Health-and-Nutrition/C2/Kangaroo-Mother-Care/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration


00:00 नमस्कार मित्रानो, Kangaroo mother care वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:05 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत -
0:08 Kangaroo mother care काय आहे?
0:10 घटक, महत्त्व आणि
0:13 Kangaroo mother care ची प्रक्रिया
0:17 आधी Kangaroo mother care ची ओळख करून घेऊ.
0:22 नावाप्रमाणेच –
0:24 ह्यात बाळाची त्वचा आणि आईची त्वचा एकमेकांशी संपर्कात राहते.
0:29 आणि ते KMC या नावाने ओळखले जाते.
0:32 लक्षात ठेवा, मुलाचा जन्म झाल्यावर ताबडतोब KMC दिले गेले पाहिजे.
0:39 विशेषतः कमी वजन असणाऱ्या बाळांसाठी याचा सल्ला दिला जातो.
0:44 ज्यांचे वजन जन्माच्या वेळी २.५ किलोग्रॅमपेक्षा कमी आहे आणि
0:48 ज्यांना सतत देखरेखीची गरज नाही.
0:52 तरीदेखील, ह्याचा वापर सर्व सामान्य, निरोगी विकसित बाळांसाठीदेखील करता येऊ शकतो.
0:59 KMC मध्ये दोन मुख्य घटक असतात :
1:03 आईच्या त्वचेचा बाळाच्या त्वचेशी सतत आणि दीर्घकालीन संपर्क.
1:09 आणि फक्त स्तनपान
1:13 या घटकांबद्दल अधिक माहिती जाणून घेऊयात.
1:17 प्रथम घटक आहे त्वचेचा त्वचेशी संपर्क.
1:21 हे लेट डाऊन रिफ्लेक्स (Let down reflex) सुधारते.
1:24 आणि शेवटी स्तनातील दुधाचे प्रमाण वाढवते.
1:28 लेट डाऊन रिफ्लेक्स (Let down reflex) ह्याच सीरिजच्या दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये समजावून सांगितले आहे.
1:34 दुसरा घटक म्हणजे फक्त स्तनपान करणे.
1:38 लक्षात घ्या की-
1:40 पहिल्या ६ महिन्यांसाठी बाळाला फक्त स्तनपान देण्याचा सल्ला दिला जातो.
1:45 पुढे, Kangaroo care चे महत्त्व जाणून घेऊ.
1:50 KMC दरम्यान त्वचेचा त्वचेशी दीर्घकाळ संपर्क असल्यामुळे बाळाच्या शरीराचे तापमान टिकवण्यास मदत होते.
1:57 आणि बाळाला जास्त सुरक्षित वाटते.
2:01 KMC
2:03 सततचे होणारे संसर्ग आणि
2:05 बाळांमधील अँप्नियाचे प्रमाण कमी करते.
2:09 अँप्निया म्हणजे थांबून थांबून श्वास घेणे.
2:13 या व्यतिरिक्त-
2:15 KMC स्तनपानाची वारंवारिता आणि कालावधी सुधारते.
2:20 आणि हे आई आणि तिच्या बाळाच्या दरम्यान भावनात्मक संबंध मजबूत करते.
2:28 अन्य कोणत्याही पारंपरिक पद्धतींपेक्षा मुलांचे वजन वाढवण्यास मदतदेखील करते जसे-
2:33 बाळाला तेजस्वी उबीत ठेवणे.
2:36 जे बाळ आणि आईसाठी तणाव निर्माण करते.
2:40 KMCमुळे आईमध्ये समाधान आणि आत्मविश्वास वाढवतो -
2:45 कारण ती तिच्या बाळासाठी जास्तीचे प्रयत्न करते.
2:49 मजेशीर म्हणजे, मातेव्यतिरिक्त,
2:54 वडील किंवा
2:49 कुटुंबातील कोणतीही प्रौढ व्यक्तीदेखील KMC देऊ शकते.
2:58 आता आपण KMC देणाऱ्यांकडून अनुसरण करणाऱ्या मुद्द्यांवर चर्चा करू.
3:04 KMC देणारा निरोगी आणि कोणताही आजार नसलेला असावा.
3:09 त्याने किंवा तिने मूलभूत स्वच्छतेचे पालन करावे जसे-
3:14 हात धुणे,
3:16 दररोज स्नान,

नखं कापणे,

3:18 केस बांधणे
3:20 आणि स्वच्छ कपडे.
3:22 त्याने किंवा तिने कोणताही दागिना, घड्याळ आणि धागा घालू नये -
3:26 कारण ह्यामुळे स्वच्छता राखण्यास अडथळा येऊ शकतो.
3:31 आणि ह्यामुळे बाळाला इजा होऊ शकते.
3:35 आता, KMC दरम्यान KMC देणाऱ्याने कशा प्रकारचे कपडे घालावेत याविषयी चर्चा करू.
3:42 कपडे हलके आणि पुढच्या बाजूने खुले असावेत.
3:46 उदाहरणार्थ, साडी-ब्लाऊज किंवा पुढच्या बाजूने खुला गाऊन.
3:51 लक्षात ठेवा,

KMC देणाऱ्याने KMC रॅपभोवती पुढच्या बाजूने खुला असलेला गाऊन किंवा ब्लाउजचा वापर करावा.

3:58 कांगारू पिशव्या किंवा बाईंडर्स बाजारातूनदेखील खरेदी करता येतात.
4:04 KMC जास्त कालावधीसाठी द्यायचे असल्यास ते उपयुक्त आहे.
4:09 नाहीतर, KMC देणारा KMC साठी मऊ स्वच्छ सुती कपडादेखील वापरू शकतो.
4:16 तथापि, KMC दरम्यान बाळाने
4:19 टोपी आणि लंगोट घालावे.
4:22 KMC दरम्यान जर बाळाने शौच किंवा लघवी (शी-शू) केल्यास
4:27 त्याला पूर्णपणे स्वच्छ करून पुसले पाहिजे
4:30 पुढे, आपण Kangaroo care प्रक्रियेबद्दल जाणून घेऊ.
4:36 प्रथम, आईने ताठ उभे राहावे.
4:40 मग, एकतर आरोग्य कर्मचारी किंवा कोणत्याही कुटुंबातील सदस्याने पायरीपायरीने पुढील गोष्टी केल्या पाहिजेत,
4:48 बाळाच्या बुडाला आणि डोक्याला आधार देऊन -
4:51 बाळाला आईच्या उघड्या स्तनांमध्ये सरळ उभे ठेवा.
4:56 मग, बाळाचे डोके एका बाजूला वळवा.
5:00 खात्री करा,

बाळाचे डोके किंचित मागे झुकवलेले असावे.

5:04 ह्यामुळे बाळाला श्वास घेण्यास नाक खुले राहील.
5:08 आणि बाळाची आईशी नजरानजर होईल.
5:14 मग बाळाचे ढुंगण किंचित बाहेरील बाजूस वळवा.
5:18 लक्षात ठेवा -

बाळाचे हात आईच्या स्तनाच्या वरच्या बाजूस ठेवा

5:23 पाय आईच्या स्तनाच्या खालच्या बाजूस आणि
5:27 आईच्या छातीवर बाळाचे पोट ठेवा.
5:29 कपड्याने गुंडाळण्याआधी
5:32 वातावरण थंड असेल तर बाळाला ब्लँकेटने झाका.
5:36 ते बाळ आणि आईला उबदार ठेवेल.
5:39 मग,

बाळाच्या सभोवती आणि आईच्या छाती व पोटावर कपडा गुंडाळा.

5:45 गुंडाळताना खात्री करून घ्या की
5:47 कपड्याचा मध्यभाग बाळावर आहे.
5:50 आणि कापडाची दोन्ही टोके
5:53 आईच्या काखेतून गेली पाहिजेत
5:56 आणि पाठीला तिरपी असली पाहिजेत.
5:59 त्यानंतर कापडाची टोके पुढे आणा.
6:03 ह्या कापडाच्या टोकांची एक सुरक्षित गाठ बाळाच्या बुडाशी बांधून निश्चिंत व्हा.
6:09 हे आरामदायक आहे आणि बाळाला आधार देण्यास मदत करते.
6:14 तसेच हे बाळाला घसरू देत नाही.
6:17 लक्षात ठेवा-

जसे आईला सोईस्कर होईल तसे तिने स्वत: कापड गुंडाळण्यास शिकले पाहिजे.

6:24 ह्याच मालिकेतील दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये KMC दरम्यान स्वतः कापड गुंडाळण्याची पद्धत स्पष्ट केली जाईल.
6:32 ही आईचा आत्मविश्वास वाढवेल आणि तिला स्वावलंबी बनवेल.
6:37 कापड वापरताना आईला अस्वस्थ वाटत असेल तर ती एक ताणणारा बॅंड वापरू शकते.
6:43 तो वापरण्यास सोपे आणि आरामदायक असतो.
6:46 ताणणारा बँड वापरत असताना-
6:49 डोक्याला आधार देण्यासाठी बँड चा काठ बाळाच्या कानावरून घ्या.
6:54 मग, बाळाला
6:57 मोकळेपणाने श्वास घेण्यासाठी आणि
6:59 पूर्वी सांगितल्याप्रमाणे आईशी नजरानजर करण्यासाठी त्याचे डोके किंचित मागे करा.
7:04 गुंडाळलेले कापड किंवा ताणलेला बँड खूप घट्ट किंवा खूप सैल असू नये.
7:11 बाळाला मोकळेपणाने श्वास घेण्यास पुरेसा सोयीस्कर असावा.
7:15 लक्षात ठेवा, KMC देत असताना, आईने -
7:20 चालण्यास,

उभे राहण्यास,बसण्यास किंवा

7:23 विविध कामांमध्ये सामील होण्यास सक्षम असावे.
7:26 जर आईला हे खूप सोईस्कर असेल तर-
7:29 Kangaroo care दरम्यान ती मागे टेकून किंवा अर्धवट मागे टेकलेल्या स्थितीत झोपू शकते.
7:35 आता KMC दरम्यान बाळाला कसे दूध पाजावे याविषयी चर्चा करू.
7:40 एकतर आई बाळाला
7:43 गुंडाळलेले कापड हलकेसे सैल करून आणि
7:46 स्तनपानासाठी बाळाला योग्य स्थितीत ठेवून दूध पाजू शकते.
7:50 किंवा ती स्वत:चे स्तनातील दूध पिळून काढून
7:54 कप किंवा चमच्याने बाळाला पाजू शकते.
7:57 लक्षात ठेवा,

प्रत्येक दिवशी बाळाचे वजन २५ ते ३० ग्रॅमने वाढले पाहिजे.

8:03 एका महिन्यात बाळाचे अपेक्षित वजन ९०० ते १,००० ग्रॅमने वाढले गेले पाहिजे.
8:10 म्हणून, आई किंवा आरोग्य कर्मचाऱ्याने
8:13 नियमित तपासणी दरम्यान बाळाच्या वजनाचे निरीक्षण केले पाहिजे.
8:17 जर बाळाचे पुरेसे वजन वाढत नसेल तर-
8:21 आरोग्य कर्मचाऱ्याने आईच्या स्तनपान करण्याच्या पद्धतीचे परीक्षण केले पाहिजे किंवा
8:25 बाळ किती वेळा लघवी करते हे तपासावे
8:28 तसेच, स्तनावरील घट्ट पकडसंबंधी आईला मार्गदर्शन करा.
8:32 ह्याच मालिकेच्या दुसऱ्या ट्युटोरिअलमध्ये योग्य स्तनावरील घट्ट पकड स्पष्ट केली गेली आहे.
8:39 पुढे,

गुंडाळलेल्या कापडामधून बाळाला कसे काढायचे ते शिकू -

8:44 प्रथम, आईने ताठ बसावे.
8:48 मग, एक हाताने गाठ सोडण्यास सुरवात करावी आणि
8:53 दुसऱ्या हाताने गुंडाळलेल्या कपड्याच्या बाहेरील बाजूस बाळाच्या बुडाला आधार द्यावा.
8:58 त्यानंतर-

ज्या हाताने आधी गाठ सैल केली होती त्याच हाताने गुंडाळलेले कापड सैल करा.

9:04 मग-

बाळाच्या बुडाला आधार देत असलेल्या कपड्यात हात घाला आणि

9:11 बाळाच्या बुडाला आधार देण्यासाठी कपड्याच्या बाहेरून दुसरा हात वापरा.
9:16 मग, बाळाला वर उचलावे आणि गुंडाळलेल्या कपड्यातून मुक्त करा.
9:21 त्यानंतर, बाळाचे डोके अशा पद्धतीत धरून ठेवावे हे लक्षात ठेवा -
9:26 जेथे अंगठा एका कानामागे आणि
9:28 इतर बोटे दुसऱ्या कानामागे आहेत.
9:30 KMC दरम्यान-
9:32 आईने ताबडतोब डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्याचा सल्ला घ्यावा -
9:37 जर बाळ सावध आणि सक्रिय नसेल तर.
9:41 जर बाळ खूप वेगाने श्वास घेत असेल किंवा बाळाचा श्वास बराच वेळ थांबत असेल तर.
9:46 जर बाळाचे ओठ किंवा जीभ निळे पडले तर
9:50 आणि जर बाळाचे तळवे थंड पडले असतील तर.
9:53 आता आपण Kangaroo mother care ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
9:57 आय आय टी बॉम्बेतर्फे मी रजनी सावंत आपला निरोप घेते.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Debosmita, Rajani st