Single-Board-Heater-System/C2/Using-SBHS-Virtual-Labs-on-Windows/Marathi
From Script | Spoken-Tutorial
|
|
00:01 | 'Using Single Board heater System Virtual labs on Windows OS' वरील स्पोकन ट्युटोरियल मध्ये आपले स्वागत आहे. |
00:11 | या स्पोकन ट्युटोरियलमध्ये आपण शिकणार आहोत: दूरस्थ वापरकर्त्यांच्या कॉम्पुटरवर आवश्यक सॉफ्टवेअर स्थापित करणे. |
00:17 | 'SBHS' वेबसाइट वापरणे. |
00:20 | दूरस्थपणे एक 'Step test' प्रयोग करणे. |
00:24 | पूर्व-आवश्यकता म्हणून, 'Introduction to SBHS' आणि 'Introduction to Xcos' ट्यूटोरियल्स पहा. |
00:32 | हे 'spoken tutorial' वेबसाइटवर उपलब्ध आहे. |
00:35 | हे ट्यूटोरियल मी 'Windows-7, 32-bit Operating System' वर रेकॉर्ड करत आहे. |
00:42 | खात्री करा की आपल्या काम्पुटरवर 'Scilab' स्थापित आहे. |
00:45 | सायलॅबला 'sbhs dot os hyphen hardware dot in slash downloads' किंवा 'www dot scilab dot org' वरून डाउनलोड केले जाऊ शकते. |
00:58 | लक्षात ठेवा सायलॅब स्थापित करण्यासाठी आपल्याला इंटरनेट कनेक्टिव्हिटीची आवश्यकता लागेल. |
01:11 | सर्व 'SBHS' प्रयोग सायलॅब कोड 'Scilab 5.3.3' वापरून लिहीले जातात आणि हाच व्हर्जन वापरण्याचा सल्ला दिला जातो. |
01:21 | सायलॅबचे उच्च व्हर्जन समान रूपात काम करेल. |
01:25 | तथापि, सायलॅबच्या उच्च व्हर्जन मध्ये रूपांतरित कोड निम्न व्हर्जन मध्ये पुन्हा वापरू शकत नाही. |
01:33 | मी अगोदरच 'Scilab 5.3.3' स्थापित केले आहे. |
01:37 | आता पुढील स्टेप म्हणजे प्रयोग सायलॅब कोड डाउनलोड करणे. |
01:42 | एक वेब ब्राउजर उघडा. |
01:44 | ऍड्रेस बारमध्ये टाइप करा 'os hyphen hardware dot in' आणि 'Enter' दाबा. |
01:53 | 'Open Source - Hardware' साठी हि वेबसाइट आहे. |
01:57 | 'SBHS' प्रोजेक्ट वर क्लिक करा. |
02:01 | डाव्या बाजूला 'Downloads' वर क्लिक करा. |
02:05 | 'SBHS Scilab codes for Windows' साठी डाउनलोड लिंकवर क्लिक करा. |
02:13 | हा 'Scilab code' डाउनलोड करेल. |
02:15 | याला डेस्कटॉपवर 'Save' करा. |
02:18 | हे येथे आहे. |
02:28 | डाउनलोड केलेली फाइल 'zip' फॉर्मेट मध्ये असेल. |
02:31 | डेस्कटॉपवरील या झिप फाईलच्या विषय वस्तूला Extract करा. |
02:35 | तसे करण्यासाठी त्यावर राईट-क्लिक करा आणि 'Extract Here' निवडा. |
02:42 | या फोल्डरमधील विषय वस्तूची चर्चा ट्यूटोरियलच्या पुढील भागात केली जाईल. |
02:48 | आता 'SBHS Virtual labs' वेबसाइटला पाहू. |
02:52 | डाव्या बाजूला 'Virtual Labs' लिंकवर क्लिक करा. |
02:57 | हा तो 'interface' आहे ज्यामधे कोणीपण 'SBHS' वर दूरस्थ प्रयोग करण्यासाठी एक्सेस प्राप्त करू शकतो. |
03:05 | पहिल्यांदा वापरणार्यांना 'Login/Register' पर्याय वर क्लिक करून एकदाच रजिस्टर करावे लागेल. |
03:14 | यानंतर एक 'form' भरावा आणि सबमिट करावा. |
03:19 | 'form' यशस्वीपणे सबमिट केल्यानंतर वापरकर्त्यास एक एक्टिवेशन ईमेल पाठवला जातो. |
03:25 | ईमेलमध्ये प्राप्त झालेले 'link' रेजिस्ट्रेशन प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी वापरले पाहिजे. |
03:31 | लक्षात घ्या की एक्टिवेशन प्रक्रिया तात्काळ होऊ शकत नाही, यासाठी काही वेळ लागू शकतो. |
03:37 | मी माझ्या रजिस्टर्ड 'account' सह लॉगिन करेन. |
03:41 | मी माझे युजरनेम आणि पासवर्ड प्रविष्ट करेन. |
03:47 | यशस्वी लॉगिननंतर, वापरकर्त्याला 'Book Slot, View/Delete Slot' इत्यादी मध्ये एक्सेस आहे. |
03:55 | एक 'slot' म्हणजे ठराविक वेळ ज्यामध्ये आपण एक प्रयोग करू शकतो. |
04:00 | आमच्या बाबतीत एक 'slot' म्हणजे प्रत्येक तासाच्या 55 मिनिटांत संपतो. |
04:06 | 'Book Slot' पर्यायावर क्लिक केल्यानंतर वापरकर्त्यास दोन निवडी असतील. |
04:12 | कोणीही 'Current Slot' किंवा 'Future Slot' बुक करू शकतो. |
04:17 | 'Book Now' पर्याय फक्त तेव्हाच दिसेल जर 'current slot' रिक्त आहे. |
04:22 | 'Book future slot' पर्याय नेहमी उपलब्ध असेल. |
04:26 | हे प्रत्येक दिवशी दोन गैर-लागोपाठ स्लॉट्स बुक करण्यास परवानगी देईल. |
04:31 | मी 'Book Now' या पर्यायावर क्लिक करेन. |
04:34 | तुम्हाला शीर्षस्थानी तुमच्या बुकिंगचा तपशील दर्शवून एक कबुली मिळेल. |
04:41 | स्लॉट बुकिंग पूर्ण झाला आहे. आता वेबसाइटवरून डाउनलोड केलेला एक साधा 'Step Test' प्रयोग रन करूया. |
04:50 | डेस्कटॉपवर डाउनलोड करून सेव्ह केलेल्या फोल्डरला उघडा. |
04:55 | आपण एक 'StepTest' फोल्डर आणि एक 'common files' फोल्डर पाहू शकता. |
05:04 | कोणत्याही फोल्डरला त्यांच्या स्थानावरून हलवू नका. |
05:07 | जर डिरेक्टरी रचना बदलली असल्यास प्रयोग कार्यान्वित होणार नाही. |
05:12 | जर तुम्हाला एक प्रयोग कुठेही कॉपी करायचे असेल तर खात्री करून घ्या कि तुम्ही 'common_files' फोल्डर कॉपी करून घेतले आहे. |
05:19 | तथापि खात्री करा कि 'common files' फोल्डर नेहमी प्रयोग फोल्डरच्या बाहेर आहे. |
05:26 | 'common files' फोल्डर उघडा, 'config' फाइल उघडा. |
05:32 | ही फाइल 'proxy settings' करण्यासाठी वापरली जाते. |
05:36 | जर तुम्ही 'IIT' बॉम्बे मध्ये आहात किंवा 'IIT' बॉम्बेच्या बाहेर आहात. |
05:42 | आणि 'open network' वापरत आहात तर 'config file' ची विषय वस्तू बदलू नका. |
05:48 | उदाहरणार्थ घरी किंवा 'mobile internet' वापरत आहात. |
05:53 | तुम्ही 'IIT Bombay' च्या बाहेर असल्यास आणि 'proxy network' वापरत असल्यास 'config file' ची विषय वस्तू बदला. |
06:01 | उदाहरणार्थ- एखाद्या संस्थेत, कार्यालयात इत्यादी. |
06:06 | 'use proxy' च्या व्हॅल्यू मध्ये 'Yes' ला कॅपिटल 'Y' ठेवा. |
06:12 | जे तुम्ही करत आहात त्या 'proxy network' च्या अनुसार अन्य तपशील बदला. |
06:17 | फाईल सेव्ह करून बंद करा. |
06:20 | 'StepTest' फोल्डर उघडा. |
06:24 | 'run 'फाइलवर जा आणि डबल क्लिक करा. |
06:28 | हा 'python' वर आधारित 'SBHS client' एप्लिकेशन उघडेल. |
06:32 | लक्षात घ्या की या फाईलच्या पहिल्यांदा कार्यवाही 'SBHS client' उघडण्यासाठी एक मिनिट लागेल. |
06:40 | हे प्रयोगाचे विविध पॅरामीटर्स दर्शवेल जसे- |
06:44 | 'SBHS Connection, Client version, User login' आणि 'Experiment status' |
06:51 | हिरव्या डॉट्सचा अर्थ असा आहे की 'SBHS client' हा 'server' शी कनेक्ट होऊ शकतो. |
06:57 | हे असेही दर्शविते की 'client version' जे मी वापरत आहे ते नवीनतम आहे. |
07:03 | 'User login' आणि 'Experiment' स्टेटस लाल आहे कारण अजूनही मी लॉग इन केलेले नाही आणि प्रयोग रन होत नाही. |
07:13 | हे तुम्हाला लॉगिन करण्यासाठी देखील एक पर्याय देईल. |
07:17 | तुमचे 'username' आणि 'password' टाइप करा. |
07:22 | हे 'username' आणि 'password' तेच आहेत जे तुम्ही 'slot' बुक करण्यासाठी वापरले. |
07:27 | 'login' वर क्लिक करा. |
07:30 | खात्री करून घ्या कि तुम्ही योग्य लॉगिन तपशीलांसह बुक केलेली तारीख आणि वेळेवर लॉग इन केले आहे. |
07:35 | 'Ready to execute scilab code' मेसेजची अपेक्षा करा. |
07:40 | 'StepTest' फोल्डर जो प्रयोग फाइल्स ठेवतो त्यावर जा. |
07:45 | 'stepc' फाईलवर डबल-क्लिक करा. |
07:56 | ह्याने आपोआप 'Scilab' उघडले पाहिजे. |
08:00 | ह्याने 'Scilab editor' मध्ये फाइल देखील उघडले पाहिजे. |
08:04 | जर असे होत नसेल तर 'File' मेनूवर क्लिक करा, 'Open a file' वर क्लिक करा. |
08:11 | 'Stepc' फाईल निवडा आणि 'Open' वर क्लिक करा. |
08:17 | 'Scilab console' वर जा. |
08:37 | कमांड टाईप करा: 'getd space dot dot slash common files' आणि 'Enter' दाबा. |
08:47 | 'scilab editor' वर जा. |
08:50 | मेनू बारवर 'Execute' पर्यायावर क्लिक करा आणि नंतर 'File with echo' वर क्लिक करा. |
08:58 | नेटवर्क योग्यरित्या कार्य करत असल्यास 'Xcos' डायग्राम उघडेल. |
09:04 | जर असे होत नसेल तर ते 'Scilab console' वर एरर दर्शवेल. |
09:09 | 'step test Xcos' डायग्राम वापरून, आम्ही 'Heat' आणि 'Fan' यासारखे प्रयोग पॅरामीटर्स सेट करू शकतो. |
09:18 | ह्याचे पॅरामीटर्स बदलण्यासाठी प्रत्येक 'block' वर डबल-क्लिक करा. |
09:23 | 300 सेकंदांनंतर मी हिट 30% ते 45% पर्यंत बदलण्यासाठी सेट करते. |
09:30 | मी 'Initial Value' मध्ये 30, 'Final Value' मध्ये 45 आणि 'Step Time' मध्ये 300 प्रविष्ट करेन. |
09:43 | त्याचप्रमाणे मी 'Fan' 50% वर स्थिर करीन जी डिफॉल्ट व्हॅल्यू आहे. |
09:52 | आता 'xcos diagram' ला save आणि execute करा. |
09:57 | कार्यान्वित करण्यासाठी मेनूबारवरील 'Start' बटणावर क्लिक करा. |
10:02 | कोणताही एरर नसल्यास 'plot window' उघडेल. |
10:06 | यात वरपासून खालपर्यंत 'Heat', 'Fan' आणि 'Temperature' तीन ग्राफ्स असतील. |
10:15 | 'SBHS client' वर जा. |
10:18 | हा 'current iteration, heat, fan, temperature' आणि प्रयोगांकरता शिल्लक राहिलेला वेळ दर्शवितो. |
10:28 | या प्रयोगासाठी त्यांनी तयार केलेली 'Log file' नाव दर्शवितो. |
10:33 | ब्राऊजरवर जा, 'Show video' पर्याय वर क्लिक करा. |
10:40 | हा 'SBHS' चा लाइव्ह व्हिडिओ फीड देईल जो तुम्ही सध्या एकसेसे करत आहात. |
10:45 | हा एक प्रत्यक्ष प्रयोग आहे आणि पूर्ण होण्यास काही वेळ लागेल. |
10:49 | मी काही वेळ हि रेकॉर्डिंग थांबवेल आणि पुन्हा सुरू करेन. |
10:55 | प्रयोगाच्या पुरेश्या वेळेनंतर प्राप्त ग्राफ दिसतो. |
11:00 | मी 'Xcos' विंडोवर उपलब्ध असलेल्या 'stop' बटणावर क्लिक करून सिम्युलेशन थांबवेल. |
11:08 | प्रयोग संपल्यानंतर 'SBHS client' विंडो बंद करा. |
11:13 | आता प्रयोग फोल्डरवर जा आणि 'logs' फोल्डर उघडा. |
11:20 | हा आपल्या 'username' च्या नंतर फोल्डरचे नाव ठेवेल. |
11:24 | हे फोल्डर उघडा आणि 'log file' वर जा. |
11:29 | 'year month date hours minutes seconds dot txt' नावाची 'log' फाइल ला वाचा. |
11:38 | पुढिल विश्लेषणासाठी हि 'log' फाईल वापरा. |
11:42 | चला सारांश काढूया. |
11:43 | या ट्युटोरियलमध्ये आपण शिकलो: 'SBHS' वरील रिमोट प्रयोगासाठी आवश्यक असलेली सॉफ्टवेअर स्थापना काय आहे. |
11:53 | 'SBHS virtual labs' वेबसाइट कशी वापरावी. |
11:56 | 'python' वर आधारित 'SBHS client application' कसा वापरावा. |
12:00 | प्रयोगासाठी 'Scilab code' कार्यान्वित कसा करावा. |
12:04 | खालील लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ पहा. |
12:07 | हा 'Spoken Tutorial' प्रोजेक्टचा सारांश देतो. |
12:10 | जर तुमच्याकडे चांगली बॅंडविड्त नसेल तर आपण तो डाउनलोड करूनही पाहू शकता. |
12:14 | स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम, स्पोकन ट्यूटोरियल च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते. |
12:18 | जे र्ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होतात त्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. |
12:23 | अधिक माहितीसाठी 'contact at spoken-tutorial.org' वर आम्हाला संपर्क करा. |
12:30 | 'Spoken Tutorial' प्रोजेक्ट हा 'Talk to a Teacher' या प्रोजेक्टचा एक भाग आहे. |
12:34 | यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. |
12:41 | या मिशन विषयी अधिक माहिती http://spoken-tutorial.org/NMEICT-Intro या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. |
12:54 | हे भाषांतर किशोर भांबळे यांनी केले असून, आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद. |