Difference between revisions of "BASH/C2/Basics-of-Shell-Scripting/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(First Upload) |
|||
Line 642: | Line 642: | ||
|- | |- | ||
| 11:40 | | 11:40 | ||
− | | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी | + | | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते |
|- | |- | ||
| 11:44 | | 11:44 |
Latest revision as of 17:35, 4 December 2014
Title of script: Basics of Shell scripting
Author: Manali Ranade
Keywords: BASH, Shell, scripting
Time | Narration |
00:01 | नमस्कार.Basics of Shell Scripting. वरील पाठात आपले स्वागत. |
00:05 | या पाठात शिकणार आहोत, |
00:09 | * सिस्टीम व्हेरिएबल्स |
00:11 | * युजर डिफाईंड व्हेरिएबल्स आणि |
00:13 | * कीबोर्डवरून युजर इनपुट स्वीकारणे. |
00:16 | ह्या पाठासाठी तुम्हाला लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीमचे ज्ञान असावे. |
00:23 | नसल्यास लिनक्सवरील संबंधित पाठांसाठी कृपया आमच्या वेबसाईटला भेट द्या. |
00:29 | ह्या पाठासाठी आपण वापरू, |
00:32 | * उबंटु लिनक्स 12.04 OS आणि |
00:35 | * GNU Bash वर्जन 4.1.10 |
00:40 | सरावासाठी कृपया GNU Bash वर्जन 4 किंवा त्यावरील वर्जन वापरावे. |
00:46 | आता व्हेरिएबल्सचा परिचय करून घेऊ. |
00:49 | * Bash व्हेरिएबल्समधे माहिती तात्पुरती संचित केली जाते. |
00:55 | *हे व्हेरिएबल्स सदर प्रोग्रॅम चालू असताना कधीही वापरता येतात. |
01:01 | * व्हेरिएबल्सचे दोन प्रकार आहेत
|
01:07 | सिस्टीम व्हेरिएबल्सची निर्मीती व व्यवस्थापन, Linux Bash Shell स्वतःच करते |
01:14 | ही कॅपिटल अक्षरात घोषित केलेली असतात. |
01:17 | सामान्यतः वापरली जाणारी सिस्टीम व्हेरिएबल्स म्हणजे |
01:20 | * BASH_VERSION, |
01:21 | * HOSTNAME, |
01:23 | * HOME इत्यादी. |
01:25 | तुमच्या कीबोर्डवरील Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबून टर्मिनल उघडा. |
01:33 | टाईप करा set आणि एंटर दाबा. |
01:38 | हे सर्व सिस्टीम व्हेरिएबल्स दाखवेल. |
01:42 | किंवा सर्व सिस्टीम व्हेरिएबल्स बघण्यासाठी env किंवा printenv देखील टाईप करू शकता. |
01:53 | प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ. |
01:55 | टाईप करा echo space डबल कोटसमधे dollar sign HOSTNAME |
02:01 | आता एंटर दाबा. |
02:04 | सिस्टीमचे hostname दाखवले जाईल. |
02:07 | आता homeडिरेक्टरीचा संपूर्ण पाथ मिळवू. |
02:11 | टाईप करा echo space डबल कोटस मधे dollar sign HOME(कॅपिटलमधे) |
02:18 | एंटर दाबा. |
02:21 | युजरच्या home डिरेक्टरीचा संपूर्ण पाथ दाखवला जाईल. |
02:26 | टाईप करा |
02:27 | echo space डबल कोटसमधे HOME (कॅपिटलमधे) |
02:32 | एंटर दाबा. |
02:34 | हे केवळ HOMEअसे दाखवेल HOME ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू नाही. |
02:39 | ती व्हॅल्यू दाखवण्यासाठी प्रत्येक व्हेरिएबलच्या सुरूवातीला ('$')डॉलरचे चिन्ह वापरावे लागते. |
02:48 | स्लाईडसवर परत जाऊ. |
02:51 | युजर डिफाईंड व्हेरिएबल्स |
02:53 | * ह्या व्हेरिएबल्सची निर्मीती आणि व्यवस्थापन युजर द्वारे होते. |
02:57 | *युजर डिफाईंड व्हेरिएबल्सची नावे अप्परकेसमधे लिहीणे टाळावे. |
03:05 | *त्यामुळे युजर डिफाईंड आणि सिस्टीम व्हेरिएबल्स मधे फरक करणे सोपे होते. |
03:12 | टर्मिनल वर परत जाऊ. |
03:14 | टाईप करा username equal to sign sunita |
03:20 | username, equal to sign आणि sunitaह्यामधे कोणतीही ब्लँक स्पेस असणार नाही याची खात्री करा. |
03:29 | एंटर दाबा. |
03:30 | username ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू दाखवण्यासाठी |
03:33 | टाईप करा echo space डबल कोटसमधे dollar sign username |
03:40 | एंटर दाबा. |
03:42 | हे टर्मिनलवर sunita दाखवेल. |
03:46 | व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून टाकता येऊ शकते. |
03:50 | स्लाईडवर जाऊ. |
03:52 | व्हेरिएबलला दिलेली व्हॅल्यू unset कमांडद्वारे काढून टाकता येते. |
03:59 | unset variablenameअसा त्याचा सिंटॅक्स आहे. |
04:03 | username हे आपले व्हेरिएबल असलेले उदाहरण वापरू. |
04:08 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा. unset space username आणि एंटर दाबा. |
04:18 | तपासण्यासाठी टाईप करा echo space डबल कोटसमधे dollar sign username आणि एंटर दाबा. |
04:28 | टर्मिनलवर काहीही दाखवले जाणार नाही. |
04:30 | ह्याचा अर्थ username ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू काढून टाकली आहे. |
04:36 | स्लाईडवर जाऊ. |
04:39 | ग्लोबल आणि लोकल व्हेरिएबल्स. |
04:42 | *Shell scriptमधे युजर डिफाईंड व्हेरिएबल्स ग्लोबल किंवा लोकल म्हणून घोषित करता येतात. |
04:49 | * डिफॉल्ट रूपात सर्व व्हेरिएबल्स ग्लोबल म्हणून घोषित असतात. |
04:52 | * म्हणजेच फंक्शनच्या आत आणि बाहेर त्यांची व्हॅल्यू तीच राहते. |
04:59 | आता व्हेरिएबल्स ग्लोबल आणि लोकल म्हणून कसे घोषित करायचे ते पाहू. |
05:04 | टर्मिनल वर जाऊन टाईप करा. |
05:07 | gedit space g_(अंडरस्कोर)variable.sh space & (अँपरसँडचे चिन्ह) |
05:16 | gedit हा टेक्स्ट एडिटर आहे. g_(अंडरस्कोर) variable.sh हे फाईलचे नाव आहे. |
05:23 | आणि & (अँपरसँड)चिन्ह प्रॉम्प्ट मुक्त करण्यासाठी लिहीले जाते. |
05:28 | एंटर दाबा. |
05:30 | येथे दाखवलेला कोड g_(अंडरस्कोर)variable.sh ह्या फाईलमधे टाईप करू. |
05:35 | आता कोड समजून घेऊ. |
05:38 | पहिली ओळ, ज्यात hash आणि exclamation चिन्ह आहे, तिला shebang किंवा bang लाईन म्हणतात. |
05:44 | username=sunita हे युजर डिफाईंड व्हेरिएबल ग्लोबल म्हणून घोषित केले आहे. |
05:51 | echo हे फंक्शनच्या बाहेरील स्ट्रींग दाखवेल आणि |
05:55 | dollar username हे username ह्या व्हेरिएबलची व्हॅल्यू प्रिंट करेल. |
06:00 | अशाप्रकारे BASH स्क्रिप्टमधे फंक्शन घोषित केले जाते. |
06:04 | फंक्शन्सबद्दल अधिक माहिती पुढील काही पाठांमधे जाणून घेऊ. |
06:09 | ही फंक्शनची बॉडी आहे. |
06:12 | येथे usernameच्या व्हॅल्यूसहित फंक्शनच्या आतील आणखी एक मेसेज दाखवला जाईल. |
06:19 | येथे फंक्शन कॉल करू. |
06:21 | हा आपला कोड आहे. कार्यान्वित करू. |
06:23 | टर्मिनल वर जाऊ. |
06:26 | प्रॉम्प्ट क्लियर करून घेऊ. |
06:28 | प्रथम फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवणे गरजेचे आहे. |
06:31 | टाईप करा chmod space plus x space g_(अंडरस्कोर)variable.sh आणि एंटर दाबा. |
06:39 | टाईप करा dot slash g_(अंडरस्कोर)variable.sh |
06:45 | एंटर दाबा. |
06:47 | आऊटपुट बघा. |
06:48 | फंक्शनच्या बाहेर username ला sunita ही व्हॅल्यू मिळेल. |
06:53 | फंक्शनच्या आत देखील username ला sunita हीच व्हॅल्यू मिळेल. |
06:59 | कारण username हे फंक्शनच्या बाहेर ग्लोबल म्हणून घोषित केले आहे. |
07:04 | आता लोकल व्हेरिएबल कसे घोषित करायचे ते पाहू. |
07:09 | टाईप करा gedit space l_(अंडरस्कोर)variable.sh space & (अँपरसँड चिन्ह) |
07:18 | एंटर दाबा. |
07:20 | दाखवलेला कोड l_(अंडरस्कोर)variable.sh ह्या फाईलमधे टाईप करा. |
07:25 | कोड समजून घेऊ. |
07:28 | फंक्शनच्या आतील एका अतिरिक्त ओळीखेरीज उरलेला कोड पूर्वीप्रमाणेच. |
07:36 | function ब्लॉकच्या आत local space username equals to jackअशी ओळ आहे. |
07:41 | ह्यामुळे username ह्या लोकल व्हेरिएबलला नवी व्हॅल्यू मिळेल. |
07:48 | आता टर्मिनलवर जा. |
07:50 | फाईल कार्यान्वित करण्यायोग्य बनवू. |
07:52 | टाईप करा chmod space plus x space l_variable.sh |
08:00 | एंटर दाबा. |
08:02 | टाईप करा dot slash l_variable.sh |
08:07 | एंटर दाबा. |
08:08 | आऊटपुट दाखवले जाईल. |
08:10 | functionच्या बाहेर username sunitaही व्हॅल्यू घेईल. |
08:15 | तर functionच्या आत username jack ही व्हॅल्यू घेईल. |
08:20 | कारण फंक्शनमधील username ह्या लोकल व्हेरिएबलला ही व्हॅल्यू दिलेली आहे. |
08:26 | आता कीबोर्डवरून युजर इनपुट कसा मिळवायचा ते पाहू. |
08:31 | कीबोर्डवरून इनपुट स्वीकारण्यासाठी read कमांड वापरली जाते. |
08:36 | ह्याचा उपयोग युजर डिफाईंड व्हेरिएबलला इनपुट व्हॅल्यू देण्यासाठी होतो. |
08:41 | read कमांडचा सिंटॅक्स असा आहे. |
08:44 | read space hyphen p space डबल कोटसमधे PROMPT |
08:50 | PROMPT ही केवळ स्ट्रिंग आहे जी युजर इनपुटची वाट बघते. |
08:55 | तुम्ही येथे स्वतःची स्ट्रिंग देखील वापरू शकता. |
08:58 | आता टर्मिनल वर जाऊ. |
09:00 | टाईप करा gedit space read.sh space & (अँपरसँडचे चिन्ह) |
09:08 | एंटर दाबा. |
09:09 | दाखवलेला कोड तुमच्या read.sh ह्या फाईलमधे टाईप करा. |
09:14 | आता कोड समजून घेऊ. |
09:16 | ह्या उदाहरणात युजर कीबोर्डवरून इनपुट देईल. |
09:21 | ही bang लाईन आहे. |
09:23 | येथे -p मुळे नव्या ओळीवर न जाता प्रॉम्प्ट दाखवला जाईल आणि कीबोर्डद्वारे इनपुट घेतले जाईल. |
09:31 | युजर इनपुट username ह्या व्हेरिएबल मधे संचित केले जाईल. |
09:36 | echo कमांड मेसेज दाखवेल. |
09:38 | Hello आणि युजरने कीबोर्ड द्वारे दिलेले नाव. |
09:43 | प्रोग्रॅम कार्यान्वित करू. |
09:45 | टर्मिनलवर परत जाऊ. |
09:49 | टाईप करा chmod space plus x space read.sh |
09:55 | एंटर दाबा. |
09:56 | टाईप करा dot slash read.shआणि एंटर दाबा. |
10:01 | येथे Enter username: असे दाखवले जाईल. |
10:04 | ashwini टाईप करून एंटर दाबा. |
10:08 | Hello ashwini असा मेसेज दाखवला जाईल. |
10:13 | ashwiniही इनपुट व्हॅल्यू usernameया युजर डिफाईंड व्हेरिएबलला दिली गेली. |
10:20 | स्लाईडसवर परत जाऊ. थोडक्यात, |
10:23 | आपण शिकलो, |
10:26 | * सिस्टीम व्हेरिएबल्स |
10:27 | * युजर डिफाईंड व्हेरिएबल्स |
10:29 | * कीबोर्ड वरून युजर इनपुट स्वीकारणे. |
10:33 | असाईनमेंट म्हणून, |
10:34 | पुढील सिस्टीम व्हेरिएबल्स मिळवण्यासाठी साधा Bash प्रोग्रॅम लिहा. |
10:38 | * pwd आणि * logname |
10:41 | साधा Bashप्रोग्रॅम लिहा जो |
10:43 | * युजरला username विचारेल. |
10:46 | * जर युजरने 10 सेकंदात काहीही टाईप केले नाही तर तो प्रोग्रॅममधून बाहेर पडेल. |
10:51 | * {मदतः read -(Hyphen)t 10 -(Hyphen)p} |
10:56 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
|
10:59 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
11:02 | जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता. |
11:07 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
11:16 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा. |
11:23 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
|
11:27 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
11:34 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.http://spoken-tutorial.org\NMEICT-Intro |
11:40 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते |
11:44 | सहभागासाठी धन्यवाद. |