Ruby/C3/for-and-each-Looping-Statements/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: for-and-each-Looping-Statements

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00:01 रुबीमधील for आणि each लूप्स वरील पाठात स्वागत.
00:05 या पाठात शिकणार आहोत,
00:07 “loop” म्हणजे काय?
00:08 रुबीमधील वेगवेगळे लूप्स.
00:11 “for” लूपचा वापर,
00:12 “each” लूपचा उपयोग.
00:14 येथे वापरणार आहोत,
00:16 उबंटु वर्जन 12.04
00:19 रुबी 1.9.3
00:22 ह्या पाठासाठी तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शन असायला हवे.
00:25 तसेच लिनक्स कमांडस, टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00:30 नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:34 आता रुबीमधे“loop” चा उल्लेख कशाच्या संदर्भात होतो ते पाहू.
00:38 loop म्हणजे कमांड किंवा कमांडसचा संच जो ठराविक वेळा कार्यान्वित होतो.
00:44 रुबी मधे खालील प्रमुख लूपिंग स्टेटमेंटस आहेत.
00:47 for
00:48 each
00:49 while
00:49 until
00:50 ह्या पाठात for आणि each लूप्सचा वापर शिकू.
00:55 सुरूवात करण्यापूर्वी तुमच्या होम डिरेक्टरीमधे पुढील फोल्डर्स बनवा.
01:02 ttt, ruby hyphen tutorial, looping hyphen statements.
01:07 येथे दाखवल्याप्रमाणे सब फोल्डर्स बनवा.
01:11 आता आवश्यक फोल्डर्स बनवले आहेत.
01:13 आता पुढे जाऊ.
01:15 रुबीमधील for लूपचा सिंटॅक्स असा आहे:
01:19 for “variable” in “a collection of objects”
01:22 रुबी कोड
01:23 end
01:25 उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
01:28 रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा.
01:32 त्याला “for hyphen loop dot rb” हे नाव द्या.
01:36 मी आधीच “for” लूपचे उदाहरण तयार केले आहे.
01:39 हे उदाहरण समजून घेताना तुम्ही हा कोड टाईप करू शकता.
01:44 ह्या उदाहरणात मी “for” लूप घोषित केले आहे.
01:47 आपल्याकडे 1 ते 20 अंकांचा संच आहे.
01:50 आपण “i” हे व्हेरिएबल “for” लूपमधे घोषित केले आहे.
01:55 “i” हे व्हेरिएबल 1 ते 20 च्या संचातील पहिल्या घटकाची प्राथमिक व्हॅल्यू घेईल.
02:00 “for” लूप कमांड 1 ते 20अंकांच्या संचातील प्रत्येक घटकांसाठी दिलेला कोड आयटरेट करेल.
02:07 “for” लूपमधे लिहिलेली “puts” मेथड आऊटपुट दाखवते .
02:14 टर्मिनल उघडून त्यात टाईप करा
02:17 ruby space for hyphen loop dot rb आणि आऊटपुट बघा.
02:22 1 ते 20 अंकांचा ऍरे आऊटपुट म्हणून दाखवला जाईल .
02:26 ह्या उदाहरणात इनक्लुझिव्ह रेंजसाठी “for” लूप घोषित केलेले आहे.
02:31 ह्यामधे 1 ते 20 मधील सर्व अंक समाविष्ट आहेत.
02:35 पुढे आपण नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी “for” लूप कसे वापरायचे ते पाहू.
02:41 कोडचा पुढील भाग टाईप करा.
02:44 नॉन इनक्लुझिव्ह म्हणजे ऑब्जेक्टसच्या संचातील शेवटचा घटक त्यामधे समाविष्ट नसतो.
02:49 येथे 1 ते 20 अंकांच्या नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी “for” लूप वापरले आहे.
02:55 तुम्हाला दिसेल की 20 हा अंक आऊटपुटमधे प्रिंट झाला नाही.
02:59 दोन अंकांमधे 3 टिंब दिलेली असल्यास शेवटचा अंक समाविष्ट नसतो.
03:04 टर्मिनल उघडून त्यात टाईप करा ruby space for hyphen loop dot rb
03:13 आऊटपुट बघा.
03:17 पुन्हा अंकांचा ऍरे आऊटपुट म्हणून मिळेल. त्यात 20 ह्या अंकाचा समावेश नसेल.
03:22 आता तुम्हाला “for” लूप लिहीता येईल.
03:27 रुबीमधील “each” लूपचा सिंटॅक्स असा आहे:
03:31 “a collection of objects” dot each do item
03:36 रुबी कोड end
03:38 उदाहरणाद्वारे समजून घेऊ.
03:42 रुबीच्या प्राथमिक पाठात दाखवल्याप्रमाणे gedit मधे नवी फाईल बनवा.
03:46 त्याला each hyphen loop dot rb हे नाव द्या.
03:50 मी each लूपचे उदाहरण आधीच तयार केले आहे.
03:53 हे उदाहरण समजून घेताना तुम्ही हा कोड टाईप करू शकता.
03:58 या उदाहरणात each लूप घोषित केले आहे.
04:03 आपल्याकडे 1 ते 20 अंकांचा संच आहे.
04:06 आपण eachलूपमधे “i” नामक व्हेरिएबल घोषित केले आहे.
04:11 “i” हे व्हेरिएबल 1 ते 20च्या संचातील पहिल्या घटकाची प्राथमिक व्हॅल्यू घेईल.
04:17 each लूप कमांड 1 ते 20 अंकांच्या संचातील प्रत्येक घटकांसाठी दिलेला कोड आयटरेट करेल.
04:23 each लूपमधे लिहिलेली puts मेथड आपल्याला आऊटपुट दाखवते.
04:30 आता टर्मिनल उघडून टाईप करा ruby space each hyphen loop dot rb
04:39 आऊटपुट पहा.
04:43 1 ते 20 अंकांचा ऍरे आऊटपुट म्हणून मिळेल.
04:46 वरील उदाहरणात इनक्लुझिव्ह रेंजसाठी each लूप घोषित केले आहे.
04:51 ह्यामधे 1 ते 20 मधील सर्व अंक समाविष्ट आहेत.
04:54 पुढे नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी each लूप कसे वापरायचे ते पाहू.
05:00 कोडचा पुढील भाग टाईप करा.
05:04 नॉन इनक्लुझिव्ह म्हणजे ऑब्जेक्टसच्या संचातील शेवटचा घटक त्यामधे समाविष्ट नसतो.
05:10 येथे 1 ते 20 अंकांच्या नॉन इनक्लुझिव्ह रेंजसाठी each लूप वापरले आहे.
05:16 तुम्हाला दिसेल की 20 हा अंक आऊटपुटमधे प्रिंट झाला नाही.
05:20 दोन अंकांमधे 3 टिंब वापरल्यास शेवटचा अंक समाविष्ट होत नाही.
05:25 आता टर्मिनल उघडून टाईप करा ruby space each hyphen loop dot rb
05:34 आऊटपुट पहा.
05:39 आता तुम्ही तुमचे each लूप लिहू शकाल.
05:44 लूपचा कोणता प्रकार निवडायचा हे कसे ठरवता येते?
05:48 for लूपची रचना आठवा.
05:53 पहिल्या उदाहरणात, आपण 1 ते 20 अंकांसाठी for लूप वापरून आयटरेट केले.
05:59 टर्मिनलवर ruby space for hyphen loop dot rb कार्यान्वित करून आऊटपुट बघा.
06:08 gedit मधे कोड बघा.
06:11 जेव्हा for लूप कॉल केले जाते, रुबी प्रत्यक्षात each मेथड कॉल करत असते.
06:16 each किंवा for कॉल केल्याने तोच आऊटपुट मिळतो.
06:21 जर for लूप कॉल केल्याने each लूप कॉल होत असेल तर each लूप वापरणे योग्य ठरते.
06:28 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
06:30 थोडक्यात,
06:32 या पाठात शिकलो
06:33 for लूपचा उपयोग
06:35 each रचनेचा उपयोग
06:38 for ऐवजी each च्या वापराचे कारण.
06:41 वरील लूप रचनांचा वापर केलेली उदाहरणे.
06:45 असाईनमेंट.
06:47 योग्य लूपचा वापर करून रुबी प्रोग्रॅम लिहा,
06:50 जो 1 ते 20 अंकातील समसंख्या आऊटपुट म्हणून दाखवेल.
06:56 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
07:00 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
07:03 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
07:08 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
07:11 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
07:14 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
07:18 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
07:23 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
07:26 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
07:33 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
07:41 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी ------- आपला निरोप घेते . सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana