PhET/C3/Models-of-the-Hydrogen-Atom/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:01 स्पोकन ट्युटोरियलच्या Models of the hydrogen atom सिम्युलेशन या पाठात आपले स्वागत.


00:07 या पाठात, Models of the Hydrogen Atom, या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघणार आहोत.


00:16 या पाठासाठी मी:

उबंटु लिनक्स ऑपरेटिंग सिस्टीम वर्जन 14.04

00:24 जावा वर्जन 1.7.0 वापरत आहे.
00:29 हा पाठ समजण्यासाठी, माध्यमिक शाळेतील विज्ञानाचे प्राथमिक ज्ञान असावे.


00:37 हे सिम्युलेशन वापरून आपण हायड्रोजन अणूच्या विविध मॉडेल्सची कल्पना करू.
00:44 प्रत्येक मॉडेलच्या प्रायोगिक अंदाजांचे स्पष्टीकरण देऊ.
00:49 प्रत्येक मॉडेलच्या मर्यादांवर चर्चा करू.
00:53 उर्जा स्तरांच्या आकृतीचे स्पष्टीकरण करू.
00:56 n, l आणि m मूल्यांवरून कक्षांचे आकार आणि ओरिएंटेशन निश्चित करू.
01:03 प्रात्यक्षिकाला सुरूवात करू.
01:06 सिम्युलेशन डाउनलोड करण्यासाठी दिलेली लिंक वापरा.
01:11 मी डाउनलोड्स फोल्डरमधे Models of the Hydrogen Atom सिम्युलेशन आधीच डाउनलोड केले आहे.
01:18 सिम्युलेशन कार्यान्वित करण्यासाठी टर्मिनल उघडा.
01:22 प्रॉम्प्टवर cd space Downloads टाईप करून एंटर दाबा.
01:29 नंतर टाईप करा, java space hyphen jar space hydrogen hyphen atom_en.jar आणि एंटर दाबा.
01:41 Models of the Hydrogen Atom सिम्युलेशन उघडेल.
01:45 स्क्रीनच्या डाव्या कोपर्‍यातील वरती मेनू बारमधे File आणि Help हे घटक आहेत.
01:52 मेनूबारच्या खाली, Experiment आणि Prediction हे दोन पर्याय असलेले करड्या रंगाचे बटण आहे.
02:01 डिफॉल्टरूपात Experiment मोड उघडतो.
02:05 स्क्रीनवरील प्रायोगिक सेटअपमधे फोटॉन्सचे किरण सोडण्यासाठी लाईट गन दिसेल.
02:13 येथे हायड्रोजनचा बॉक्सदेखील आहे.
02:16 हा बॉक्स हायड्रोजन अणूंनी भरलेला आहे.
02:20 झूम-इन बॉक्स एका हायड्रोजन अणूचे प्रतिनिधित्व करतो.
02:25 एक संदेश दिसेल.
02:28 हा आपल्याला प्रकाशकिरण चालू करण्यासाठी लाल बटण क्लिक करण्यास सांगेल.
02:33 लाइट गनमधे White आणि Monochromatic असे दोन प्रकाश नियंत्रक आहेत.
02:41 डिफॉल्टरूपात White प्रकाश निवडला आहे.
02:45 करड्या रंगाच्या बटणावरील Prediction पर्यायावर क्लिक करा.
02:49 स्क्रीनच्या डाव्या बाजुला Atomic Model पॅनेल उघडेल.
02:54 यात Classicalआणि Quantum Atomic Models ची सूची आहे.
02:59 येथे आपण मॉडेलचे अंदाज प्रायोगिक परिणामांशी कसे जुळतात हे पाहू शकतो.
03:06 स्क्रीनच्या उजव्या बाजूस Legend बॉक्समध्ये सबऍटोमिक कणांची यादी आहे.
03:13 स्क्रीनच्या तळाशी अ‍ॅनिमेशनचा वेग नियंत्रित करणारा स्लाइडर तसेच Play/Pause आणि Step बटणे आहेत.
03:25 अणूचे पहिले सुचवलेले मॉडेल Billiard Ball मॉडेल आहे.
03:30 डिफॉल्ट रूपात यादीतून Billiard Ball निवडलेले आहे.
03:35 Billiard Ball मॉडेल
03:38 Billiard Ball मॉडेलला Dalton चे अणु मॉडेल देखील म्हणतात.
03:44 हे मॉडेल जॉन डाल्टन यांनी सुचवलेले होते.
03:48 या मॉडेलनुसार, प्रत्येक अणू बिलियर्ड बॉलसारखा घन, कठीण गोल असल्याची कल्पना केली आहे.
03:58 लाईट गनच्या लाल बटणावर क्लिक करा.
04:02 White लाईट निवडा.
04:05 वेगवेगळ्या तरंगलांबी असलेल्या फोटॉनचा किरण हायड्रोजन बॉक्समधून जातो.
04:11 हायड्रोजन अणूंच्या मार्गावरील सर्व फोटॉन दिशा बदलत असल्याचे दिसेल.
04:17 Billiard Ball मॉडेलच्या मर्यादा.
04:21 येथे Billiard Ball मॉडेलच्या मर्यादा दिसत आहेत.


04:27 सिम्युलेशनवर परत जाऊ.
04:30 प्रकाशकिरण बंद करा.
04:33 Atomic Model यादीमधून Plum Pudding वर क्लिक करा.
04:37 हे मॉडेल 1898 मधे जे. जे.जे.थॉमसन यांनी मांडले होते.
04:43 धनभार एकसारखा वितरित झालेला असून इलेक्ट्रॉन्स त्यात स्थापित झालेले आहेत.
04:50 तपकिरी रंगाचे वस्तुमान हा धनभार आहे.
04:53 मध्यभागी निळ्या रंगाचा कण इलेक्ट्रॉन आहे.
04:57 Show spectrometer च्या चेक बॉक्सवर क्लिक करा.
05:01 प्रकाशकिरण चालू करा.
05:04 White लाईट निवडा.
05:07 जेव्हा फोटॉन इलेक्ट्रॉनवर आपटतात, तेव्हा इलेक्ट्रॉन हलतो आणि फोटॉन विक्षेपित(डिफ्लेक्ट) होतात.
05:13 लक्षात घ्या की वर्णपटात फक्त उत्सर्जित uv (अतिनील) फोटॉन असतात.
05:19 प्रकाशकिरण बंद करा.
05:23 Plum Pudding मॉडेलच्या मर्यादा
05:27 येथे Plum Pudding मॉडेलच्या मर्यादा आहेत.


05:32 वरील निरीक्षणाच्या आधारे रदरफोर्डने अणूचे Classical solar system मॉडेल मांडले.
05:42 रदरफोर्डचे हे अणूचे न्यूक्लियर मॉडेल लहान प्रमाणातील सौर यंत्रणेसारखे आहे.
05:49 न्यूक्लियस सूर्याची आणि फिरणारे ग्रह इलेक्ट्रॉन्सची भूमिका बजावतात.
05:55 अणूच्या अतिसूक्ष्म धनभाराच्या भागाला न्यूक्लियस म्हणतात.
06:01 इलेक्ट्रॉन्स न्युक्लियसभोवती फिरत असतात.
06:05 ते प्रचंड वेगाने वर्तुळाकार मार्गात फिरतात ज्यांना कक्षा म्हणतात.
06:11 सिम्युलेशनवर परत जाऊ.


06:14 सिम्युलेशन थांबवा.
06:17 सूचीमधून Classical Solar System वर क्लिक करा.
06:21 स्क्रीनच्या उजव्या वरील कोपर्‍यात Show electron energy level diagram चेक बॉक्स आहे.
06:28 चेक बॉक्सवर क्लिक करा.
06:31 हा डायग्राम इलेक्ट्रॉनची उर्जा दर्शवतो.
06:35 हे मॉडेल खरे असल्यास इलेक्ट्रॉनला स्पायरल मार्गाने फिरत न्यूक्लियसमध्ये पडण्यास फक्त एका सेकंदाचा काही अंश लागेल.
06:43 प्रकाशकिरण चालू करा.


06:46 ऍनिमेशन वेगाचा स्लाइडर slow वर ड्रॅग करा.
06:50 इलेक्ट्रॉनची उर्जा पाहण्यासाठी Step बटणावर क्लिक करा.
06:55 इलेक्ट्रॉनची उर्जा एका सेकंदाच्या काही भागातच जास्तीतजास्त कडून कमीतकमीकडे जाईल.
07:03 आपल्याला माहित आहे की असे होत नाही.
07:07 अणू स्थिर असल्याचे आपल्याला माहित आहे.
07:10 प्रकाशकिरण बंद करा.
07:13 रदरफोर्ड Solar System मॉडेलची मर्यादाः अणूची स्थिरता, इलेक्ट्रॉन डिस्ट्रीब्युशन आणि त्यांच्या ऊर्जा यांचे स्पष्टीकरण करू शकत नाही.
07:28 सिम्युलेशनवर परत जाऊ.
07:31 Atomic Model यादीमधून Bohr वर क्लिक करा.
07:35 नील्स बोर यांनी रदरफोर्डच्या मॉडेलमध्ये सुधारणा करण्यासाठी हायड्रोजन अणूचे मॉडेल सुचवले.
07:42 या मॉडेलप्रमाणे, इलेक्ट्रॉन निश्चित त्रिज्या आणि उर्जेच्या कक्षेत न्युक्लियसभोवती फिरतो.
07:50 कक्षेतील इलेक्ट्रॉनची ऊर्जा वेळेबरोबर बदलत नाही.
07:56 ह्या कक्षांना उर्जा स्तर असे म्हटले जाते.
08:00 या कक्षा Electron energy level डायग्राममधे n=1,2,3,4 या प्रकारे प्रतिनिधीत्व करतात.
08:13 प्रकाशकिरण चालू करा.
08:15 Play बटणावर क्लिक करा.
08:18 सुरुवातीला एक इलेक्ट्रॉन अणूच्या पहिल्या कक्षेत आहे.
08:23 Electron energy level डायग्राम इलेक्ट्रॉनला पहिल्या स्तरावर दाखवत आहे.
08:29 Electron energy level डायग्राममधे झालेले इलेक्ट्रॉन संक्रमण पहा.
08:34 फोटॉनला शोषून घेतल्याने इलेक्ट्रॉन उत्तेजित होऊन वरच्या स्तरावर जातो.
08:39 जेव्हा इलेक्ट्रॉन वरच्या स्तरावरून खालच्या स्तरावर जातो तेव्हा ऊर्जा उत्सर्जित होते.
08:45 हा इलेक्ट्रॉन परत त्याच्या पहिल्या स्तरावर आला आहे.
08:49 स्पेक्ट्रोमीटरचे निरीक्षण करा.
08:52 स्पेक्ट्रोमीटर उत्सर्जित फोटॉन दर्शवितो.
08:56 Light controls च्या खालील Monochromatic रेडिओ बटणावर क्लिक करा.
09:01 नंतर Show absorption wavelengths चेकबॉक्स क्लिक करा.
09:05 आपल्याला चार उभ्या वर्णपट रेषा दिसतील.
09:09 या रेषा शोषलेल्या प्रकाशाच्या तरंगलांबींचे प्रतिनिधित्व करतात.
09:14 स्लाइडर पहिल्या ओळीवर हायलाईट केला आहे.
09:18 टेक्स्टबॉक्समध्ये तरंगलांबी 94 nm दिसत आहे.
09:23 फोटॉन इलेक्ट्रॉनवर आपटत असताना, Electron energy level आकृतीमधील 94 nm पाशी झालेले इलेक्ट्रॉनचे संक्रमण पहा.
09:32 इलेक्ट्रॉन n= 6 या स्तरापर्यंत गेला आहे.
09:36 थोड्या वेळात फोटॉन उत्सर्जित करून इलेक्ट्रॉन खालच्या पातळीवर येतो.
09:42 प्रकाशकिरण बंद करा.
09:45 असाईनमेंट म्हणून Bohrअणू मॉडेल निवडा.
09:50 प्रकाशकिरण Monochromatic मधे बदला.
09:53 103 nm, 112 nm, आणि 122 nm तरंगलांबींचा प्रकाश शोषून घेणारी इलेक्ट्रॉन संक्रमणे तुम्हाला दिसतील.
10:04 उर्जा स्तरावरील आकृती आणि स्पेक्ट्रोमीटर परिणामांचे निरीक्षण करा.
10:09 निरीक्षणांची नोंद करून स्पष्टीकरण द्या.
10:13 Bohr मॉडेलच्या मर्यादा.


10:16 बोरचे मॉडेल खालील घटना स्पष्ट करण्यात अक्षम आहे.
10:24 सिम्युलेशनवर परत जाऊ.


10:26 इलेक्ट्रॉन्सच्या दुहेरी वर्तनावर आधारित आणखी एक मॉडेल सुचवले होते.
10:32 Atomic Model यादीमधून de Broglie वर क्लिक करा.
10:36 झूमइन बॉक्समध्ये इलेक्ट्रॉन दर्शविणारा तरंग पहा.
10:42 deBroglie Atomic Model: de Broglie या फ्रेंच भौतिकशास्त्रज्ञाने 1924 मधे इलेक्ट्रॉनचे दुहेरी वर्तन सुचवले.
10:51 रेडिएशनप्रमाणे, पदार्थसुध्दा कण आणि तरंग या दोन्हींचे गुणधर्म दाखवतो.
10:58 इलेक्ट्रॉन्सला सुध्दा संवेग तसेच तरंगलांबी असायला पाहिजे.
11:03 प्रकाशकिरण चालू करा.


11:05 इलेक्ट्रॉन फोटॉन शोषून घेतो आणि उच्च उर्जा पातळीच्या कक्षेत जातो हे बघा.
11:12 उच्च उर्जा स्तरावरील इलेक्ट्रॉन उर्जेचे उत्सर्जन करतो.
11:16 हा खालील उर्जा पातळीच्या कक्षेत परत येतो.
11:20 energy level diagram मधील इलेक्ट्रॉन संक्रमणे पहा.
11:25 व्ह्यू बॉक्सच्या वरील डाव्या कोप-यात radial view ड्रॉप डाऊन बॉक्स आहे.
11:30 ड्रॉप-डाऊन बाणावर क्लिक करा.
11:33 3D view वर स्क्रोल करा आणि त्यावर क्लिक करा.
11:37 आता 3D view मध्ये इलेक्ट्रॉनचे वेव्ह नेचर पहा.
11:42 प्रकाशकिरण बंद करा.
11:45 हायड्रोजन अणूच्या वर्णपटाचे स्पष्टीकरण देण्यासाठी, क्वांटम मेकॅनिक्सचा सिद्धांत अस्तित्वात आला.
11:53 Schrödinger मॉडेल : Erwin Schrödinger ने अणूचे क्वांटम मेकॅनिकल मॉडेल मांडले.
12:00 Schrödinger ने इलेक्ट्रॉन असण्याच्या संभाव्यतेचे वर्णन करण्यासाठी गणिताची समीकरणे वापरली.
12:07 Quantum नंबर्स: Schrodinger's च्या वेव्ह समीकरणातून मिळणारे कोऑर्डिनेट्स Principal (n), Angular (l), आणि Magnetic (m) हे तीन quantum नंबर्स असतात.
12:19 Quantum नंबर्स कक्षेचा आकार, आणि कक्षेच्या ओरिएंटेशनचे वर्णन करतात.
12:26 सिम्युलेशनवर परत जाऊ.


12:29 सूचीमधून Schrödinger वर क्लिक करा.
12:32 झूम इन बॉक्समध्ये, इलेक्ट्रॉनच्या ढगाने वेढलेला न्यूक्लियस या स्वरूपात अणू दर्शविला जातो.
12:38 White लाइटवर परत जा.
12:41 प्रकाशकिरण चालू करा.
12:43 फोटॉन शोषून घेऊन इलेक्ट्रॉन वेगवेगळ्या कक्षांकडे जात असल्याचे दिसेल.
12:49 इलेक्ट्रॉन फिरत असताना ऑर्बिटल्सचे आकार पहा.
12:54 Electron energy level आकृतीमधील इलेक्ट्रॉन संक्रमणे लक्षात घ्या.
12:59 n च्या मूल्याव्यतिरिक्त, energy level डायग्राममध्ये l आणि m च्या व्हॅल्यू देखील आहेत.
13:06 व्ह्यू बॉक्सच्या उजव्या कोपऱ्यात तळाशी n, l, m व्हॅल्यू पहा.
13:12 फोटॉन इलेक्ट्रॉनांवर आपटतात तेव्हा n, l, m व्हॅल्यूजमधील बदल पहा.
13:19 प्रयोगात मिळालेले परिणाम केलेल्या अंदाजांशी कसे जुळतात यासाठी सर्व मॉडेल्सची तुलना करा.


13:26 असाईनमेंट म्हणून, Schrodinger च्या अणू मॉडेलसाठी Monochromatic प्रकाश किरण निवडा.
13:34 इलेक्ट्रॉनच्या चार शोषण तरंगलांबीसाठी n,l,m मूल्ये लक्षात घ्या.


13:41 प्रत्येक तरंगलांबीसाठी कक्षेचा आकार आणि संभाव्य ओरिएंटेशन लक्षात घ्या.
13:47 थोडक्यात,
13:49 या पाठात, Models of the Hydrogen Atom, कसे वापरायचे या PhET सिम्युलेशनचे प्रात्यक्षिक बघितले.


13:59 हे सिम्युलेशन वापरून आपण हायड्रोजन अणूच्या विविध मॉडेल्सची कल्पना केली.


14:06 प्रत्येक मॉडेलच्या प्रायोगिक अंदाजांचे स्पष्टीकरण दिले.
14:11 प्रत्येक मॉडेलच्या मर्यादांवर चर्चा केली.
14:15 n, l आणि m मूल्यांमधून कक्षीय आकार आणि ओरिएंटेशन निश्चित केले.


14:22 उर्जा स्तरांची आकृती स्पष्ट केली.
14:25 दिलेल्या लिंकवरील व्हिडिओमधे स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्टचा सारांश मिळेल.


14:30 हा व्हिडिओ डाऊनलोड करूनही पाहू शकता.


14:33 स्पोकन ट्युटोरियल प्रोजेक्ट टीम, स्पोकन ट्युटोरियलच्या सहाय्याने कार्यशाळा चालवते.

ऑनलाईन परीक्षा उत्तीर्ण होणा-या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र देते.


14:42 अधिक माहितीसाठी कृपया येथे लिहा.


14:46 कृपया या फोरममध्ये आपल्या टाईम क्वेरीज पोस्ट करा.
14:51 या प्रकल्पाला पंडित मदन मोहन मालवीय नॅशनल मिशन ऑन टीचर्स अँड टिचिंग यांनी अंशतः अनुदान दिले आहे.


14:59 या प्रोजेक्टसाठी अर्थसहाय्य NMEICT, MHRD, Government of India यांच्याकडून मिळालेले आहे.
15:06 अधिक माहिती या लिंकवर उपलब्ध आहे.


15:11 ह्या ट्युटोरियलचे भाषांतर मनाली रानडे यांनी केले असून आवाज --- यांचा आहे.


15:15 सहभागासाठी धन्यवाद.

Contributors and Content Editors

Manali