Ruby/C2/Arithmetic-and-Relational-Operators/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search

Title of script: Arithmetic-and-Relational-Operators

Author: Manali Ranade

Keywords: Ruby


Time Narration


00:01 रुबीमधील Arithmetic आणि Relational Operators वरील पाठात आपले स्वागत.
00:06 या पाठात शिकणार आहोत,
00:08 ऍरीथमेटिक ऑपरेटर्स
00:10 ऑपरेटर्सचा प्राधान्यक्रम
00:12 रिलेशनल ऑपरेटर्स
00:14 येथे उबंटु लिनक्स वर्जन 12.04 आणि रुबी 1.9.3 वापरणार आहोत.
00:23 या पाठासाठी तुम्हाला लिनक्स टर्मिनल आणि टेक्स्ट एडिटरचे ज्ञान असावे.
00:28 तसेच irb चा परिचय असावा.
00:31 नसल्यास संबंधित पाठासाठी आमच्या वेबसाईटला भेट द्या.
00:34 आता ऍरीथमेटिक ऑपरेटर्स बद्दल जाणून घेऊ.
00:38 रुबीमधील ऍरीथमेटिक ऑपरेटर्स असे आहेत.
00:42 + एडिशन: उदाहरणार्थ. a+b.
00:45 - सब्ट्रैक्शन: उदाहरणार्थ. a-b.
00:48 / डिवीज़न: उदाहरणार्थ. a/b.
00:51 * मल्टिप्लिकेशन: उदाहरणार्थ. a*b.
00:55  % मॉड्युलस: उदाहरणार्थ. a%b.
00:59 ** एक्सपोनेंट: उदाहरणार्थ a**b
01:04 irb द्वारे ही ऍरीथमेटिक ऑपरेटर्स वापरून बघू .
01:08 Ctrl, Alt आणि T एकत्रित दाबून टर्मिनल उघडा.
01:14 स्क्रीनवर टर्मिनल विंडो उघडेल.
01:17 इंटरऍक्टीव्ह रुबी उघडण्यासाठी टाईप करा irb आणि एंटर दाबा.
01:21 टाईप करा 10 प्लस 20 आणि एंटर दाबा.
01:25 बेरजेची क्रिया होऊन 30 उत्तर मिळाले.
01:31 तसेच वजाबाकी आणि गुणाकार ह्या क्रिया करता येतात.
01:35 भागाकार करून बघू.
01:38 टाईप करा 10 स्लॅश 4
01:40 आणि एंटर दाबा.
01:42 येथे दिसेल की अपूर्णांकाचा भाग कापून 2 असे पूर्णांकात उत्तर मिळाले.
01:47 अधिक अचूक उत्तर मिळण्यासाठी एक संख्या float म्हणून देणे आवश्यक आहे.
01:52 टाईप करा 10.0 स्लॅश 4
01:56 आणि एंटर दाबा.
01:58 2.5 असे उत्तर मिळेल.
02:01 आता modulus ऑपरेटर वापरून बघू.
02:05 modulus ऑपरेटर आऊटपुट म्हणून बाकी देतो.
02:09 टाईप करा 12 पर्सेंटेज साइन 5 आणि एंटर दाबा.
02:15 येथे 12 ला 5 ने भागले जाईल आणि 2 ही बाकी मिळेल.
02:21 आता घातांक वापरून बघू.
02:24 2, नंतर दोन वेळा asterisk चे चिन्ह आणि 5 टाईप करा. एंटर दाबा.
02:32 याचा अर्थ 2 चा पाचवा घात 5.
02:36 आपल्याला 32 हे आऊटपुट मिळेल.
02:39 पुढे ऑपरेटर प्राधान्यक्रमाबद्दल जाणून घेऊ.
02:44 पदावलीमधे अनेक गणिती क्रिया असल्यास,
02:47 प्रत्येक भागाचे वेगळे मूल्यमापन होते,
02:50 आणि उत्तर काढण्यासाठी पूर्वी ठरवलेल्या प्राधान्यक्रम वापरतात.
02:56 ह्याचा अर्थ सर्वाधिक प्राधान्य असलेला ऑपरेटर सर्वप्रथम कार्यान्वित होतो.
03:01 नंतर प्राधान्य क्रमानुसार पुढील ऑपरेटर कार्यान्वित होतो.
03:07 सर्वाधिक पासून सर्वात कमी प्राधान्य असलेल्या सर्व ऑपरेटर्सची सूची ह्या स्लाईडवर आहे.
03:13 उदाहरणार्थ 3 + 4 * 5 आपल्याला 23 उत्तर देईल 35 नाही.
03:23 गुणाकाराच्या (*) क्रियेला बेरजेच्या (+) क्रियेपेक्षा अधिक प्राधान्य आहे.
03:29 त्यामुळे ते प्रथम कार्यान्वित होईल.
03:32 त्यामुळे चार गुणिले पाच बरोबर 20 आणि नंतर त्यात तीन मिळवले गेले आणि 23 हे आऊटपुट मिळाले.
03:42 ऑपरेटरला प्राधान्य देण्यावर आधारित असलेली आणखी काही उदाहरणे पाहू.
03:47 टर्मिनलवर जा.
03:50 Crtl आणि L एकत्रित दाबून irb कन्सोल क्लियर करा.
03:56 टाईप करा 7 माइनस 2 मल्टिप्लाइ बाइ 3
04:03 आणि एंटर दाबा.
04:05 आपल्याला 1 हे उत्तर मिळेल.
04:08 येथे ऍस्टेरिक चिन्हाला वजाच्या चिन्हापेक्षा अधिक प्राधान्य आहे.
04:13 त्यामुळे प्रथम गुणाकार आणि नंतर वजाबाकीची क्रिया केली जाईल.
04:20 दुसरे उदाहरण पाहू.
04:22 टाईप करा कंसात 10 प्लस 2 स्लॅश 4
04:29 आणि एंटर दाबा.
04:30 आपल्याला 3 हे उत्तर मिळेल.
04:33 येथे भागाकार (स्लॅश) पेक्षा () कंसाला अधिक प्राधान्य आहे.
04:39 कंसाच्या आतील बेरजेची क्रिया प्रथम केली जाईल.
04:44 नंतर भागाकार केला जाईल.
04:47 आता रिलेशनल ऑपरेटर्स बद्दल जाणून घेऊ.
04:51 स्लाईडसवर जाऊ.
04:54 रिलेशनल ऑपरेटर्सना कंपॅरिझन ऑपरेटर्स असेही नाव आहे.
04:59 रिलेशनल ऑपरेटर्स असलेल्या पदावली boolean व्हॅल्यूज देतात.
05:04 रुबीतील रिलेशनल ऑपरेटर्स असे आहेत.
05:07 == Equals to उदाहरणार्थ a==b
05:14 dot eql question mark उदाहरणार्थ a.eql?b
05:21  != Not equals to उदाहरणार्थ a exclamation equal b
05:28 < Less than उदाहरणार्थ a < b
05:32 Greater than उदाहरणार्थ a > b
05:37 <= Lesser than or equal to उदाहरणार्थ a less than arrow equal b
05:44 >= Greater than or equal to उदाहरणार्थa greater than arrow equal b
05:49 <=> Combined comparison उदाहरणार्थ a less than arrow equal greater than arrow b
05:56 ह्यापैकी काही ऑपरेटर्स वापरून पाहू.
06:00 टर्मिनलवर जा.
06:02 ctrl, L एकत्रितपणे दाबून irb कंसोल क्लियर करा.
06:09 equals to ऑपरेटर वापरून पाहू.
06:11 टाईप करा 10 equals equals 10
06:16 आणि एंटर दाबा.
06:17 true असे आऊटपुट मिळेल.
06:20 .eql? हा ऑपरेटर equals to ऑपरेटर प्रमाणेच आहे.
06:24 वापरून पाहू.
06:25 टाईप करा 10 .eql?10 आणि एंटर दाबा.
06:33 true असे आऊटपुट मिळेल.
06:35 not equal to ऑपरेटर वापरून पाहू.
06:39 टाईप करा 10 not equal 10
06:44 आणि एंटर दाबा.
06:46 false असे आऊटपुट मिळेल.
06:48 कारण दोन्ही अंक एकच आहेत.
06:51 ctrl, L एकत्रितपणे दाबून irb कंसोल क्लियर करा.
06:56 आता less than ऑपरेटर वापरून पाहू.
07:00 टाईप करा 10 less than 5 आणि एंटर दाबा.
07:05 येथे पहिला ऑपरंड दुस-यापेक्षा लहान असेल तरtrue आऊटपुट मिळेल.
07:10 अन्यथा false आऊटपुट मिळेल.
07:14 false आऊटपुट मिळाले कारण 10 हे 5 पेक्षा लहान नाहीत.
07:19 आता greater than वापरून पाहू.
07:22 टाईप करा 5 greater than 2
07:26 येथे पहिला ऑपरंड दुस-यापेक्षा मोठा असेल तर true आऊटपुट मिळेल.
07:31 अन्यथा false आऊटपुट मिळेल.
07:34 एंटर दाबा.
07:36 True आऊटपुट मिळाले कारण 5 हा 2 पेक्षा मोठा आहे.
07:42 ctrl, L एकत्रितपणे दाबून irb कंसोल क्लियर करा.
07:47 आता less than equal to ऑपरेटर वापरून पाहू.
07:51 टाईप करा 12 less than equal 12
07:56 आणि एंटर दाबा.
07:59 येथे पहिला ऑपरंड दुस-यापेक्षा लहान किंवा तेवढाच असेल तर true आऊटपुट मिळेल.
08:04 अन्यथा false आऊटपुट मिळेल.
08:07 True आऊटपुट मिळाले कारण 12 बरोबर 12 आहेत.
08:11 तुम्ही greater than or equal to वापरून पाहू शकता.
08:15 आता कंबाईंड कँपॅरिझन ऑपरेटर पाहू .
08:19 ह्या operator चे उत्तर,
08:21 पहिला ऑपरंड दुस-याबरोबर असल्यास, 0 येईल,
08:24 पहिला ऑपरंड दुस-यापेक्षा मोठा असल्यास, 1 येईल,
08:29 पहिला ऑपरंड दुस-यापेक्षा लहान असल्यास, -1 येईल.
08:34 उदाहरणाद्वारे याचे कार्य पाहू.
08:36 टाईप करा 3 less than equals greater than 3
08:41 आणि एंटर दाबा.
08:43 0 आऊटपुट मिळाले.
08:45 कारण दोन्ही ऑपरंड समान म्हणजे 3 आहेत.
08:50 आता एक ऑपरंड बदलून 4 करू.
08:53 टाईप करा 4 less than equals greater than 3
08:58 आणि एंटर दाबा.
08:59 1 आऊटपुट मिळाले.
09:01 कारण4 हे 3 पेक्षा मोठे आहेत.
09:04 आता पुन्हा एकदा बदल करू.
09:07 टाईप करा 4 less than equals greater than 7
09:11 आणि एंटर दाबा.
09:13 -1 आऊटपुट मिळाले.
09:14 कारण 4 हे 7 पेक्षा लहान आहेत.
09:17 आता असाईनमेंट.
09:19 irb वापरून पुढील उदाहरणे सोडवा. आऊटपुट तपासा.
09:24 10 + bracket 2 astreisk 5 bracket 8 slash 2
09:32 4 astreisk 5 slash 2 plus 7
09:37 तसेच मेथडद्वारे ऍरीथमेटिक ऑपरेटर्स वापरून बघा.
09:42 आपण पाठाच्या अंतिम टप्प्यात आहोत.
09:45 थोडक्यात,
09:47 या पाठात आपण ,
09:49 बेरीज, वजाबाकी, गुणाकार, भागाकारासाठी वापरली जाणारी अधिक, वजा, ऍस्टेरिक, स्लॅश ही ऍरीथमेटिक ऑपरेटर्स ,
09:59 ऑपरेटर्सचा प्राधान्यक्रम,
10:01 आणि रिलेशनल ऑपरेटर्स
10:04 उदाहरणाद्वारे समजून घेतले.
10:06 स्क्रीनवर दिसत असलेल्या लिंकवर उपलब्ध असलेला व्हिडिओ बघा.
10:10 ज्यामध्ये तुम्हाला प्रॉजेक्टचा सारांश मिळेल.
10:14 जर तुमच्याकडे चांगली Bandwidth नसेल तर आपण व्हिडिओ download करूनही पाहू शकता.
10:18 स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट टीम,
10:20 Spoken Tutorial च्या सहाय्याने कार्यशाळा चालविते.
10:23 परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रही दिले जाते.
10:26 अधिक माहितीसाठी कृपया contact [at] spoken hyphen tutorial dot org वर लिहा
10:32 "स्पोकन ट्युटोरियल प्रॉजेक्ट" हे "टॉक टू टीचर" या प्रॉजेक्टचा भाग आहे.
10:36 यासाठी अर्थसहाय्य National Mission on Education through ICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
10:43 यासंबंधी माहिती पुढील साईटवर उपलब्ध आहे.
10:51 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून मी रंजना भांबळे आपला निरोप घेते .
10:57 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Ranjana