Linux-AWK/C2/Built-in-Functions-in-awk/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 नमस्कार awk मध्ये built-in functions वरील या स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:07 या ट्युटोरिअलमध्ये आपण विविध प्रकारच्या built-in functions बद्दल जाणून घेऊ, जसे-

Arithmetic functions

00:15 String functions
00:17 Input/Output functions आणि Time-stamp functions
00:23 आपण हे काही उदाहरणांद्वारे करू.
00:26 हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी, मी वापरत आहे Ubuntu Linux 16.04 Operating System आणि gedit text editor 3.20.1
00:38 तुम्ही तुमच्या पसंतीचा कोणताही टेक्स्ट एडिटर वापरू शकता.
00:42 या ट्युटोरियलचा अभ्यास करण्यासाठी, तुम्ही आपल्या वेबसाईटवरील पूर्वीचे awk ट्युटोरिअल्स पहा.
00:49 तुम्हाला C किंवा C++ सारखे कोणत्याही सामान्य प्रोग्रामिंग लँग्वेजचे काही मूलभूत ज्ञान असावे .
00:56 नसल्यास, कृपया आपल्या वेबसाईटवरील संबंधित ट्युटोरिअल्स पहा.
01:02 या ट्युटोरियलमध्ये वापरल्या गेलेल्या फाईल्स या ट्यूटोरियल पेजवरील Code Files लिंकमध्ये उपलब्ध आहेत. कृपया ते डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट करा.
01:12 Built-in functions awk साठी कॉल करण्यासाठी नेहमीच उपलब्ध असतात.
01:17 प्रथम आपण arithmetic functions बद्दल शिकू.

square root function (sqrt (x)) : संख्या x ची पॉसिटीव्ह square root देते.

01:27 int function : x ला पूर्णांक व्हॅल्यूमध्ये विभाजित(ट्रांकेट्स) करते.
01:32 exponential function x चे घातांक (एक्सपोनेन्शल) देते.
01:37 log function हे नॅच्युरल logarithm x ची व्हॅल्यू देते.
01:43 sin आणि cos sine(x) आणि cosine(x) देते.
01:49 कृपया लक्षात घ्या की argument x चा उल्लेख radians मध्ये केला पाहिजे.
01:55 हे functions समजण्यासाठी एक उदाहरण पाहूया.
02:00 मी आधीच arithmetic underscore function dot awk फाईल मध्ये कोड लिहिले आहे.

Code Files लिंकमध्ये तेच उपलब्ध आहे.

02:10 येथे, आपण अनुक्रमे पॉसिटीव्ह किंवा नेगेटिव्ह संख्येचे square root प्रिंट करीत आहोत.
02:17 पुढे आपण अनुक्रमे पॉसिटीव्ह आणि नेगेटिव्ह संख्येसाठी पूर्णांक व्हॅल्यू प्रिंट करीत आहोत.
02:24 नंतर आपण लहान संख्या आणि खूप मोठ्या संख्येची घातांक(एक्स्पोनेन्शल) प्रिंट करीत आहोत.
02:31 त्यानंतर, पॉसिटीव्ह आणि नेगेटिव्ह संख्येचे नॅच्युरल logarithm प्रिंट केले जातात.
02:38 आपण 0.52 radian चे sine आणि cosine व्हॅल्युज देखील प्रिंट करीत आहोत, जे प्रत्येक्षात 30 degree आहे. आपण टर्मिनलमध्ये फाईल कार्यान्वित करू.
02:50 Ctrl, Alt आणि T कीज दाबून टर्मिनल उघडा.
02:55 नंतर त्या फोल्डर वर जा जेथे तुम्ही cd कमांड वापरून फाईल डाउनलोड करून एक्सट्रॅक्ट केलेल्या आहेत.
03:03 आता टाईप करा awk space -f space arithmetic_function.awk

आणि आउटपुट पाहण्यासाठी Enter दाबा.

03:14 या आउटपुटमधून काही गोष्टी स्पष्ट आहेत.
03:18 sqrt() function एक पॉसिटीव्ह संख्येचे वर्गमुळ देते.
03:23 जर संख्या नेगेटिव्ह असेल तर ते nan किंवा not a number देते.
03:29 int() function कोणत्याही पॉसिटीव्ह किंवा नेगेटिव्ह संख्येचे विभाजित केलेले(ट्रांकेटेड) पूर्णांक देते.
03:36 exp() function संख्येचे घातांक (एक्स्पोनेन्शल) देते.

जर संख्या खूप मोठी असेल, तर function inf रिटर्न करेल.

03:47 पॉसिटीव्ह संख्येचा नॅच्युरल logarithm log() function द्वारे दिला जातो.
03:53 जर संख्या नेगेटिव्ह असेल, तर function nan रिटर्न करेल.
03:58 Sine आणि cosine functions संबंधित व्हॅल्यू देते.

तुम्ही तुमचे कॅल्क्युलेटर वापरून व्हॅल्यू तपासू शकता.

04:07 आता आपण random functions पाहू.
04:11 rand() function 0 आणि 1 च्या दरम्यान कोणतीही यादृच्छिक संख्या देते. परंतु 0 किंवा 1 कधीच रिटर्न करत नाही.
04:21 मिळालेली संख्या एक awk अंमलबजावणीमध्ये यादृच्छिक असतील.
04:27 परंतु awk प्रोग्रामच्या वेगवेगळ्या अंमलबजावणीमध्ये अंदाज योग्य आहे.
04:33 srand(x) function चा वापर random function साठी seed value x देण्यासाठी केला जातो.
04:39 x च्या अनुपस्थितीत, दिवसाची तारीख आणि वेळ seed value म्हणून वापरली जाते.

आपण एका उदाहरणासह हे समजून घेऊया.

04:49 मी random function साठी एक कोड लिहिला आहे आणि त्यास random.awk म्हणून सेव्ह केले आहे.
04:56 येथे, for loop च्या आत, rand() function 0 आणि 1 च्या दरम्यान एक यादृच्छिक संख्या निर्माण करेल.
05:04 नंतर निर्माण झालेली संख्या 50 ने गुणाकार केली जाईल आणि प्रिंट केली जाईल.
05:10 तर, हा कोड 50 पैकी 5 यादृच्छिक संख्या निर्माण करेल.
05:16 टर्मिनल वर जा आणि फाईल कार्यान्वित करा.

मी टर्मिनल क्लिअर करते.

05:23 टाईप करा: awk space hyphen f space random dot awk आणि Enter दाबा.
05:31 पहा, हे 5 यादृच्छिक संख्या देत आहे.
05:35 मी कोड पुन्हा कार्यान्वित केल्यास काय होते?
05:39 पूर्वी कार्यान्वित केलेली कमांड मिळविण्यासाठी अप एरो की दाबा आणि Enter दाबा.
05:47 आपल्याला सामान आउटपुट मिळत आहे. याचा अर्थ, awk स्क्रिप्टच्या प्रत्येक अंमलबजावणीसाठी यादृच्छिक संख्यांचा समान संच तयार करीत आहे.
05:57 मग प्रत्येक अंमलबजावणीत आपल्याला यादृच्छिक संख्यांचा एक नवीन संच कसा मिळेल?

पुन्हा एकदा कोडवर जा.

06:06 for loop च्या आधी, टाईप करा srand() function
06:11 फाईल सेव्ह करण्यासाठी Crtl आणि S कीज दाबा.
06:16 आता टर्मिनल वर जा.
06:19 पूर्वी कार्यान्वित केलेली कमांड मिळविण्यासाठी अप एरो की दाबा आणि Enter दाबा.
06:27 हे यादृच्छिक संख्यांचा एक वेगळा संच देत आहे.
06:31 म्हणून, जेव्हा हे argument शिवाय वापरले जाते तेव्हा आपण srand function वापरून यादृच्छिक संख्यांचा एक नवीन संच निर्माण करू शकतो,
06:40 पुढे आपण काही string functions पाहू.

length function विशिष्ट स्ट्रिंग s ची लांबी देते.

06:49 index function हे मोठ्या string s1 मध्ये string s2 ची स्थिती निश्चित करते.
06:57 उदाहरणार्थ, index पॅरेंथिसिस मध्ये डबल कोट्समध्ये linux comma डबल कोट्समध्ये n, 3 रिटर्न करते.

आता एक उदाहरण पाहू.

07:10 awkdemo.txt फाईल उघडा.
07:14 आपल्याला माहित आहे कि awkdemo.txt फाईलमध्ये प्रत्येक विद्यार्थ्याचे 4 अंकी रोल नंबर आहे.
07:21 टाइपिंग मध्ये चूक झाल्यामुळे, रोल नंबरमध्ये अंकांची चुकीची संख्या असू शकते.

awk commands वापरून आपण हे सहज ओळखू शकतो.

07:30 terminal वर जा.

मी terminal क्लिअर करते.

07:36 आता येथे दाखवल्याप्रमाणे command टाइप करा.

येथे आपण पहिल्या फील्डची लांबी 4 च्या सामान आहे कि नाही हे तपासत आहोत.

07:46 जर नाही, तर ते विशिष्ट रिकॉर्ड प्रिंट होईल.

Enter दाबा.

07:53 पहा, एक रोल-नंबर S02 चुकीचा टाईप केला गेला आहे.
08:00 यात तीन अंक आहेत, तर बाकीचे इतर चार अंक आहेत.
08:07 substr(s,a,b) function मोठ्या string s मधून substring एक्सट्रॅक्ट करते.
08:14 मी पॅरामीटर्स समजावून सांगते.
08:17 येथे s: string आहे.
08:20 a : s मधील स्थिती दर्शवते ज्यामधून एक्सट्रेक्शन (काढणे) सुरु होईल.
08:26 b वर्णांची संख्या दर्शवते जे एक्सट्रॅक्ट केले जाईल.

आपण एक उदाहरण पाहू.

08:33 awkdemo.txt फाईल वर जा.
08:37 रोल नंबरचे पहिले अक्षर Hostel code दर्शवते जेथे विशिष्ट विद्यार्थी राहतो.
08:46 समजा आपल्याला विद्यार्थ्यांची यादी शोधायची आहे, जे हॉस्टेल A मध्ये राहत आहेत.
08:52 ते मिळविण्यासाठी, टर्मिनल वर जाऊया.
08:56 येथे दर्शविल्याप्रमाणे कमांड टाइप करा.
09:00 येथे आपण $1 dware दर्शविलेले string घेतो.
09:05 आम्हाला माहित आहे कि $1 प्रथम field दर्शवित आहे, जे आमच्या बाबतीत रोल नंबर आहे.
09:12 पुढे, आपण substring एक्सट्रॅक्ट करतो जो one च्या वर्ण लांबी सह one च्या स्थानावर सुरू होतो.
09:19 नंतर, जर ते कॅपिटल A च्या समान असेल, तर फाईलमधून ती लाईन प्रिंट होईल.

आउटपुट पाहण्यासाठी Enter दाबा.

09:29 आपल्याला Hostel A मध्ये असलेल्या विद्यार्थ्यांची यादी मिळाली.
09:34 आपण पूर्वी function split पहिले आहे.

तर, मी येथे तपशील स्पष्ट करीत नाही.

09:40 जर आपल्याला शंका असेल तर कृपया awk ट्यूटोरियलचा संदर्भ घ्या.
09:45 Input/Output शी संबंधित काही अन्य functions आहेत.

system() function - awk मधील कोणताही unix command रन करण्यासाठी मदत करते.

09:56 आता आपण awk command द्वारे unix command date रन करूया.
10:01 टर्मिनल मध्ये येथे दाखवल्या प्रमाणे कमांड टाईप करा.

आणि Enter दाबा.

10:09 आजची तारीख आणि वेळ terminal वर आउटपुट म्हणून प्रदर्शित होते.
10:15 आता, आपल्याला याची गरज का आहे? आपण केवळ BEGIN सेक्शनला awk command साठी ठेवले आहे.
10:21 वास्तविक जगाच्या परिस्थितीत, आम्हाला आवश्यक आउटपुट प्रदर्शित होण्यापूर्वी system date प्रिंट करायची आहे.
10:28 त्या प्रकरणात, आपल्याला awk command मधून system commands कार्यान्वित करणे आवश्यक आहे.
10:34 येथे time stamps सह हाताळणी करणारे काही functions आहेत जसे

systime(), strftime() , इत्यादी.

10:43 या functions बद्दल जाणून घेण्यासाठी इंटरनेटद्वारे ब्राउज करा.
10:48 आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात.

10:53 या ट्युटोरिअलमध्ये आपण विविध प्रकारच्या built-in functions बद्दल शिकलो जसे

Arithmetic functions, String functions, Input/Output functions आणि Time stamps functions

11:06 असाइन्मेंट म्हणून- प्रत्येक रेकॉर्डच्या शेवटच्या field प्रिंट करण्यासाठी एक awk प्रोग्रॅम लिहा.
11:13 जिथे awkdemo.txt फाईल वापरून विद्यार्थ्याचे नाव तिसरे अक्षर म्हणून लहान u आहे.
11:22 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
11:30 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

11:43 कृपया या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
11:47 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

11:59 या स्क्रिप्टचे योगदान अंतराने केले आहे.

आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana