Difference between revisions of "Gedit-Text-Editor/C3/Default-plugins-in-gedit/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 14: | Line 14: | ||
|- | |- | ||
|00:34 | |00:34 | ||
− | |ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण | + | |ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यास आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
|- | |- | ||
|00:40 | |00:40 | ||
Line 23: | Line 23: | ||
|- | |- | ||
|00:49 | |00:49 | ||
− | |'''gedit Text editor''' | + | |'''gedit Text editor''' उघडू. |
|- | |- | ||
|00:53 | |00:53 | ||
Line 44: | Line 44: | ||
|- | |- | ||
|01:28 | |01:28 | ||
− | |येथे | + | |येथे दाखविल्याप्रमाणे, जर आपल्याला एडिटरवर कोणतेही प्लगइन्स दिसत नसतील तर आपण ते सहजपणे संस्थापित करू शकता. |
|- | |- | ||
|01:36 | |01:36 | ||
− | |आपण '''Ubuntu Software Center''' वापरून हे करू | + | |आपण '''Ubuntu Software Center''' वापरून हे करू शकतो. |
|- | |- | ||
|01:40 | |01:40 | ||
Line 68: | Line 68: | ||
|- | |- | ||
|02:14 | |02:14 | ||
− | |'''gedit Text editor''' साठी उपलब्ध असलेले '''Add-ons''' पाहण्यासाठी स्क्रोल | + | |'''gedit Text editor''' साठी उपलब्ध असलेले '''Add-ons''' पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. |
|- | |- | ||
|02:20 | |02:20 | ||
Line 146: | Line 146: | ||
|- | |- | ||
|04:36 | |04:36 | ||
− | |मी फॉन्ट साईज 20 पर्यंत | + | |मी फॉन्ट साईज 20 पर्यंत वाढवते. |
|- | |- | ||
|04:39 | |04:39 | ||
− | |फॉन्ट साईज सेट करण्यासाठी '''Select''' बटण क्लिक करा. | + | |फॉन्ट साईज सेट करण्यासाठी '''Select''' बटण वर क्लिक करा. |
|- | |- | ||
|04:43 | |04:43 | ||
Line 164: | Line 164: | ||
|- | |- | ||
|05:01 | |05:01 | ||
− | |पुढे, '''Sort | + | |पुढे, '''Sort''' ऑप्शन कसे काम करते ते पाहू. |
|- | |- | ||
|05:05 | |05:05 | ||
Line 216: | Line 216: | ||
|- | |- | ||
|06:32 | |06:32 | ||
− | |इतर ऑप्शन्स वापरून पाहा आणि तुम्ही स्वतः संबंधित | + | |इतर ऑप्शन्स वापरून पाहा आणि तुम्ही स्वतः संबंधित आऊटपुटचा शोध लावा. |
|- | |- | ||
|06:38 | |06:38 | ||
Line 252: | Line 252: | ||
|- | |- | ||
|07:36 | |07:36 | ||
− | |हे बरोबर शब्दलेखनदेखील दर्शविते. | + | | तसेच हे बरोबर शब्दलेखनदेखील दर्शविते. |
|- | |- | ||
|07:39 | |07:39 | ||
Line 303: | Line 303: | ||
|- | |- | ||
|09:04 | |09:04 | ||
− | |ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण जीएडीट टेक्स्ट | + | |ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण जीएडीट टेक्स्ट एडिटरमधील डीफॉल्ट '''plugins''' बद्दल शिकलो जसे -'''Sort''' , '''Change Case''', '''Spell checker''', '''Insert Date and Time'''. |
|- | |- | ||
|09:16 | |09:16 |
Revision as of 12:19, 19 February 2018
Time | Narration |
00:01 | स्पोकन ट्युटोरिअलवरील Default Plugins in gedit Text editor मध्ये आपले स्वागत आहे. |
00:07 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण gedit Text editor मधील काही डीफॉल्ट plugins शिकणार आहोत जसे Sort, Change Case, Spell checker आणि Insert Date and Time. |
00:23 | हे ट्युटोरिअल रेकॉर्ड करण्यासाठी मी - Ubuntu Linux 14.04 ऑपरेटिंग सिस्टम gedit Text editor 3.10 वापरत आहे. |
00:34 | ह्या ट्युटोरिअलचे अनुसरण करण्यास आपल्याला कोणत्याही ऑपरेटिंग सिस्टमवर काम करण्याचे ज्ञान असणे आवश्यक आहे. |
00:40 | Plugin हा एक सॉफ्टवेअर कॉम्पोनंट आहे जो एखादे विशिष्ट फिचर एप्लिकेशनशी जोडतो. |
00:46 | हा अतिरिक्त कार्यक्षमता देतो. |
00:49 | gedit Text editor उघडू. |
00:53 | gedit Text editor मध्ये काही plugins डीफॉल्टनुसार संस्थापित आहेत. |
00:59 | डिफॉल्ट plugins पाहण्यासाठी, Main menu मधून Edit आणि Preferences वर क्लिक करा. |
01:06 | Preferences डायलॉग बॉक्समध्ये ते प्रदर्शित होते, Plugins टॅबवर क्लिक करा. |
01:12 | इन्टॉल केलेले डीफॉल्ट plugins ची सूची येथे सूचीबद्ध केली आहे. |
01:18 | लक्षात घ्या की काही प्लगइन्स डिफॉल्टनुसार चेक आहेत. |
01:23 | हे सूचित करते की ते सक्षम आहेत आणि आपण ते वापरू शकतो. |
01:28 | येथे दाखविल्याप्रमाणे, जर आपल्याला एडिटरवर कोणतेही प्लगइन्स दिसत नसतील तर आपण ते सहजपणे संस्थापित करू शकता. |
01:36 | आपण Ubuntu Software Center वापरून हे करू शकतो. |
01:40 | gedit Preferences बॉक्सच्या Close बटणावर क्लिक करा. |
01:45 | आता, कंप्युटर डेस्कटॉपच्या वरच्या डाव्या कोपऱ्यात Dash Home आयकॉनवर क्लिक करा. |
01:52 | Search box मध्ये, Ubuntu Software Center टाईप करा. |
01:57 | Ubuntu Software Center आयकॉन दिसेल. त्यावर क्लिक करा |
02:03 | Search box मध्ये, gedit टाईप करा. |
02:07 | Text Editor icon वर क्लिक करा. नंतर More Info वर क्लिक करा. |
02:14 | gedit Text editor साठी उपलब्ध असलेले Add-ons पाहण्यासाठी खाली स्क्रोल करा. |
02:20 | आपण अतिरिक्त plugins ऑप्शन्स पाहू शकतो. |
02:24 | आपल्या गरजांनुसार हे वापरले जाऊ शकतात. |
02:28 | A set of gedit plugins for developers आणि Set of plugins for gedit यासाठी चेक बॉक्स निवडा, जर हे आधीपासून निवडलेले नसतील. |
02:40 | Apply Changes बटणावर क्लिक करा. |
02:43 | सूचित केल्यावर Admin पासवर्ड टाका. Authenticate वर क्लिक करा |
02:51 | आता, सर्वात सामान्यपणे वापरलेले plugins आपल्या सूचीमध्ये जोडले जातील. |
02:57 | Ubuntu Software Center बंद करा. |
03:00 | पुढे आपण काही plugins सक्षम करू. |
03:04 | Main मेनूमध्ये, Edit आणि नंतर Preferences वर क्लिक करा. |
03:09 | Plugins टॅबमध्ये, ही फिचर्स सक्षम करण्यासाठी Change Case, Sort आणि Spell checker चेक बॉक्सेस चेक करा. |
03:21 | Close वर क्लिक करा. |
03:24 | पुन्हा एकदा, मेनू बारमध्ये Edit वर क्लिक करा. |
03:28 | आपण पाहू शकतो की, plugins आपल्या मेनू लिस्टमध्ये जोडलेले आहेत. |
03:33 | मी Fruits.txt नावाचा एक डॉक्युमेंट उघडतो, जो मी आधीच तयार केला आहे. |
03:40 | Fruits.txt फाईल, ह्या ट्युटोरिअलसोबत Codefile लिंकमध्ये उपलब्ध आहे. |
03:48 | डाऊनलोड करा आणि ते टेक्स्ट डॉक्युमेंट वापरा. |
03:51 | डॉक्युमेंटमध्ये फॉन्टचा आकार कसा वाढवावा किंवा कमी करावा आणि बॅकग्राऊंडचा रंग कसा बदलावा हे पाहू. |
03:59 | मेनूबारमधून, Edit आणि Preferences वर क्लिक करा. |
04:03 | त्यानंतर, Font आणि Colors टॅबवर क्लिक करा. |
04:08 | जर तो आधीपासूनच चेक केला असेल तर Use the system fixed width font बॉक्स अनचेक करा. |
04:14 | शेवटी, Editor font बटणावर क्लिक करा. |
04:18 | येथे आपण वेगवेगळी फॉन्टची नावे पाहू शकतो. |
04:22 | आपण वापरू इच्छित असलेला फॉन्ट निवडा. |
04:26 | उजव्या बाजूला तळाशी, एक minus किंवा plus चिन्हांचे बटण आहेत. |
04:31 | फॉन्ट साईज वाढविण्यासाठी किंवा कमी करण्यासाठी याचा वापर केला आहे. |
04:36 | मी फॉन्ट साईज 20 पर्यंत वाढवते. |
04:39 | फॉन्ट साईज सेट करण्यासाठी Select बटण वर क्लिक करा. |
04:43 | बॅकग्राऊंडचा रंग बदलण्यासाठी, Color Scheme ऑप्शनमध्ये Cobalt वर क्लिक करा. |
04:49 | आपण पाहू शकता की बॅकग्राऊंडचा रंग ताबडतोब निळ्यामध्ये बदलला आहे. |
04:54 | नॉर्मल सेटिंग्जवर परत जाण्यासाठी Classic वर क्लिक करा. |
04:58 | त्यानंतर Close वर क्लिक करा. |
05:01 | पुढे, Sort ऑप्शन कसे काम करते ते पाहू. |
05:05 | Main menu मधून, Edit आणि Sort वर क्लिक करा. |
05:09 | Sort डायलॉग बॉक्स प्रदर्शित होतो. |
05:12 | आपल्या डॉक्युमेंटमध्ये आपल्याकडे Oranges दोन वेळा टाईप केलेले आहे. |
05:17 | Remove duplicates बॉक्स चेक करा. |
05:20 | तो डॉक्युमेंटमधील ड्युप्लिकेट शब्द असल्यास काढून टाकेल. |
05:25 | Ignore case चेक बॉक्सदेखील चेक करा. |
05:29 | आता Sort वर क्लिक करा. |
05:32 | लक्ष द्या की यादीतील शब्द आता वर्णानुक्रमाने आयोजित झाले आहेत. |
05:38 | कृपया हेदेखील लक्षात घ्या की Oranges शब्दाची डुप्लिकेट कॉपी काढून टाकली आहे. |
05:44 | पुढे, Change Case ऑप्शन कसा वापरावा ते पाहू. |
05:49 | प्रथम टेक्स्टची ओळ निवडा ज्यासाठी आपण केस बदलू इच्छित आहात. |
05:55 | येथे, मी संपूर्ण डॉक्युमेंट निवडणार आहे. |
05:59 | Main मेनूमधून Edit आणि Change Case वर क्लिक करा. |
06:03 | आपण ऑप्शन्स पाहू शकतो जसे - All Upper case, All Lower case, Invert case म्हणजेच हे सर्व lowercase ला uppercase मध्ये आणि uppercase ला lowercase मध्ये बदलेल.
Title case- हे प्रत्येक शब्दाचे पहिले अक्षर uppercase मध्ये बदलेल. |
06:25 | आता मी Title Case निवडेन. |
06:29 | डॉक्युमेंटमधील बदलांचे निरीक्षण करा. |
06:32 | इतर ऑप्शन्स वापरून पाहा आणि तुम्ही स्वतः संबंधित आऊटपुटचा शोध लावा. |
06:38 | पुढे आपण spell check ऑप्शन पाहणार आहोत. |
06:42 | ह्या डॉक्युमेंटमध्ये, दाखविल्याप्रमाणे, Oranges हा चुकीचा शब्दप्रयोग करू. |
06:48 | Main मेनूमधून, Tools आणि Highlight Misspelled Words निवडा. |
06:54 | लक्षात घ्या, चुकीचे शब्दलेखन आता लाल रंगात अधोरेखित झाले आहे. |
07:00 | शब्दावर कर्सर ठेवा आणि त्यावर राईट-क्लिक करा. |
07:05 | Spelling Suggestions वर क्लिक करा. |
07:08 | सूचीमधून योग्य शब्द निवडा. शब्दलेखन आता बरोबर होते. |
07:14 | आपण संपूर्ण डॉक्युमेंटसाठीदेखील स्पेल चेक करू शकतो. |
07:18 | दाखवल्याप्रमाणे, मी grapes आणि apples शब्दांचे चुकीचे शब्दलेखन करेन. |
07:24 | Main मेनूमधून Tools आणि Check Spelling निवडा. |
07:29 | Check Spelling डायलॉग बॉक्स प्रदर्शित होतो, डॉक्युमेंटमध्ये चुकीचे शब्दलेखन हायलाईट करत आहे. |
07:36 | तसेच हे बरोबर शब्दलेखनदेखील दर्शविते. |
07:39 | Suggestions सूचीमधून योग्य शब्द निवडा आणि Change वर क्लिक करा. |
07:45 | येथे, आपल्याकडे दोन चुकीचे शब्द आहेत. योग्य शब्द निवडा आणि ते बदला. |
07:51 | बाहेर पडण्यासाठी Close वर क्लिक करा. |
07:54 | कधीकधी, आपण एका विशिष्ट तयार केलेल्या किंवा सुधारित केलेल्या फाईलीची तारीख आणि वेळ रेकॉर्ड करू इच्छितो. |
08:03 | यासाठी, Insert Date and Time नावाचे plugin सक्षम करू. |
08:09 | Main मेनूमधून Edit आणि Preferences वर क्लिक करा. |
08:14 | Preferences डायलॉगबॉक्समध्ये प्रदर्शित होणाऱ्या Plugins टॅबवर क्लिक करा. |
08:20 | चेक बॉक्समधील Insert Date and Time चेक करा. Close वर क्लिक करा. |
08:26 | आता, मला डॉक्युमेंटच्या पहिल्या ओळीवर डेट आणि टाईम टाकायची आहे. |
08:32 | पहिल्या ओळीवर कर्सर ठेवा. |
08:35 | Main मेनूमधून Edit वर क्लिक करा आणि Insert Date and Time निवडा. |
08:41 | वेगवेगळ्या तारखा आणि वेळांच्या स्वरूपांसह एक डायलॉग बॉक्स दिसेल. |
08:46 | मी दुसरे स्वरूप निवडेन. |
08:48 | मग Insert वर क्लिक करेन. |
08:51 | आपण पाहू शकतो की आपण जिथे कर्सर ठेवला आहे तिथे तारीख आणि वेळ समाविष्ट केली गेली आहे. |
08:59 | ह्यासह आपण ह्या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. सारांशित करूया. |
09:04 | ह्या ट्युटोरिअलमध्ये आपण जीएडीट टेक्स्ट एडिटरमधील डीफॉल्ट plugins बद्दल शिकलो जसे -Sort , Change Case, Spell checker, Insert Date and Time. |
09:16 | येथे तुमच्यासाठी एक असाईनमेंट आहे. Fruits.txt डॉक्युमेंट उघडा, फॉन्ट इटॅलिकमध्ये बदला आणि त्याचा फॉन्ट साईज 24 पर्यंत वाढवा. टेक्स फाईलचा कंन्टेट Upper case मध्ये बदला. |
09:34 | खालील लिंकवरील व्हिडिओ स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया डाऊनलोड करून पाहा. |
09:42 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्ट टीम कार्यशाळा आयोजित करते आणि प्रमाणपत्रे देते. |
09:48 | अधिक माहितीसाठी, कृपया आम्हांला लिहा. |
09:51 | ह्या फोरममध्ये आपले प्रश्न वेळेसहित पोस्ट करा. |
09:56 | स्पोकन ट्युटोरिअल प्रॉजेक्टला NMEICT, MHRD, भारत सरकारद्वारे निधी उपलब्ध आहे. यासंबंधी माहिती ह्या लिंकवर उपलब्ध आहे. |
10:09 | हे मराठी भाषांतर लता पोपळे यांनी केले असून आवाज .......... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |