Difference between revisions of "Linux-AWK/C2/Built-in-Functions-in-awk/Marathi"
(Created page with "{| border=1 | <center>'''Time'''</center> | <center>'''Narration'''</center> |- | 00:01 | नमस्कार '''awk''' मध्ये ''' built-in functions''' वर...") |
|||
Line 274: | Line 274: | ||
| 07:21 | | 07:21 | ||
| टाइपिंग मध्ये चूक झाल्यामुळे, रोल नंबरमध्ये अंकांची चुकीची संख्या असू शकते. | | टाइपिंग मध्ये चूक झाल्यामुळे, रोल नंबरमध्ये अंकांची चुकीची संख्या असू शकते. | ||
− | + | '''awk commands''' वापरून आपण हे सहज ओळखू शकतो. | |
|- | |- |
Latest revision as of 23:43, 19 February 2019
|
|
00:01 | नमस्कार awk मध्ये built-in functions वरील या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरिअलमध्ये आपण विविध प्रकारच्या built-in functions बद्दल जाणून घेऊ, जसे-
Arithmetic functions |
00:15 | String functions |
00:17 | Input/Output functions आणि Time-stamp functions |
00:23 | आपण हे काही उदाहरणांद्वारे करू. |
00:26 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे Ubuntu Linux 16.04 Operating System आणि gedit text editor 3.20.1 |
00:38 | तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता. |
00:42 | या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुम्ही आपल्या वेबसाईटवरील पूर्वीचे awk ट्युटोरिअल्स पहा. |
00:49 | तुम्हाला C किंवा C++ सारखे कोणत्याही सामान्य प्रोग्रामिंग लँग्वेजचे काही मूलभूत ज्ञान असावे . |
00:56 | नसल्यास, कृपया आपल्या वेबसाईटवरील संबंधित ट्युटोरिअल्स पहा. |
01:02 | या ट्युटोरियलमध्ये वापरल्या गेलेल्या फाईल्स या ट्यूटोरियल पेजवरील Code Files लिंकमध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट करा. |
01:12 | Built-in functions awk साठी कॉल करण्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात. |
01:17 | प्रथम आपण arithmetic functions बद्दल शिकू.
square root function (sqrt (x)) : संख्या x ची पॉसिटीव्ह square root देते. |
01:27 | int function : x ला पूर्णांक व्हॅल्यूमध्ये विभाजित(ट्रांकेट्स) करते. |
01:32 | exponential function x चे घातांक (एक्सपोनेन्शल) देते. |
01:37 | log function हे नॅच्युरल logarithm x ची व्हॅल्यू देते. |
01:43 | sin आणि cos sine(x) आणि cosine(x) देते. |
01:49 | कृपया लक्षात घ्या की argument x चा उल्लेख radians मध्ये केला पाहिजे. |
01:55 | हे functions समजण्यासाठी एक उदाहरण पाहूया. |
02:00 | मी आधीच arithmetic underscore function dot awk फाईल मध्ये कोड लिहिले आहे.
Code Files लिंकमध्ये तेच उपलब्ध आहे. |
02:10 | येथे, आपण अनुक्रमे पॉसिटीव्ह किंवा नेगेटिव्ह संख्येचे square root प्रिंट करीत आहोत. |
02:17 | पुढे आपण अनुक्रमे पॉसिटीव्ह आणि नेगेटिव्ह संख्येसाठी पूर्णांक व्हॅल्यू प्रिंट करीत आहोत. |
02:24 | नंतर आपण लहान संख्या आणि खूप मोठ्या संख्येची घातांक(एक्स्पोनेन्शल) प्रिंट करीत आहोत. |
02:31 | त्यानंतर, पॉसिटीव्ह आणि नेगेटिव्ह संख्येचे नॅच्युरल logarithm प्रिंट केले जातात. |
02:38 | आपण 0.52 radian चे sine आणि cosine व्हॅल्युज देखील प्रिंट करीत आहोत, जे प्रत्येक्षात 30 degree आहे. आपण टर्मिनलमध्ये फाईल कार्यान्वित करू. |
02:50 | Ctrl, Alt आणि T कीज दाबून टर्मिनल उघडा. |
02:55 | नंतर त्या फोल्डर वर जा जेथे तुम्ही cd कमांड वापरून फाईल डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट केलेल्या आहेत. |
03:03 | आता टाईप करा awk space -f space arithmetic_function.awk
आणि आउटपुट पाहण्यासाठी Enter दाबा. |
03:14 | या आउटपुटमधून काही गोष्टी स्पष्ट आहेत. |
03:18 | sqrt() function एक पॉसिटीव्ह संख्येचे वर्गमुळ देते. |
03:23 | जर संख्या नेगेटिव्ह असेल तर ते nan किंवा not a number देते. |
03:29 | int() function कोणत्याही पॉसिटीव्ह किंवा नेगेटिव्ह संख्येचे विभाजित केलेले(ट्रांकेटेड) पूर्णांक देते. |
03:36 | exp() function संख्येचे घातांक (एक्स्पोनेन्शल) देते.
जर संख्या खूप मोठी असेल, तर function inf रिटर्न करेल. |
03:47 | पॉसिटीव्ह संख्येचा नॅच्युरल logarithm log() function द्वारे दिला जातो. |
03:53 | जर संख्या नेगेटिव्ह असेल, तर function nan रिटर्न करेल. |
03:58 | Sine आणि cosine functions संबंधित व्हॅल्यू देते.
तुम्ही तुमचे कॅल्क्युलेटर वापरून व्हॅल्यू तपासू शकता. |
04:07 | आता आपण random functions पाहू. |
04:11 | rand() function 0 आणि 1 च्या दरम्यान कोणतीही यादृच्छिक संख्या देते. परंतु 0 किंवा 1 कधीच रिटर्न करत नाही. |
04:21 | मिळालेली संख्या एक awk अंमलबजावणीमध्ये यादृच्छिक असतील. |
04:27 | परंतु awk प्रोग्रामच्या वेगवेगळ्या अंमलबजावणीमध्ये अंदाज योग्य आहे. |
04:33 | srand(x) function चा वापर random function साठी seed value x देण्यासाठी केला जातो. |
04:39 | x च्या अनुपस्थितीत, दिवसाची तारीख आणि वेळ seed value म्हणून वापरली जाते.
आपण एका उदाहरणासह हे समजून घेऊया. |
04:49 | मी random function साठी एक कोड लिहिला आहे आणि त्यास random.awk म्हणून सेव्ह केले आहे. |
04:56 | येथे, for loop च्या आत, rand() function 0 आणि 1 च्या दरम्यान एक यादृच्छिक संख्या निर्माण करेल. |
05:04 | नंतर निर्माण झालेली संख्या 50 ने गुणाकार केली जाईल आणि प्रिंट केली जाईल. |
05:10 | तर, हा कोड 50 पैकी 5 यादृच्छिक संख्या निर्माण करेल. |
05:16 | टर्मिनल वर जा आणि फाईल कार्यान्वित करा.
मी टर्मिनल क्लिअर करते. |
05:23 | टाईप करा: awk space hyphen f space random dot awk आणि Enter दाबा. |
05:31 | पहा, हे 5 यादृच्छिक संख्या देत आहे. |
05:35 | मी कोड पुन्हा कार्यान्वित केल्यास काय होते? |
05:39 | पूर्वी कार्यान्वित केलेली कमांड मिळविण्यासाठी अप एरो की दाबा आणि Enter दाबा. |
05:47 | आपल्याला सामान आउटपुट मिळत आहे. याचा अर्थ, awk स्क्रिप्टच्या प्रत्येक अंमलबजावणीसाठी यादृच्छिक संख्यांचा समान संच तयार करीत आहे. |
05:57 | मग प्रत्येक अंमलबजावणीत आपल्याला यादृच्छिक संख्यांचा एक नवीन संच कसा मिळेल?
पुन्हा एकदा कोडवर जा. |
06:06 | for loop च्या आधी, टाईप करा srand() function |
06:11 | फाईल सेव्ह करण्यासाठी Crtl आणि S कीज दाबा. |
06:16 | आता टर्मिनल वर जा. |
06:19 | पूर्वी कार्यान्वित केलेली कमांड मिळविण्यासाठी अप एरो की दाबा आणि Enter दाबा. |
06:27 | हे यादृच्छिक संख्यांचा एक वेगळा संच देत आहे. |
06:31 | म्हणून, जेव्हा हे argument शिवाय वापरले जाते तेव्हा आपण srand function वापरून यादृच्छिक संख्यांचा एक नवीन संच निर्माण करू शकतो, |
06:40 | पुढे आपण काही string functions पाहू.
length function विशिष्ट स्ट्रिंग s ची लांबी देते. |
06:49 | index function हे मोठ्या string s1 मध्ये string s2 ची स्थिती निश्चित करते. |
06:57 | उदाहरणार्थ, index पॅरेंथिसिस मध्ये डबल कोट्समध्ये linux comma डबल कोट्समध्ये n, 3 रिटर्न करते.
आता एक उदाहरण पाहू. |
07:10 | awkdemo.txt फाईल उघडा. |
07:14 | आपल्याला माहित आहे कि awkdemo.txt फाईलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे 4 अंकी रोल नंबर आहे. |
07:21 | टाइपिंग मध्ये चूक झाल्यामुळे, रोल नंबरमध्ये अंकांची चुकीची संख्या असू शकते.
awk commands वापरून आपण हे सहज ओळखू शकतो. |
07:30 | terminal वर जा.
मी terminal क्लिअर करते. |
07:36 | आता येथे दाखवल्याप्रमाणे command टाइप करा.
येथे आपण पहिल्या फील्डची लांबी 4 च्या सामान आहे कि नाही हे तपासत आहोत. |
07:46 | जर नाही, तर ते विशिष्ट रिकॉर्ड प्रिंट होईल.
Enter दाबा. |
07:53 | पहा, एक रोल-नंबर S02 चुकीचा टाईप केला गेला आहे. |
08:00 | यात तीन अंक आहेत, तर बाकीचे इतर चार अंक आहेत. |
08:07 | substr(s,a,b) function मोठ्या string s मधून substring एक्सट्रॅक्ट करते. |
08:14 | मी पॅरामीटर्स समजावून सांगते. |
08:17 | येथे s: string आहे. |
08:20 | a : s मधील स्थिती दर्शवते ज्यामधून एक्सट्रेक्शन (काढणे) सुरु होईल. |
08:26 | b वर्णांची संख्या दर्शवते जे एक्सट्रॅक्ट केले जाईल.
आपण एक उदाहरण पाहू. |
08:33 | awkdemo.txt फाईल वर जा. |
08:37 | रोल नंबरचे पहिले अक्षर Hostel code दर्शवते जेथे विशिष्ट विद्यार्थी राहतो. |
08:46 | समजा आपल्याला विद्यार्थ्यांची यादी शोधायची आहे, जे हॉस्टेल A मध्ये राहत आहेत. |
08:52 | ते मिळविण्यासाठी, टर्मिनल वर जाऊया. |
08:56 | येथे दर्शविल्याप्रमाणे कमांड टाइप करा. |
09:00 | येथे आपण $1 dware दर्शविलेले string घेतो. |
09:05 | आम्हाला माहित आहे कि $1 प्रथम field दर्शवित आहे, जे आमच्या बाबतीत रोल नंबर आहे. |
09:12 | पुढे, आपण substring एक्सट्रॅक्ट करतो जो one च्या वर्ण लांबी सह one च्या स्थानावर सुरू होतो. |
09:19 | नंतर, जर ते कॅपिटल A च्या समान असेल, तर फाईलमधून ती लाईन प्रिंट होईल.
आउटपुट पाहण्यासाठी Enter दाबा. |
09:29 | आपल्याला Hostel A मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची यादी मिळाली. |
09:34 | आपण पूर्वी function split पहिले आहे.
तर, मी येथे तपशील स्पष्ट करीत नाही. |
09:40 | जर आपल्याला शंका असेल तर कृपया awk ट्यूटोरियलचा संदर्भ घ्या. |
09:45 | Input/Output शी संबंधित काही अन्य functions आहेत.
system() function - awk मधील कोणताही unix command रन करण्यासाठी मदत करते. |
09:56 | आता आपण awk command द्वारे unix command date रन करूया. |
10:01 | टर्मिनल मध्ये येथे दाखवल्या प्रमाणे कमांड टाईप करा.
आणि Enter दाबा. |
10:09 | आजची तारीख आणि वेळ terminal वर आउटपुट म्हणून प्रदर्शित होते. |
10:15 | आता, आपल्याला याची गरज का आहे? आपण केवळ BEGIN सेक्शनला awk command साठी ठेवले आहे. |
10:21 | वास्तविक जगाच्या परिस्थितीत, आम्हाला आवश्यक आउटपुट प्रदर्शित होण्यापूर्वी system date प्रिंट करायची आहे. |
10:28 | त्या प्रकरणात, आपल्याला awk command मधून system commands कार्यान्वित करणे आवश्यक आहे. |
10:34 | येथे time stamps सह हाताळणी करणारे काही functions आहेत जसे
systime(), strftime() , इत्यादी. |
10:43 | या functions बद्दल जाणून घेण्यासाठी इंटरनेटद्वारे ब्राउज करा. |
10:48 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.
थोडक्यात. |
10:53 | या ट्युटोरिअलमध्ये आपण विविध प्रकारच्या built-in functions बद्दल शिकलो जसे
Arithmetic functions, String functions, Input/Output functions आणि Time stamps functions |
11:06 | असाइन्मेंट म्हणून- प्रत्येक रेकॉर्डच्या शेवटच्या field प्रिंट करण्यासाठी एक awk प्रोग्रॅम लिहा. |
11:13 | जिथे awkdemo.txt फाईल वापरून विद्यार्थ्याचे नाव तिसरे अक्षर म्हणून लहान u आहे. |
11:22 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
11:30 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
11:43 | कृपया या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा. |
11:47 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
11:59 | या स्क्रिप्टचे योगदान अंतराने केले आहे.
आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद. |