Synfig/C2/Overview-of-Synfig/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Overview and Installation of Synfig वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत.
00:08 या ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत: Synfig चे इंटरफेस.
00:13 Synfig मध्ये रेखांकन आणि एनिमेट करणे आणि या सिरीज अंतर्गत विविध ट्यूटोरियलमध्ये उपलब्ध असलेली सामग्री.
00:22 या ट्युटोरिअलसाठी मी उबंटू लिनक्स 16.04 OS व्हर्जन,
00:30 Synfig व्हर्जन 1.0.2
00:35 हे ट्युटोरिअल अनुसरण्यासाठी, तुम्हाला Inkscape
00:40 आणि एनिमेशन तत्वांचे ज्ञान असावे.
00:43 प्रथम आपण Synfig बद्दल शिकू.
00:46 Synfig हे 2D एनिमेशन सॉफ्टवेअर आहे. हे एक मुक्त ओपन सोअर्स सॉफ्टवेअर आहे.
00:53 पुढे, आपण Synfig ची काही वैशिष्ट्ये शिकू.
00:57 हे Linux, Windows आणि Mac ऑपरेटिंग सिस्टमवर कार्य करते.
01:02 हे विविध आकार काढू शकते आणि टेक्स्ट एनिमेशन तयार करू शकते.
01:07 ते png इमेजेसना आयात करू शकतात आणि त्या इमेजेसना एनिमेट करू शकतात.
01:12 हे Cutout एनिमेशन तयार करते.
01:16 हे Character walk cycle देखील तयार करते.

आउटपुट gif, avi आणि इतर अनेक फॉरमॅट्समध्ये रेंडर केले जाऊ शकते.

01:26 Synfig चा वापर एनिमेशनमध्ये स्वारस्य असलेल्या 2 डी अॅनिमेटर्स,
01:30 शाळेतील आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांद्वारे केले जाऊ शकते.
01:34 पुढे आपण पाहू कि उबंटू OS वर Synfig कसे इन्स्टॉल करावे.
01:39 इंस्टॉलेशन प्रक्रिया अनुसरण्यासाठी, तुम्हाला इंटरनेटशी जुडने आवश्यक आहे.
01:44 Ctrl + Alt + T कीज एकत्र दाबून terminal उघडा.
01:50 आता टर्मिनल मध्ये टाईप करा sudo space apt hyphen get install synfigstudio आणि एंटर दाबा. आवश्यक असल्यास system password प्रविष्ट करा.
02:07 हे एक मेसेज दर्शवेल कि डिस्क मध्ये किती जागा(स्पेस) व्यापली जाईल.
02:13 Y टाईप करा आणि याची पुष्टी करण्यासाठी एंटर दाबा.

हे Synfig इन्स्टॉल करेल.

02:18 "Synfig" यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले आहे का ते तपासू.
02:22 टर्मिनल मध्ये टाईप करा, synfigstudio आणि एंटर दाबा.
02:28 आपण पाहू शकतो कि Synfig console उघडते.
02:31 आता आपण विंडोज ऑपरेटिंग सिस्टिमवर Synfig चे इंस्टॉलेशन शिकू.
02:37 इंस्टॉलेशनची प्रक्रिया अनुसरण्यासाठी, तुम्हाला इंटरनेटशी जुडने आवश्यक आहे.

आपले डीफॉल्ट वेब ब्राउजर उघडा.

02:45 address bar मध्ये, url टाईप करा: https://www.synfig.org/download-stable.

एंटर दाबा.

03:02 Choose your OS ड्रॉप डाउन बॉक्समध्ये, तुमचे OS तपशील निवडा - Windows 64bit / Windows 32bit.

मी Windows 64bit निवडेन.

03:15 Name a fair price फील्ड मध्ये, 0(जिरो) टाईप करा आणि GET SYNFIG एंटर करा.

एक पॉपअप विंडो दिसते.

03:23 दाखवल्याप्रमाणे तुम्हचा ईमेल-आयडी टाईप करा. Continue वर क्लिक करा.
03:29 पुढे ड्रॉपडाउन बॉक्समध्ये तुमचे लोकेशन(स्थान) निवडा आणि Continue दाबा.

Complete Checkout वर क्लिक करा.

03:37 तुम्हाला Paddle help@paddle.com कडून एक ईमेल मिळेल.

तुमचा ईमेल तपासा आणि मेल मध्ये Download बटणवर क्लिक करा.

03:47 एक पॉपअप विंडो दिसेल. Save वर क्लिक करा.
03:51 Downloads folder वर जा आणि Synfig च्या .exe फाईल वर डबल क्लिक करा.
03:57 एक पॉपअप विंडो दिसेल. Run बटणवर क्लिक करा.

Synfig Studio Setup विंडो दिसेल.

04:04 License Agreement सेक्शनमध्ये, I Agree निवडा.

Next वर क्लिक करा आणि नंतर Install वर क्लिक करा.

04:14 Close वर क्लिक करा. Synfig आता यशस्वीरित्या इन्स्टॉल झाले आहे.
04:20 तपासण्यासाठी, Windows बटणवर क्लिक करा आणि टाईप करा Synfig

तुम्ही पाहू शकता Synfig उघडते.

04:28 आता आपण या सिरीज मधील प्रत्येक ट्युटोरिअल्स थोडक्यात पाहू.
04:33 या सिरीज मधील पहिला ट्यूटोरियल “Bouncing ball animation” आहे.
04:38 इथे आपण Synfig interface वापरणे शिकणार आहोत.

Synfig मध्ये एक बॉल काढणे.

04:45 keyframes आणि waypoints जोडणे.
04:48 squash इफेक्ट सह एक बॉल एनिमेशन काढणे. gif फॉरमॅटमध्ये एनिमेशन रेंडर करणे.
04:54 इथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
_____ @04:56 Add the audio_____
05:03 पुढील ट्युटोरिअल E-card animation आहे.
05:08 हे png इमेजेस आयात करण्यास मदत करेल.

इमेजेस एनिमेट करणे, टेक्स्ट एनिमेशन करणे.

05:17 आपण एनिमेशनचे पूर्वावलोकन(प्रीव्यू) करणे आणि avi फॉरमॅटमध्ये रेंडर करणे देखील शिकू.
05:24 मी हा ट्युटोरिअल प्ले करते.
_____@05:26 Add the audio_____
05:34 पुढील ट्युटोरिअल “Create a Star animation” आहे.
05:38 या ट्युटोरिअलमध्ये आपण ग्रेडियंट कलर एनिमेशन, ग्रुप लेअर्स आणि स्टार एनिमेशन तयार करण्यास शिकलो.
05:48 इथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
_____@05:51 - Add the audio_____
06:00 पुढील ट्युटोरिअल “Draw a toy train” आहे.
06:04 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकू मूलभूत आकृत्या काढणे, आकृत्यांना रंगवणे
06:11 ग्रुप (समूह) आणि डुप्लिकेट ऑब्जेक्ट्स आणि Guideline वापरून आकृत्या अलाइन करणे.
06:17 इथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
_____ @06:19 Add the audio_____
06:28 पुढील ट्युटोरिअल “Animate a toy train” बद्दल आहे.
06:33 या ट्युटोरिअलमध्ये आपण आधीच्या ट्यूटोरियलमध्ये बनवलेली टॉय ट्रेन एनिमेट करणे शिकूया.
06:40 इथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
_____ @06:44 -Add the audio_____
06:55 पुढील ट्युटोरिअल “Plant animation” आहे.
07:00 येथे या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकू - Insert item वापरून एक vertex जोडणे.
07:05 Split tangent पर्याय वापरणे

Mark active point as off option वापरणे

07:12 आकृत्यांना एनिमेट करणे.
07:14 इथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
_____ @07:17 Add the audio_____
07:24 पुढील ट्युटोरिअल “Logo animation” आहे.
07:28 या ट्यूटोरियलमध्ये आपण शिकू- मिरर ऑब्जेक्ट वापरणे.
07:32 एक लोगो एनिमेट करणे, Spherize इफेक्ट बनविणे.
07:38 इथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
_____ @07:41 Add the audio_____
07:51 पुढील ट्युटोरिअल “Basic bone animation” आहे.
07:55 येथे या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकू: कॅरक्टरला बोन्स जोडणे आणि बोन्स शरीरात टाकणे.
07:59 Skeleton पर्याय वापरून एका कॅरक्टरला एनिमेट करणे.
08:03 इथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
_____ @08:07 Add the audio_____
08:18 पुढील ट्युटोरिअल Cutout animation आहे.
08:22 या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकू - त्या इमेजवर Cutout tool वापरणे आणि कटआऊट आकृत्यांना एनिमेट करणे.
08:30 इथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
_____ @08:34 Add the Audio_______
08:43 पुढील ट्युटोरिअल Rocket animation आहे.

या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकू - फायर इफेक्ट, (आगीचे प्रभाव), नॉइज ग्रेडियंट आणि फेथर इफेक्ट(पिसांचे प्रभाव) बनवणे.

08:56 इथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
_____@09:00- Add the Audio_______
09:12 पुढील ट्युटोरिअल आहे '"Underwater animation"' तयार करणे.
09:17 या ट्युटोरिअल मध्ये आपण शिकू - PNGs आणि SVGs आयात(इम्पोर्ट) करणे.
09:23 Distortion effect वापरून इमेज एनिमेट करणे.
09:27 Noise Gradient जोडणे आणि random animation साठी Random पर्याय वापरणे.
09:32 उपरोक्त वापरून आपण underwater animation तयार करण्यास शिकू.
09:36 इथे ट्युटोरिअलची एक झलक आहे.
_____@09:39 Add the audio_____
09:47 आपण ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात.
09:52 या ट्युटोरियलमध्ये आपण Synfig बद्दल शिकलो आणि या सिरीज मधील ट्युटोरियल्सची झलक पाहिली.
10:00 खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते पहा.
10:06 स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.

परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा.

10:14 या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? कृपया या साईटला भेट द्या.
10:19 तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा.

तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील.

10:28 स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे.
10:33 कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत.
10:37 यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल.
10:45 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.

या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.

10:56 आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Ranjana