Ubuntu-Linux-on-Virtual-Box/C2/Installing-Ubuntu-Linux-OS-in-a-VirtualBox/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
Narration
00:01 VirtualBox मध्ये Installing Ubuntu Linux OS वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत आहे.
00:08 या ट्युटोरिअलमध्ये आपण Windows base machine वर VirtualBox मध्ये Ubuntu Linux 16.04 इन्स्टॉल कसे करणे हे शिकू.
00:18 हे ट्युटोरिअल Windows OS व्हर्जन 10 ,
00:23 VirtualBox व्हर्जन 5.2.18,
00:27 Ubuntu Linux 16.04 OS वापरून रेकॉर्ड केले आहे.
00:31 सुरवात करण्यापूर्वी, कृपया खात्री करून घ्या की तुम्ही Internet शी जुडलेले आहात.
00:36 VirtualBox मध्ये OS install करण्यासाठी, base machine मध्ये खालील कॉन्फिगरेशन असावे.
00:43 i3 processor किंवा उच्चतर,
00:46 RAM 4GB किंवा उच्चतर,
00:49 Hard disk मध्ये 50GB फ्री स्पेस किंवा अधिक
00:54 आणि Virtualization BIOS वर एनेबल असले पाहिजे.
00:58 हे खात्री करेल कि VirtualBox सहजतेने कार्य करेल.
01:03 इन्स्टॉल करण्यापूर्वी, कृपया क्रॉस-चेक करा कि System type he 32-bit किंवा 64-bit आहे.
01:12 असे करण्यासाठी, Start मेनूच्या पुढच्या सर्च बॉक्स वर जा. About your PC टाईप करा.
01:22 About your PC निवडा.
01:25 System type अंतर्गत, आपण पाहू शकतो कि आपण विंडोचा 32-bit किंवा 64-bit व्हर्जनचे वापर करीत आहोत.
01:34 येथे, माझ्या बाबती, ते 64-bit Windows आहे.
01:39 तुमच्या System type च्या आधारावर, या लिंकवरून योग्य Ubuntu Linux 16.04 ISO डाउनलोड करा:

http colon double slash releases dot ubuntu dot com slash 16.04

01:59 32-bit साठी, हे ubuntu hyphen 16.04.5 hyphen desktop hyphen i386 dot iso असेल.
02:12 64-bit साठी हे ubuntu hyphen 16.04.5 hyphen desktop hyphen amd64 dot iso असेल.
02:26 आधी सांगितल्याप्रमाणे, माझे विंडोज सिस्टिम टाईप 64-bit आहे.
02:31 म्हणूनच, मी या प्रदर्शनासाठी ubuntu hyphen 16.04.5 hyphen desktop hyphen amd64.iso file डाउनलोड केली आहे.
02:45 प्रथम, आपण VirtualBox मध्ये virtual machine कशी तयार करावी ते शिकू.
02:52 Desktop वर, हे लाँच करण्यासाठी VirtualBox आयकॉनवर डबल क्लिक करा.
02:59 VirtualBox विंडोच्या शीर्षस्थानी, निळ्या रंगाच्या New आयकॉनवर जा आणि त्यावर क्लिक करा.
03:06 उघडलेल्या Create Virtual Machine विंडोमध्ये, आपण Name and Operating system पृष्ठ पाहू शकतो.
03:14 Name टेक्स्ट बॉक्समध्ये, ते नाव टाईप करा जे तुम्हाला द्यायचे आहे.

मी Ubuntu टाईप करेल.

03:22 नंतर Type ड्रॉप-डाउन मध्ये, Linux निवडा.
03:27 Version ड्रॉप-डाउन मधून, मी Ubuntu (64-bit) निवडेन.
03:33 जर तुमचे base machine 32-bit आहे, तर ड्रॉप-डाउन मधून Ubuntu (32-bit) निवडा.
03:40 आणि विंडोच्या तळाशी Next बटणावर क्लिक करा.
03:44 पुढील पृष्ठ Memory size आहे.

येथे, आपण virtual machine साठी RAM ची साईज आवंटित करतो.

03:52 RAM साठी साईज आवंटित करण्यासाठी slider किंवा टेक्स्ट-बॉक्स वापरा.
03:58 समजा युनिट MB मध्ये आहे, मी टेक्स्ट-बॉक्स मध्ये 4048 टाईप करेल.
04:05 हे या virtual machine साठी 4GB RAM आवंटित करेल.
04:11 जर base machine ची सिस्टिम मेमरी केवळ 4GB असेल, तर virtual machine साठी 2GB आवंटित करा.
04:19 आता, window च्या तळाशी Next बटणवर क्लिक करा.
04:24 Hard disk पृष्ठवर, आपल्याला हे ठरवावे लागेल कि कोणत्या प्रकारची virtual hard disk आपण वापरणार आहोत.
04:32 मी एक नवीन virtual machine तयार करीत आहे. म्हणून मी Create a virtual hard disk now निवडेन.
04:39 हा पर्याय आपल्यासाठी डिफॉल्ट द्वारे आधीच निवडला जाऊ शकतो.
04:44 तळाशी Create बटणवर क्लिक करा.
04:48 Hard disk file type मध्ये, VDI (Virtual Disk Image) निवडा.

आणि, विंडोच्या तळाशी Next बटणवर क्लिक करा.

04:59 पुढील पृष्ठ Storage on physical hard disk मध्ये, आपल्याला हे ठरवावे लागेल कि आपला hard disk storage कसा असावा.

येथे दोन पर्याय आहेत.

05:11 Dynamically allocated पर्याय वापरावर आधारित hard disk storage विस्तृत करेल.
05:19 Fixed Size साईजला आवंटित करेल ज्याला आपण परिभाषित करतो.

मी Fixed size निवडेन.

05:27 आता पुढे जाण्यासाठी Next बटणावर क्लिक करा.
05:31 पुढील पृष्ठ File location and size,' hard disk size आवंटीत करण्यासाठी आहे.
05:38 येथे तुम्ही Ubuntu नाव पाहू शकता जे आपण पूर्वी दिले होते.
05:44 तसेच, उजवीकडे आपण एक folder आयकॉन पाहू शकतो.
05:48 जर तुम्हाला अन्य स्थानावर या Virtual Disk Image ला सेव्ह करायचे असेल, तर या icon' वर क्लिक करून पुढे जा.

मी या प्रदर्शनासाठी हा भाग वगळत आहे.

06:02 नंतर hard disk size आवंटीत करण्यासाठी स्लायडर किंवा टेक्स्टबॉक्सचा वापर करा.
06:09 शिफारस केलेला आकार 10GB आहे, परंतु मी ते 20GB मध्ये बदलेल.
06:16 नंतर, तळाशी Create बटणवर क्लिक करा.
06:20 आपण आतापर्यंत प्रदान केलेल्या तपशीलांसह हे नवीन Virtual Machine base तयार करेल.

यास तयार करण्यास काही वेळ लागू शकतो.

06:31 एकदा Virtual Machine तयार झाल्यानंतर, आपण हे डाव्या बाजूला पाहू शकतो.
06:37 येथे Virtual Machine आहे, Ubuntu, जे आम्ही आता तयार केले आहे.
06:42 हे सूचित करते की आपण Virtual Machine यशस्वीरित्या तयार केली आहे जी VM आहे.
06:49 पुढे, आपण त्यात Ubuntu Linux 16.04 इन्स्टॉल करू.
06:55 डीफॉल्टनुसार, Virtual Machine Power off मोडमध्ये असेल.
07:00 Virtual Machine, Ubuntu निवडा.

नंतर सर्वात वर हिरव्या रंगाच्या एरोने Start बटणवर क्लिक करा.

07:09 एक नवीन विंडो पॉप अप होईल आणि आपल्याला virtual optical disk file किंवा physical optical drive निवडण्यासाठी विचारेल. folder icon वर जा आणि त्यावर क्लिक करा.
07:22 आता, ubuntu hyphen 16.04.5 hyphen desktop hyphen amd64.iso ही फाईल ब्राउज करा आणि निवडा, जी आपण पूर्वी डाउनलोड केली होती.
07:37 आणि, तळाशी Open बटणवर क्लिक करा.
07:41 आता आपल्याला मागील screen वर रिडायरेक्ट(पुनर्निर्देशित) केले जाईल.

लक्षात घ्या की ubuntu hyphen 16.04.5 hyphen desktop hyphen amd64.iso आता निवडलेले आहे.

07:56 इंस्टॉलेशन सुरू करण्यासाठी तळाशी Start बटणावर क्लिक करा.
08:02 आपण येथे पाहू शकतो कि Ubuntu Linux लोड होत आहे.
08:07 प्रथम स्क्रीन जी आपण पाहत आहोत, त्यात तीन पर्याय आहेत.
08:11 डाव्या बाजूला, आपण भाषांची यादी पाहू शकतो.

तुमच्या पसंतीची भाषा निवडा.

08:18 डीफॉल्टनुसार, English निवडले आहे. मी ही निवड त्याप्रमाणे सोडून देईल.
08:25 मध्यभागी आपण दोन पर्याय पाहू शकतो, Try Ubuntu आणि Install Ubuntu.
08:31 जर तुम्हाला इन्स्टॉल करण्यापूर्वी Ubuntu चे स्वरूप आणि अनुभव प्रयत्न करायचे असेल, तर Try Ubuntu वर क्लिक करा.
08:38 अन्यथा, Install Ubuntu वर क्लिक करा.

मी Install Ubuntu पर्यायावर क्लिक करेल.

08:47 पुढील पृष्ठ दोन पर्याय दर्शवते.

Downloading update while installing Ubuntu

आणि, इंस्टॉलेशन दरम्यान Installing some third-party software.

09:00 मी हे वगळेल आणि तळाशी Continue बटणवर क्लिक करेल.
09:05 तिसरा पृष्ठ Ubuntu Linux इंस्टॉलेशन दरम्यान महत्वपूर्ण स्टेप्स मधून एक आहे.

येथे आपल्याला हे ठरवावे लागेल कि आपण Ubuntu Linux कुठे इन्स्टॉल करणार आहोत.

09:18 Something else. हा एक चांगला पर्याय आहे.

जर आपण VirtualBox च्या ऐवजी आपल्या मशीनवर Ubuntu इन्स्टॉल करीत आहोत.

09:28 या पर्यायासह आपल्या base machineमध्ये dual boot OS प्राप्त करू शकतो.
09:34 जसे कि मी VirtualBox वर काम करीत आहे, तर मी Erase disk and install Ubuntu निवडेन.
09:41 हे पर्याय संपूर्ण Virtual hard disk पुसून टाकेल आणि एका पार्टीशन मध्ये Ubuntu OS इन्स्टॉल करेल.
09:49 नंतर तळाशी Install Now बटणवर क्लिक करा.
09:53 Write the changes to the disks? नावाचा एक पॉप-उप विंडो उघडते.
09:59 येथे Continue बटणावर क्लिक करा.
10:03 नंतर Where are you? पृष्ठवर जा.

मी India मध्ये आहे, तर मी India वर क्लिक करेल.

10:11 खाली स्थित टेक्स्ट-बॉक्स मध्ये , हे Kolkata दर्शवते.

आपल्या निवडीवर आधारित, ते वेळ क्षेत्र सेट करेल.

10:21 तळाशी Continue वर क्लिक करा.
10:24 आता आपल्याला आपले Keyboard layout निवडावे लागेल.
10:28 डीफॉल्टनुसार, English (US) दोन्ही बाजूंवर निवडली जाईल.
10:34 जर तुम्हाला भाषा बदलायची असेल, तर इच्छित पर्याय निवडा.

मी English (US) सह पुढे जाईल.

10:42 तळाशी Continue बटणवर क्लिक करा.
10:46 अंतिम स्टेप लॉगिन तपशील प्रदान करणे आहे.

मी Your name फील्ड spoken म्हणून भरले.

10:55 लगेचच Computer’s name आणि Pick a username फील्ड आपल्या इनपुटच्या आधारावर भरले जाईल.

तुम्ही इच्छित असल्यास तुम्ही ही व्हॅल्यू बदलू शकता.

11:07 पुढे, Choose a password टेक्स्ट-बॉक्समध्ये, तुमच्या Ubuntu Linux OS साठी password टाईप करा.

मी spoken टाईप करेल.

11:18 Confirm your password टेक्स्ट-बॉक्स मध्ये , तोच password पुन्हा टाईप करेल.
11:24 कृपया हा पासवर्ड लिहा, या Ubuntu Linux OS साठी admin password आहे.
11:32 पासवर्ड टेक्स्टबॉक्सच्या खाली, आपण काही अधिक पर्याय पाहू शकतो.

मी Require my password to login निवडेल.

11:42 हे आग्रह करेल की, जेव्हा user पासवर्ड प्रविष्ट करेल जेव्हा पण ते लॉगिन करेल.
11:49 इंस्टॉलेशन सह पुढे जाण्यासाठी Continue वर क्लिक करा.
11:53 इंस्टॉलेशन पूर्ण होण्यासाठी काही वेळ लागू शकतो.
11:58 एकदा का इंस्टॉलेशन पूर्ण झाले कि, आपण एक डायलॉग-बॉक्स पाहू शकतो ज्याला Installation Complete म्हणतात.
12:06 डायलॉग बॉक्स मध्ये, Restart Now बटणवर क्लिक करा. .
12:11 स्क्रीनवर Ubuntu लोड होत आहे असा मेसेज प्रदर्शित होतो.

आपल्याला इंस्टॉलेशनचे माध्यम काढून टाकण्यासाठी Enter दाबावे लागेल.

12:20 उदाहरण साठी CD/USB Stick इत्यादी.

तुमच्या कीबोर्डवरील Enter दाबा.

12:28 हे Virtual Machine सुरू करेल आणि आपल्याला login page वर घेऊन जाईल.
12:34 इंस्टॉलेशनदरम्यान आम्ही दिलेल्या तपशीलांसह लॉगिन करा.
12:39 आपल्याला Ubuntu 16.04 Desktop वर आणण्यात आले आहे.

हे दर्शवते की आपण इंस्टॉलेशन यशस्वीरित्या पूर्ण केली आहे.

12:49 Ubuntu बंद करण्यासाठी, वरती उजव्या कोपर्यात power icon वर क्लिक करा.

आणि Shut Down पर्याय निवडा.

12:58 प्रदर्शित पॉपअपमध्ये, मोठ्या Shut Down बटणवर क्लिक करा.
13:04 लगेच, Ubuntu विंडो बंद होते आणि आपण VirtualBox manager वर परत आलो आहोत.
13:11 या सह आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत.

थोडक्यात.

13:16 या ट्युटोरिअलमध्ये, आपण VirtualBox मध्ये Virtual Machine तयार करणे शिकलो.
13:24 Virtual Machine वर Ubuntu Linux 16.04 इन्स्टॉल करणे शिकलो.
13:30 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा.
13:38 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.

अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

13:50 कृपया या फोरममध्ये आपली कालबद्ध प्रश्न पोस्ट करा.
13:54 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

14:06 या ट्युटोरियलसाठी स्क्रिप्ट आणि व्हिडिओचे योगदान NVLI आणि स्पोकन ट्युटोरियल टीम द्वारे करण्यात आले आहे.

आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेते. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Nancyvarkey, Ranjana