Synfig/C3/Plant-animation/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:00 | Synfig वापरून Create a Plant animation वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:05 | या ट्युटोरिअलमध्ये आपण Synfig मध्ये एनिमेट केलेल्या आकृत्यांशी स्वतःला परिचित करू. |
00:11 | आपण आकृत्यांना काढणे आणि लेअर्सना ग्रुप करणे शिकू. |
00:15 | Insert item वापरून एक vertex जोडणे. |
00:18 | Split tangent पर्याय. |
00:21 | active point as off पर्याय मार्क करणे. |
00:24 | आकृत्यांना एनिमेट करणे. |
00:26 | येथे आपण एक Plant animation तयार करूया. |
00:29 | या ट्युटोरिअलसाठी मी |
00:31 | उबंटू लिनक्स 14.04 OS, |
00:35 | Synfig व्हर्जन 1.0.2 वापरत आहे. |
00:39 | आता Synfig उघडू. |
00:41 | Dash home वर जा आणि टाईप करा Synfig. |
00:45 | तुम्ही logo वर क्लिक करून Synfig उघडू शकता. |
00:50 | आता आपण Plant animation तयार करणे सुरू करूया. |
00:54 | आपल्याला प्रथम "'Synfig मधील ग्राफिक्स तयार करणे आवश्यक आहे. |
00:59 | आपण एक फुलांचे रोप तयार करू. |
01:02 | आपली Synfig फाईल सेव्ह करू. |
01:05 | File वर जा आणि Save वर क्लिक करा. |
01:08 | सेव्ह करण्यासाठी फोल्डर निवडा. |
01:11 | फाईलचे नाव Plant-animation म्हणून टाईप करा आणि Save बटणवर क्लिक करा. |
01:16 | कोणतीही अन्य आकृती काढण्यापूर्वी एक पांढरा बॅकग्राऊंड (पार्श्वभूमी) लेअर काढा. |
01:21 | लेअरचे नाव Background म्हणून बदला. |
01:26 | toolbox वर जा. Spline tool निवडा. |
01:30 | फक्त Create Region Layer निवडले आहे याची खात्री करा. |
01:35 | toolbox मध्ये, कलर हिरव्यामध्ये सेट करा. |
01:38 | येथे दर्शविल्याप्रमाणे Spline टूलसह एक त्रिकोण काढा. |
01:43 | ३ व्हर्टायसेस (शिरोबिंदू) काढल्यानंतर आपण ही आकृती बंद केली पाहिजे. |
01:49 | असे करण्यासाठी, पहिल्या व्हर्टेक्सवर (शिरोबिंदू) राईट क्लिक करा आणि '"Loop Spline निवडा. |
01:55 | हे हिरव्या त्रिकोणाच्या आकृतीचा शोध घेईल. |
01:57 | राउंडर त्रिकोण तयार करण्यासाठी, आपल्याला टेन्जेन्ट हॅन्डल्स थोडेसे हलवावे लागेल. |
02:03 | Transform tool वर क्लिक करा आणि नंतर प्रत्येक व्हर्टेक्सवर राईट क्लिक करा. |
02:09 | Split tangents निवडा जेणेकरून प्रत्येक व्हर्टेक्सच्या टेन्जेन्ट हॅन्डल्सना वेगळे हलवून हलवता येईल. |
02:18 | Layers पॅनलमध्ये बघा. |
02:20 | एक नवीन लेअर तयार केली आहे. त्याचे नाव Stem असे देऊ. |
02:24 | फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S दाबा. |
02:29 | आता आपण फांदीची (स्टेम)आकृती एनिमेट करणे शिकू. |
02:34 | Turn on animate editing mode आयकॉन वर क्लिक करा. |
02:38 | Stem लेअरवर क्लिक करून आकृती निवडा. |
02:42 | कॅनव्हसच्या वर Toggle tangent handles पर्याय ON (चालू) आहे याची खात्री करा. |
02:50 | नंतर, Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 24th फ्रेमवर ठेवा. |
02:57 | Transform tool निवडा. |
03:00 | दाखवल्याप्रमाणे फांदीच्या शीर्ष व्हर्टेक्सवर (शिरोबिंदू) क्लिक करा आणि त्यास कॅनव्हसवर वरच्या बाजूस ड्रॅग करा. |
03:06 | तुम्ही झूम इन आणि झूम आउट करण्यासाठी + आणि - चिन्हाचा वापर करू शकता. |
03:13 | नंतर रुलरवर जा. |
03:17 | दर्शविल्याप्रमाणे कॅनव्हसवर पाच गाईडलाईन्स ड्रॅग करा. |
03:24 | फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा. |
03:29 | Toolbar वर Transform tool वर क्लिक करा. |
03:32 | canvas वर, आकृतीवर राईट क्लिक करा. |
03:36 | नंतर Insert item and keep shape वर क्लिक करा. |
03:40 | येथे केल्याप्रमाणे Guidelines वर आणखी 10 व्हर्टायसेस (शिरोबिंदू) जोडा. |
03:45 | Insert item and keep shape वर क्लिक करून हे करा. |
03:49 | आता प्रत्येक व्हर्टेक्सवर राईट क्लिक करा. |
03:53 | Split tangents निवडा जेणेकरून प्रत्येक व्हर्टेक्सच्या टेन्जेन्ट हॅन्डल्सना वेगळे करून हलवता येईल. |
04:00 | नंतर Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 23rd फ्रेमवर ठेवा. |
04:06 | parameter panel वर जा. |
04:08 | ग्रुप उघडण्यासाठी Vertices च्या त्रिकोण चिन्हावर क्लिक करा. |
04:13 | नवीन जोडलेल्या व्हर्टायसेस तपासा. |
04:15 | आपल्याला त्यांना 23rd फ्रेमवर निष्क्रिय करणे आवश्यक आहे. |
04:19 | नवीन जोडलेल्या व्हर्टायसेसवर राईट क्लिक करा. |
04:22 | Mark active point as off वर क्लिक करा. |
04:26 | सर्व नवीन जोडलेल्या व्हर्टायसेसवर त्याचप्रमाणे करा. |
04:39 | फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा. |
04:43 | पुन्हा एकदा, Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 30th फ्रेमवर ठेवा. |
04:49 | canvas वर परत येऊ. |
04:50 | दर्शविल्याप्रमाणे, पानांचा सुरवातीचा भाग तयार करण्यासाठी व्हर्टायसेस हलवा. |
04:57 | पुन्हा, Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 37th फ्रेमवर ठेवा. |
05:04 | आता canvas वर परत येऊ. |
05:06 | अशा प्रकारे पाने तयार करण्यासाठी व्हर्टायसेस हलवा. |
05:11 | लक्षात ठेवा केवळ नवीन जोडलेल्या व्हर्टायसेससाठी active point as off मार्क करा. |
05:18 | Time track panel वर परत जा. |
05:20 | टाइम कर्सर 45th फ्रेमवर ठेवा आणि येथे दाखवल्याप्रमाणे वरील व्हर्टेक्स हलवा. |
05:30 | अशाच प्रकारे आपण Stem च्या लेअरमध्ये आणखी दोन पाने जोडू. |
05:35 | Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 80th फ्रेमवर ठेवा. |
05:40 | कळ्याभोवती हिरव्या रंगाच्या सेपल्स तयार करण्यासाठी स्टेमचे व्हर्टायसेस हलवा. |
05:53 | पुन्हा एकदा, Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 90th फ्रेमवर ठेवा. |
05:59 | नंतर Keyframes वर जा आणि एक नवीन keyframe जोडा. |
06:02 | आता Spline टूलवर क्लिक करा. |
06:05 | केवळ Create Region Layer'" निवडले असल्याचे खात्री करा. |
06:11 | toolbox मध्ये, कलर गुलाबीवर सेट करा. |
06:14 | नंतर दर्शविल्याप्रमाणे Spline टूलसह एक कळी काढा. |
06:19 | 3 व्हर्टायसेस (शिरोबिंदू) रेखाटल्यानंतर ही आकृती बंद करणे लक्षात ठेवा. |
06:25 | असे करण्यासाठी, पहिल्या व्हर्टेक्सवर राईट क्लिक करा आणि Loop Spline'" निवडा. |
06:31 | लक्षात घ्या की फॉर्मचा ट्रेस (शोध घेणे) आता बंद आहे. |
06:36 | व्हर्टायसेस समायोजित करून कळीची आकृती काढा. |
06:40 | लेअरचे नाव Bud म्हणून बदला. |
06:43 | Stem लेअरच्या खाली Bud लेअर ठेवा. |
06:47 | पुन्हा, Time track panel वर जा आणि टाइम कर्सर 99th फ्रेमवर ठेवा. |
06:54 | येथे केल्याप्रमाणे, कळीच्या वरच्या व्हर्टेक्सला हलवा. |
06:58 | फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा. |
07:03 | आता, Layers panel वर जा आणि Stem लेअर निवडा. |
07:07 | यानंतर, कॅनव्हसवर परत या आणि स्टेमच्या (फांदी) आकृतीवर राईट क्लिक करा. |
07:13 | Insert item and keep shape वर क्लिक करून व्हर्टेक्स जोडा. |
07:18 | त्याचप्रमाणे आपल्याला आणखी ४ व्हर्टायसेस जोडायचे आहे. |
07:22 | टाइम कर्सर 98th फ्रेमवर ठेवा आणि या व्हर्टायसेससाठी active point off मार्क करा. |
07:33 | दर्शविल्याप्रमाणे व्हर्टायसेस हलवा, जेणेकरून आपल्याला अशी आकृती मिळेल. |
07:41 | फाईल सेव्ह करण्यासाठी Ctrl आणि S कीज दाबा. |
07:45 | आपले काम वारंवार सेव्ह करण्याची ही चांगली सवय आहे. |
07:49 | जसे आम्ही ट्युटोरिअलमध्ये पुढे जाऊ, मी हे स्पष्टपणे उल्लेख करणार नाही. |
07:54 | कृपया नियमित वेळ अंतराने हे स्वतः करा. |
07:58 | Time track panel वर परत जा आणि टाइम कर्सर 100th फ्रेमवर ठेवा. |
08:03 | Layers पॅनल वर जा आणि Bud लेअर निवडा. |
08:06 | दोनदा Duplicate वर क्लिक करा. |
08:10 | लेअर्सना petal_1 आणि petal_2 म्हणून नाव द्या. |
08:19 | टाइम कर्सर 108th फ्रेमवर ठेवा. |
08:22 | दर्शविल्याप्रमाणे पाकळयांच्या नोड्स हलवा. |
08:26 | Time track panel वर परत जा आणि टाइम कर्सर 115th फ्रेमवर ठेवा. |
08:34 | Layers पॅनल वर जा आणि दोन्ही petal_1 आणि petal_2 लेअर्स निवडा. |
08:40 | Duplicate वर क्लिक करा. |
08:43 | नवीन लेअर्सना petal_3 आणि petal_4 म्हणून नाव द्या. |
08:47 | Time track panel वर परत येऊ या. |
08:52 | टाइम कर्सर 120th फ्रेमवर ठेवा. |
08:56 | दर्शविल्याप्रमाणे ३ आणि ४ पाकळीच्या व्हर्टायसेसला हलवा. |
09:03 | Layers पॅनल वर जा आणि दोन्ही petal _3 आणि petal_4 लेअर्सना निवडा. |
09:10 | Duplicate वर क्लिक करा. |
09:12 | नवीन लेअर्सना petal_5 आणि petal_6 म्हणून नाव द्या. |
09:17 | Time track panel वर परत या, टाइम कर्सर 140th फ्रेमवर ठेवा. |
09:23 | दर्शविल्याप्रमाणे ५व्या आणि 6व्या पाकळीच्या व्हर्टायसेसला हलवा. |
09:33 | पुन्हा Time track panel वर जा टाइम कर्सर 108th फ्रेमवर ठेवा. |
09:42 | नंतर Toolbar वर जा Transform tool वर क्लिक करा. |
09:46 | चित्राच्या फांदीचा भाग निवडा. |
09:48 | आणि येथे दर्शविल्याप्रमाणे, कळीच्या हिरव्या सेपल्सचे व्हर्टायसेस हलवा. |
09:55 | Time track panel वर परत या. टाइम कर्सर 128th फ्रेमवर ठेवा. |
10:01 | येथे दर्शविल्याप्रमाणे, कळीच्या हिरव्या सेपल्सचे व्हर्टायसेस हलवा. |
10:13 | कर्सर 0th फ्रेमवर ठेवा. Bud लेअर निवडा. |
10:17 | Parameter panel वर जा. Amount 0 मध्ये बदला. |
10:20 | त्याचप्रमाणे petals लेअर्ससाठी करा. |
10:34 | तसेच 89th फ्रेमसाठी करू. |
10:46 | Turn off animate editing mode आयकॉन वर क्लिक करा. |
10:51 | कॅनव्हसच्या तळाशी Seek to begin वर क्लिक करा. |
10:55 | Play आयकॉनवर क्लिक करून एनिमेशन प्ले करा. |
10:58 | आता gradient मध्ये background लेअर जोडू. |
11:02 | Background लेअर निवडा. gradient वर क्लिक करा. |
11:06 | दर्शविल्याप्रमाणे बॅकग्राऊंडवर (पार्श्वभूमी) ग्रेडियंट ड्रॅग करा. |
11:11 | ओउटलाईनचे रंग तपकिरी मध्ये सेट करा आणि निळा रंग भरा. |
11:15 | आता आपली '"Synfig"' फाईल सेव्ह करू. |
11:18 | आता आपण प्रीव्यू तपासू. |
11:21 | File वर जा आणि नंतर Preview वर क्लिक करा. |
11:25 | Quality 0.5 वर आणि Frame per second 24 वर सेट करा. |
11:30 | Preview बटणावर क्लिक करा आणि नंतर Play बटणावर क्लिक करा. |
11:35 | आपण स्क्रीनवरील एनिमेशनचे प्रीव्यू पाहू शकतो. |
11:40 | Preview विंडो बंद करा. |
11:42 | आता आपण एनिमेशन रेंडर करू. |
11:46 | असे करण्यासाठी, File वर क्लिक करा आणि नंतर Render वर क्लिक करा. |
11:51 | Choose वर क्लिक करा आणि Save render as विंडो उघडा. |
11:56 | तुम्हाला रेंडर केलेली फाईल सेव्ह करायची आहे त्या लोकेशन वर क्लिक करा. |
12:00 | नाव plant-animation.avi मध्ये बदला. |
12:05 | Target ड्रॉप डाउन मेनूवर क्लिक करा आणि एक्सटेंशन ffmpeg. म्हणून निवडा. |
12:10 | पुढे, Time टॅबवर क्लिक करा आणि End time 150 मध्ये बदला. |
12:16 | नंतर Render वर क्लिक करा. |
12:21 | आपण आपली एनिमेशन तपासू. |
12:24 | Desktop वर जा. |
12:27 | ज्या फोल्डरमध्ये आपण आपली फाईल सेव्ह केली ते फोल्डर उघडा. |
12:31 | आता plant-animation. avi निवडा. |
12:35 | राईट क्लिक करून Firefox वेब ब्राउजर वापरून एनिमेशन प्ले करा. |
12:48 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. |
12:51 | थोडक्यात. |
12:53 | या ट्युटोरिअलमध्ये आपण Synfig मध्ये एक प्लांट एनिमेट करणे शिकलो. |
12:58 | आपण हे देखील शिकलो |
13:00 | Spline टूल सह आकृत्या काढणे. |
13:03 | Insert item वापरून एक व्हर्टेक्स जोडा. |
13:07 | Split tangent पर्याय |
13:09 | active point as off पर्याय मार्क करणे. |
13:13 | आकृत्यांना एनिमेट करणे. |
13:15 | येथे तुमच्यासाठी एक असाइन्मेंट आहे. |
13:17 | वेगवेगळ्या रंगांनी भरलेल्या लांब केसांसह साध्या कार्टूनचा चेहरा काढा. |
13:22 | आणि केस ऍनिमेट करा. |
13:26 | तुमची पूर्ण झालेली असाइनमेंट अशी दिसली पाहिजे. |
13:29 | ऍनिमेट केलेल्या लांब केसांसह कार्टूनचा चेहरा. |
13:33 | तुम्हाला Spoken Tutorial प्रॉजेक्टचा सारांश मिळेल. |
13:37 | कृपया डाउनलोड करून पहा. |
13:40 | स्पोकन ट्युटोरिअल प्रोजेक्ट टीम. Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
13:45 | कृपया आमच्याशी संपर्क साधा. |
13:47 | कृपया या फोरममध्ये तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. |
13:51 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
13:58 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद. |