Thunderbird/C2/Address-Book/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 Mozilla Thunderbird मधील " एड्रेस बुक " स्पोकन ट्यूटोरियल मध्ये आपले स्वागत.
00:06 या मध्ये आपण, एड्रेस बुक मधून संपर्कांना, जोडणे, पाहणे, सुधारणे आणि डिलीट करणे शिकू.
00:14 तसेच आपण,
00:16 नवीन एड्रेस बुक बनविणे.
00:18 अस्तित्वात असलेले/existing एड्रेस बुक डिलीट करणे.
00:20 इतर मेल आकाउन्ट मधून संपर्क इम्पोर्ट करणे शिकू.
00:24 येथे आपण Ubuntu 12.04 वर, Mozilla Thunderbird 13.0.1 वापरत आहोत.
00:32 एड्रेस बुक म्हणजे काय?
00:34 एड्रेस बुक तुमच्या मोबाईल फोन च्या Contact वैशिष्ट्या प्रमाणे काम करते.
00:39 Contacts बनविणे आणि सुस्थितीत ठेवण्यास तुम्ही एड्रेस बुक वापरू शकता.
00:45 Thunderbird मध्ये एड्रेस बुक चे दोन प्रकार आहेत.
00:48 Personal एड्रेस बुक तुम्हाला नवीन संपर्क बनविण्यास परवानगी देते.
00:53 Collected address book आपोआप outgoing किंवा sent मेल्स मधून इमेल एड्रेस चा संग्रह करतो.
00:59 Launcher मधीलThunderbird आयकॉन वर क्लिक करा.
01:02 Thunderbird विंडो उघडेल.
01:05 आता, Personal Address Book मध्ये संपर्क जोडणे शिकू.
01:10 मेन मेन्यु मधून Tools आणि Address Book वर क्लिक करा.
01:14 Address Book डायलॉग बॉक्स दिसेल.
01:17 डाव्या पैनल मध्ये तुम्ही दोन्ही, Personal आणि Collected एड्रेस बुक बघू शकता.
01:23 डीफोल्ट रुपात, Personal एड्रेस बुक डाव्या पैनल मध्ये निवडलेले आहे.
01:28 उजवे पैनल दोन भागात विभाजित आहे.
01:31 वरील अर्धा भाग contacts दर्शवितो.
01:34 खालील अर्धा भाग, वर निवडलेल्या संपर्काची पूर्ण माहिती दर्शवितो.
01:40 आता नवीन Contact बनवु.
01:44 टूलबार मध्ये, New Contact वर क्लिक करा.
01:47 The New Contact डायलॉग बॉक्स दिसेल.
01:50 Contact tab वर क्लिक करा.
01:53 First मध्ये, AMyNewContact इंटर करा.
01:57 इमेल साठी USERONE@gmail.com एन्टर करा.
02:02 लक्षात घ्या, Display Name फिल्ड आपोआप First Name सोबत अपडेट होईल.
02:10 Private tab वर क्लिक करा. या tab चा उपयोग संपर्कासाठी, संपूर्ण पोस्टल एड्रेस चा संग्रह करण्यास करा.
02:18 तुम्ही, संबंधित माहित आणि संपर्काचा फोटो संग्रह करण्यास, Work, Other आणि Photo tab चा वापर करू शकता.
02:26 Ok वर क्लिक करा.
02:29 जोडलेला संपर्क उजव्या पैनल मध्ये दर्शित झाला आहे.
02:34 अशाप्रकारे आणखी दोन संपर्क जोडू, VMyNewContact आणि ZMyNewContact.
02:48 समजा, संपर्क नावाच्या आधारे क्रमबद्ध करायचे आहे.
02:52 मेन मेन्यु मधून, View, Sort by, आणि Name वर क्लिक करा.
02:58 लक्षात घ्या, संपर्क डिफ़ॉल्ट रुपात चढत्या क्रमाने क्रमबद्ध झाले आहेत.
03:04 हे चढत्या क्रमाने क्रमबद्ध करण्यासाठी, मेन मेन्यु मधून, View, Sort by आणि Ascending वर क्लिक करा.
03:13 एकांतरित Address Book डायलॉग बॉक्स मध्ये, उजव्या पैनल मधून, Name वर क्लिक करा.
03:19 नावे आता उतरत्या क्रमामध्ये क्रमबद्ध झाले आहेत.
03:24 आता, संपर्क शोधू.
03:27 आपण संपर्कांना नाव किंवा इमेल द्वारे शोधू शकता.
03:33 चला, AMyNewContact हे नाव शोधू.
03:37 Address Book डायलॉग बॉक्स वर जा.
03:40 Search फिल्ड मध्ये, AMyNewContact एन्टर करा.
03:45 Search फिल्ड पहा.
03:47 Magnifying glass आयकॉन ऎवजी, छोटे क्रॉस आयकॉन दर्शित होते.
03:54 वर उजव्या पैनल मध्ये, फक्त AMyNewContact दर्शित झाला आहे.
04:01 Search फिल्ड मध्ये, क्रॉस आयकॉन वर क्लिक करा.
04:05 सर्व संपर्क वर उजव्या पैनल मध्ये दिसत आहे.
04:09 ट्यूटोरियल थांबवून Assignment करा.
04:13 इमेल्स ला Subject द्वारे शोधा.
04:16 समजा, ZMyNewContact संपर्क माहिती बदलली आहे.
04:21 आपण हि माहिती संपादित करू शकतो का? हो, करू शकतो.
04:26 उजव्या पैनल वरूनZMyNewContact निवडा.
04:30 Context मेन्यु साठी right-click करा आणि Properties निवडा.
04:36 Edit Contact For ZMyNewContact डायलॉग बॉक्स दिसेल.
04:42 आता, नावाला MMyNewContact मध्ये बदलू.
04:46 आता, Display Name फील्ड ला MMyNewContact मध्ये बदलू.
04:53 आपण Work Title आणि Department सुद्धा जोडू.
04:57 Work tab क्लिक करा.
04:59 Title मध्ये Manager आणि Department मध्ये HR प्रविष्ट करा. OK क्लिक करा.
05:06 खाली उजव्या पैनल मध्ये अपडेट झालेले संपर्क विवरण पहा.
05:13 Thunderbird मधील अनावश्यक संपर्क कसे डीलीट करू शकतो?
05:18 संपर्क निवडा.
05:20 Context मेन्यु पाहण्यास right-click करून डिलीट वर क्लिक करा.
05:25 Confirmation डायलॉग बॉक्स दिसेल. OK वर क्लिक करा.
05:30 संपर्क डिलीट झाला आहे आणि संपर्क सूची वर दिसणार नाही .
05:37 Thunderbird तुम्हाला स्वताचे एड्रेस बुक बनविण्याची परवानगी देतो.
05:41 हे दोन डिफॉल्ट बुक्स Personal Address Book आणि Collected Addresses ने जोडलेले आहे.
05:50 आता, नवीन एड्रेस बुक बनवू.
05:53 लक्षात ठेवा, तुम्हाला Address Book डायलॉग बॉक्स खुला ठेवावा लागेल.
05:58 मेन मेन्यु मधुन, फाईल वर जा New वर क्लिक करा आणि एड्रेस बुक निवडा.
06:04 The New Address Book डायलॉग बॉक्स दिसेल.
06:08 Address Book Name फिल्ड मध्ये, Office Contacts टाईप करा. OK वर क्लिक करा.
06:16 आपण बनविलेले एड्रेस बुक, डाव्या पैनल मध्ये, दर्शित होत आहे.
06:20 तुम्ही डीफोल्ट एड्रेस बुक प्रमाणे, या एड्रेस बुक चा वापर करू शकता.
06:28 ट्यूटोरियल थांबवून हि Assignment करा.
06:31 नवीन एड्रेस बुक बनवून त्यात संपर्क जोडा.
06:36 पुढे, चला एड्रेस बुक डिलीट करणे शिकू.
06:41 लक्षात ठेवा, जर तुम्ही एड्रेस बुक डिलीट कराल, तर त्या संबंधित असलेले सर्व संपर्क हि डिलीट होतील.
06:50 एड्रेस बुक Office Contacts डिलीट करण्यास डाव्या पैनल वरून ते निवडा.
06:56 Context मेन्यु पाहण्यास right-click करा आणि Delete निवडा.
07:01 केलेली क्रिया डिलीट करण्याच्या सुनिश्चिते साठी डायलॉग बॉक्स दिसेल. OK वर क्लिक करा.
07:10 Address Book डिलीट झाले आहे.
07:14 ट्यूटोरियल थांबवून हि Assignment करा.
07:17 Additional Office Contacts नाव असलेले नवीन एड्रेस बुक बनवा.
07:22 Address Book टूलबार मध्ये Edit पर्याय वापरा.
07:27 हे एड्रेस बुक डिलीट करा.
07:30 मेन मेन्यु मधून एड्रेस बुक डायलॉग बॉक्स मध्ये, Edit आणि Search Addresses निवडा.
07:37 एड्रेसेस च्या शोधा साठी Advanced Search पर्याय वापरा.
07:43 Thunderbird इतर मेल अकाउंट मधून हि संपर्क इम्पोर्ट करण्यास परवानगी देते.
07:48 अशाप्रकारे आपण संपर्क माहिती न गमावता, संपर्क अपडेट करू शकतो.
07:55 आपल्या जीमेल अकाउंट मधून संपर्क इम्पोर्ट करू.
07:59 जीमेल अकाउंट उघडू .
08:02 नवीन ब्राउजर उघडा आणि url वर www.gmail.com टाइप करा. Enter दाबा.
08.12 Gmail होम पेज दिसेल.
08:15 Username STUSERONE@gmail.com प्रविष्ट करा. तुमचा पासवर्ड प्रविष्ट करा.
08:24 Sign In वर क्लीक करा. Gmail विंडो दिसेल.
08:29 या ट्यूटोरियल च्या उद्देशासाठी आम्ही Gmail मध्ये 4 संपर्क बनविले आहेत.
08:35 Gmail विंडो च्या वर डाव्या बाजूला, Gmail आणि Contacts वर क्लिक करा.
08:41 Contacts tab दिसेल.
08:44 More वर क्लिक करून Export निवडा.
08:48 Export contact डायलॉग बॉक्स दिसेल.
08:51 Which contacts do you want to export?, फिल्ड मध्ये All contacts निवडा.
08:58 Which export format फिल्ड मध्ये, Outlook CSV format निवडा. Export वर क्लिक करा.
09:06 Opening contacts.csv डायलॉग बॉक्स दिसेल.
09:11 Save File निवडून OK वर क्लिक करा.
09:15 Downloads डायलॉग बॉक्स दिसेल.
09:18 हे डीफ़ॉल्ट फोल्डर आहे ज्यामध्ये डॉक्यूमेंट्स सेव्ड आहे.
09:23 फाईल contact.csv रुपात डीफोल्ट Downloads फोल्डर मध्ये सेव्ड आहे.
09:30 Downloads डायलॉग बॉक्स बंद करा.
09:34 Main मेन्यु मधून, Tools वर क्लिक करा आणि Import निवडा.
09:39 Import डायलॉग बॉक्स दिसेल.
09:42 Address Book निवडा. Next वर क्लिक करा.
09:47 Select type of file list मधून Text file वर क्लीक करा. Next वर क्लिक करा.
09:54 Downloads फोल्डर ब्राउज करा.
09:57 Select which type of file are shown button वर क्लिक करा. All Files निवडा.
10:04 contact.csv निवडा. Open वर क्लिक करा.
10:10 Import Address Book डायलॉग बॉक्स दिसेल.
10:14 खात्री करा, First record contains field names बॉक्स तपासलेला आहे.
10:20 या ट्यूटोरियल मध्ये आपण First Name, Last Name आणि Primary Email फील्ड तपासू आणि जोडू.
10:28 डाव्या बाजूवरील इतर सर्व फ़ाइल्स अनचेक करू.
10:33 डाव्या बाजूचे First Name उजव्या बाजूच्या First Name सोबत जुळत आहे.
10:39 तुम्हाला डाव्या बाजूच्या Mozilla Thunderbird Address Book फिल्ड ला, उजव्या बाजूच्या कॉलम Gmail Record Data To Import सोबत जोडण्यास,
10:47 Move Up आणि Move Down बटणाचा वापर करावाच लागेल.
10:52 डाव्या बाजूची Last Name फिल्ड निवडा आणि Move Down बटनावर क्लिक करा.
10:58 लक्षात घ्या, Address Book फिल्ड कॉलम आणि Record Data to Import कॉलम वरील Last Name आता, जुळलेले आहेत.
11:07 Primary Email निवडा आणि ते Email Address सोबत जुळेपर्यंत Move Down बटनावर क्लिक करून OK वर क्लीक करा.
11:17 Address Book इम्पोर्ट झाले आहे, असा मेसेज दर्शित होईल. Finish वर क्लिक करा.
11:24 Gmail Address Book, Thunderbird मध्ये इम्पोर्ट झाले आहे.
11:28 Address Book डायलॉग बॉक्स च्या डाव्या पैनल मध्ये नवीन संपर्क फोल्डर जोडलेला आहे.
11:36 contacts क्लिक वर करा.
11:38 First Name, इमेल एड्रेस सोबत दर्शित होईल.
11:43 आपण Gmail एड्रेस बुक ला Thunderbird मध्ये इम्पोर्ट केले आहे.
11:48 डायलॉग बॉक्स च्या वर डाव्या कोपऱ्यात लाल क्रॉस वर क्लिक करून Address Book बंद करा.
11:55 शेवटी, Thunderbird लॉग आउट करण्यास, मेन मेन्यु मधून File आणि Quit वर क्लिक करा.
12:02 हा पाठ येथे संपत आहे.
12:06 या ट्यूटोरियल मध्ये आपण, एड्रेस बुक च्या संपर्कांना कशाप्रकारे, जोडणे, पाहणे, सुधारणे आणि डिलीट करणे शिकलो. तसेच आपण,
12:17 नवीन एड्रेस बुक बनविणे.
12:19 existing एड्रेस बुक डिलीट करणे.
12:21 इतर मेल आकाउन्ट मधून संपर्क इम्पोर्ट करणे हि शिकलो.
12:25 तुमच्या साठी Assignment आहे.
12:27 नवीन Address Book बनवा.
12:29 संपर्क जोडा आणि पहा.
12:32 वैयक्तिक इमेल आयडी वरून तुमच्या Thunderbird च्या आकाउंट मध्ये संपर्क इम्पोर्ट करा.
12:38 Address Book इम्पोर्टींग करताना सर्व फिल्ड निवडा आणि जुळवा.
12:43 प्रकल्पाची माहिती दिलेल्या लिंक वर उपलब्ध आहे.
12:46 ज्यामध्ये तुम्हाला प्रोजेक्ट चा सारांश मिळेल.
12:50 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर व्हिडिओ download पाहू शकता.
12:54 स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट टीम.
12:56 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
12:59 परीक्षा उतीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
13:03 अधिक माहितीसाठी कृपया contact@spoken-tutorial.org वर लिहा.
13:10 "स्पोकन ट्यूटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
13:14 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India कडून मिळालेले आहे.
13:22 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
13:32 ह्या ट्यूटोरियल मराठी भाषांतर कविता साळवे आणि आवाज रंजना भांबळे यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, Pratik kamble