Scilab/C4/Simulating-a-PID-controller-using-XCOS/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:01 | Simulating a PID controller using Xcos वरील स्पोकन ट्युटोरिअलमध्ये आपले स्वागत. |
00:07 | या ट्युटोरिअल मध्ये आपण Xcos मध्ये PID controller कार्यान्वित करणे शिकू. |
00:13 | आपल्या संगणकावर 'Scilab स्थापित आहे याची खात्री करा. |
00:17 | मी हा ट्युटोरिअल Ubuntu 16.04 64-bit Operating System वर रेकॉर्ड करत आहे आणि Scilab 6.0.0 वापरत आहे. |
00:27 | पूर्व-आवश्यकता म्हणून, Xcos Introduction हे ट्यूटोरियल पहा. |
00:32 | हे ट्युटोरिअल तुम्हाला Xcos वातावरणासह सोयीस्कर बनवेल. |
00:37 | या सोबत आपण त्या ट्यूटोरियलमध्ये बनविलेल्या firstorder.xcos फाईलचा वापर करू. |
00:43 | म्हणूनच, पुढे जाण्यापूर्वी आपण ट्युटोरियलचा सराव करणे महत्वाचे आहे म्हणजे त्यामुळे आपल्याकडे फाइल असेल? |
00:50 | PID controller चे काही मूलभूत ज्ञान आवश्यक आहे. |
00:54 | हे गृहीत धरून चला कि तुम्ही पूर्वापेक्षित समाधान केल्या आहेत, आपण ट्यूटोरियलने सुरुवात करूया. |
00:59 | सर्व प्रथम, आम्ही Scilab सुरू करणार आहोत. |
01:03 | नंतर Applications वर जा आणि Xcos निवडा. |
01:08 | किंवा तुमच्या Scilab console विंडो मध्ये, Xcos टाईप करून एंटर दाबा. |
01:15 | हे केल्यानंतर, दोन विंडोज उघडतील.
|
01:23 | Untitled-Xcos विंडो वर, click on File वर जा आणि नंतर Open वर क्लीक करा. |
01:30 | firstorder.xcos फाइल जेथे सेव्ह झाली आहे ती डिरेक्टरी ब्राउज करा. |
01:36 | ती फाइल निवडा आणि Ok वर क्लिक करा. |
01:40 | आता, transfer function block वर डबल क्लिक करा. |
01:44 | तपासा कि मी जे transfer function वापरत आहे तेच तुम्ही वापरत आहेत. |
01:49 | माझ्यासाठी, अंश 1 आहे आणि भाजक 2 asteric s plus 1 आहे .
जे 2 गुणाकार s अधिक एक आहे. |
02:01 | Ok वर क्लिक करा. |
02:03 | Step block वर डबल क्लिक करा. |
02:06 | तपासा कि मी जे step input पॅरामीटर्स वापरत आहे तेच तुम्ही वापरत आहेत. |
02:11 | माझ्यासाठी Step time 1 आहे, Initial value 0 आहे आणि Final value 2 आहे.
OK वर क्लिक करा. |
02:20 | मेनूबार मधील Simulation वर क्लिक करा आणि फाइल सिमूलेट करण्यासाठी Start निवडा. |
02:27 | समान आलेखची अपेक्षा करा जे खात्री करते कि फाईलमध्ये कोणतेही चुका नाही. |
02:32 | Palette Browser वर जाऊ. |
02:35 | Continuous time systems कॅटेगरी वर क्लिक करा. |
02:39 | PID ब्लॉक वर ड्रॅग आणि ड्रॉप करा, जे इथे Xcos विंडो मध्ये आहे. |
02:46 | Signal Routing कॅटेगरी वर क्लिक करा. |
02:49 | Mux ब्लॉक वर ड्रॅग आणि ड्रॉप करा, जे इथे Xcos विंडो मध्ये आहे. |
02:55 | Mathematical Operations कॅटेगरी वर क्लिक करा. |
03:00 | Summation ब्लॉक वर ड्रॅग आणि ड्रॉप करा, जे इथे Xcos विंडो मध्ये आहे. |
03:07 | लक्षात घ्या की हे ब्लॉक डिफॉल्टद्वारे पहिल्या इनपुटमधील दुसरा इनपुट वजा करतो. |
03:14 | आपण summation ब्लॉकचा या मूलभूत कॉन्फिगरेशनचा वापर करू. |
03:18 | step input ब्लॉक आणि transfer function ब्लॉक सामील होणाऱ्या लाईनवर(ओळीवर) क्लिक करा. |
03:24 | त्यानंतर ते डिलीट करण्यासाठी Delete बटण दाबा. |
03:27 | step input ब्लॉक ड्रॅग करून transfer function ब्लॉकमधून दूर(काढा) करा. |
03:31 | transfer function ब्लॉक आणि cscope ब्लॉक सामील होणाऱ्या लाईनवर(ओळीवर) क्लिक करा. |
03:36 | त्यानंतर ते डिलीट करण्यास Delete बटण दाबा. |
03:40 | cscope आणि clock input ब्लॉक ड्रॅग करून transfer function ब्लॉकमधून दूर करा. |
03:46 | transfer function ब्लॉकच्या आधी PID ब्लॉक ठेवा. |
03:50 | PID ब्लॉकच्या आधी summation ब्लॉक ठेवा. |
03:54 | transfer function ब्लॉक आणि cscope ब्लॉक दरम्यान Mux ब्लॉक ठेवा . |
03:59 | गरज असल्यास, ब्लॉक्स समायोजित करा, जेणेकरून ते सर्व एका ओळीत येतील. |
04:04 | step input ब्लॉक summation ब्लॉकच्या आधी input port शी जोडा. |
04:10 | लक्षात घ्या की हे summation ब्लॉकचा सकारात्मक input port आहे. |
04:15 | summation ब्लॉकच्या आउटपुट पोर्टला PID ब्लॉकच्या इनपुट पोर्टशी जोडा. |
04:21 | PID ब्लॉकच्या output port ला transfer function ब्लॉकच्या input port शी जोडा. |
04:27 | transfer function ब्लॉकच्या output port ला Mux ब्लॉकच्या खाली input port शी जोडा. |
04:33 | Mux ब्लॉकच्या output port ला cscope ब्लॉकच्या input port शी जोडा. |
04:39 | step input ब्लॉक आणि summation ब्लॉकला जोडणारी लाईन शोधा. |
04:44 | Mux च्या input पोर्टला त्या लाईनशी जोडा. |
04:48 | जोडणी करताना लाईन वळण तयार करण्यास माउसचा डावा क्लिक वापरा. |
04:54 | transfer function ब्लॉक आणि Mux ब्लॉकला जोडणारी लाईन शोधा. |
04:59 | summation ब्लॉकच्या दुसऱ्या input port ची जोडणी त्या लाईनशी करा. जिथे गरज आहे तिथे लाईन वळण वापरा. |
05:08 | PID ब्लॉकचा पॅरामीटर सेटिंग डायलॉग बॉक्स उघडण्यास त्यावर डबल क्लिक करा. |
05:14 | येथे आपण Proportional, Integral आणि Derivative गेन्स(वाढ) सेट करू शकतो. |
05:18 | कृपया लक्षात घ्या की Integral gain ला 1 by tau I गृहीत धरले पाहिजे, जिथे tau I हे integral time आहे. |
05:28 | आपण डिफॉल्ट सेटीन्ग्स वापरू. डिफॉल्ट सेटीन्ग्स वापरण्यास Cancel वर क्लिक करा. |
05:34 | आता सिम्युलेशन रन करण्यास तयार आहोत. |
05:37 | लक्षात घ्या आपण step input ब्लॉक setpoint वेरियेबल म्हणून वापरत आहे. |
05:42 | PID controller हे Transfer Function ब्लॉकसाठी एक इनपुट तयार करेल. |
05:47 | ते अशा प्रकारे असेल कि transfer function ब्लॉकचे आउटपुट हे setpoint शी जुळते. |
05:53 | मेनूबार वर उपलब्ध Start simulation बटण वर क्लिक करा. |
05:58 | एक ग्राफिक विंडो उघडण्याची अपेक्षा आहे. त्यात दोन वेरियेबल्स असतील जे एका प्लॉटमध्ये प्लॉट केले जाईल. |
06:07 | स्टेप प्लॉट हे setpoint आहे ज्याचे अंतिम व्हॅल्यू 2 आहे. |
06:12 | हिरव्या रंगाच्या वक्र (कर्वड) प्लॉटला transfer function चे आउटपुट आहे जे 2 ची setpoint व्हॅल्यू जुळण्याचा प्रयत्न करते. |
06:22 | तुम्ही आता PID सेटीन्ग्स बदलू शकता आणि त्याचा कशा प्रकारे आउटपुटवर परिणाम होतो हे जाणून घेऊ शकता. |
06:28 | इथे विडिओ थांबवा आणि दिलेल्या अभ्यासासाठी उदाहरणे सोडवा. |
06:33 | फक्त एक Proportional Controller कार्यान्वित करा. म्हणजेच, फक्त P ना कि PID . |
06:40 | प्रमाणित गेनला अशा प्रकारे बदला कि सेटपॉईंट आऊटपुटशी जुळते परंतु ते ओलांडल्याशिवाय. |
06:47 | प्लॉटमध्ये summation ब्लॉकचा आउटपुट समाविष्ट करा. |
06:51 | हे वेगळे ठेवण्यासाठी तुम्ही CMSCOPE वापरू शकता. |
06:55 | अपेक्षित PID ब्लॉक्सच्या आऊटपुटसह तुलना करा. |
06:59 | आपण या ट्युटोरिअलच्या अंतिम टप्प्यात पोहोचलो आहोत. थोडक्यात |
07:04 | या ट्युटोरिअलमध्ये आपण शिकलो: PID कंट्रोलरची अंमलबजावणी करण्यासाठी firstorder.xcos फाईल सुधारित करणे. |
07:12 | सिम्युलेशन आवश्यकतानुसार प्रत्येक ब्लॉक कॉन्फिगर करणे. |
07:16 | सिम्युलेशन पॅरामीटर्स सेटअप करणे |
07:19 | खालील लिंकवरील व्हिडिओ 'स्पोकन ट्युटोरियल' प्रोजेक्टचा सारांश देते. कृपया ते डाउनलोड करून पहा. |
07:26 | स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते. अधिक माहितीसाठी कृपया आम्हाला लिहा. |
07:34 | या Spoken Tutorial संदर्भात तुम्हाला काही प्रश्न आहेत का? |
07:37 | कृपया या साईटला भेट द्या. |
07:43 | तुम्हाला ज्या ठिकाणी प्रश्न पडला आहे ते मिनिट आणि सेकंद निवडा. |
07:47 | तुमचा प्रश्न थोडक्यात मांडा. |
07:50 | आमच्या टीम मधील सदस्य याचे उत्तर देतील. |
07:53 | स्पोकन ट्युटोरियल फोरम या पाठाशी संबंधित प्रश्नांसाठी बनवली आहे. |
07:58 | कृपया पाठाशी संबंधित नसलेले किंवा जनरल प्रश्न यावर टाकू नयेत. |
08:03 | यामुळे गोंधळ टाळण्यास मदत होईल. |
08:05 | फारशी अव्यवस्था नसल्यास ही चर्चा शैक्षणिक सामग्री म्हणून वापरता येईल. |
08:11 | "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" ला अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
या मिशनवरील अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे. |
08:23 | आय.आय.टी. बॉम्बे तर्फे मी रंजना उके आपली रजा घेत. सहभागासाठी धन्यवाद. |