Difference between revisions of "Git/C2/Tagging-in-Git/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
 
Line 1: Line 1:
{| Border =1
+
{| border = 1
| <center>Time</center>
+
|'''Time'''
| <center>Narration</center>
+
|'''Narration'''
  
 
|-
 
|-
Line 13: Line 13:
 
|-
 
|-
 
| 00:12
 
| 00:12
| या पाठासाठी वापरणार आहोत:
+
| या पाठासाठी वापरणार आहोत:उबंटु लिनक्स 14.04, '''Git 2.3.2''' आणि '''gedit''' टेक्स्ट एडिटर तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
उबंटु लिनक्स 14.04, '''Git 2.3.2''' आणि '''gedit''' टेक्स्ट एडिटर तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
+
  
 
|-
 
|-

Latest revision as of 11:58, 17 April 2017

Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Tagging in Git वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत: टॅगिंग आणि टॅगिंग चे प्रकार.
00:12 या पाठासाठी वापरणार आहोत:उबंटु लिनक्स 14.04, Git 2.3.2 आणि gedit टेक्स्ट एडिटर तुम्ही तुमच्या पसंतीचा एडिटर देखील वापरू शकता.
00:28 या पाठासाठी - टर्मिनलवर वापरल्या जाणा-या लिनक्स कमांडसचे ज्ञान आवश्यक आहे. नसल्यास संबंधित लिनक्स वरील पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:41 टॅगिंग बद्दल जाणून घेऊ.
00:44 एखाद्या कमिटचा टप्पा महत्वाचा म्हणून चिन्हांकित करणे म्हणजे टॅगिंग.
00:49 पुढील संदर्भासाठी बुकमार्क केल्याप्रमाणे आपण कमिट टॅग करू शकतो.
00:54 सामान्यपणे हे म्हणजे प्रकल्पाचे प्रकाशन v1.0 आहे असे चिन्हांकित करण्यासारखे आहे.
01:02 दोन प्रकारचे टॅग्ज आहेत: Lightweight टॅग आणि Annotated टॅग
01:09 प्रथम lightweight टॅग कसा बनवायचा हे जाणून घेऊ.
01:15 आपण बनवलेल्या mywebpage Git रिपॉझिटरीमधे जाऊ.
01:21 टर्मिनलवर जाऊन टाईप करा: cd space mywebpage आणि एंटर दाबा.
01:30 मी येथे html फाईल्स वापरणार आहे.
01:34 तुम्ही तुमच्या पसंतीची फाईल वापरू शकता.
01:39 Git log तपासण्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
01:48 सध्या आपल्या रिपॉझिटरीमधे "Added colors, Added history.html" आणि "Initial commit" अशी तीन कमिटस आहेत.
01:59 आता “Added colors” या सर्वात शेवटच्या कमिटमधे lightweight टॅग बनवू.
02:05 आपण टॅग बनवतो तेव्हा डिफॉल्ट रूपात तो सर्वात शेवटच्या कमिटमधे बनतो.
02:12 टाईप करा:git space tag space v1.1 आणि एंटर दाबा.
02:20 येथे मी v1.1 असे टॅगचे नाव देत आहे. तुम्ही कोणतेही देऊ शकता.
02:29 टॅग बघण्यासाठी टाईप करा git space tag आणि एंटर दाबा.
02:35 आता आपल्या रिपॉझिटरीमधे केवळ एकच टॅग आहे.
02:39 पुढे आपण annotated टॅग बनवण्याबद्दल जाणून घेऊ.
02:44 त्यासाठी प्रथम mypage.html या फाईलमधे काही बदल करणार आहोत.
02:52 टाईप करा: gedit space mypage.html space ampersand आणि एंटर दाबा. फाईलमधे काही ओळी समाविष्ट करू.
03:04 नंतर फाईल सेव्ह करून बंद करा.
03:07 या टप्प्यावर आपले काम कमिट करू.
03:11 टाईप करा:git space commit space hyphen a m space डबल कोटसमधे “Added content in mypage.html” आणि एंटर दाबा.
03:25 हा टप्पा प्रोजेक्टसाठी अतिशय महत्वाचा आहे असे समजू.
03:31 त्यामुळे या कमिट पॉईंटवर टॅग बनवणे गरजेचे आहे.
03:35 येथे annotated टॅग बनवणार आहोत.
03:39 टाईप करा:git space tag space hyphen a space v1.2 space hyphen m space डबल कोटसमधे “My Version 1.2” आणि एंटर दाबा.
03:55 -m फ्लॅग वापरून तुम्ही कोणताही टॅग मेसेज देऊ शकता.
04:01 येथे tag मेसेज ऐच्छिक आहे.
04:05 टॅगची सूची बघण्यासाठी टाईप करा:git space tag आणि एंटर दाबा. आता आपल्याकडे दोन टॅग आहेत.
04:14 येथे v1.1 हा lightweight टॅग आहे तर v1.2 हा annotated टॅग आहे.
04:21 टॅगमधील फरक आपल्याला कसा ओळखता येईल?
04:24 git show कमांडच्या सहाय्याने दोन टॅगमधील फरक आपण पाहू शकतो.
04:31 टाईप करा:git space show space v1.1 आणि एंटर दाबा.
04:38 येथे lightweight tag v1.1 चा संपूर्ण तपशील पाहू शकता.
04:44 हे केवळ कमिटचा तपशील आणि फाईलमधील बदल दाखवते.
04:50 पुढे annotated tag v1.2 चा तपशील पाहू. त्यासाठी टाईप करा:git space show space v1.2 आणि एंटर दाबा.
05:03 येथे आपण पाहू शकतो: टॅगचे नाव, टॅगरचा तपशील, कमिट टॅग केल्याची तारीख, टॅग मेसेज, कमिटचा तपशील, फाईलमधील बदल.
05:17 सहका-यांसोबत काम करताना Annotated टॅगचा वापर करणे जास्त उपयोगी ठरेल.
05:23 जुन्या कमिटसमधे टॅग कसे चिन्हांकित करायचे हे जाणून घेऊ.
05:29 प्रथम Git लॉग तपासू. त्यासाठी टाईप करा git space log space hyphen hyphen oneline आणि एंटर दाबा.
05:39 उदाहरणादाखल मला “Added history.html” या दुस-या कमिटमधे टॅग समाविष्ट करायचा आहे.
05:47 टाईप करा: git space tag space hyphen a space v1.0 space. नंतर “Added history.html” space चा commit hash कॉपी करून पेस्ट करा. पुढे टाईप करा:hyphen m space डबल कोटसमधे “'My Version 1.0” आणि एंटर दाबा.
06:09 आता बनवलेला टॅग बघण्यासाठी टाईप करा git space tag आणि एंटर दाबा.
06:19 येथे बनवलेला tag v1.0 बघू शकतो.
06:24 पुढे आपण Git लॉगबरोबर टॅग्ज कसे बघायचे ते जाणून घेऊ.
06:29 टाईप करा:git space log space hyphen hyphen oneline space hyphen hyphen decorate आणि एंटर दाबा.
06:40 आपण टॅगच्या नावांसहित Git लॉग पाहू शकतो.
06:44 आता नको असलेले टॅग कसे डिलिट करायचे ते पाहू.
06:49 समजा आपल्याला tag v1.1 डिलिट करायचा आहे.
06:53 टाईप करा:git space tag space hyphen d space v1.1 आणि एंटर दाबा.
07:02 हे “Deleted tag v1.1” आणि commit hash असा मेसेज दाखवत आहे.
07:08 टॅग डिलिट झाला की नाही हे तपासून पाहू.
07:14 टाईप करा:git space tag आणि एंटर दाबा.
07:19 आपल्याला tag v1.1 दिसत नाही कारण तो यशस्वीरित्या डिलिट झाला आहे.
07:25 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
07:29 थोडक्यात, आपण या पाठात शिकलो: टॅगिंग आणि टॅगिंग चे प्रकार.
07:38 असाईनमेंट - lightweight टॅग आणि annotated टॅग बनवा आणि दोन्ही टॅग्ज मधला फरक समजून घ्या.
07:47 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवरील व्हिडिओ डाऊनलोड करून बघा. ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:56 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
08:03 अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.
08:08 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. या मिशनसंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
08:20 हे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, PoojaMoolya, Ranjana