Difference between revisions of "Health-and-Nutrition/C2/How-to-bathe-a-newborn/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
(Created page with "border=1 | <center>Time</center> |<center>Narration</center> |- | 00:00 | नवजात बाळाला आंघोळ कशी घालावी ह्यावर...")
 
Line 1: Line 1:
border=1
+
{|border=1
 
| <center>Time</center>
 
| <center>Time</center>
 
|<center>Narration</center>
 
|<center>Narration</center>

Revision as of 16:46, 30 January 2020

Time
Narration
00:00 नवजात बाळाला आंघोळ कशी घालावी ह्यावरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:06 ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकणार आहोत - आंघोळीच्या आधी आणि अंघोळ घालताना आई किंवा काळजी घेणाऱ्यांसाठी सुरक्षित टिपा, जसे
00:15 बाळाला पहिल्यांदा अंघोळ केव्हा घालावी, ओल्या कपड्याने त्याचे शरीर कसे पुसावे,
00:20 नियमित अंघोळ, पारंपारिक अंघोळ,
00:23 डोंगराळ भागात किंवा थंड प्रदेशातील बाळांना अंघोळ घालणे आणि क्रॅडल कॅप.
00:32 सर्व नवीन पालक नवजात बाळाला कशी अंघोळ घालावी ह्याबद्दल उत्सुक असतात.
00:37 बाळाला अंघोळ घालताना खूप काळजी घेणे गरजेचे आहे.
00:42 एक चुकीचे पाऊल नवजात बाळास खूप नुकसान पोहोचवू शकतो.
00:46 बाळाला अंघोळ घालण्यापूर्वी सुरक्षितेच्या कोणत्या सूचना पाळाव्यात हे जाणून घेणे आवश्यक आहे -
00:54 आईने किंवा कुटुंबातील सदस्याने बाळाला हात लावण्याआधी नेहमी बोटांची नखे कापावीत.
01:02 कोणत्याही अंगठ्या, बांगड्या किंवा घड्याळे घालू नयेत.
01:07 ह्यामुळे बाळाला इजा होणार नाही.
01:11 तर, बाळाला पहिल्यांदा अंघोळ केव्हा घालावी?
01:16 प्रसूतीच्या 48 तासांनंतर आई बाळाला ओल्या कपड्याने पुसू शकते.
01:22 लक्षात ठेवा, जोवर गर्भनाळ गळून पडत नाही तोवर बाळाला केवळ ओल्या कपड्याने पुसावे.
01:29 एकदा गर्भनाळ गळून पडली की आई किंवा कुटुंबाचा सदस्य बाळाला नियमितपणे अंघोळ घालू शकतो.
01:38 तथापि, जर बाळाचे वजन कमी असेल तर अशा बाळाचे वजन 2 किलोपर्यंत वाढेपर्यंत बाळाला ओल्या कपड्याने पुसावे.
01:49 ओल्या कपड्याने कसे पुसावे ते पाहू.
01:53 सुरू करण्यापूर्वी, खिडक्या बंद करून खोली पुरेशी उबदार आहे ह्याची खात्री करून घ्या.
02:00 एक मऊ, स्वच्छ, लहान कापड तयार ठेवा.
02:07 बाळाला सुरक्षित, सपाट जागी ठेवावे.
02:12 जमीन ही अतिशय सुरक्षित जागा असते.
02:15 बाळाला कधीही उंच जागेवर ठेवू नका.
02:19 अंघोळीसाठी पाण्याचे तापमान 37 डिग्री सेल्सिअसपेक्षा जास्त नसावे.
02:26 आईने कोपर किंवा मनगटाने पाण्याचे तपमान तपासावे.
02:32 अंघोळ घालताना, प्रथम स्वच्छतेसाठी साबणाचे पाणी वापरा.
02:37 साबणाचे पाणी बनविण्यासाठी नेहमीच सौम्य, रंगहीन आणि गंधरहित साबण किंवा खास बाळासाठी असलेले साबण वापरावे.
02:45 नंतर साबण धुवून टाकण्यासाठी स्वच्छ पाणी वापरा.
02:50 लहान, मऊ कापड पाण्यात बुडवून पिळून घ्या.
02:56 आता बाळाचे डोळे आतील कोपरापासून बाहेरील काठापर्यंत पुसा.
03:02 त्याच कपड्याने शरीराचे इतर अंग पुसू नका.
03:06 एका वेगळ्या नवीन आणि मऊ कपड्याने शरीराचे इतर अंग स्वच्छ करा.
03:12 तसेच सुकरत्या पडणारे अंग जसे – काख, कानामागे
03:18 मानेभोवती, बोटे आणि अंगठ्यांच्या मध्ये आणि जननेंद्रियाच्या भागात पुसण्यास विसरू नका.
03:25 आपण ओल्या कपड्याने अंग पुसणे म्हणजे काय ह्याबद्दल चर्चा केली, तर आता आपण नियमित आंघोळीबद्दल जाणून घेऊ.
03:31 कृपया लक्षात ठेवा; गर्भनाळ गळून पडल्यानंतर सर्व निरोगी बाळांना रोज अंघोळ घालावी.
03:39 रोज अंघोळ घालताना, जर तुम्ही मोठा टब वापरत असाल तर - प्रथम टब 2 इंचापर्यंत साबणाच्या पाण्याने भरा.
03:48 साबणाचे पाणी बनवण्यासाठी आधी सांगितल्याप्रमाणे, नेहमीच सौम्य, रंगहीन आणि गंधरहित साबण किंवा खास बाळासाठी असलेला साबण वापरा.
03:58 आणखी एक टब तयार ठेवा ज्यात ताजे पाणी असेल.
04:03 त्यानंतर, दोन्ही टबांमध्ये आपल्या कोपराने पाण्याचे तपमान तपासा.
04:09 पाण्याचे तपमान योग्य वाटल्यावर, बाळाला काळजीपूर्वक साबणाचे पाणी असलेल्या टबमध्ये ठेवा, डोक्याला नेहमी आधार राहिल ह्याची काळजी घ्या.
04:22 बाळ जेव्हा टबमध्ये असेल तेव्हा जास्तीचे पाणी घालू नका.
04:27 प्रथम, गंधहीन आणि रंगहीन असे खास बाळांचे शैम्पू किंवा साबण वापरून बाळाचे डोके धुवून घ्या.
04:35 नंतर ताज्या पाण्याने साबण हळूवारपणे धुवा.
04:39 पुढे, शरीरातील घड्या पडणारे अंग आणि गुप्तांगासह बाकीचे शरीर स्वच्छ करा जिथे सर्वात जास्त मळ असतो.
04:47 शेवटी, बाकीचे शरीर ताज्या पाण्याने हळूवारपणे धुवा.
04:53 दुसरीकडे - जर आईला किंवा काळजी घेणाऱ्यास बाळाला पारंपारिक भारतीय पद्धतीने अंघोळ घालायचे असेल तर आपले पाय एकमेकांना समांतर पसरवून जमिनीवर बसा.
05:06 मग, बाळाला आपल्या पायावर ठेवा.
05:09 बाळाचे डोके आईच्या किंवा काळजी घेणाऱ्याच्या पायाजवळ असावे.
05:14 बाळाचे पाय आई किंवा काळजी घेणाऱ्याच्या पोटाजवळ असावेत.
05:20 आता बाळ आंघोळ करण्यासाठी योग्य स्थितीत आहे.
05:24 आंघोळ झाल्यावर ताबडतोब बाळाला मुलायम आणि स्वच्छ टॉवेलने पुसा.
05:30 आधी सांगितल्याप्रमाणे, घड्या पडणारे भाग पुसा.
05:35 पावडर किंवा बेबी पावडर वापरू नका.
05:40 बेबी पावडरमुळे नवजात बाळांना श्वास घेण्यास त्रास होऊ शकतो.
05:45 डोळ्यात सुरमा किंवा काजळ कधीही घालू नका.
05:49 सुरमा किंवा काजळामुळे नवजात बाळांना विषबाधा होऊ शकते आणि संसर्ग होऊ शकतो.
05:56 विशेष म्हणजे, डोंगराळ भागात किंवा थंड प्रदेशात राहणाऱ्या बाळांसाठी विशेष काळजी घेणे आवश्यक आहे.
06:04 अशा ठिकाणी असलेल्या बाळांसाठी, गर्भनाळ गळून पडल्यावर दररोज ओल्या कपड्याने पुसावे.
06:11 तथापि, बाळाला कोरडे केल्यानंतर ताबडतोब आई किंवा काळजी घेणाऱ्याने बाळाला त्वचेच्या संपर्कात त्वचा दिली पाहिजे.
06:20 यामुळे बाळांच्या शरीराचे तापमान कमी होण्याचा धोका कमी होईल.
06:25 कृपया लक्षात घ्या की आठवड्यातून दोनदा केस धुवावे.
06:30 दररोज केस धुवू नका कारण यामुळे टाळू कोरडी पडेल.
06:35 असेही होऊ शकते की नवजात बाळाच्या टाळूवर खपल्या किंवा खवले येतील. ह्याला क्रॅडल कॅप म्हणतात.
06:45 ह्या खवल्यांभोवती काही लालसरपणा असू शकतो.
06:50 लक्षात घ्या की क्रॅडल कॅपबद्दल काळजी करू नये.
06:54 हे स्वतःच निघून जाईल आणि उपचार करण्याची गरज नाही.
06:59 बाळासाठीचे विशेष तेल ह्या खवली मऊ कमी करण्यास मदत करते.
07:04 तेल लावताना, खवल्यांवर फक्त थोडे तेल पुसून घ्या.
07:09 जास्त तेलामुळे स्थिती बिघडू शकते.
07:12 मग, एक किंवा दोन तासांत डोळ्यांना झोंबणार नाही अश्या सौम्य शैम्पूने बाळाचे केस धुवा.
07:20 त्यानंतर, खवले अधिक वाढू नये म्हणून एका तासानंतर हळुवारपणे कंगव्याने ते झाडून घ्या.
07:27 खवले कधीही खेचू नका त्यामुळे टाळूला इजा होऊ शकते किंवा संसर्ग होऊ शकतो.
07:33 नवजात बाळाला अंघोळ कशी घालावी ह्यावरील स्पोकन ट्युटोरिअलच्या समाप्तीकडे आपण आलो आहोत.

हे स्क्रिप्ट लता पोपळे ह्यांनी अनुवाद केले असून ह्यासाठी आवाज क्राईस्ट ग्लोरी सर्व्हिसेस ह्यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Debosmita, Latapopale, Sakinashaikh