PhET/C3/Projectile-Motion/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 Projectile motion वरील पाठात आपले स्वागत.
00:05 या पाठात आपण, Projectile Motion या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.
00:11 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील भौतिकशास्त्राचे प्राथमिक ज्ञान असावे.


00:18 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04, जावा वर्जन 1.7,

00:26 फायरफॉक्स वेब ब्राउजर वर्जन 53.02.2 वापरत आहे.
00:31 हे सिम्युलेशन वापरून आपण पाहणार आहोत,

1. प्रत्येक पॅरामीटर पदार्थाच्या गतिमार्गाला कसा प्रभावित करतो ते पाहणे.

00:39 2. पदार्थाची प्रारंभिक परिस्थिती दिली असता तो कोठे पडेल याचा अंदाज बांधणे.
00:45 3. गतीचे क्षितीजाला समांतर(आडवे) व लंब रेषेतील (उभे) घटक स्वतंत्र आहेत हे पाहणे.
00:51 4. ड्रॅग फोर्सवर परिणाम करणारे व्हेरिएबल्स शोधणे.
00:56 5. वेग आणि त्वरण यांच्यावर ड्रॅग फोर्सचा होणारा परिणाम तपासणे.
01:02 प्रोजेक्टाईलची व्याख्या करू.
01:05 प्रोजेक्टाईल म्हणजे प्रक्षेपित केलेली, उडवलेली, किंवा फेकलेली एखादी वस्तू.
01:11 प्रोजेक्टाईलच्या मार्गाला गतीमार्ग असे नाव आहे.
01:15 प्रोजेक्टाइल गती हा गतीचा असा प्रकार आहे की ज्यात पृथ्वीच्या पृष्ठभागाजवळ पदार्थ प्रक्षेपित केलेला असतो.
01:22 गुरुत्वाकर्षणाच्या प्रभावाखाली प्रोजेक्टाईलचा मार्ग वक्राकार होतो.
01:27 प्रोजेक्टाईलवर गुरुत्व बल खालच्या दिशेने कार्य करत असते.
01:32 गुरुत्व बल पदार्थाच्या उभ्या गतीवर परिणाम करत असल्याने त्याचा पथ पॅराबोलिक होतो.
01:39 प्रोजेक्टाईल गतीची काही उदाहरणे- फेकलेला बेसबॉलचा चेंडू.
01:46 बंदुकीतून उडवलेली गोळी.
01:51 दिलेली लिंक वापरून सिम्युलेशन डाऊनलोड करू.


01:55 मी डाऊनलोड्स फोल्डरमधे Projectile Motion हे PhET सिम्युलेशन आधीच डाऊनलोड केले आहे.
02:02 सिम्युलेशन उघडण्यासाठी, projectile-motion_en.html या फाईलवर राईट क्लिक करा.
02:10 Open With Firefox Web Browser पर्याय निवडा.
02:15 हा Projectile Motion या PhET सिम्युलेशनचा इंटरफेस आहे.
02:20 इंटरफेसमधे चार स्क्रीन्स आहेत:

Intro,

02:25 Vectors,
02:27 Drag ,
02:29 आणि Lab.
02:31 Intro स्क्रीनवर क्लिक करा.
02:34 या स्क्रीनच्या सहाय्याने प्रोजेक्टाईलच्या गतीमार्गावर परिणाम करणाऱ्या घटकांचा अभ्यास करूया.
02:40 Intro स्क्रीनमधे एका चौथऱ्यावर एक तोफ बसवलेली आहे.
02:45 डीफॉल्ट रूपात चौथऱ्याची उंची 10 m आहे.
02:49 उंची ऍडजस्ट केल्यावर Height चे लेबल दिसेनासे होईल.
02:53 आपण चौथऱ्याची उंची शून्यापासून ते 15 m पर्यंत बदलू शकतो.
02:59 सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा.
03:03 डीफॉल्ट रूपात, तोफेचा कोन शून्य अंशावर आहे.
03:08 तोफेचा कोन वजा 90 अंशांपासून ते 90 अंशांपर्यंत बदलता येऊ शकतो.
03:14 ड्रॅग करून तोफेचा कोन शून्य अंश करा.
03:18 स्क्रीनच्या खालील भागात प्रारंभिक वेग बदलण्यासाठी स्लायडर,
03:23 गतिमार्ग खोडण्यासाठी पिवळ्या खोडरबराचा आयकॉन,


03:27 प्रोजेक्टाईल प्रक्षेपित करण्यासाठी लाल रंगाचा Launch Projectile आयकॉन,
03:32 Play/Pause आणि Step ही बटणे,
03:36 ऍनिमेशनचा वेग बदलण्यासाठी Normal आणि Slow ही रेडिओ बटणे आहेत.
03:41 तसेच स्क्रीनवरील चित्र झूम करण्यासाठी डाव्या कोपऱ्यात वरती Zoom in आणि Zoom out ही बटणे आहेत.
03:48 उजवीकडील कोपऱ्यात वरती एका पांढऱ्या रंगाच्या बॉक्समधे probe आणि मोजपट्टीचा समावेश आहे.
03:56 प्रोबचा उपयोग गतिमार्गाची वेळ, पल्ला आणि उंची मोजण्यासाठी केला जातो.
04:02 प्रोजक्टाईल निवडण्यासाठी एक ड्रॉपडाऊन सूची दिली आहे.
04:06 डीफॉल्ट रूपात, Pumpkin हे प्रोजेक्टाईल म्हणून निवडले आहे.
04:10 निवडलेल्या प्रोजेक्टाईलचे वस्तुमान आणि व्यास खाली सूचीत दिसेल.
04:16 पुढे Drag Coefficient सहित Air Resistance समाविष्ट करण्यासाठी चेकबॉक्स आहे.
04:22 आपल्याकडे वेग आणि त्वरण या सदिशांसाठी चेकबॉक्सेस आहेत.
04:28 सूचीतून Human प्रोजेक्टाईल निवडू. Human projectile चे वस्तुमान आणि व्यास यांची नोंद घ्या.
04:38 लाल रंगाच्या Launch आयकॉनवर क्लिक करा. गतीमार्गाचे निरीक्षण करा.
04:44 पुढे तोफेचा कोन बदलून 10 अंश करा.
04:49 प्रोजेक्टाईल लाँच करा.
04:54 तोफेचा कोन बदलल्यामुळे प्रोजेक्टाईलच्या नव्या गतिमार्गाचे निरीक्षण करा.
04:59 सर्वोच्च बिंदू हिरव्या रंगाने दाखवला आहे.
05:03 ड्रॅग करून प्रोब गतीमार्गाच्या सर्वोच्च बिंदूवर न्या.
05:07 सर्वोच्च बिंदूपाशी Time, Range व Height यांची नोंद घ्या.
05:12 एका तक्त्यात Cannon's Angle, Time, Range आणि Height यांचे कॉलम तयार करा.
05:19 मी 10 अंश कोनासाठी व्हॅल्यूज भरत आहे.
05:27 प्रोब ड्रॅग करून परत त्याच्या जागेवर आणा.
05:30 आता मी तोफेचा कोन 20 अंश करत आहे.
05:35 प्रोजेक्टाईल लाँच करून गतिमार्गाचे निरीक्षण करा.
05:40 प्रोब गतीमार्गाच्या सर्वोच्च बिंदूवर ठेवू.
05:44 Time, Range आणि Height यांच्या व्हॅल्यूजची तक्त्यात नोंद करा.

मी नोंद केली आहे.

05:55 असाईनमेंट म्हणून:

तोफेचा कोन बदलून तक्त्यातील नोंदी पूर्ण करा.

06:04 सिम्युलेशन रिसेट करण्यासाठी Reset बटणावर क्लिक करा.
06:08 प्रोजेक्टाईल लाँच करून गतीमार्गाचे निरीक्षण करा.
06:13 संदर्भ रेषेवर टारगेट (लक्ष्य) अशा ठिकाणी हलवा की प्रोजेक्टाईल टारगेटवर पडेल.
06:19 प्रोजेक्टाईल लाँच करून गतीमार्गाचे निरीक्षण करा.
06:23 प्रोजेक्टाईल टारगेट भेदत असताना निर्माण झालेल्या ताऱ्यांचे निरीक्षण करा.
06:27 डीफॉल्ट रूपात, slider 15 मीटर प्रति सेकंद या प्रारंभिक वेगावर आहे.
06:33 आपण प्रारंभिक वेग 0 ते 30 मीटर प्रति सेकंद एवढा बदलू शकतो.
06:39 प्रारंभिक वेगाचा स्लायडर 20 मीटर प्रति सेकंदावर न्या. प्रोजेक्टाईल लाँच करा.
06:49 लक्षात घ्या की आता, प्रोजेक्टाईल अधिक वेगाने जात असून संदर्भ रेषेवर जास्त दूर पडेल.
06:56 Slow या रेडिओ बटणावर क्लिक करून प्रोजेक्टाईल लाँच करा.
07:01 प्रोजेक्टाईलची गती कमी झाल्याचे दिसेल.
07:05 Slow हे रेडिओ बटण निवडल्यामुळे ऍनिमेशनचा वेग कमी होईल.
07:10 यामुळे प्रोजेक्टाईलचा वेग कमी झालेला नाही.
07:14 आधीचे गतीमार्ग खोडून टाकण्यासाठी पिवळ्या eraser च्या आयकॉनवर क्लिक करा.
07:20 तोफेचा कोन वजा 10 अंश आणि प्रारंभिक वेग 25 मीटर प्रति सेकंद करा.
07:28 प्रोजेक्टाईल लाँच करा.
07:34 प्रोजेक्टाईलचा गतीमार्ग आणि त्याने कापलेले अंतर पहा.
07:38 Velocity Vector खालील Total आणि Components या चेकबॉक्सेसवर क्लिक करा.
07:45 प्रोजेक्टाईल लाँच करा.
07:48 गतीमार्गावरील Velocity vector आणि त्यांचे घटक यांची नोंद घ्या.
07:54 चेकबॉक्सेस अनचेक करा.
07:57 Acceleration Vectors' खालील Total आणि Components या चेकबॉक्सेसवर क्लिक करा.
08:03 प्रोजेक्टाईल लाँच करून गतीमार्गाचे निरीक्षण करा.
08:11 असाईनमेंट म्हणून,

1. विविध प्रोजेक्टाईल्स निवडून,

2. आणि प्रारंभिक वेग आणि चौथऱ्याची उंची बदलून, प्रोजेक्टाईल गतींचे निरीक्षण करा.

08:23 आता आपण Vectors स्क्रीनवर जाऊ.
08:27 Vectors स्क्रीनवर क्लिक करा.
08:30 हवेच्या रोधामुळे वेग, त्वरण आणि बल यावरील परिणाम या स्क्रीनवर आपण पाहू.
08:39 Vectors स्क्रीनवरही जवळपास Intro स्क्रीनप्रमाणे टूल्स आहेत.
08:44 या स्क्रीनवर चौथऱ्याची उंची 0 मीटर आणि तोफेचा कोन 80 अंश आहे.
08:52 तोफेचा कोन 70 अंश करून प्रोजेक्टाईल लाँच करा.
09:03 येथे आपल्याकडे तोफगोळा हे एकच प्रोजेक्टाईल आहे.
09:07 ड्रॅग करून त्याचा व्यास आणि वस्तुमान बदलू शकतो.
09:14 Air Resistance चेकबॉक्स अनचेक करून प्रोजेक्टाईल लाँच करा.
09:27 हवेचा रोध नसताना, प्रोजेक्टाईल जास्त उंचीवर आणि जास्त लांब जाते .
09:34 आता पुढील चेकबॉक्सेसवर क्लिक करा- Velocity Vectors,
09:40 Acceleration Vectors,
09:42 Force Vectors.
09:44 प्रोजेक्टाईल लाँच करा.
09:46 तुम्हाला गतीमार्गावर सदिश घटक दिसतील.
09:51 आता आपण Drag स्क्रीनवर जाऊ.
09:54 इंटरफेसच्या तळाशी असलेल्या Drag स्क्रीनवर क्लिक करा.
09:59 या स्क्रीनवर आपण drag force वर परिणाम करणारे घटक शोधू,
10:05 drag force आणि वेगातील संबंध पाहू.
10:10 शिवाय या स्क्रीनवर Drag Coefficient आणि Altitude स्लायडर्स आहेत.
10:16 आता Drag Coefficient स्लायडर हलवून 0.04 पर्यंत न्या.
10:21 प्रोजेक्टाईलच्या आकाराचे निरीक्षण करा. हे पाण्याच्या थेंबासारखे दिसत आहे.
10:27 प्रोजेक्टाईल लाँच करून गतीमार्गाचे निरीक्षण करा.
10:37 drag coefficient लहान असल्यास प्रोजेक्टाईल जास्त उंची गाठते आणि जास्त लांब जाते.
10:45 प्रोब ड्रॅग करून तो सर्वोच्च बिंदूवर ठेवा.
10:49 प्रोब प्रोजेक्टाईलचा Time, Range आणि Height दाखवेल.
10:54 प्रोब ड्रॅग करून त्याच्या मूळ जागेवर नेऊन ठेवा.
10:57 प्रारंभिक वेग बदलून 14 मीटर प्रति सेकंद करा आणि Drag Coefficient बदलून 0.45 करा.
11:06 झूम करून बघण्यासाठी Zoom In बटणावर क्लिक करा.
11:11 प्रोजेक्टाईल लाँच करून गतीमार्गाचे निरीक्षण करा.
11:17 पुन्हा नॉर्मल व्ह्यूसाठी Zoom Out बटणावर क्लिक करा.
11:21 आता Drag coefficient स्लायडर हलवून 0.50 वर न्या.
11:27 प्रारंभिक वेग बदलून 24 मीटर प्रति सेकंद करा.
11:32 Altitude स्लायडर ड्रॅग करून 1700 मीटरवर न्या आणि प्रोजेक्टाईल लाँच करा.
11:45 गतीमार्गाचे निरीक्षण करा.
11:50 मोजपट्टीचा वापर करून प्रोजेक्टाईलने किती अंतर कापले ते पहा.
12:06 आता Lab स्क्रीनवर जाऊया.
12:09 Lab स्क्रीनवर क्लिक करा.
12:12 या स्क्रीनवर आपल्याकडे प्रोजेक्टाईल्सची सूची आहे.
12:16 प्रोजेक्टाईल म्हणून Custom हा पर्याय निवडा.
12:20 येथे आपण Mass ची व्हॅल्यू,
12:24 तसेच Diameter,
12:26 Gravity,
12:28 Altitude आणि Drag Coefficient स्वतः बदलू शकतो.
12:33 प्रत्येक attribute च्या शेजारी असलेले पिवळ्या रंगाचे edit बटण दिसेल.
12:38 या बटणांच्या सहाय्याने तुम्ही स्वतः त्यांच्या किंमती बदलू शकता.
12:43 आता मी Gravity ची किंमत बदलणार आहे.
12:46 Gravityशी संबंधित असलेल्या edit बटणावर क्लिक करा.
12:50 की पॅड उघडेल.
12:53 15 हा पर्याय निवडून एंटर दाबा.
12:59 Air Resistance हा चेक बॉक्स निवडा.
13:03 एडीट बटणाच्या सहाय्याने Altitude ची व्हॅल्यू बदलून 2000 मीटर करा.
13:11 प्रोजेक्टाईल लाँच करून गतीमार्गाचे निरीक्षण करा.
13:17 प्रोजेक्टाईलचा सर्वोच्च बिंदू मोजण्यासाठी प्रोब ड्रॅग करून त्यावर ठेवा.
13:22 असाईनमेंट म्हणून, विविध कस्टम पॅरामीटर्स बदला आणि प्रोजेक्टाईल लाँच करा.
13:29 थोडक्यात,


13:31 या पाठात आपण, Projectile Motion या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघितले.
13:37 हे सिम्युलेशन वापरून आपण पाहिले:

1. प्रत्येक पॅरामीटरचा पदार्थाच्या गतिमार्गावरील प्रभाव.


13:45 2. पदार्थाची प्रारंभिक परिस्थिती दिली असता तो कोठे पडेल याचा अंदाज.


13:51 3. गतीचे क्षितिजाला समांतर(आडवे) व लंब रेषेतील (उभे) घटकांचे एकमेकांवर अवलंबित्व नसणे.


13:58 4. ड्रॅग फोर्सवर परिणाम करणारे व्हेरिएबल्स.


14:03 5. वेग आणि त्वरण यांच्यावर ड्रॅग फोर्सचा होणारा परिणाम.


14:09 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल. हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.
14:16 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते. ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.
14:26 अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.

कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.


14:33 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.
14:41 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे. अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.


14:52 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.

सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali, Radhika