Difference between revisions of "LibreOffice-Suite-Base/C2/Add-Push-Button-to-a-form/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
(Created page with ''''Title of script''': '''Add Push Button ''' '''Author: Manali Ranade''' '''Keywords: Base''' {| style="border-spacing:0;" ! <center>Visual Clue</center> ! <center>Narratio…') |
Pravin1389 (Talk | contribs) |
(No difference)
|
Revision as of 18:57, 2 December 2012
Title of script: Add Push Button
Author: Manali Ranade
Keywords: Base
|
|
---|---|
00:00 | LibreOffice Base च्या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपले स्वागत. |
00:03 | ह्या ट्युटोरियलमध्ये आपण form मध्ये Push Button कसे समाविष्ट करायचे हे शिकणार आहोत. |
00:10 | मागील ट्युटोरियलमध्ये आपण form मध्ये list box form control समाविष्ट करण्याबद्दल शिकलो. |
00:17 | ह्या ट्युटोरियलमध्ये आपण form मध्ये Push Button कसे समाविष्ट करायचे ह्याबद्दल शिकणार आहोत. |
00:24 | बेस प्रोग्रॅम सुरू नसल्यास तो प्रथम आपण सुरू करू या. |
00:36 | आपला Library database उघडा. तो कसा उघडायचा ते आता तुम्हाला माहित असेलच. |
00:45 | File menu मधील Open वर क्लिक करून Library database निवडा. |
00:52 | आता आपण Library database मध्ये आहोत. |
00:56 | मागील ट्युटोरियलमध्ये आपण ज्यावर काम केले तो Books Issued to Members हा form उघडा. |
01:04 | त्यासाठी डाव्या पॅनेल मधील form आयकॉनवर क्लिक करा. |
01:09 | आणि नंतर उजव्या पॅनेलमधील Books Issued to Members वर राईट क्लिक करा. |
01:16 | आता Edit वर क्लिक करा. |
01:19 | आता आपण form design window मध्ये आहोत. |
01:23 | आपल्या form मध्ये Push बटण समाविष्ट करण्याबाबत चर्चा करण्यापूर्वी Member names साठी अजून एक list box बनवू या. |
01:34 | मागील ट्युटोरियलमध्ये आपण दुसरा list box बनवण्याची assignment केली होती. |
01:41 | प्रथम आपण Member Name ह्या लेबलच्या उजवीकडील text box काढून टाकू. |
01:50 | त्यासाठी text box वर right-click करून Cut वर क्लिक करा. |
01:57 | text box डिलिट झाला आहे. |
02:00 | पुढे आपण formवरील घटकांची रचना करू या. |
02:04 | लिस्ट बॉक्सना टेक्स्ट बॉक्सपेक्षा जास्त जागा लागत असल्यामुळे आपण formवरील घटक जरा आणखीन खाली सरकवून घेऊ. |
02:15 | कसे ते पाहू. |
02:17 | प्रथम form मधीलBook title label खालील सर्व घटक आपण select करून घेऊ . |
02:26 | त्यासाठी आपण click, drag आणि drop पध्दत वापरू या. |
02:32 | select केलेल्या भागावर क्लिक करून सरळ खाली ड्रॅग करा. |
02:39 | त्यामुळे Book Title लेबलशी संबंधित पहिल्या list box ला आता पुरेशी जागा झाली आहे. |
02:48 | Member Name लेबलसाठी देखील त्याच steps पुन्हा करा. |
03:05 | आता Member Name ह्या लेबलच्या डावीकडे असलेल्या दुस-या list box वर क्लिक करून drag आणि drop करू या. |
03:14 | ही लिस्ट बॉक्स उजवीकडे आणून formमधील इतर घटकांशी जुळवून घ्या. |
03:22 | कीबोर्डवरील Control S ह्या shortcut च्या सहाय्याने आपण formवर केलेले काम सेव्ह करू या. |
03:32 | आता आपण form मध्ये Push बटणे समाविष्ट करण्यास तयार आहोत. |
03:39 | Push बटण हे form control चे अजून एक उदाहरण आहे. |
03:44 | आपण OK, Cancel, Next आणि Finish ह्या Push बटणांशी परिचित आहोत. |
03:56 | आपण बेसमध्ये ही Push बटणे आपल्या form मध्ये समाविष्ट करू शकतो. आणि त्यावर क्लिक केल्यानंतर विशिष्ट कृती करण्याची सूचना देऊ शकतो. |
04:07 | तसेच Save, Undo किंवा Delete ही पण Pushबटणाची काही उदाहरणे आहेत. |
04:14 | कसे ते आपण पाहू. |
04:17 | आता येथे image मध्ये दाखविल्याप्रमाणे आपण आपल्या form मधील सर्व घटकांच्या खाली चार Push बटणे समाविष्ट करू या. |
04:30 | त्यासाठी आपल्या form design विंडोवर परत जाऊ. |
04:35 | आणि Form Controls टूलबार मधील Push बटणावर क्लिक करा. |
04:43 | आपल्याला परिचित असलेल्या Ok बटणासारखा हा आयकॉन दिसेल. |
04:50 | आपला mouse pointer अधिकच्या चिन्हासारखा होईल. |
04:57 | आता आपण form मध्ये पहिले बटण इतर सर्व घटकांखाली डाव्या बाजूला click, drag आणि drop पध्दतीने काढू या. |
05:10 | आपण त्याचा आकार बदलू या. |
05:14 | आता वरील सर्व steps पुन्हा तीन वेळा करा. |
05:27 | आपल्याकडे अजून तीन बटणे आहेत आणि सर्व एका आडव्या ओळीत align झाली आहेत. |
05:35 | आपली form वर push buttons काढून झाली आहेत. आता आपण त्यांची नावे बदलू या. |
05:43 | त्यासाठी पहिल्या बटणावर डबल क्लिक करा. |
05:49 | आपल्याला Properties window दिसेल. येथे लेबलसमोरSave Record असे टाईप करा. |
05:59 | आता formवरील दुस-या बटणावर क्लिक करा. |
06:06 | आणि Properties window मध्ये आपण लेबलसमोर Undo Changes असे टाईप करा. |
06:15 | तिस-या आणि चौथ्या बटणावर अनुक्रमे Delete Record |
06:25 | व New Record असे टाईप करा. |
06:31 | आता आपण त्यांचे कार्य ठरवू या. |
06:37 | त्यासाठी Save Recordबटणावर क्लिक करा. |
06:43 | आणि Properties window मध्ये Action हे लेबल दिसेपर्यंत खाली scroll करा. |
06:51 | येथे drop down list box वर क्लिक करा आणि मगSave record वर क्लिक करा. |
06:59 | इतर तीन बटणांसाठी ह्याच सूचनांचे पालन करा. |
07:05 | Undo Changes बटणासाठी Undo Changes ही Actionनिवडा. |
07:12 | Delete Record बटणासाठी Delete Record ही Actionनिवडा. |
07:18 | New Record बटणासाठी New Record ही Actionनिवडा. |
07:25 | अशाप्रकारे आता आपण push buttons समाविष्ट केली आहेत. |
07:29 | keyboard shortcut, Control S च्या सहाय्याने आपला form सेव्ह करून ही विंडो बंद करा. |
07:40 | पुढील ट्युटोरियलमध्ये आपण आपल्या form मध्ये अजून तीन साधे बदल करणार आहोत. |
07:47 | नंतर आपण data entry आणि data update करण्यासाठी formचा वापर करणार आहोत. |
07:54 | उदाहरणार्थ जेव्हा लायब्ररीचा सभासद पुस्तक परत करेल तेव्हा आपण ह्या formच्या मदतीने ही माहिती डेटाबेसमध्ये अपडेट करू शकतो. |
08:06 | आता assignment करू. |
08:08 | form मध्ये चौथ्या push बटणाशेजारी पाचवे बटण समाविष्ट करा. आणि वापरण्यापूर्वी form रिफ्रेश करून घ्या. |
08:18 | खाली पुढच्या ओळीवर चार बारीक push बटणे समाविष्ट करा. ज्यांच्या मदतीने आपण records मध्ये नेव्हिगेट करू शकू. |
08:30 | आपण बेसवरील ट्युटोरियलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
08:35 | थोडक्यात आपण form मध्ये push बटण समाविष्ट करण्याबद्दल शिकलो. |
08:40 | *"स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा एक भाग आहे. यासाठी National Mission on Education through ICT, MHRD यांच्याकडून अर्थसहाय्य मिळालेले आहे. |
08:52 | सदर प्रकल्पाचे संयोजन Spoken-Tutorial.org Team ने केले आहे. |
08:57 | *यासंबंधी माहिती या साईटवर उपलब्ध आहे. |
09:02 | ह्या ट्युटोरियलचे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केलेले असून आवाज .... यांनी दिलेला आहे. आपल्या सहभागासाठी धन्यवाद. |