PHP-and-MySQL/C4/User-Password-Change-Part-3/Marathi
From Script | Spoken-Tutorial
Time | Narration |
00:03 | “change password” ट्युटोरियलच्या तिस-या भागात स्वागत. येथे आपण डेटाबेसमधे पासवर्ड बदलणार आहोत. |
00:11 | आपण डेटाबेसला आधीच जोडलेले आहोत. |
00:14 | ती कमांड आधीच दिलेली असल्याने पुन्हा जोडायची गरज नाही. |
00:23 | आता “query change” नावाची query बनवू. ज्याची व्हॅल्यू “mysql m-y-s-q-lunderscore query" function च्या समान असेल. |
00:30 | हा कोडचा नवीन भाग आहे. आता खाली scroll करू म्हणजे तुम्ही नीट बघू शकाल. |
00:36 | येथे “UPDATE users” लिहू, जे आपले टेबल आहे. त्यामुळे "users" table “UPDATE” करण्यासाठी, |
00:44 | “SET password equal to new password” असे लिहू. |
00:51 | येथे अवतरण चिन्हे वापरल्याची खात्री करा. |
00:56 | टाईप करा WHERE username is equal to the व्हेरिएबल "user" जे माझ्या चालू पेजवर आहे. |
01:03 | आता येथे ह्या कॉलममधे, |
01:07 | जे काही आहे ती याची व्हॅल्यू असेल. |
01:12 | आपण php session आधीच प्रक्रियित केलेले आहे, |
01:18 | जे "Alex" च्या समान आहे. |
01:21 | ह्या कोडचा अर्थ असा की टेबल update करा. हा पासवर्ड युजरने दिलेल्या नव्या पासवर्डने बदला. त्याला हा नवा पासवर्ड हवा आहे. |
01:32 | “where” ला Alex मध्ये बदला. |
01:37 | कारण हे Alex च्या समान आहे. |
01:40 | त्यामुळे पासवर्ड बदलेल कारण हे युजर नेम Alex आहे. |
01:45 | हे 900 ने सुरू होत आहे. आपण हे बदलल्यावर रिफ्रेश करून पासवर्ड बदलल्याचे तपासू शकतो. |
01:56 | आणखी काही गोष्टी समाविष्ट करू . |
02:03 | येथे लिहू. |
02:06 | पेज संपवूया. त्यासाठी लिहा “die” आणि नंतर कंसात “Your password has been changed”. |
02:15 | येथे “return”अशी लिंक टाकु आणि ते मुख्य पेज वर पुन्हा जाईल. |
02:23 | म्हणजेच “index.php”. |
02:27 | पेज बंद करण्यापूर्वी हे session destroyकरू. |
02:31 | त्यासाठी “session destroy”. |
02:33 | कारण एकदा युजरने पासवर्ड बदलल्यावर ही लिंक त्याला मुख्य पेजवर घेऊन जाईल आणि हे session destroy होईल. |
02:42 | नंतर त्यांना पुन्हा नव्या पासवर्डने login करावे लागेल. |
02:50 | जर हे तपासून पहायचे असेल तर लक्षात ठेवा, माझा current पासवर्ड "abc" ज्याचा md5 hash , 900 ने सुरू होतो. |
03:00 | जर येथे मागे गेलो, माझा जुना पासवर्ड "abc" टाईप केला, नवा पासवर्ड "123" टाईप केला आणि “change password” वर क्लिक केले. तर येथे सर्व validation तपासली गेली आहे. पासवर्ड बदलला गेला आहे. आणि आपल्याला return back to the main page हा मेसेज मिळाला आहे. |
03:18 | आता जर मी मेंबर पेजवर जाण्याचा प्रयत्न केला तर मला you must be logged in हा मेसेज दिसेल. आपले session destroyझाले कारण आपण “session destroy” हे फंक्शन वापरले होते. |
03:32 | पुन्हा login करताना मी "abc" हा जुना पासवर्ड टाईप केल्यास “Incorrect password” असा मेसेज मिळेल. |
03:43 | जर "123" ने तपासले तर you’re urin in हा मेसेज दिसेल. |
03:50 | आता “browse” क्लिक करू. खाली scroll केल्यावर दिसेल, 900 ने सुरू होणारा पासवर्ड आता 202 ने सुरू झाला आहे. |
03:59 | त्यामुळे हा पूर्ण नवा hash आणि नवा password आहे. |
04:06 | आता सर्व नीट कार्य करत आहे. आणि हे सोपे आहे. |
04:11 | तुम्हाला "sql" queriesनीट येणे आवश्यक आहे. त्यासंबंधीचा पाठ उपलब्ध आहे. |
04:18 | जुना पासवर्ड आणि दोन नवे पासवर्ड कसे तपासायचे ह्याबद्दल नीट विचार करा. |
04:24 | तसेच registrationकरताना पासवर्ड किती मोठा असावा त्याच्या काही मर्यादा असतात. |
04:31 | पासवर्ड हा 6 अक्षरांपेक्षा जास्त आणि 25 पेक्षा कमी असायला हवा ही कंडिशन घालून तपासून पहा. |
04:42 | अशा अनेक गोष्टी तपासता येऊ शकतात. हा php मधे mysql m-y-s-q-l databaseद्वारे पासवर्ड बदलण्याचा प्राथमिक आराखडा आहे. |
04:53 | आपल्याला हे उपयोगी होईल अशी आशा करू. काही शंका असल्यास आम्हाला कळवा. video updates साठी subscribe करा. |
05:01 | सहभागाबद्दल धन्यवाद. हे भाषांतर मनाली रानडे ह्यांनी केले असून आवाज रंजना भांबळे यांचा आहे. |