PHP-and-MySQL/C4/Cookies-Part-2/Marathi

From Script | Spoken-Tutorial
Jump to: navigation, search
Time Narration
00:00 या ट्युटोरियलमधे स्वागत. पहिल्या भागात आपण शिकलो cookie बनवणे, तिला expiry date देणे आणि हव्या त्या cookies प्रिंट करणे.
00:13 ह्या कमांडद्वारे संचित केलेली cookie प्रिंट करायला शिकलो.
00:18 cookies बनवल्या आहेत असे समजू. आता ही विशिष्ट cookie वापरणार आहोत. ती उपलब्ध आहे की नाही ते तपासणार आहोत.
00:28 त्यासाठी isset हे फंक्शन वापरू.
00:32 हे एखादी गोष्ट सेट आहे की नाही त्यानुसार true किंवा false व्हॅल्यू रिटर्न करते.
00:37 उदाहरणार्थ cookie. येथे टाईप करा dollar sign underscore cookie.
00:42 आणि येथे 'name' असे टाईप करा.
00:46 हे इंग्रजीत कसे वाचायचे ते पाहू.
00:49 जर या नावाची cookie सेट असल्यास आपण “Cookie is set” एको करू.
00:57 नसल्यास "Cookie is not set" एको करू.
01:01 असे समजू की cookie सेट केल्या आहेत आणि सर्व नीट कार्य करत आहे. रिफ्रेश केल्यावर "Cookie is set" मेसेज दिसेल.
01:11 आता cookie अनसेट कशी करायची ते पाहू.
01:14 येथे 'if' स्टेटमेंटच्या आधी आपल्याला cookie अनसेट करायची आहे.
01:20 येथे लिहा unset cookie. समजा ही cookie अनसेट करायची आहे,
01:25 एकदा अनसेट करायला शिकल्यावर तुम्हाला हेही अनसेट करता येईल.
01:31 आपण ही name cookie अनसेट करू.
01:34 अनसेट करण्यासाठी 'setcookie' हीच कमांड वापरली जाते.
01:39 म्हणजे आपण cookie रीसेट करत आहोत.
01:41 ह्यातून अर्थबोध होत नाही परंतु लवकरच होईल.
01:45 आपण cookie ला कुठलेही नाव सेट करणार नाही.
01:49 आणि येथे आपली expiry date.
01:51 येथे "exp unset" हे नवे व्हेरिएबल बनवू.
01:55 त्याची व्हॅल्यू time वजा 86400 देऊ.
02:01 येथे अधिकचा अर्थ भविष्यातील वेळ असा आहे.
02:05 भविष्यातील वेळ दाखवणा-या व्हेरिएबलला cookie सेट करताना प्रत्यक्षात आपण cookie अनसेट करत असतो.
02:13 असे म्हणता येईल की name नावाची cookie आपण 'no value' ला सेट करत आहोत.
02:20 त्यासाठी exp unset हा भविष्यातील वेळ दाखविणारा व्हेरिएबल वापरल्याने cookie अनसेट होते.
02:28 आत्ता हा कोड काढून टाकून हे पेज कार्यान्वित करा.
02:34 काही झाले नाही याचा अर्थ cookie अनसेट झाली आहे.
02:40 आता आपल्याला कोड नको आहे म्हणून त्याला कमेंट करू.
02:45 आणि पेजवर 'if' स्टेटमेंट पुन्हा लिहू.
02:48 name नावाची cookie आहे का? हा प्रश्न विचारत आहोत. "Cookie is not set" उत्तर मिळाले पाहिजे.
02:56 रिफ्रेश केल्यावर "Cookie is not set" असे मिळाले.
03:02 हवे असल्यास येथे पुन्हा सेट करून cookie ची व्हॅल्यू बदलू शकता.
03:08 cookie ची व्हॅल्यू बदलण्यासाठी 'setcookie' कमांड पुन्हा वापरावी लागेल.
03:13 म्हणजे set cookie, name आणि येथे नवी व्हॅल्यू टाईप करा.
03:17 अशाप्रकारे cookies वापरणे कठीण नाही.
03:19 ही सोपी प्रोसेस आहे.
03:21 ही php मधील अत्यंत उपयोगी गोष्ट आहे.
03:23 त्याचा भरपूर वापर करा.
03:27 काही शंका असल्यास आम्हाला कळवा. धन्यवाद.

Contributors and Content Editors

Kavita salve, PoojaMoolya, Pratik kamble