Difference between revisions of "Health-and-Nutrition/C2/Kangaroo-Mother-Care/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with " {|border=1 | <center> '''Time''' </center> | <center> '''Narration''' </center> |- | 00:00 | नमस्कार मित्रानो, '''Kangaroo mot...") |
|||
(One intermediate revision by one other user not shown) | |||
Line 154: | Line 154: | ||
| 3:16 | | 3:16 | ||
| दररोज स्नान, | | दररोज स्नान, | ||
− | + | नखं कापणे, | |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 3:18 | | 3:18 | ||
Line 184: | Line 182: | ||
| 3:51 | | 3:51 | ||
| लक्षात ठेवा, | | लक्षात ठेवा, | ||
− | + | '''KMC''' देणाऱ्याने '''KMC''' रॅपभोवती पुढच्या बाजूने खुला असलेला गाऊन किंवा ब्लाउजचा वापर करावा. | |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 3:58 | | 3:58 | ||
Line 292: | Line 288: | ||
| 6:17 | | 6:17 | ||
| लक्षात ठेवा- | | लक्षात ठेवा- | ||
− | + | जसे आईला सोईस्कर होईल तसे तिने स्वत: कापड गुंडाळण्यास शिकले पाहिजे. | |
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 6:24 | | 6:24 | ||
Line 337: | Line 331: | ||
| 7:20 | | 7:20 | ||
| चालण्यास, | | चालण्यास, | ||
− | + | उभे राहण्यास,बसण्यास किंवा | |
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
− | + | ||
|- | |- | ||
| 7:23 | | 7:23 | ||
Line 460: | Line 449: | ||
| आता आपण '''Kangaroo mother care''' ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. | | आता आपण '''Kangaroo mother care''' ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. | ||
|- | |- | ||
− | | 9: | + | | 9:57 |
|आय आय टी बॉम्बेतर्फे मी रजनी सावंत आपला निरोप घेते. | |आय आय टी बॉम्बेतर्फे मी रजनी सावंत आपला निरोप घेते. | ||
सहभागासाठी धन्यवाद. | सहभागासाठी धन्यवाद. | ||
+ | |- | ||
|} | |} |
Latest revision as of 13:10, 14 August 2020
|
|
00:00 | नमस्कार मित्रानो, Kangaroo mother care वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे. |
00:05 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - |
0:08 | Kangaroo mother care काय आहे? |
0:10 | घटक, महत्त्व आणि |
0:13 | Kangaroo mother care ची प्रक्रिया |
0:17 | आधी Kangaroo mother care ची ओळख करून घेऊ. |
0:22 | नावाप्रमाणेच – |
0:24 | ह्यात बाळाची त्वचा आणि आईची त्वचा एकमेकांशी संपर्कात राहते. |
0:29 | आणि ते KMC या नावाने ओळखले जाते. |
0:32 | लक्षात ठेवा, मुलाचा जन्म झाल्यावर ताबडतोब KMC दिले गेले पाहिजे. |
0:39 | विशेषतः कमी वजन असणाऱ्या बाळांसाठी याचा सल्ला दिला जातो. |
0:44 | ज्यांचे वजन जन्माच्या वेळी २.५ किलोग्रॅमपेक्षा कमी आहे आणि |
0:48 | ज्यांना सतत देखरेखीची गरज नाही. |
0:52 | तरीदेखील, ह्याचा वापर सर्व सामान्य, निरोगी विकसित बाळांसाठीदेखील करता येऊ शकतो. |
0:59 | KMC मध्ये दोन मुख्य घटक असतात : |
1:03 | आईच्या त्वचेचा बाळाच्या त्वचेशी सतत आणि दीर्घकालीन संपर्क. |
1:09 | आणि फक्त स्तनपान |
1:13 | या घटकांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात. |
1:17 | प्रथम घटक आहे त्वचेचा त्वचेशी संपर्क. |
1:21 | हे लेट डाऊन रिफ्लेक्स (Let down reflex) सुधारते. |
1:24 | आणि शेवटी स्तनातील दुधाचे प्रमाण वाढवते. |
1:28 | लेट डाऊन रिफ्लेक्स (Let down reflex) ह्याच सीरिजच्या दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये समजावून सांगितले आहे. |
1:34 | दुसरा घटक म्हणजे फक्त स्तनपान करणे. |
1:38 | लक्षात घ्या की- |
1:40 | पहिल्या ६ महिन्यांसाठी बाळाला फक्त स्तनपान देण्याचा सल्ला दिला जातो. |
1:45 | पुढे, Kangaroo care चे महत्त्व जाणून घेऊ. |
1:50 | KMC दरम्यान त्वचेचा त्वचेशी दीर्घकाळ संपर्क असल्यामुळे बाळाच्या शरीराचे तापमान टिकवण्यास मदत होते. |
1:57 | आणि बाळाला जास्त सुरक्षित वाटते. |
2:01 | KMC– |
2:03 | सततचे होणारे संसर्ग आणि |
2:05 | बाळांमधील अँप्नियाचे प्रमाण कमी करते. |
2:09 | अँप्निया म्हणजे थांबून थांबून श्वास घेणे. |
2:13 | या व्यतिरिक्त- |
2:15 | KMC स्तनपानाची वारंवारिता आणि कालावधी सुधारते. |
2:20 | आणि हे आई आणि तिच्या बाळाच्या दरम्यान भावनात्मक संबंध मजबूत करते. |
2:28 | अन्य कोणत्याही पारंपरिक पद्धतींपेक्षा मुलांचे वजन वाढवण्यास मदतदेखील करते जसे- |
2:33 | बाळाला तेजस्वी उबीत ठेवणे. |
2:36 | जे बाळ आणि आईसाठी तणाव निर्माण करते. |
2:40 | KMCमुळे आईमध्ये समाधान आणि आत्मविश्वास वाढवतो - |
2:45 | कारण ती तिच्या बाळासाठी जास्तीचे प्रयत्न करते. |
2:49 | मजेशीर म्हणजे, मातेव्यतिरिक्त, |
2:54 | वडील किंवा |
2:49 | कुटुंबातील कोणतीही प्रौढ व्यक्तीदेखील KMC देऊ शकते. |
2:58 | आता आपण KMC देणाऱ्यांकडून अनुसरण करणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करू. |
3:04 | KMC देणारा निरोगी आणि कोणताही आजार नसलेला असावा. |
3:09 | त्याने किंवा तिने मूलभूत स्वच्छतेचे पालन करावे जसे- |
3:14 | हात धुणे, |
3:16 | दररोज स्नान,
नखं कापणे, |
3:18 | केस बांधणे |
3:20 | आणि स्वच्छ कपडे. |
3:22 | त्याने किंवा तिने कोणताही दागिना, घड्याळ आणि धागा घालू नये - |
3:26 | कारण ह्यामुळे स्वच्छता राखण्यास अडथळा येऊ शकतो. |
3:31 | आणि ह्यामुळे बाळाला इजा होऊ शकते. |
3:35 | आता, KMC दरम्यान KMC देणाऱ्याने कशा प्रकारचे कपडे घालावेत याविषयी चर्चा करू. |
3:42 | कपडे हलके आणि पुढच्या बाजूने खुले असावेत. |
3:46 | उदाहरणार्थ, साडी-ब्लाऊज किंवा पुढच्या बाजूने खुला गाऊन. |
3:51 | लक्षात ठेवा,
KMC देणाऱ्याने KMC रॅपभोवती पुढच्या बाजूने खुला असलेला गाऊन किंवा ब्लाउजचा वापर करावा. |
3:58 | कांगारू पिशव्या किंवा बाईंडर्स बाजारातूनदेखील खरेदी करता येतात. |
4:04 | KMC जास्त कालावधीसाठी द्यायचे असल्यास ते उपयुक्त आहे. |
4:09 | नाहीतर, KMC देणारा KMC साठी मऊ स्वच्छ सुती कपडादेखील वापरू शकतो. |
4:16 | तथापि, KMC दरम्यान बाळाने |
4:19 | टोपी आणि लंगोट घालावे. |
4:22 | KMC दरम्यान जर बाळाने शौच किंवा लघवी (शी-शू) केल्यास |
4:27 | त्याला पूर्णपणे स्वच्छ करून पुसले पाहिजे |
4:30 | पुढे, आपण Kangaroo care प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ. |
4:36 | प्रथम, आईने ताठ उभे राहावे. |
4:40 | मग, एकतर आरोग्य कर्मचारी किंवा कोणत्याही कुटुंबातील सदस्याने पायरीपायरीने पुढील गोष्टी केल्या पाहिजेत, |
4:48 | बाळाच्या बुडाला आणि डोक्याला आधार देऊन - |
4:51 | बाळाला आईच्या उघड्या स्तनांमध्ये सरळ उभे ठेवा. |
4:56 | मग, बाळाचे डोके एका बाजूला वळवा. |
5:00 | खात्री करा,
बाळाचे डोके किंचित मागे झुकवलेले असावे. |
5:04 | ह्यामुळे बाळाला श्वास घेण्यास नाक खुले राहील. |
5:08 | आणि बाळाची आईशी नजरानजर होईल. |
5:14 | मग बाळाचे ढुंगण किंचित बाहेरील बाजूस वळवा. |
5:18 | लक्षात ठेवा -
बाळाचे हात आईच्या स्तनाच्या वरच्या बाजूस ठेवा |
5:23 | पाय आईच्या स्तनाच्या खालच्या बाजूस आणि |
5:27 | आईच्या छातीवर बाळाचे पोट ठेवा. |
5:29 | कपड्याने गुंडाळण्याआधी |
5:32 | वातावरण थंड असेल तर बाळाला ब्लँकेटने झाका. |
5:36 | ते बाळ आणि आईला उबदार ठेवेल. |
5:39 | मग,
बाळाच्या सभोवती आणि आईच्या छाती व पोटावर कपडा गुंडाळा. |
5:45 | गुंडाळताना खात्री करून घ्या की |
5:47 | कपड्याचा मध्यभाग बाळावर आहे. |
5:50 | आणि कापडाची दोन्ही टोके |
5:53 | आईच्या काखेतून गेली पाहिजेत |
5:56 | आणि पाठीला तिरपी असली पाहिजेत. |
5:59 | त्यानंतर कापडाची टोके पुढे आणा. |
6:03 | ह्या कापडाच्या टोकांची एक सुरक्षित गाठ बाळाच्या बुडाशी बांधून निश्चिंत व्हा. |
6:09 | हे आरामदायक आहे आणि बाळाला आधार देण्यास मदत करते. |
6:14 | तसेच हे बाळाला घसरू देत नाही. |
6:17 | लक्षात ठेवा-
जसे आईला सोईस्कर होईल तसे तिने स्वत: कापड गुंडाळण्यास शिकले पाहिजे. |
6:24 | ह्याच मालिकेतील दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये KMC दरम्यान स्वतः कापड गुंडाळण्याची पद्धत स्पष्ट केली जाईल. |
6:32 | ही आईचा आत्मविश्वास वाढवेल आणि तिला स्वावलंबी बनवेल. |
6:37 | कापड वापरताना आईला अस्वस्थ वाटत असेल तर ती एक ताणणारा बॅंड वापरू शकते. |
6:43 | तो वापरण्यास सोपे आणि आरामदायक असतो. |
6:46 | ताणणारा बँड वापरत असताना- |
6:49 | डोक्याला आधार देण्यासाठी बँड चा काठ बाळाच्या कानावरून घ्या. |
6:54 | मग, बाळाला |
6:57 | मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी आणि |
6:59 | पूर्वी सांगितल्याप्रमाणे आईशी नजरानजर करण्यासाठी त्याचे डोके किंचित मागे करा. |
7:04 | गुंडाळलेले कापड किंवा ताणलेला बँड खूप घट्ट किंवा खूप सैल असू नये. |
7:11 | बाळाला मोकळेपणाने श्वास घेण्यास पुरेसा सोयीस्कर असावा. |
7:15 | लक्षात ठेवा, KMC देत असताना, आईने - |
7:20 | चालण्यास,
उभे राहण्यास,बसण्यास किंवा |
7:23 | विविध कामांमध्ये सामील होण्यास सक्षम असावे. |
7:26 | जर आईला हे खूप सोईस्कर असेल तर- |
7:29 | Kangaroo care दरम्यान ती मागे टेकून किंवा अर्धवट मागे टेकलेल्या स्थितीत झोपू शकते. |
7:35 | आता KMC दरम्यान बाळाला कसे दूध पाजावे याविषयी चर्चा करू. |
7:40 | एकतर आई बाळाला |
7:43 | गुंडाळलेले कापड हलकेसे सैल करून आणि |
7:46 | स्तनपानासाठी बाळाला योग्य स्थितीत ठेवून दूध पाजू शकते. |
7:50 | किंवा ती स्वत:चे स्तनातील दूध पिळून काढून |
7:54 | कप किंवा चमच्याने बाळाला पाजू शकते. |
7:57 | लक्षात ठेवा,
प्रत्येक दिवशी बाळाचे वजन २५ ते ३० ग्रॅमने वाढले पाहिजे. |
8:03 | एका महिन्यात बाळाचे अपेक्षित वजन ९०० ते १,००० ग्रॅमने वाढले गेले पाहिजे. |
8:10 | म्हणून, आई किंवा आरोग्य कर्मचाऱ्याने |
8:13 | नियमित तपासणी दरम्यान बाळाच्या वजनाचे निरीक्षण केले पाहिजे. |
8:17 | जर बाळाचे पुरेसे वजन वाढत नसेल तर- |
8:21 | आरोग्य कर्मचाऱ्याने आईच्या स्तनपान करण्याच्या पद्धतीचे परीक्षण केले पाहिजे किंवा |
8:25 | बाळ किती वेळा लघवी करते हे तपासावे |
8:28 | तसेच, स्तनावरील घट्ट पकडसंबंधी आईला मार्गदर्शन करा. |
8:32 | ह्याच मालिकेच्या दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये योग्य स्तनावरील घट्ट पकड स्पष्ट केली गेली आहे. |
8:39 | पुढे,
गुंडाळलेल्या कापडामधून बाळाला कसे काढायचे ते शिकू - |
8:44 | प्रथम, आईने ताठ बसावे. |
8:48 | मग, एक हाताने गाठ सोडण्यास सुरवात करावी आणि |
8:53 | दुसऱ्या हाताने गुंडाळलेल्या कपड्याच्या बाहेरील बाजूस बाळाच्या बुडाला आधार द्यावा. |
8:58 | त्यानंतर-
ज्या हाताने आधी गाठ सैल केली होती त्याच हाताने गुंडाळलेले कापड सैल करा. |
9:04 | मग-
बाळाच्या बुडाला आधार देत असलेल्या कपड्यात हात घाला आणि |
9:11 | बाळाच्या बुडाला आधार देण्यासाठी कपड्याच्या बाहेरून दुसरा हात वापरा. |
9:16 | मग, बाळाला वर उचलावे आणि गुंडाळलेल्या कपड्यातून मुक्त करा. |
9:21 | त्यानंतर, बाळाचे डोके अशा पद्धतीत धरून ठेवावे हे लक्षात ठेवा - |
9:26 | जेथे अंगठा एका कानामागे आणि |
9:28 | इतर बोटे दुसऱ्या कानामागे आहेत. |
9:30 | KMC दरम्यान- |
9:32 | आईने ताबडतोब डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्याचा सल्ला घ्यावा - |
9:37 | जर बाळ सावध आणि सक्रिय नसेल तर. |
9:41 | जर बाळ खूप वेगाने श्वास घेत असेल किंवा बाळाचा श्वास बराच वेळ थांबत असेल तर. |
9:46 | जर बाळाचे ओठ किंवा जीभ निळे पडले तर |
9:50 | आणि जर बाळाचे तळवे थंड पडले असतील तर. |
9:53 | आता आपण Kangaroo mother care ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
9:57 | आय आय टी बॉम्बेतर्फे मी रजनी सावंत आपला निरोप घेते.
सहभागासाठी धन्यवाद. |