Difference between revisions of "Ruby/C2/Logical-and-other-Operators/Marathi"

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Line 478: Line 478:
 
|-
 
|-
 
| 08.20  
 
| 08.20  
| रेंजचा वापर एखादी व्हॅल्यू दिलेल्या रेंजमधे आहे की नाही हे तपासण्यासही होतो.
+
| रेंजचा वापर एखादी व्हॅल्यू दिलेल्या रेंजमधे आहे की नाही हे तपासण्यासाठी होतो.
  
 
|-
 
|-

Revision as of 11:25, 1 July 2014

Title of script: Logical-and-other-Operators

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00.02 Logical आणि Other Operators वरील पाठात आपले स्वागत.
00.06 या पाठात शिकणार आहोत,
00.09 लॉजिकल ऑपरेटर्स,
00.11 पॅरलल असाईनमेंट आणि
00.13 रेंज ऑपरेटर्स.
00.15 येथे वापरणार आहोत.
00.17 उबंटु लिनक्स वर्जन12.04
00.20 आणि रुबी 1.9.3
00.23 या पाठासाठी तुम्हाला लिनक्स टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00.29 तसेच irb चा परिचय असावा.
00.33 नसल्यास संबंधित पाठांसाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00.38 लॉजिकल ऑपरेटर्सला Boolean ऑपरेटर्स असेही म्हणतात.
00.42 कारण ते राशीतील भागांचे मूल्यमापन करून
00.45 true किंवा false व्हॅल्यू आपल्याला देतात.
00.48 लॉजिकल ऑपरेटर्स अशाप्रकारे आहेत.
00.51 दोन अँपरसँड (&&) म्हणजे (and)
00.54 डबल पाईप म्हणजे (or)
00.56 एक्स्लमेशन (!) म्हणजे (not)
01.00 दोन्ही राशी true असतील तरच &&(दोन अँपरसँड) आणि and आपल्याला true व्हॅल्यू देते .
01.07 पहिली राशी true असेल तरच दुस-याचे मूल्यमापन केले जाते.
01.12 प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारांतील फरक आहे.
01.15 चिन्हरूपी and म्हणजे &&(दोन अँपरसँड) ला अधिक प्राधान्य असते.
01.20 त्याची उदाहरणे पाहू.
01.22 त्यासाठी irb वापरू.
01.25 टर्मिनल उघडण्यासाठी Ctrl, Alt आणि T एकत्रितपणे दाबा.
01.31 इंटरऍक्टीव्ह रुबी उघडण्यासाठी irb टाईप करून एंटर दाबा.
01.36 टाईप करा 3 greater than 2 space &&(दोन अँपरसँड) space 4 less than 5
01.47 एंटर दाबा.
01.49 trueहे आऊटपुट मिळाले.
01.53 येथे पहिली राशी 3>2 ही true आहे.
01.59 दुसरी राशी 4<5 ही सुध्दा true आहे.
02.03 दोन्ही राशी trueअसल्याने true हे आऊटपुट मिळाले.
02.08 मागील कमांड पुन्हा मिळवण्यासाठी अप ऍरो दाबा.
02.12 दोन अँपरसँड चिन्हांच्या जागी and टाईप करा.
02.17 एंटर दाबा.
02.19 आपल्याला तोच रिझल्ट मिळेल.
02.22 मागील कमांड पुन्हा मिळवण्यासाठी अप ऍरो दाबा.
02.27 पहिल्या राशीत greater than बदलून ते less than करा.
02.32 एंटर दाबा.
02.35 false असे आऊटपुट मिळेल.
02.38 कारण 3<2 हे false आहे.
02.43 पहिली राशी falseअसल्यामुळे दुस-या राशीचे मूल्यमापन झाले नाही.
02.49 आणि false हे आऊटपुट मिळाले.
02.53 राशींपैकी एक जरी true असेल तर double pipe आणि or आपल्याला true व्हॅल्यू देते .
02.59 पहिली राशी false असेल तरच दुस-या राशीचे मूल्यमापन होते.
03.04 प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारातील फरक आहे.
03.07 चिन्हरूपी or म्हणजे double pipeला सर्वाधिक प्राधान्य असते.
03.11 त्याची उदाहरणे पाहू.
03.15 10 greater than 6 space double pipe space 12 less than 7
03.23 एंटर दाबा.
03.26 true हे आऊटपुट मिळेल.
03.29 येथे पहिली राशी म्हणजे 10>6 true आहे.
03.35 पहिली राशी true असल्यामुळे दुस-या राशीचे मूल्यमापन होणार नाही.
03.40 आणि true हे आऊटपुट मिळेल.
03.42 मागील कमांड पुन्हा मिळवण्यासाठी अप ऍरो दाबा.
03.46 पहिल्या राशीत greater than चिन्ह बदलून ते less than करा.
03.52 आणि pipe चिन्हाच्या जागी or टाईप करा.
03.57 एंटर दाबा.
04.00 येथे पहिली राशी म्हणजे 10<6 false आहे.
04.05 दुसरी राशी 12<7 सुध्दा false आहे.
04.10 दोन्ही राशी falseअसल्यामुळे falseहे आऊटपुट मिळाले.
04.15 ! ( exclamation mark ) आणि not ऑपरेटर्स दिलेल्या राशीच्या विरूध्द व्हॅल्यू परत करतात.
04.20 जर राशी true असेल, exclamation mark ऑपरेटर false व्हॅल्यू परत करेल.
04.27 राशी false असल्यास true व्हॅल्यू परत करेल.
04.30 प्राधान्यक्रम हा दोन्ही प्रकारातील फरक आहे.
04.33 चिन्हरूपी not म्हणजे (!) उद्गारचिन्हाला सर्वाधिक प्राधान्य असते.
04.37 आता not ऑपरेटर वापरून बघू.
04.40 प्रथम टाईप करा 10 double equal to 10
04.45 एंटर दाबा.
04.47 true हे आऊटपुट मिळेल.
04.50 वरील राशीचा रिझल्ट उलटा करण्यासाठी
04.53 राशीच्या आधी not ऑपरेटर समाविष्ट करा.
04.57 टाईप करा Exclamation mark कंसात 10 double equal to 10
05.04 एंटर दाबा.
05.06 false हे आऊटपुट मिळेल.
05.10 Ctrl+L दाबा. irb कंसोल क्लियर करा.
05.15 आता parallel assignment बद्दल जाणून घेऊ.
05.20 रूबीत पॅरलल असाइनमेंटद्वारे एका ओळीने अनेक व्हेरिएबल्सना प्राथमिक व्हॅल्यू देता येते.
05.26 आता टर्मिनलवर जा.
05.29 पॅरलल असाइनमेंटद्वारे a, b, c ही तीन व्हेरिएबल घोषित करू.
05.36 टाईप करा a comma b comma c equal to 10 comma 20 comma 30
05.45 आणि एंटर दाबा.
05.47 येथे व्हेरिएबल a ला 10
05.52 b ला 20 ,
05.54 c ला 30 ही व्हॅल्यू दिली जाईल.
05.56 उजवी बाजू ऍरे सारखे कार्य करेल.
06.01 जर डाव्या बाजूस अनेक व्हेरिएबल्स लिहिले तर त्यांचा ऍरे अनपॅक करून त्यांना अनुक्रमाने व्हॅल्यू दिल्या जातात.
06.10 ऍरेज बद्दल पुढील पाठांत सविस्तर जाणून घेऊ.
06.14 आता व्हॅल्यूज योग्य पध्दतीने प्रदान झाल्या आहेत का ते पाहू .
06.20 a टाईप करून एंटर दाबा.
06.23 व्हेरिएबल a मधे 10 ही व्हॅल्यू संचित असल्याचे दिसेल .
06.28 b टाईप करून एंटर दाबा.
06.31 आपल्याला 20 मिळेल.
06.33 c टाईप करून एंटर दाबा.
06.37 30 दाखवले जाईल.
06.40 दोन व्हेरिएबल्समधील व्हॅल्यूजची अदलाबदल करण्यासाठी पॅरलल असाइनमेंट उपयोगी आहे.
06.45 a आणि b च्या व्हॅल्यूजची अदलाबदल करू.
06.50 टाईप करा puts space डबल कोटसमधे a equal to hash महिरपी कंसात a comma डबल कोटसमधे b equal to hash महिरपी कंसात b
07.11 एंटर दाबा.
07.13 a=10 आणि
07.16 b=20 हे आऊटपुट मिळेल.
07.20 आता a आणि b ची अदलाबदल करू.
07.23 त्यासाठी टाईप करा
07.25 a comma b equal to b comma a
07.31 एंटर दाबा.
07.33 puts कमांड मिळवण्यासाठी दोनदा अप ऍरो की दाबा आणि एंटर दाबा.
07.39 आपल्याला,
07.41 a=20
07.44 b=10 हे आऊटपुट मिळेल.
07.47 आता रुबीमधील रेंजबद्दल जाणून घेऊ.
07.50 रेंजमधील व्हॅल्यूज नंबर्स, कॅरॅक्टर्स, स्ट्रिंग्ज किंवा ऑब्जेक्टस असू शकतात.
07.58 रेंजचा उपयोग अनुक्रम (Sequence) दाखवण्यासाठी करतात.
08.02 Sequence रेंज ही व्हॅल्यूजची सलग रेंज तयार करण्यास वापरतात.
08.06 त्यामधे सुरूवातीची व्हॅल्यू, व्हॅल्यूजची रेंज आणि शेवटची व्हॅल्यू दिली जाते.
08.13 (..) two dot ऑपरेटर इनक्लुझिव्ह रेंज बनवते.
08.16 (...) three dot ऑपरेटर एक्सक्लुझिव्ह रेंज बनवते.
08.20 रेंजचा वापर एखादी व्हॅल्यू दिलेल्या रेंजमधे आहे की नाही हे तपासण्यासाठी होतो.
08.26 आपण हे (===) equality ऑपरेटरद्वारे करतो.
08.30 रेंजेसवरील उदाहरणे पाहू.
08.33 टर्मिनलवर जा.
08.36 टाईप करा कंसात 1 two dots 10 then dot to underscore a
08.46 Two dot ऑपरेटर इनक्लुझिव्ह रेंज बनवतो.
08.50 इनक्लुझिव्ह ऑपरेटर रेंजमधे सुरूवातीची किंवा शेवटची व्हॅल्यू समाविष्ट करतो.
08.57 रेंज, सूचीमधे बदलण्यासाठी to_a ही मेथड वापरली आहे.
09.03 एंटर दाबा.
09.05 रेंजमधे 1 आणि 10 ह्या व्हॅल्यूज समाविष्ट झालेल्या दिसतील.
09.11 आता एक्सक्लुझिव्ह रेंज ऑपरेटर पाहू.
09.16 टाईप करा कंसात 1 three dots 10 then dot to underscore a
09.27 Three dot ऑपरेटर एक्सक्लुझिव्ह रेंज बनवतो.
09.31 एक्सक्लुझिव्ह ऑपरेटर रेंजमधील शेवटची व्हॅल्यू वगळतो.
09.37 एंटर दाबा.
09.39 येथे 10 ही व्हॅल्यू रेंजमधे समाविष्ट झालेली नाही.
09.45 आता 1 ते 10च्या रेंजमधे 5 ही व्हॅल्यू येते का ते तपासू .
09.50 टाईप करा कंसात 1 two dots 10 तीन वेळा equal to आणि नंतर 5
10.00 एंटर दाबा.
10.02 रेंजमधे एखाद्या व्हॅल्यूचा समावेश होतो का ते तपासण्यासाठी Equality ऑपरेटर वापरतात.
10.07 1 ते 10 या रेंजमधे 5 ही व्हॅल्यू समाविष्ट होत असल्यामुळे trueआऊटपुट मिळेल.
10.14 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
10.17 या पाठात आपण शिकलो ,
10.20 लॉजिकल ऑपरेटर म्हणजे दोन अँपरसँड, डबल पाईप आणि उद्गारचिन्ह हे ऑपरेटर्स
10.27 पॅरलल असाइनमेंट उदाहरणार्थ a,b,c=10,20,30
10.34 रेंज ऑपरेटर, इनक्लुझिव्ह ऑपरेटर (..) आणि एक्सक्लुझिव्ह ऑपरेटर(...)
10.39 आता असाईनमेंट.
10.41 पॅरलल असाइनमेंट वापरून दोन व्हेरिएबल्स घोषित करा.
10.45 त्या दोन्हींची बेरीज 20 आणि 50 च्या मधे येते की नाही ते तपासा.
10.49 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10.52 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10.56 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
11.00 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
11.03 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
11.05 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
11.09 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
11.15 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
11.19 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
11.25 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
11.34 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते .
11.38 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana