undotum झालेले आहे. |
11:13 | आता केलेले बदल सेव्ह करू.
त्यासाठी Ctrl + S ही बटणे एकत्रितपणे दाबा. |
11:22 | फाईलमध्ये बदल केल्यानंतरही ती फाईल त्याच नावाने सेव्ह झालेली दिसेल. |
11:27 | आता डॉक्युमेंट बंद करू. |
11:29 | menu bar मधील File मेनूवर क्लिक करून नंतर Close वर क्लिक करा. |
11:35 | अशाप्रकारे आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात, |
11:41 | या पाठात आपण शिकलो, |
11:44 | LibreOffice Writer विषयी |
11:47 | विविध toolbars |
11:49 | नवीन डॉक्युमेंट आणि अस्तित्वात असलेले डॉक्युमेंट उघडणे |
11:53 | Writer मधील डॉक्युमेंट सेव्ह करून डॉक्युमेंट बंद करणे |
11:57 | ते MS Word डॉक्युमेंट म्हणून सेव्ह करणे |
12:00 | डॉक्युमेंट PDF म्हणून एक्सपोर्ट करणे. |
12:03 | असाईनमेंट म्हणून,
Writer मधे नवे डॉक्युमेंट उघडा. |
12:07 | ते practice.odt नावाने सेव्ह करा. |
12:11 | “This is my first assignment” हे टेक्स्ट टाईप करा. |
12:15 | टेक्स्टला अंडरलाईन करा. |
12:17 | Font size 16 पर्यंत वाढवा. फाईल सेव्ह करून बंद करा. |
12:23 | दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.
हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता. |
12:30 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम कार्यशाळा चालवते आणि विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा. |
12:39 | तुम्हाला या पाठासंदर्भात काही प्रश्न आहेत का?
कृपया या साईटला भेट द्या. |
12:44 | ज्या भागासंदर्भात प्रश्न विचारायचा आहे त्याच्या मिनिट आणि सेकंदांची नोंद करा.
प्रश्न थोडक्यात विचारा. |
12:51 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीममधील कोणीतरी उत्तर देईल. |
12:55 | प्रश्न विचारण्यासाठी आपल्याला या वेबसाइटवर नोंदणी करावी लागेल. |
12:59 | स्पोकन ट्युटोरियल फोरम हे या पाठाशी संबंधित विशिष्ट प्रश्नांसाठी आहे. |
13:04 | कृपया पाठाशी संबंध नसलेले आणि इतर सर्वसामान्य प्रश्न विचारू नये.
त्यामुळे गोंधळ कमी होईल. |
13:11 | असंबध्दता टाळल्यास सदर मजकूर शैक्षणिक साहित्य म्हणून वापरता येईल. |
13:16 | स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:21 | DesiCrew Solutions Pvt. Ltd. यांनी 2011 मधे या पाठासाठी मूळ योगदान दिले होते. |
13:28 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज अमित वेले यांचा आहे.
सहभागासाठी धन्यवाद. |