STEMI-2017/C3/EMRI-to-AB-Hospital/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time
NARRATION
00:01 नमस्कार. ट्रान्सफर फ्रॉम EMRI अँब्युलन्स टू AB हॉस्पिटल वरील पाठात आपले स्वागत.
00:09 या पाठात शिकणार आहोत -

STEMI ऍपवर EMRI अँब्युलन्समधून नव्या रुग्णाची माहिती भरणे.

00:20 A/B हॉस्पिटलमधे त्याच रुग्णाची पुढील माहिती STEMI ऍपवर भरणे.
00:27 आपण STEMI च्या होमपेजवर आहोत.
00:30 येथे लक्ष द्या.

हे stemiEuser - दर्शवत आहे. म्हणजेच EMRI अँब्युलन्स पॅरामेडिक ही माहिती भरत आहे.

00:42 न्यू पेशंट टॅब सिलेक्ट करा.
00:45 एखादा रुग्ण गृहीत धरून खालील माहिती भरू.
00:51 बेसिक डिटेल्सखाली रुग्णाचे नाव, वय, लिंग, दूरध्वनी आणि पत्ता भरा.
01:04 पेजच्या खालील भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
01:09 आता हे ऍप आपल्याला Fibrinolytic चेकलिस्ट या पुढील पेजवर घेऊन जाईल.
01:15 रुग्ण पुरुष असल्यास Fibrinolytic चेकलिस्ट खाली 12 घटक आहेत.
01:21 रुग्ण स्त्री असल्यास 13 घटक दाखवले जातील.
01:26 प्रेग्नंट फीमेल? Yes / No, हा अतिरिक्त घटक येथे भरणे गरजेचे आहे.
01:36 सध्या मी सर्व 12 घटकांसाठी “No” हा पर्याय निवडणार आहे.
01:41 चालू पेज सेव्ह करण्यासाठी सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
01:46 आता आपण Co-Morbid Conditions या पुढील पेजवर जाऊ.
01:52 येथे History आणि Co-Morbid Conditions चा तपशील दिसेल.
01:56 सर्व घटकांसाठी ‘Yes’ पर्याय निवडत आहे.
01:59 पुढे Diagnosis हा विभाग आहे.
02:04 मी चेस्ट डिस्कंफर्टसाठी Pain

लोकेशन ऑफ Pain साठी Retrosternal आणि

Pain Severity मधे 8 हे पर्याय निवडत आहे.


02:17 यानंतर मी उर्वरित घटकांसाठी YES पर्याय निवडत आहे.
02:22 चालू पेज सेव्ह करण्यासाठी सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
02:28 आपण ट्रान्सपोर्टेशन डिटेल्स या पुढील पेजवर आहोत.
02:33 ट्रान्सपोर्टेशन डिटेल्सखालील सर्व फिल्डस अनिवार्य आहेत.
02:38 मी या घटकांसाठी माहिती भरणार आहे.

सिंपटम ऑनसेटसाठी तारीख आणि वेळ , अँब्युलन्स कॉलसाठी तारीख आणि वेळ , अँब्युलन्स अरायव्हलसाठी तारीख आणि वेळ, अँब्युलन्स डिपार्चरसाठी तारीख आणि वेळ

02:56 पुढे ट्रान्सपोर्ट टू स्टेमी क्लस्टर Yes/No असे आहे.
03:01 Yes हा पर्याय निवडल्यास हे पुढे गुगल मॅप्समधे उघडेल. त्याचा उपयोग हॉस्पिटल शोधताना आणि निवडताना दिशानिर्देश मिळवण्यासाठी होतो.
03:12 काँटॅक्टचा उपयोग ज्या हॉस्पिटलमधे रुग्णाला स्थलांतरित करण्यात येणार आहे, तिथे कॉल करण्यासाठी किंवा संपर्काची माहिती मिळवण्यासाठी होतो.
03:20 मेडिकेशन्स ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशनमधे आपण येथे दाखवल्याप्रमाणे संबंधित माहिती भरणे गरजेचे आहे.
03:31 पेजच्या खालील भागात असलेले फिनिश बटण सिलेक्ट करा.
03:37 ट्रान्सपोर्टेशन टू STEMI क्लस्टरसाठी ‘No’ पर्याय निवडल्यास त्या फिल्डखालील Save and Continue बटणावर क्लिक करा. या पेजमधे माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे.
03:51 सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
03:54 हे चालू पेज सेव्ह करेल.

आणि आपल्याला डिस्चार्ज समरी या पेजवर घेऊन जाईल.

04:01 डिस्चार्ज समरीखाली Death हे अनिवार्य फिल्ड आहे. येथे “No” पर्याय निवडा.
04:09 पुढे डिस्चार्ज फ्रॉम EMRI या फिल्डसाठी तारीख आणि वेळ निवडा.
04:15 ट्रान्सपोर्ट टू मधे मी STEMI क्लस्टर हॉस्पिटल निवडत आहे.
04:21 त्यासाठी पुढे ही फिल्डस उघडतील-

रिमार्कसमधे काही नोंदी असल्यास लिहा.

ट्रान्सफर टू हॉस्पिटल नेम आणि ट्रान्सफर टू हॉस्पिटल ऍड्रेस

04:32 आपण हॉस्पिटलचे नाव निवडल्यावर त्याचा पत्ता तिथे आपोआप आलेला दिसेल.
04:39 याचे कारण हे रुग्णालय STEMI प्रोग्रॅमचा भाग आहे.
04:46 जर हे हॉस्पिटल STEMI प्रोग्रॅमचा भाग नसेल तर आपल्याला हॉस्पिटलचे नाव व पत्ता स्वतः भरावा लागेल.
04:57 ही माहिती भरून झाल्यावर पेजच्या खालील भागात असलेले फिनिश बटण सिलेक्ट करा.
05:03 हे चालू पेज सेव्ह करेल.
05:06 आता EMRI अँब्युल्न्समधील नव्या रुग्णाची माहिती भरण्याचे काम पूर्ण झाले आहे.
05:13 रुग्णाला पुन्हा एकदा EMRI अँब्युलन्सद्वारे A/B हॉस्पिटलमधे पाठवण्यात आले आहे.
05:21 आता रुग्ण A/B हॉस्पिटलमधे पोहोचला आहे.
05:25 A/B हॉस्पिटलमधे वापर करण्याच्या प्रक्रियेचा हा सारांश आहे.
05:31 आता A/B हॉस्पिटलमधे STEMI ऍपवर पुढील माहिती कशी भरायची ते जाणून घेऊ.
05:38 आपण A/B हॉस्पिटल युजर म्हणून STEMI च्या होमपेजवर आहोत.
05:43 सर्च टॅब सिलेक्ट करा.
05:46 रुग्णाचा Id किंवा नाव टाईप करा आणि पेजच्या खालील भागातील सर्च बटण सिलेक्ट करा.
05:54 दर्शवलेल्या सूचीतून विशिष्ट रुग्णाचे नाव निवडा.
05:58 याद्वारे आपण बेसिक डिटेल्स या पेजवर पोचू.
06:03 येथे EMRI अँब्युलन्समधे भरलेली सर्व माहिती दाखवली जाईल.
06:09 A/B हॉस्पिटलमधे आपल्याला A/B हॉस्पिटलमधे येण्याची तारीख आणि वेळ भरणे गरजेचे आहे.
06:17 त्यानंतर Manual ECG Taken साठी Yes/No पर्याय आहे. मी
Yes निवडत आहे. 

06:25 त्यानंतर ECG घेतल्याची तारीख आणि वेळ भरा.
06:29 पुढे STEMI Confirmed साठी Yes/No पर्याय आहेत.

मी Yes निवडत आहे.

06:36 आणि नंतर त्याची तारीख आणि वेळ भरा.
06:39 पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
06:43 आपण Fibrinolytic चे पेज वगळून Cardiac History या पेजवर जाणार आहोत.
06:50 प्रथम आपण रुग्णाच्या हिस्ट्री संदर्भातील सर्व संबंधित माहिती भरणार आहोत.
06:56 त्यानंतर क्लिनिकल एक्झामिनेशनखाली त्या विशिष्ट रुग्णाचा तपशील भरा.
07:03 पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
07:06 हे आपल्याला Co-Morbid Conditions या पेजवर घेऊन जाईल.
07:10 रुग्णाच्या वैद्यकीय स्थितीनुसार त्याला कुठली औषधे दिली जात आहेत त्याची माहिती देण्यास सांगितले जाईल.

कृपया सदर रुग्णासाठी संबंधित माहिती भरा.

07:21 पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
07:25 आता ह्या द्वारे आपण काँटॅक्ट डिटेल्स या पेजवर पोचू.
07:29 येथे रुग्णाच्या नातेवाईकाचे नाव, रिलेशन टाईप, पत्ता, शहर आणि मोबाईल नंबर अशी माहिती भरणे गरजेचे आहे.
07:42 नंतर व्यवसायाची माहिती भरा.
07:44 त्यानंतर आपण आधार कार्ड नंबर देत आहोत.
07:47 आधार कार्डाची प्रत अपलोड करण्यासाठी विचारणा केली जाईल.
07:54 पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
07:57 ह्या द्वारे आपण Medications prior to Thrombolysis या पेजवर पोचू.
08:02 येथे Thrombolysis पूर्वी रुग्णाला दिल्या गेलेल्या औषधांची माहिती भरा.
08:12 पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
08:15 ह्या द्वारे आपण Thrombolysis पेजवर पोचू.
08:19 येथे कुठलाही एक Thrombolytic agent निवडा. मी Streptokinase निवडत आहे.
08:26 नंतर डोसेज, तारीख आणि वेळ भरा.
08:30 90 min ECG साठी तारीख आणि वेळ निवडा.
08:34 Successful Lysis साठी Yes/No निवडा.
08:38 पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
08:45 ह्या द्वारे आपण थेट PCI पेजवर पोहोचू.
08:49 येथे Drugs before PCI हा टॅब आहे.
08:54 PCI पूर्वी रुग्णास दिल्या गेलेल्या औषधांचा तपशील तारीख आणि वेळ यांच्यासह नोंदवा.
09:02 पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
09:06 पुढील पेज PCI हे आहे.
09:09 या पेजवरील माहिती केवळ Cath Lab टेक्निशियन किंवा कार्डिओलॉजिस्टने भरणे गरजेचे आहे.
09:18 Cath Lab खाली

Cath Lab ऍक्टिव्हेशन आणि Cath Lab अरायव्हल ह्याचा तपशील द्यायचा आहे.

09:26 पुढे Vascular access आणि Catheter access हे घटक आहेत.
09:31 त्यानंतर CART चा तपशील भरा. जसे की, स्टार्ट डेट अँड टाईम आणि एंड डेट अँड टाईम.
09:39 पुढे आपल्याला दिलेल्या पर्यायांपैकी एक Culprit Vessel नमूद करणे गरजेचे आहे.
09:46 नंतर त्या Culprit Vessel चा सर्व संबंधित तपशील भरा.
09:51 आता त्या रुग्णासाठी Management खालील माहिती भरा.
09:55 या पेजवर शेवटी Intervention हा घटक आहे.
09:59 Intervention हा पर्याय निवडल्यावर आपल्याला खाली आणखी काही तपशील दिसेल.
10:05 त्या विशिष्ट रुग्णाशी संबंधित असलेली माहिती भरा.
10:10 पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
10:14 आता आपण Medications in Cath Lab या टॅबमधे आहेत.
10:18 मी येथे 2b3a Inhibitors शी संबंधित असलेला तपशील भरणार आहे.
10:25 मी Unfractionated Heparin साठी Yes, पर्याय निवडून पुढे डोसेज, तारीख आणि वेळ भरणार आहे.
10:34 पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
10:39 पुन्हा एकदा आपण In-Hospital Summary याच्याशी संबंधित पेजेस वगळू शकतो.
10:47 आपण Discharge Summary या पुढील पेजवर जाऊ.

येथे Death हा टॅब आहे.

10:54 त्यासाठी No पर्याय निवडा.
10:57 पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
11:01 पुढे Discharge Medications हा टॅब आहे.
11:05 पुन्हा या पेजवर दर्शवलेल्या घटकांसाठी संबंधित पर्याय निवडा.
11:11 पेजच्या खालच्या भागातील सेव्ह अँड कंटिन्यू बटण सिलेक्ट करा.
11:15 आता आपण Discharge or Transfer या पेजवर आहोत.
11:19 येथे आपल्याला A/B हॉस्पिटल मधून बाहेर पडण्यासंदर्भातील माहिती देणे गरजेचे आहे.
11:27 शेवटी फिनिश बटण सिलेक्ट करा.
11:30 थोडक्यात,
11:32 आपण या पाठात शिकलो-

STEMI ऍपवर EMRI अँब्युलन्समधून नव्या रुग्णाची माहिती भरणे,

त्याच रुग्णाची A/B हॉस्पिटल मधे STEMI वर पुढील माहिती भरणे.

11:49 STEMI INDIA संस्थेची निर्मिती “लाभ निरपेक्ष संस्था” म्हणून झाली आहे. तिचे उद्दिष्ट मुख्यत्वे हृदयविकाराचा झटका आलेल्या रुग्णांना उपचार मिळण्यातील विलंब कमी करणेआणि हृदयविकाराने होणा-या मृत्यूंची संख्या घटवणे.
12:03 IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD,Govt. of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहितीसाठी कृपया http://spoken-tutorial.org या साईटला भेट द्या.
12:18 हा पाठ STEMI INDIA आणि IIT Bombay च्या स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट यांच्या योगदानाने बनला आहे.

हे मराठी भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज .... यांनी दिला आहे. सहभागासाठी धन्यवाद.


Contributors and Content Editors

PoojaMoolya