Difference between revisions of "Netbeans/C2/Designing-GUI-for-Sample-Java-Application/Marathi"
From Script | Spoken-Tutorial
Line 213: | Line 213: | ||
|- | |- | ||
| 03.31 | | 03.31 | ||
− | | जसे की '''बटणे''', '''लेबल्स''', '''पॅनेल्स''', '''टॅब्ड पेन'''इत्यादी वापरू. | + | | जसे की '''बटणे''', '''लेबल्स''', '''पॅनेल्स''', '''टॅब्ड पेन''' इत्यादी वापरू. |
|- | |- | ||
Line 581: | Line 581: | ||
|- | |- | ||
| 11.25 | | 11.25 | ||
− | | '''मेनू आयटम,''' '''Exit'''(एग्ज़िट) वर राईट क्लिक करून '''Events'''( इवेंट्स) मधील'''Action'''(एक्षन) मधील '''Action Performed'''(एक्षन पर्फॉर्म्ड ) सिलेक्ट करा. | + | | '''मेनू आयटम,''' '''Exit'''(एग्ज़िट) वर राईट क्लिक करून '''Events'''( इवेंट्स) मधील '''Action'''(एक्षन) मधील '''Action Performed'''(एक्षन पर्फॉर्म्ड ) सिलेक्ट करा. |
|- | |- |
Revision as of 19:35, 17 May 2014
Time | Narration |
---|---|
00.01 | नमस्कार. |
00.02 | Building GUIs using Netbeans वरील पाठात स्वागत. |
00.06 | या पाठात Netbeans चे अतिशय आकर्षक फीचर म्हणजे GUI बिल्डर पाहू. |
00.13 | GUI बनवण्यासाठी Netbeans आपल्याला काय देते ? |
00.16 | हे What You See Is What You Get प्रकारची रचना करण्याची सुविधा देते. |
00.21 | लेआऊट बनवण्यासाठी सोपा इंटरफेस प्रदान करते ज्यात घटक ड्रॅग व ड्रॉप करता येतात. |
00.27 | ह्यात पॅलेटस उपलब्ध होतात ज्यामधे AWT आणि Swing हे घटक आधीच इन्स्टॉल्ड असतात. |
00.33 | यातील प्रभावी व्हिज्युअल एडिटर वापरून पूर्ण GUI ऍप्लीकेशन काही मिनिटात बनवता येते. |
00.39 | या पाठासाठी आपण, |
00.43 | Linux ऑपरेटिंग सिस्टीम Ubuntu v11.04 |
00.46 | आणि Netbeans IDE v7.1.1 वापरणार आहोत. |
00.50 | इन्स्टॉलेशन व इतर गोष्टींबाबत अधिक जाणून घेण्यासाठी सुरूवातीचे पाठ पहा. |
00.56 | या पाठात आपण शिकणार आहोत, |
00.58 | फॉर्म एडिटरचा वापर, |
01.00 | सोर्स एडिटर, |
01.02 | पॅलेट, इन्सपेक्टर आणि प्रॉपर्टीज ही वैशिष्ट्ये. |
01.05 | इव्हेंट हँडलर्स समाविष्ट करणे, |
01.07 | तसेच ऍप्लिकेशन कंपाईल आणि कार्यान्वित करणे. |
01.10 | आता सुरूवात करू. सोपे अकाउंट बॅलन्सचे ऍप्लिकेशन बनवू. |
01.15 | ह्यात खालील गोष्टी करायच्या आहेत, |
01.18 | अकाउंटमधे क्रेडिट केलेली रक्कम तसेच |
01.21 | अकाऊंट मधून डेबिट केलेली रक्कम इनपुट करणे, |
01.24 | आणि शेवटी बॅलन्स काढणे. |
01.26 | ऍप्लिकेशन आकर्षक दिसण्यासाठी त्यात पिक्चर, |
01.31 | सहज व पटकन नेव्हीगेट करता येण्यासाठी वरती मेनूबार समाविष्ट करू. |
01.35 | आता netbeans वर जाऊन नवे प्रोजेक्ट बनवू. |
01.40 | File(फाइल) मेनू मधून New Project(न्यू प्रॉजेक्ट) निवडून Java Application(जावा अप्लिकेशन) सिलेक्ट करा. Next(नेक्स्ट) वर क्लिक करा. |
01.49 | प्रोजेक्टला नाव द्या. |
01.51 | आपण Account balance(अकाउंट बॅलेन्स ) हे नाव देऊ. |
01.58 | main class(मेन क्लास) बनवू नका पण ते main project(मेन प्रॉजेक्ट) म्हणून सेट करा. |
02.02 | finish(फिनिश) वर क्लिक करा. तुमच्या IDE मधे नवे प्रोजेक्ट बनले असेल. |
02.07 | आता मेनूतील File(फाइल) वर जाऊन New File(न्यू फाइल) निवडा. |
02.15 | categories(कॅटगरीज ) खालील Swing GUI(स्विंग जीयूआय) forms निवडा. |
02.18 | File Type(फाइल टाइप) खालील Jframe Form(जे फ्रेम फॉर्म) निवडून, |
02.21 | Next(नेक्स्ट) वर क्लिक करा. |
02.24 | ह्याला आपण Account Balance( अकाउंट बॅलेन्स) असे नाव देत आहोत. |
02.29 | तुम्ही हवे ते नाव देऊ शकता. |
02.33 | Finish(फिनिश ) वर क्लिक केल्यावर हे मुख्य डिझाईनच्या भागात घेऊन जाईल. |
02.39 | आता GUI builder(जीयूआय बिल्डर) समजून घेऊ. |
02.43 | येथे उजवीकडे palette(पॅलेट) आहे. |
02.45 | ज्यात Swing आणि AWT हे आधीच इन्स्टॉल्ड असलेले घटक आहेत. |
02.49 | येथे palette(पॅलेट) च्या खाली Properties(प्रॉपर्टीज) विंडो आहे. |
02.53 | येथे तुम्ही निवडलेल्या घटकांच्या प्रॉपर्टीज दिसतात. |
02.58 | डावीकडे navigator(नॅविगेटर) किंवा inspector(इनस्पेक्टर) आहे. |
03.01 | जे डिझाईन मोडमधील वर्कस्पेसवरील, |
03.05 | फ्रेममधे समाविष्ट केलेले घटक दाखवते. |
03.08 | वरच्या बाजूला source(सोर्स) बटण आहे. |
03.11 | त्यावर क्लिक केल्यावर हे सोर्स कोडवर घेऊन जाईल. |
03.15 | तुमच्या डिझाईनमधे घटक समाविष्ट केल्यावर |
03.18 | ते तुम्हाला संबंधित सोर्स कोड येथे सोर्समधे लिहून देईल. |
03.23 | डिझाईन मोडवर जाऊ आणि कोणते घटक येथे वापरायचे ते पाहू. |
03.28 | ऍप्लीकेशन बनवण्यासाठी पॅलेटमधील घटक |
03.31 | जसे की बटणे, लेबल्स, पॅनेल्स, टॅब्ड पेन इत्यादी वापरू. |
03.38 | Palette मधून swing Containers खालील tabbedPane निवडा. |
03.45 | Tabbed Pane(टेब्ब्ड पेन )निवडून form (फॉर्म)वर क्लिक करा. |
03.50 | हे आपल्याला tabbed frame(टेब्ब्ड फ्रेम) देईल. माऊसद्वारे त्याचा आकार बदलू शकतो. |
03.58 | आता Palette(पॅलेट) वर जाऊन Panel(पॅनेल) निवडा. |
04.02 | आणि तुमच्या frame वर क्लिक करा. |
04.06 | हे आपल्याला टॅब देईल. |
04.09 | आता आणखी एकदा पॅनेल सिलेक्ट करून पुन्हा फॉर्मवर क्लिक करा. |
04.14 | आपल्याकडे एकूण दोन टॅब्ज आहेत. |
04.17 | आता टॅब्जचे नाव बदलण्यासाठी त्यावर डबल क्लिक करू शकता किंवा टॅबवर राईट क्लिक करून edit text(एडिट टेक्स्ट) पर्याय निवडू शकता. |
04.29 | पहिल्या टॅबला image(इमेज) व दुस-याला Balance(बॅलेन्स) असे नवीन नाव देऊ. |
04.37 | आता पुन्हा पॅलेटवर जाऊन swing Controls(स्विंग कंट्रोल्स) मेनूमधून लेबल्स समाविष्ट करू. |
04.43 | Swing Controls(स्विंग कंट्रोल्स) मधून लेबल सिलेक्ट करून आपल्या फॉर्ममधे समाविष्ट करा. |
04.48 | ह्या ऍप्लीकेशनसाठी सहा लेबल्स ची गरज आहे. |
04.54 | आपल्या फॉर्ममधे सहा लेबल्स समाविष्ट केली आहेत. |
04.58 | त्यांच्यावर क्लिक करून त्यांची जागा आणि रचना बदलू शकता. |
05.02 | तसेच माऊसद्वारेही नवी जागा आणि रचना बनवता येते. |
05.06 | आता लेबलवरील टेक्स्ट बदलू. |
05.08 | त्यावर डबल क्लिक किंवा राईट क्लिक करू शकता. |
05.12 | edit text(एडिट टेक्स्ट) निवडा. |
05.14 | आता लेबल्सची नावे बदलू. |
05.16 | मी पहिल्या लेबलला Initial Amount(इनिशियल अमाउंट), |
05.22 | दुस-याला Credit Amount(क्रेडिट अमाउंट), |
05.30 | तिस-याला Debit amount(डेबिट अमाउंट), |
05.35 | चौथ्याला balance( बॅलेन्स) नाव देत आहे. |
05.41 | सुरूवातीची रक्कम रूपये 5000 वर सेट करू. |
05.48 | बॅलन्स कंप्युट केल्यावर तो येथे दाखवू. |
05.53 | परंतु आत्ता येथे stars काढू. |
06.01 | Palette(पॅलेट) वर जाऊन Text Field(टेक्स्टफील्ड) सिलेक्ट करा. आपण credit amount आणि debit amount समोर टेक्स्ट फिल्डस समाविष्ट करू. |
06.16 | आपण text field(टेक्स्टफील्ड) रिकामी ठेवणे गरजेचे आहे. |
06.20 | टेक्स्ट एडिट करून येथील टेक्स्ट काढून टाका. |
06.27 | माऊसद्वारे त्याचा आकार बदलू. |
06.35 | हे पूर्ण झाल्यावर पॅलेटवर परत जा आणि बटण सिलेक्ट करा. |
06.42 | फ्रेममधे खाली बटण समाविष्ट करा. |
06.48 | त्यावर राईट क्लिक करून लेबलचे नाव बदलू शकता. |
06.53 | edit text(एडिट टेक्स्ट) पर्याय निवडून Get Balance(गेट बॅलेन्स) हे नाव द्या. |
06.58 | हे GUI आहे. |
07.01 | आता Image(इमेज) टॅबवर म्हणजेच tab1 वर जाऊन इमेज समाविष्ट करा. |
07.05 | हे करण्यासाठी Palette(पॅलेट) वर परत जा. |
07.08 | आणखी एक Label निवडून पॅनेलवर ड्रॉप करा. |
07.13 | palette(पॅलेट) खालील Properties(प्रॉपेर्टिज) विंडो मधील icon(आइकान) प्रॉपर्टी शोधून त्याच्या उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा. |
07.26 | icons(आइकॉन्स) प्रॉपर्टी विंडो उघडेल. |
07.28 | येथे External Image( एक्सटर्नल इमेज) पर्याय निवडून त्याच्या उजवीकडे असलेल्या तीन बिंदूंवर क्लिक करा. |
07.35 | तुमच्या ऍप्लीकेशनमधे जी इमेज समाविष्ट करायची आहे ती शोधा. |
07.41 | ही इमेज सिलेक्ट करून OK वर क्लिक करा. |
07.48 | माऊसद्वारे ती योग्य ठिकाणी ठेवा. |
07.51 | तुम्ही हे टेक्स्ट काढून टाकू शकता. त्यासाठी लेबलवर डबल क्लिक करा. |
07.59 | आता इमेज समाविष्ट केली आहे. |
08.02 | आता GUI मधे मेनू समाविष्ट करू. |
08.05 | palette(पॅलेट) वर जाऊन swing menus(स्विंग मेनुस) खालील Menu bar (मेनु बार )हा पर्याय निवडा. |
08.12 | Menu Bar(मेनु बार ) निवडून पॅनेलच्या वरच्या बाजूला येथे क्लिक करा. |
08.17 | डिफॉल्ट रूपात येथे File( फाइल) आणि Edit(एडिट) ही मेनू लेबल्स आहेत. |
08.22 | Edit(एडिट) टेक्स्टवर डबल क्लिक करून तिथे Help(हेल्प) लिहा. |
08.28 | तसेच File(फाइल) खाली सबमेनू देखील समाविष्ट करू. |
08.32 | आता डाव्या बाजूला असलेल्या Inspector(इनस्पेक्टर) किंवा navigator(नॅविगेटर) मधील JMenu1(जेमेनुवन) वर राईट क्लिक करा. |
08.39 | Add From Palette(एड फ्रॉम पॅलेट) हा पर्याय निवडून Menu Item(मेनु आइटम) सिलेक्ट करा. |
08.45 | हे Menu Item(मेनु आइटम) समाविष्ट करेल . |
08.47 | त्याचे नाव बदलून तिथे Exit(एग्ज़िट) लिहू. |
08.54 | अशाप्रकारे file(फाइल) मेनूखाली सबमेनू समाविष्ट करून त्या मेनू आयटमचे नाव देखील बदलले. |
09.00 | आता GUI ब-यापैकी पूर्ण झाले आहे. |
09.03 | आता प्रिव्ह्यू पाहू. |
09.05 | वरच्या बाजूला असलेल्या 'Preview Design'(प्रीव्यू डिज़ाइन) बटणावर क्लिक करा. |
09.09 | आपण जे काम केले त्याचा प्रिव्ह्यू दिसेल. |
09.12 | येथे बटणे काम करणार नाहीत. |
09.16 | परंतु कोडमधे समाविष्ट केल्यावर हे सर्व काम करेल. |
09.20 | आता प्रिव्ह्यू बंद करू. |
09.22 | कोड समाविष्ट करण्यापूर्वी इनपुट टेक्स्ट फिल्डला योग्य व्हेरिएबलची नावे देऊ. |
09.28 | balance(बॅलेन्स) टॅबवर जाऊन टेक्स्ट फिल्डला योग्य व्हेरिएबलची नावे देऊ. |
09.34 | inspector(इनस्पेक्टर) मधे JTextfield1 वर राईट क्लिक करा. |
09.40 | चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करा. |
09.43 | व्हेरिएबल चे नाव बदलून credit Amount(क्रेडिट अमाउंट) करा. |
09.50 | Ok क्लिक करा. |
09.53 | येथे डिझाईन मोडमधे textfield(टेक्स्टफील्ड ) वर राईट क्लिक करू शकता. |
09.56 | चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करा. |
10.00 | व्हेरिएबल चे नाव बदलून debit Amount(डेबिट अमाउंट) करा. |
10.04 | Ok क्लिक करा. |
10.08 | आपण या शेवटच्या लेबलला म्हणजेच stars textfields(स्टार्स टेक्स्टफील्ड) लेबलला resultBalance(रिज़ल्ट बॅलेन्स) म्हणू. |
10.16 | पुन्हा चेंज व्हेरिएबल नेम सिलेक्ट करून व्हेरिएबल चे नाव बदलून resultBalance(रिज़ल्ट बॅलेन्स) करा. |
10.23 | Ok क्लिक करा. |
10.25 | आता ऍप्लीकेशन सुरू करण्यासाठी कोड बघू. |
10.30 | हा sample code(सॅम्पल कोड) आहे. |
10.32 | आपल्याला creditAmount(क्रेडिट अमाउंट ) मधून getText()(गेट टेक्स्ट) |
10.37 | आणि debitAmount(डेबिट अमाउंट) मधून getText()(गेट टेक्स्ट) हवे आहे. |
10.39 | balance कंप्युट करून ती रक्कम resultBalance(रिज़ल्ट बॅलेन्स) मधे लिहू. |
10.44 | येथील कोड कॉपी करून IDE वर जाऊ. |
10.51 | getBalance(गेट बॅलेन्स ) बटणावर राईट क्लिक करा. |
10.55 | Events( इवेंट्स) पर्यायातील Action(एक्षन) मधील Action Performed(एक्षन पर्फॉर्म्ड ) सिलेक्ट करा. |
11.00 | हे आपल्याला कोडच्या विभागाकडे नेईल. |
11.03 | जेथे तुम्हाला बटण दाबल्यावर करायच्या कृतीचा कोड लिहावा किंवा पेस्ट करावा लागेल. |
11.10 | कॉपी केलेला कोड येथे पेस्ट करा. |
11.17 | कोड सेव्ह करून Design mode( डिज़ाइन मोड) वर जा. |
11.22 | आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कोड समाविष्ट करू. |
11.25 | मेनू आयटम, Exit(एग्ज़िट) वर राईट क्लिक करून Events( इवेंट्स) मधील Action(एक्षन) मधील Action Performed(एक्षन पर्फॉर्म्ड ) सिलेक्ट करा. |
11.40 | हे सोर्स कोडवर नेईल. येथे ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कोड लिहायचा आहे. |
11.46 | टाईप करा. System.exit(1). |
11.53 | कोड सेव्ह करून डिझाईन मोडवर परत जा. |
11.57 | Exit(एग्ज़िट) मेनू आयटमसाठी शॉर्टकट समाविष्ट करू. |
12.02 | शॉर्टकट पर्यायावर डबल क्लिक करा. उघडलेल्या विंडोमधे, |
12.07 | key stroke(की स्ट्रोक) मधे Q आणि Ctrl चेकबॉक्सवर क्लिक करून OK(ओके) क्लिक करा. |
12.14 | अशाप्रकारे ऍप्लिकेशन मधूनबाहेर पडण्यासाठी Ctrl Q हा कीबोर्ड शॉर्टकट सेट केला आहे. |
12.20 | आता ऍप्लिकेशन पूर्ण झाले आहे. |
12.23 | कीबोर्डवरील F6 दाबून ऍप्लिकेशन कार्यान्वित करा . |
12.30 | कार्यान्वित करायचा main class(मेन क्लास) आधीच सिलेक्ट केलेला आहे. |
12.33 | Ok(ओके) क्लिक करा. |
12.37 | हा GUI आहे. |
12.40 | आता तपासणी कार्यान्वित करू. |
12.43 | balance(बॅलेन्स) टॅबवर जाऊन credit amount(क्रेडिट अमाउंट) मधे 300 रूपये टाईप करा. |
12.47 | आणि debit amount(डेबिट अमाउंट) मधे 200 रूपये टाईप करा. 'Get Balance'(गेट बॅलेन्स) क्लिक करा. |
12.53 | येथे बॅलन्समधे योग्य रक्कम दिसते. |
12.56 | आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडू. |
12.58 | File(फाइल) मधे जाऊन Exit(एग्ज़िट ) वर क्लिक करा. |
13.02 | कीबोर्डवरील Ctrl Q दाबून देखील ऍप्लिकेशन मधून बाहेर पडू शकतो. |
13.08 | अशाप्रकारे ऍप्लिकेशन पूर्ण झाले आहे. आता असाईनमेंट करा. |
13.14 | तुम्हाला टेंपरेचर कन्व्हर्टर ऍप्लिकेशन बनवायचे आहे. |
13.18 | आपल्याकडे आधीसारखेच दोन टॅब्ज असणे गरजेचे आहे. |
13.21 | पहिला सेंटीग्रेडचे फॅरनहाइटमधे आणि दुसरा फॅरनहाइटहीटचे सेल्सियसमधे रूपांतर करण्यासाठी. |
13.27 | आपण इनपुट टेंपरे चर घेऊन, |
13.30 | त्याचे रूपांतरित टेंपरेचर दाखवायचे आहे. |
13.33 | तसेच त्यामधे File(फाइल) आणि Help(हेल्प) हे पर्याय असलेला मेनूबार असावा. |
13.38 | आणि फाईल मेनूमधे ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी कीबोर्ड शॉर्टकट सहित Exit(एग्ज़िट ) आयटम असायला हवा. |
13.46 | ही असाईनमेंट आधीच सोडवलेली आहे. |
13.48 | हे असे दिसायला हवे. |
13.50 | आपण असाईनमेंट कार्यान्वित करत आहोत आणि हा GUI आहे. |
13.56 | आता इनपुट टेंपरेचर म्हणून -40 सेल्सियस टाईप करा. आणि गेट फॅरनहीटवर क्लिक करा. |
14.05 | ऍप्लिकेशननी योग्य रूपांतरित आऊटपुट टेंपरेचर दिले पाहिजे. |
14.10 | आता ऍप्लिकेशन मधून बाहेर पडण्यासाठी Ctrl X ही शॉर्टकट की वापरा. |
14.18 | अशाप्रकारे आपण कीबोर्ड शॉर्टकट वापरून ऍप्लिकेशन मधून बाहेर पडलो आहोत. |
14.25 | स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा. |
14.29 | ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
14.32 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण व्हिडिओ डाउनलोड करूनही पाहू शकता. |
14.37 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
14.42 | परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
14.46 | अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा |
14.52 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे. |
14.56 | यासाठी अर्थसहाय्य नॅशनल मिशन ऑन एज्युकेशन थ्रू आय. सी. टी. , एम .एच. आर. डि. गव्हरमेण्ट ऑफ इंडिया यांच्याकडून मिळालेले आहे. |
15.03 | यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे. |
15.13 | ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते. |
15.17 | सहभागासाठी धन्यवाद . |